प्रेमाचा पंचनामा - १

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
21 Jul 2011 - 1:26 pm

प्रेरणा - प्यार का पंचनामा ( फुलाभोवती रुंजी घालणार्‍या प्रत्येक भुंग्याने पहावा असा हिंदी चित्रपट)

विकेंड अगदी झकास गेला होता. आहेच आमचं शेखाडी गाव तसं. नितांत सुंदर. वरच्या अंगाला छोटासा डोंगर जो आम्हाला खुप मोठा डोंगर वाटतो. खालच्या अंगाला किनार्‍यावरील खडकरांगांशी टकरा घेणारा पांढराशुभ्र समुद्र. आणि या दोहोंच्या मधून जाणारा धड कच्चाही नाही आणि धड डांबरीही नाही असा रस्ता. काही ठीकाणी तर समुद्राच्या लाटा केवळ चार पाच फुट उंचीवर असलेल्या रस्त्याला टकरा मारतात. सारं काही इतकं सुंदर अगदी कॅलिफोर्नियाच्या स्टेट रुट १ वरील हाफ मुन किंवा बिग सर बीचची आठवण यावी. आणि आमचं गावही तसं दोन प्रसिद्ध ठीकाणांच्या रस्त्यावर आहे. दिवेआगरवरुन हरीहरेश्वरला जाताना तुम्ही श्रीवर्धनकडे जाण्यासाठी मुंबईच्या पुण्याच्या परतीच्या वाटेला न लागता, शेखाडीवरुन समुद्रकिनार्‍याला चिकटून जाणारा श्रीवर्धनला जाणारा शॉर्टकट पकडायचा की झालं.

आज सकाळी लवकर उठलो. तसा दोन दिवस हव्यातशा उनाडक्या केल्यावर सोमवारी सकाळी लवकर उठायला जीवावर येतं. पण काय करणार. पापी पेट का सवाल असलयामुळे करावं मागतं सारं. छोटया भावाने दिन्याने बाईकवर श्रीवर्धनला सोडलं. श्रीवर्धन - पुणे लाल डब्ब्यानं दहाला डेक्कनला. तिथून मायमाऊली पीएमटीने पंधरा वीस मिनिटांत सार्‍या दुनियाभराचे अनुभव घेत शिवाजीनगरला.

ऑफीसला आल्यावर क्लायंटच्या मेलबॉक्समधील सगळ्या मेली चेक केल्या. लाल टीळा लावलेल्या अर्जंट मेलींना उत्तरे दिली. आता नंबर आमच्या ऑफीसच्या मेलींचा. ही एक नसती पनवती असते तिज्यायला. आमचं आख्खं युनिट क्लायंटच्या नेटवर्कवर आहे. आणि मशिनही क्लायंटच्याच आहेत. पण दोन दिवसाआड का होईना पण ऑफिसच्या मशीनवर बसून त्या मेली चेक कराव्या लागतात. आणि साला सहाशे लोकांच्या फ्लोअरवर मोजून चार मशिनी ऑफिसच्या. आणि चारमधल्या एकातरी मशिनला रोज काही ना काही झालेलं असतं. आज काय तर मशिन डोमेनवर नाही उदया काय तर तुमचा प्रोफाईल करप्ट झाला आहे. रोज नवीन दुखणं. पण ईलाज नाही. पूर्वी मी पंधरा पंधरा दिवस ऑफिसच्या मेली पाहत नसे. हल्ली करावं लागतं. साला आमच्या फ्लोअरवरचं स्वाईप मशिन गंडलं आहे. दोन दोन वेळा कार्ड घासूनही लेकाचं एंट्री करत नाही. आणि मग ऑफिसच्या मेलबॉक्समध्ये मेल येते पंचिंग मिस्ड म्हणून. मग अटेंडन्स रेगुलराईज करावी लागते. च्यायला काम बीम गेलं भोकात. हजेरी महत्त्वाची.

आणि म्हणून ही दोन दोन मेलबॉक्स चेक करण्याची भेंचोतगिरी रोज करावी लागते.

झालं एकदांचं. काम काही विशेष नव्हतं. आणि असलं तरी ते फाटयावर कसं मारायचं हे आपल्याला चांगलं माहिती आहे.

चकाटया पिटायच्या म्हणून अमरींदरच्या डेस्कवर गेलो. अमरींदर आमच्या टीममधला एक च्युत्या सरदार पोरगा. दिसायलाही असातसाच पण साला बोलायचा असा की जसं काय आतापर्यंत शंभर पोरींवर हात साफ करुन झालाय. नाही म्हणायला भोसडीचा कुठल्याही पोरीशी ओळख काढून लगेच तिला पकवायला सुरुवात करतो. पण ते तर आम्हालाही जमेल की. आता आम्ही तसला फालतूपणा करत नाही ही गोष्ट वेगळी. पण साल्याशी ईकडच्या तिकडच्या गोष्टी करताना मस्त टाईमपास होतो. कधी कधी जाम भारी आयटम देतो. म्हणून मग त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढवून आम्ही दोन तीन मराठी पोरं मस्त मजा घेत बसतो.

