मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अळूवड्या.

ज्योति प्रकाश · · पाककृती
Image removed. साहित्यः-तीन अळूवड्याची पाने. पाव किलो बेसनपीठ. एक वाटी चिंचेचा कोळ. एक वाटी किसलेला गूळ. अर्धा चमचा हळद. दोन ते अडीच चमचे तिखट . मिठ. कृती :-अळूवड्याची पाने धुवून व पुसून घ्यावी.पाने उलती ठेवून त्याच्या शिरांवरून लाटणे फिरवावे म्हणजे शिरा मोडल्या जातात. नंतर एका भांड्यात बेसनपीठ्,चिंचेचा कोळ,किसलेला गूळ,हळद,तिखट व मिठ घेवून ते चांगले मिक्स करावे. पाणी घालून जरा पातळ करून घ्यावे. चव घेवून बघा.मस्त आंबट्,गोड,तिखट चव लागली पाहिजे. हे तयार मिश्रण एक मोठ पान घेऊन त्यावर पसरवा.त्यावर दुसरे पान ठेवून त्यावर पण मिश्रण लावा.परत व तिसरे पान ठेवून मिश्रण लावा.आता ह्या तयार पानाच्या बाजू दुमडून घ्या.(म्हणजे रोल केल्यावर मिश्रण बाहेर येणार नाही.)आता पानाच्या टोकापासून गूंडाळायला घ्या.रोल झाल्यावर तो सुटेल असं वाटत असल्यास त्याला दोर्‍याने गुंडाळा. हे रोल कुकरमधे चाळणीवर ठेवून्,शिटी काढून २०-२५ मिनीटे वाफवा.थंड झाल्यावर कापून वड्या तेलात खरपूस तळा किंवा तव्यावर शॅलो फ्राय करा.

वाचन 6865 प्रतिक्रिया 0