गाजराचा हलवा

स्मिता.'s picture
स्मिता. in पाककृती
30 Jun 2011 - 7:08 pm

तुमच्या लक्षात आलंच असेल की हा केवळ 'गाजर हलवा' नाहीये तर रितसर गाजराचा हलवा आहे ;)

लहानपणापासून मला गाजराचा हलवा फार आवडतो. आणि सध्या फ्युजन म्हणून गरम-गरम हलवा आणि त्यावर व्हॅनिला आइसक्रिम मिळते, ते तर... अहाहा!

अश्या या सदाबहार हलव्याची पाकृ मात्र एकदम सोप्पी आहे.

साहित्य:
मध्यम आकाराचे ६ गाजर
१ टेस्पून साजूक तूप
१ वाटी साखर
१ वाटी दूध
चिमूटभर वेलची पूड
सजावटीसाठी सुक्यामेव्याचे तुकडे

कृती:
गाजर स्वच्छ धुवून कोरडे करून किसून घ्यावे.

कढई किंवा पसरट भांड्यात मंद आचेवर तूप गरम करावे. त्यात गाजराचा किस घालून मध्यम आचेवर शिजवावे.

गाजराचा जरा मऊ झाला की त्यात साखर घालून हलक्या हाताने मिक्स करावे. साखरेमुळे मिश्रणाला पाणी सुटते. त्यामुळे भांड्याला मिळणारी आच वाढवायला हरकत नाही. पण अधूनमधून हलवत राहून खालून जळणार नाही याची खबरदारी घ्यावी.

मिश्रण कोरडे व्हायला लागले की आच पुन्हा मंद करून दूध घालावे. बरेच लोक आवडीप्रमाणे खवा/कन्डेन्स्ड मिल्क सुद्धा घालतात.

हलवा आपल्याला हवा तसा ओलसर/कोरडा झाला की त्यात वेलची पूड मिक्स करून आचेवरून उतरवून घ्यावा.

गरमागरम हलवा वाटीत काढून त्यावर सजावटीसाठी सुक्यामेव्याचे तुकडे पेरावे आणि....... पुढचे सांगायची गरज नाही :)

प्रतिक्रिया

निवेदिता-ताई's picture

30 Jun 2011 - 7:46 pm | निवेदिता-ताई

अहाहा...................मस्तच ह ....

चिरोटा's picture

30 Jun 2011 - 8:02 pm | चिरोटा

छान. एक चमचा तूप पुरते का ? बर्‍याच घरी पाहुण्यांना सर्व केला जातो तो हलवा विस्कळीत असतो. लग्नात/ हॉटेलांमध्ये देतात तो एकसंध वाटतो.

स्मिता.'s picture

30 Jun 2011 - 9:00 pm | स्मिता.

चिरोटाराव, गाजराच्या हलव्यात साजूक तूप घालतात कारण सुरूवातीला आपण फक्त गाजराचा कीस शिजवतो तो गरम भाड्याला चिटकू नये आणि तूपाचा छान सुगंधा यावा. त्यामुळे १ मोठा चमचा (टेबल स्पून) तूप पुरेसे असते.

हॉटेलांत देतात तो हलवा एकसंध/ओलसर असतो खरा. तो कसा याची काही कल्पना नाही. बहुदा साखर घातल्यावर सुटणारे पाणी पूर्ण आटवत नसावेत.

हलवा छान मिळून येतो.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Jul 2011 - 2:41 pm | परिकथेतील राजकुमार

आपण तर बॉ काजु पेस्ट घालतो.

पाकृ झकास फटु अतिझकास.

स्मिता.'s picture

4 Jul 2011 - 3:34 pm | स्मिता.

अरे वा!! काजू पेस्ट घालून गाजराचा हलवा... पण जरा जास्तच कॅलरीज नाही का रे होणार?

मी आपलं कॅलरीचा फक्त विचार करते आणि चांगलं लागलं की सगळं खाते ;)

व्वा!
पाकृ बुकमार्क्ड!

मुलूखावेगळी's picture

30 Jun 2011 - 8:45 pm | मुलूखावेगळी

रेसिपी मस्त

सध्या फ्युजन म्हणून गरम-गरम हलवा आणि त्यावर व्हॅनिला आइसक्रिम मिळते, ते तर... अहाहा!