"क्या किया बे भोसडीके दो दिन? बोल रहा था चल पिकनिकको. आया नही साले" साहेबांनी स्वतःहून सुरुवात केली.

विकेंडला आमच्या युनिटची पिकनिक होती. दरवर्षी असते. आख्ख्या बाराशे जणांच्या युनिटचा एकच क्लायंट आहे. टीम मुंबई, पुणे आणि चेन्नई, सॅन फ्रान्सिस्को अशा चार ऑफीसमधून काम करते. यातल्या मुंबई आणि पुण्याच्या टीम मेंबर्सची दरवर्षी पिकनिक होते. क्लायंट स्पॉन्सर्ड. मुंबई आणि पुणे अश्या दोन्ही सब टीमना सोयीचं पडेल असं जुन्या मुंबई पुणे रोडवर एखादं रीसॉर्ट बुक केलं जातं. मग काय साला सगळा तमाशा. खायचं प्यायचं आणि रात्रभर धुडगुस घालायचा. पोरंही या संधीचा बेकार फायदा उठवून जास्त झाल्याचा आव आणून पीएम, एसपीएमची आयमाय काढतात. इथे पोरं या शब्दाचा अर्थ "पोरं - पोरी" असा घ्यायचा. पोरीही काही कमी नाही करत. एकवेळ जास्त झालेल्या पोराला आवरता येतं पण पोरीला चढली की त्या रणरागिणीला आवरताना नाकी नऊ येतात. आपल्याला नाही आवडत सालं हे सगळं. मागची दोन वर्षे गेलो होतो. यावर्षी नाही गेलो.

"मेरा तो विकेंड मस्त था. तू बता. पिकनिक कैसा रहा?"

"अबे एकदम ढासू. रुक तुझे कुछ दिखाता हूं"

त्याने तुझे कुछ दिखाता हूं म्हटल्यावर मी कान टवकारले. मागेही त्याने एकदा असेच "रुक तुझे कुछ दिखाता हूं" म्हणून निकिता मिश्राचे फोटो दाखवले होते. निकिता आमच्या टेस्टींग टीमची बंदी. आमच्याच क्युबिकलच्या आसपास तिचं क्युबिकल होते. पोरगी तशी चालूच. मागच्या दोन वर्षांत आमच्या नजरेसमोर तिने तिघांना फीरवलं होतं. जे फोटो त्याने दाखवले होते ते फोटो म्हणजे नुसती आग होती आग. तिच्या टीचभर शॉर्टमधून शरीरसौष्ठव अगदी खडकवासला धरणाचं पाणी सोडल्यावर मुळा नदी जशी दुथडी भरुन वाहते तसं वाहत होतं. डोळे निवले वगैरे म्हणतात तसं झालं होतं आमचं पोरांचं.

"साले तेरे पास कहासे आयें ये फोटो" म्हटल्यावर त्याने दात विचकत "ओरकूट" असं सांगितलं.
"अबे लडकी कितनी भी चालू हो. ऐसे फोटो ओरकुटपें नही डालेगी. हमको च्युत्या मत बना."
"अबे तुम साले झंडू लोग हों. उसने ये फोटो ओरकुटपेंही डाले थे. सिर्फ सिलेक्टेड दोस्तोंके साथ शेयर किये थे. उसके ऐसेही एक दोस्त के साथ अपना चलता हैं. उसने निकालके दिये. तूम साला जो दिखा रहा हूं वोह देखो ना. कहासे आये, किसने दिये ये बेकार की बातें क्यूं कर रहे हों सालों".

आम्हीही मग फारशा चांभारचौकशा न करता त्या शॉर्टवाल्या फोटोंचा लुफ्त लुटला होता.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 Jul 2011 - 1:38 pm | प्रचेतस

एकदम उत्कंठावर्धक सुरुवात.
पुढचे भाग येउ द्यात लवकर.

शाहिर's picture

21 Jul 2011 - 1:38 pm | शाहिर

अवंतर : देल्लि बेल्ली पासुन स्वताची तरुणाइ दाखवाय्चा एक मार्ग म्हणजे शिव्या देत बोलणे ..

धन्या's picture

21 Jul 2011 - 2:34 pm | धन्या

देल्लि बेल्ली पासुन स्वताची तरुणाइ दाखवाय्चा एक मार्ग म्हणजे शिव्या देत बोलणे ..

दाखवायचं काय त्यात. आम्ही आहोतच मुळी तरूण. आणि तेसुद्धा वयाने :)

खरं तर "प्यार का पंचनामा" ची पारायणे झाल्यानंतर या कथेची मनातल्या मनात जुळणी तयार होती. फक्त कथेतल्या पात्रांनी पावलोपावली शिव्या देणं ही कथानकाची गरज होती. फक्त तशा शिव्या टंकण्याईतके आम्ही निर्ढावलेले नसल्यामुळे ती कथा मनातच दडून होती.

