मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अळूवड्या.

ज्योति प्रकाश · · पाककृती
साहित्यः-तीन अळूवड्याची पाने. पाव किलो बेसनपीठ. एक वाटी चिंचेचा कोळ. एक वाटी किसलेला गूळ. अर्धा चमचा हळद. दोन ते अडीच चमचे तिखट . मिठ. कृती :-अळूवड्याची पाने धुवून व पुसून घ्यावी.पाने उलती ठेवून त्याच्या शिरांवरून लाटणे फिरवावे म्हणजे शिरा मोडल्या जातात. नंतर एका भांड्यात बेसनपीठ्,चिंचेचा कोळ,किसलेला गूळ,हळद,तिखट व मिठ घेवून ते चांगले मिक्स करावे. पाणी घालून जरा पातळ करून घ्यावे. चव घेवून बघा.मस्त आंबट्,गोड,तिखट चव लागली पाहिजे. हे तयार मिश्रण एक मोठ पान घेऊन त्यावर पसरवा.त्यावर दुसरे पान ठेवून त्यावर पण मिश्रण लावा.परत व तिसरे पान ठेवून मिश्रण लावा.आता ह्या तयार पानाच्या बाजू दुमडून घ्या.(म्हणजे रोल केल्यावर मिश्रण बाहेर येणार नाही.)आता पानाच्या टोकापासून गूंडाळायला घ्या.रोल झाल्यावर तो सुटेल असं वाटत असल्यास त्याला दोर्‍याने गुंडाळा. हे रोल कुकरमधे चाळणीवर ठेवून्,शिटी काढून २०-२५ मिनीटे वाफवा.थंड झाल्यावर कापून वड्या तेलात खरपूस तळा किंवा तव्यावर शॅलो फ्राय करा.

वाचने 6868 वाचनखूण प्रतिक्रिया 16

bhaktipargaonkar 11/08/2011 - 15:07
वाह...माझ्या आज्जीची आठवण झाली ....ती पण अश्याच सुंदर अळूच्या वड्या करायची...बाकी पाककृती एकदम झक्कास...उकडलेल्या वाद्यांचे फोटो टाकले असते तर अजून व्यवस्थित कळलं असतं भक्ती

bhaktipargaonkar 11/08/2011 - 15:09
वाह...माझ्या आज्जीची आठवण झाली ....ती पण अश्याच सुंदर अळूच्या वड्या करायची...बाकी पाककृती एकदम झक्कास...उकडलेल्या वाड्यांचे फोटो टाकले असते तर अजून व्यवस्थित कळलं असतं

जाई. 11/08/2011 - 15:15
वाँव सुपर्ब अळुवड्या पाहुन खायची इच्छा झाली आईला सांगितल पाहिजे

ज ब रा ट एकदम. परवाच मटा मध्ये सविस्तर पाकॄ वाचुन पहिले काका हलवाई गाठले होते. अळु खाजरा आहे का नाही हे ओळखण्याची सोपी युक्ती कोणास माहिती आहे काय ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो मलापण मटा मध्ये वाचल्यावर वड्या करायची तिव्र ईच्छा झाली म्हणून लगेच केल्या व जीव तृप्त केला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

शाहिर 11/08/2011 - 15:41
लगेच कळेल खाजरा आहे का ..किंवा आधि कोणाला तरी टेस्ट करायला द्या

बहुगुणी 11/08/2011 - 22:29
छान पाककृती, धन्यवाद! (आता कोण करून खायला घालेल ते शोधायला हवं! इथे आळूची पानं दिसायची मारामार!) काळ्या देठाचा आळू कमी खाजरा असतो (असं म्हणतात :) अनुभव नाही!).... जागू ताईंचा याचविषयीचा जुना धागा आठवला.

कच्ची कैरी 12/08/2011 - 13:05
माझा आवडता प्रकार ! @खाडाद्-लिंबाचा रस घातल्यनेही अळूचा खाजरेपणा कमी होतो.

गवि 12/08/2011 - 13:20
कोणतेही आम्ल घातले की कमी होतो खाजरेपणा. मला वाटते कॅल्शियम ऑक्झेलेटचे स्फटिक या पानांत असतात. ते पानांचा नैसर्गिक संरक्षणाचा प्रकार आहेत. (गुरांनी खाऊ नये म्हणून.. कारण एकदा खाल्ल्यास घसा ओरखडला जाऊन पुढच्या वेळी गुरे तोंड लावत नाहीत.) चिंचेतील आम्लाने हे स्फटिक विरघळतात आणि टोचत / खाजत नाहीत. असो.. रसायनशास्त्र बास. आपल्याला तर अळकुड्यांपासून अळूच्या फदफदद्यापर्यंत सर्व काही जिवापाड आवडते. अळूवडी हाही वीक पॉईंट. कुरकुरीत पाहिजे मात्र.. झकास झालेली दिसतेय.. पाकृबद्दल आभार्स.

michmadhura 12/08/2011 - 15:10
पाने उलती ठेवून त्याच्या शिरांवरून लाटणे फिरवावे म्हणजे शिरा मोडल्या जातात>>>>>> हे माहीत नव्हतं, पुढ्च्यावेळी नक्की करेन. खाजरेपणा कमी करण्यासाठी आम्ही आगळ (कोकमाचा रस) लावतो.

इरसाल 12/08/2011 - 15:44
मस्तच. ह्या अळूवड्या तळून खाल्ल्या तरी मस्त किंवा ह्यांची शेवभाजी सारखी भाजी पण करता येते. शिजवलेल्या वड्या ग्रेवी झाली कि त्यात टाकून ग्यास मंद करून ४/५ मी. शिजू द्याव्यात