पिवळा खडक राष्ट्रीय उद्यान (येलो स्टोन)

निमिष ध.'s picture
निमिष ध. in कलादालन
12 Jul 2011 - 4:09 am

नमस्कार मंडळी,

बर्याच दिवसांपासून गाजत होते की पिवळा खडक राष्ट्रीय उद्यानात (येलो स्टोन) जायचे. अखेर संयुक्त राज्यांच्या स्वातंत्र्य दिवसाचा (४ जुलै ) चा मुहूर्त निघाला. आणि जवळ जवळ दीड महिना आधी आरक्षण करून (तंबू ठोकायला पण आरक्षण !!) निघालो. आता प्रवास वगैरे काही सांगत बसत नाही फक्त काही मित्राचा (अमोल बेदरकर) कॅमेरा वापरून काढलेले छायाचित्र (प्रकाशचित्र) टाकण्याचा प्रयत्न करतो. कॅमेरा आहे canon t3 रेबेल - २ लेन्स वापरल्या होत्या. एक मिळणारी आणि दुसरी लांबची.
सुरवात झाली बेअर टूथ खिंडीच्या रस्त्यांनी. आता अर्धा उन्हाळा (इकडचा) संपला तरी इकडे बर्फ.

मग कूक सिटी मधून ईशान्येच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो .. थोडे पुढे जातो तर एके ठिकाणी बरेच लोक उभे दिसले .. थांबलो तर कळले, एक अस्वल होते पण आता निघून गेले. तरीही भरपूर बायसन (रेडे ??) पाहून पुढे निघालो.

त्यानंतर रस्त्यात पाटी दिसली sulphur cauldron अशी. मस्त उकळत्या गंधकाचा वास येत होता. शाळेतल्या प्रयोगशाळेची आठवण झाली.

शेवटी मुक्कामी येऊन कसा बस तंबू ठोकला

दुसर्या दिवशी निघून येलो स्टोन सरोवर पहिले.

मग पहिले old faithful geyser - गरम पाण्याचे कारंजेच जणू. बरोबर ९० मिनिटांनी ते उडते म्हणून त्याला फेथफुल म्हणतात. खरच त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते उडालेही.

असे बरेच गरम पाण्याचे झरे पहिले - वेस्ट थंब, ग्रांड प्रिझमाटिक

प्राणी ही भरपूर पहिले

आणि धबधबे .. बापरे .. !!

विकी वरचा येलो स्टोन चा दुवा देतो आहे. काय आता तीच माहिती मी इकडे कशाला टाकू ..

www.en.wikipedia.org/wiki/Yellowstone_National_Park

मिपा करांना आवडतील असे वाटते. नाही आवडले तरी पहिला प्रयत्न म्हणून गोड मानून घ्या.

कलाप्रवासछायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रास's picture

12 Jul 2011 - 1:11 pm | प्रास

प्रकाशचित्रे आवडली.....

मिपावर कलादालनात फोटो टाकण्याचा पहिला प्रसंग असावा पण मित्राचे कॅमेरे घेऊन प्रकाशचित्रे काढण्याचा तुम्हाला चांगला अनुभव आहे हे ही समजलं. ;-)

पुलेशु.

मस्तच.

फक्त स्वतःचा अनुभव डीटेलमधे लिहीला असतात तर पूर्णता आली असती.

विकीवरची माहिती तर खूपच जनरलाईझ्ड असते. आपण जाऊन आल्याने आणि स्वतःच्या नजरेतून लिहिल्याने फरक पडतो.

मग तसे तर यलोस्टोनचे फोटोही खूप आहेत जालावर.

काहीशी घाईने उरकल्यासारखी पोस्ट वाटली.

फोटो आणि ठिकाण सुंदर हे पुन्हा नमूद करतो.

मनराव's picture

13 Jul 2011 - 2:51 pm | मनराव

>>आपण जाऊन आल्याने आणि स्वतःच्या नजरेतून लिहिल्याने फरक पडतो.
मग तसे तर यलोस्टोनचे फोटोही खूप आहेत जालावर.<<<

+१११११

जातीवंत भटका's picture

12 Jul 2011 - 4:30 pm | जातीवंत भटका

सुंदर फोटो !!

--
जातीवंत भटका ...

निसर्गाच्या कुशीत मजा करुन आल्याबद्द्ल तुमचे अभिनंदन! आणि इकडे ते शिंचे लोक ध्यान अन विपश्यना करत बसलेत!

मस्त ...
फोटो मात्र मोठे आणि जास्त हवे होते.
वर्णन आखडते घेतल्याने नाराज

प्राजु's picture

13 Jul 2011 - 12:03 am | प्राजु

फोटो आवडले.

ढब्बू पैसा's picture

13 Jul 2011 - 3:05 am | ढब्बू पैसा

फोटो मस्त आहेत!

पंधरा तासांचा ड्राईव्ह म्हणजे जरा जास्तच झाला असेन नै?

मदनबाण's picture

13 Jul 2011 - 9:04 am | मदनबाण

मस्त फोटु. :)

प्रचेतस's picture

13 Jul 2011 - 9:10 am | प्रचेतस

यलोस्टोन नॅशनल पार्कच्या भूगर्भात सतत जोरदार हालचाली चालू असतात त्यामुळे येथे हे फवारे उडत असतात तर गरम पाण्याचे झरे देखील आढळतात. काही हजार वर्षात येथे एका महाप्रचंड ज्वालामुखीचा स्फोट होउ शकतो असे डिस्कव्हरीवर एका यलोस्टोनवरील लघुपटात पाहीले होते.

सुनील's picture

13 Jul 2011 - 10:11 am | सुनील

फोटो छान पण जरा मोठे करून टाकायला हवे होते. आणि मुख्य म्हणजे, वर्णनदेखिल लिहायला हवे होते.

दीप्स's picture

20 Jul 2011 - 5:27 pm | दीप्स

अजून सविस्तर माहिती तुम्ही तुमच्या भाषेत द्यायला हवी होती. कारण विकिपिडीयावर तर सर्व माहिती मिळतेच पण ती दुसर्याच्या भाषेत वाचण्याची मज्जा काही वेगळीच असते. असुद्या पुढच्या वेळी नक्की तुम्ही तुमचाच भाषेत लिहावे अशी आग्रहाची विनंती. आणि हो फोटो देखील छान आहेत. ते देखील अजून टाकावे.