देल्ही बेलीने आम्हाला मार्ग दाखवला. :P

तरीही तुम्ही म्हणता तसं शिव्या टाळण्याचा जरुर प्रयत्न करेन

- धनाजीराव वाकडे

बहुगुणी's picture

21 Jul 2011 - 6:42 pm | बहुगुणी

उत्कंठावर्धक.

(एकही अपशब्द न वापरताही तुमचं लिखाण तितकंच दमदार झालं असतं असं वाटून गेलं. अनपेक्षित ठिकाणी [आणि अनपेक्षित लेखकाकडूनही] शिव्यांनी चांगल्या मिसळीत कचकन् दाताखाली खडा लागलासा वाटलं. बाकी लेखक म्हणून तुमची मर्जी. 'अभिव्यक्तीस्वातंत्र्य' वगैरे...;-) )

छान लिहित आहात.. फक्त काही वेळेस शिव्या विनाकारण मध्ये घुसडवल्यासारख्या वाटतात/
असो .
लिहित रहा.. पुढे वाचत आहे.

...

शेखाडी माहित नाही.. पण तुम्ही जो रस्ता म्हणत आहात त्याच्या कडेला ' आरावी' हे गाव आहे का? कारण तेथे बर्याचदा गेलो आहे मी, माझ्या आवडत्या समुद्रकिणार्‍या पैकी एक आहे ती जागा... मस्त रेती .. बाजुला कडेने लांब सडक डांबरी रस्ता.. थोडे पुढे चालले की मस्त उंच झाडे .. आणि समुद्रकिणार्‍या वर कोणीच नाही फक्त आपण आणि आपले मित्र.
बस्स .

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2011 - 12:10 am | अत्रुप्त आत्मा

त्याचं नाव आरावी नसुन अराठी आहे...

प्रचेतस's picture

22 Jul 2011 - 7:07 am | प्रचेतस

आरावीच आहे तो.
शेखाडीच्या पुढे आणि श्रीवर्धनाच्या अलीकडे. एकदम व्हर्जिन बीच आहे.

माझीही शॅम्पेन's picture

21 Jul 2011 - 1:45 pm | माझीही शॅम्पेन

क.ड.क सुरूवात :) ,

पटकन पुढचा भाग येऊद्या !!

छोटा डॉन's picture

21 Jul 2011 - 1:51 pm | छोटा डॉन

लिहा लिहा, आम्ही वाचत आहोत.

स्वगत : बर्‍याच दिवसात 'बाकी शुन्य' वाचले नाही, असो.

- छोटा डॉन

विकाल's picture

21 Jul 2011 - 3:25 pm | विकाल

लवकर्र लिहायचं हं पुढ्चं......

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Jul 2011 - 11:44 pm | बिपिन कार्यकर्ते

वाचतोय.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2011 - 12:05 am | अत्रुप्त आत्मा

वाचतोय,वाचतोय... येऊ द्या पुढचा भाग लवकर...
बाकी माझं अजोळ हरिहरेश्वर...त्यामुळे जवळची सगळी गावं मला तीर्थक्षेत्रासारखी...त्यामुळे अनुषंगानी आलेली नावं सुद्धा मनाला सुखावुन गेली...आणी शेखाडी-श्रीवर्धन रस्ता तर काय जबरा आहे, शॉर्टकट म्हणजे समुद्राचे बाजुच्या खडकांसह कीती व्ह्यू आणी कीती एंगलनी शोट/कट घ्यावेत...नामतः परीपूर्ण...असो मी प्रसादापेक्षा वर ठेवलेल्या तुळशीपत्रावरच जास्त प्रतिक्रीया दिलिये पण रहावल नाही...

आनंदयात्री's picture

22 Jul 2011 - 1:59 am | आनंदयात्री

छान. पहिला भाग आवडला. उद्या टाका आता पुढचा भाग !!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jul 2011 - 2:23 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

वाचते आहे. पुढचा भाग लवकर टाका.

(शिव्या मलातरी खटकल्या नाहीत. चामारी, काय आणि कोणाला त्रास होतो साला शिव्यांचा?)

वाचतिये.
बाकी अपशब्दांचं म्हणाल तर आम्हा म्हातार्‍यांनी फार काही बोलू नये हे उत्तम!;)

नितिन थत्ते's picture

22 Jul 2011 - 7:33 am | नितिन थत्ते

चांगला आहे भाग १. पुढचा भाग येऊदे.

पण हल्लीच ती कॉलसेंटरची दुसरी गोष्ट वाचली असल्यामुळे ही जरा रिपिटिशन वाटली.

कवितानागेश's picture

26 Jul 2011 - 1:12 pm | कवितानागेश

प्रतिसाद वाचून पुन्हा एकदा लेख वाचावा लागला,
....शिव्या शोधायला! ;)