अळूवड्या.

ज्योति प्रकाश's picture
ज्योति प्रकाश in पाककृती
11 Aug 2011 - 2:57 pm


साहित्यः-तीन अळूवड्याची पाने.
पाव किलो बेसनपीठ.
एक वाटी चिंचेचा कोळ.
एक वाटी किसलेला गूळ.
अर्धा चमचा हळद.
दोन ते अडीच चमचे तिखट .
मिठ.
कृती :-अळूवड्याची पाने धुवून व पुसून घ्यावी.पाने उलती ठेवून त्याच्या शिरांवरून लाटणे फिरवावे म्हणजे शिरा
मोडल्या जातात. नंतर एका भांड्यात बेसनपीठ्,चिंचेचा कोळ,किसलेला गूळ,हळद,तिखट व मिठ घेवून ते
चांगले मिक्स करावे. पाणी घालून जरा पातळ करून घ्यावे. चव घेवून बघा.मस्त आंबट्,गोड,तिखट चव
लागली पाहिजे. हे तयार मिश्रण एक मोठ पान घेऊन त्यावर पसरवा.त्यावर दुसरे पान ठेवून त्यावर पण
मिश्रण लावा.परत व तिसरे पान ठेवून मिश्रण लावा.आता ह्या तयार पानाच्या बाजू दुमडून घ्या.(म्हणजे
रोल केल्यावर मिश्रण बाहेर येणार नाही.)आता पानाच्या टोकापासून गूंडाळायला घ्या.रोल झाल्यावर तो
सुटेल असं वाटत असल्यास त्याला दोर्‍याने गुंडाळा. हे रोल कुकरमधे चाळणीवर ठेवून्,शिटी काढून
२०-२५ मिनीटे वाफवा.थंड झाल्यावर कापून वड्या तेलात खरपूस तळा किंवा तव्यावर शॅलो फ्राय करा.

प्रतिक्रिया

वाह...माझ्या आज्जीची आठवण झाली ....ती पण अश्याच सुंदर अळूच्या वड्या करायची...बाकी पाककृती एकदम झक्कास...उकडलेल्या वाद्यांचे फोटो टाकले असते तर अजून व्यवस्थित कळलं असतं

भक्ती

वाह...माझ्या आज्जीची आठवण झाली ....ती पण अश्याच सुंदर अळूच्या वड्या करायची...बाकी पाककृती एकदम झक्कास...उकडलेल्या वाड्यांचे फोटो टाकले असते तर अजून व्यवस्थित कळलं असतं

जाई.'s picture

11 Aug 2011 - 3:15 pm | जाई.

वाँव सुपर्ब अळुवड्या पाहुन खायची इच्छा झाली
आईला सांगितल पाहिजे

परिकथेतील राजकुमार's picture

11 Aug 2011 - 3:22 pm | परिकथेतील राजकुमार

ज ब रा ट एकदम.
परवाच मटा मध्ये सविस्तर पाकॄ वाचुन पहिले काका हलवाई गाठले होते.

अळु खाजरा आहे का नाही हे ओळखण्याची सोपी युक्ती कोणास माहिती आहे काय ?

ज्योति प्रकाश's picture

11 Aug 2011 - 3:28 pm | ज्योति प्रकाश

अहो मलापण मटा मध्ये वाचल्यावर वड्या करायची तिव्र ईच्छा झाली म्हणून लगेच केल्या व जीव तृप्त केला.

शाहिर's picture

11 Aug 2011 - 3:41 pm | शाहिर

लगेच कळेल खाजरा आहे का ..किंवा आधि कोणाला तरी टेस्ट करायला द्या

हो खाजरा असेल तर खूपच विरस होतो :) आधिच काही काळजी घेता येते का ?

ज्योति प्रकाश's picture

11 Aug 2011 - 6:25 pm | ज्योति प्रकाश

म्हणूनच यांत चिंच जास्त घालतात्.म्हणजे खाज येत नाही.

बहुगुणी's picture

11 Aug 2011 - 10:29 pm | बहुगुणी

छान पाककृती, धन्यवाद! (आता कोण करून खायला घालेल ते शोधायला हवं! इथे आळूची पानं दिसायची मारामार!)

काळ्या देठाचा आळू कमी खाजरा असतो (असं म्हणतात :) अनुभव नाही!)....

जागू ताईंचा याचविषयीचा जुना धागा आठवला.

जागु's picture

11 Aug 2011 - 11:27 pm | जागु

छान.

कच्ची कैरी's picture

12 Aug 2011 - 1:05 pm | कच्ची कैरी

माझा आवडता प्रकार !
@खाडाद्-लिंबाचा रस घातल्यनेही अळूचा खाजरेपणा कमी होतो.

कोणतेही आम्ल घातले की कमी होतो खाजरेपणा. मला वाटते कॅल्शियम ऑक्झेलेटचे स्फटिक या पानांत असतात. ते पानांचा नैसर्गिक संरक्षणाचा प्रकार आहेत. (गुरांनी खाऊ नये म्हणून.. कारण एकदा खाल्ल्यास घसा ओरखडला जाऊन पुढच्या वेळी गुरे तोंड लावत नाहीत.)

चिंचेतील आम्लाने हे स्फटिक विरघळतात आणि टोचत / खाजत नाहीत.

असो.. रसायनशास्त्र बास.

आपल्याला तर अळकुड्यांपासून अळूच्या फदफदद्यापर्यंत सर्व काही जिवापाड आवडते.

अळूवडी हाही वीक पॉईंट. कुरकुरीत पाहिजे मात्र..

झकास झालेली दिसतेय.. पाकृबद्दल आभार्स.

michmadhura's picture

12 Aug 2011 - 3:10 pm | michmadhura

पाने उलती ठेवून त्याच्या शिरांवरून लाटणे फिरवावे म्हणजे शिरा
मोडल्या जातात>>>>>> हे माहीत नव्हतं, पुढ्च्यावेळी नक्की करेन.

खाजरेपणा कमी करण्यासाठी आम्ही आगळ (कोकमाचा रस) लावतो.

मस्तच.
ह्या अळूवड्या तळून खाल्ल्या तरी मस्त किंवा ह्यांची शेवभाजी सारखी भाजी पण करता येते.
शिजवलेल्या वड्या ग्रेवी झाली कि त्यात टाकून ग्यास मंद करून ४/५ मी. शिजू द्याव्यात

सही रे सई's picture

16 Aug 2011 - 2:04 pm | सही रे सई

बेसन ऐवजी भाजणीचे पिठ वापरतात आमच्याकडे. त्याने आणखीनच छान चव येते. बघा करुन आणि सांगा.

पर्नल नेने मराठे's picture

18 Aug 2011 - 2:05 pm | पर्नल नेने मराठे

आम्च्या गावात कॅन्ड अळुचे उन्डे मिळतात. कॅन उघडायचा आतला उन्डा चिरुन मग शॅलो फ्राय करायच्या ;)