असेच फ्युजन म्हणून गरम-गरम हलवा आणि त्यावर गुलकंदआइसक्रिम पन मिळते, ते पन... अहाहा अहाहा!!!!

सानिकास्वप्निल's picture

1 Jul 2011 - 12:29 am | सानिकास्वप्निल

मस्तच मला ही खुप आवडतो
ह्यात थोडा खवा घातला तर हलवा अजुन रीच होतो ;)

नगरीनिरंजन's picture

1 Jul 2011 - 9:16 am | नगरीनिरंजन

खवा किंवा कन्डेन्स्ड मिल्क घातल्यास मस्त होतो असा स्वानुभव आहे.

स्मिता.'s picture

2 Jul 2011 - 6:29 pm | स्मिता.

सनिकाताई, खवा घालून हलवा रीच तर होतोच पण त्याने लगेच पोट भरते आणि मनसोक्त खाता येत नाही ;)
माझी आई जर पाहुणे येणार असतील तरच खवा किंवा कन्डेस्ड मिल्क घालते, रिच वाटावा म्हणून :)

श्रावण मोडक's picture

9 Jul 2011 - 9:45 am | श्रावण मोडक

सनिकाताई, खवा घालून हलवा रीच तर होतोच पण त्याने लगेच पोट भरते आणि मनसोक्त खाता येत नाही Wink
माझी आई जर पाहुणे येणार असतील तरच खवा किंवा कन्डेस्ड मिल्क घालते, रिच वाटावा म्हणून Smile

;)
ह.घ्या.हे वे.सां.न ल.

प्रदीप's picture

9 Jul 2011 - 12:22 pm | प्रदीप

गॉच्चा!

स्मिता.'s picture

9 Jul 2011 - 12:37 pm | स्मिता.

श्रामो, बरोब्बर पकडलत हं तुम्ही!! मनसोक्त हसले :)

रुतिका's picture

1 Jul 2011 - 9:11 am | रुतिका

मला खुप आवडतो

रुतिका

मदनबाण's picture

1 Jul 2011 - 9:27 am | मदनबाण

यम यम !!! :)

बायकोला करावयास सांगणे.

अहाहा.. अतिशय आवडला..

- पिंगू

स्वाती दिनेश's picture

1 Jul 2011 - 1:58 pm | स्वाती दिनेश

गाजर हलवा आवडीचा!
ही आमची गाजर हलवा पाकृ.
स्वाती

असा केशरी गजर हलवा???

मद्रासी गाजर वापरली आहेत वाटत

स्मिता.'s picture

2 Jul 2011 - 6:26 pm | स्मिता.

मराठी लोकांना लहानपणापासून लाल गाजर बघायची सवय असल्याने आजकाल येणारे केशरी गाजर पहिल्यांदा बघून जरा वेगळे वाटते. पण आजकाल आपल्याकडेही केशरी गाजरे जास्त मिळायला लागली आहेत.

मी पॅरिसमधे असल्याने येथे मिळालीत ती गाजरे वापरलेली आहेत.

मद्रासी गाजर वापरली आहेत वाटत

प्रांतवादाचं मूळ हे आहे!;)

स्मिता.'s picture

2 Jul 2011 - 6:37 pm | स्मिता.

सर्व प्रतिक्रिया देणार्‍यांचे आणि वाचकांचे आभार!

बर्‍याच प्रतिक्रियांमधून खवा घालण्याचा उल्लेख आला आहे. खवा घालून हलवा छानच लागतो. पण तो ऑप्शनल आहे. खवा/कन्डेन्स्ड मिल्क/मिल्क पावडर घालून हलव्याला आणखी रीच बनवता येते.

जरा (म्हणजे बरीच) उशिराने प्रतिक्रिया देते आहे.
हलवा आवडला. फोटू छान आलाय.
तू आधीच आभार मानल्याने मी माझेच मानून घेते. काळजी नसावी.;)

कच्ची कैरी's picture

4 Jul 2011 - 2:16 pm | कच्ची कैरी

माझाही आवडता !!!!!