साहित्य-७ते८ गाजरे,१/२ ते ३/४ वाटी साखर, १०%फॅटवाले दूध १/२ते ३/४ खोका किवा आटीव दूध १ ते १.५कप ,१चहाचा चमचा साजूक तूप, वेलचीपूड,बदाम,पिस्ते इ.चे तुकडे
कृती-साले काढूनएका गाजराचे ३ ते ४ तुकडे करा,ती उकडून घ्या. नंतर चाळणीवर घालून पाणी असलेच तर काढून टाका.पावभाजीच्या चेपणीने चांगली चेचा किवा किसा.
एका जाड बुडाच्या पातेल्यात किवा नॉन स्टीक कढईत चमचाभर साजूक तूप टाका त्यावर हा गाजराचा कीस घाला व चांगले परता,त्यात १/२ वाटीतली थोडी साखर ठेवून बाकीची साखर घाला. गोड हवे असेल तर साखर वाढवा पण गाजरालाही मुळात गोडी असल्याने साखर बेतात घालावी.पुन्हा थोडे परता.
आटीव दूध किवा १०%फॅट वाले दूध थोडे थोडे घाला आणि परता.दूध गाजरात जिरु द्या. वेलचीपूड व बदामतुकडे घाला.
गाजरे उकडून घेतलेली असल्याने शिजायला वेळ लागत नाही.
खव्याला हा चांगला पर्याय वाटला.
प्रतिक्रिया
29 May 2008 - 5:16 pm | राजे (not verified)
त्या भाषा शुध्दीच्या गोपालकाला फेक्षा तुमचा हा हलवा मला गोड लागला !
धन्यवाद !
राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !
29 May 2008 - 5:47 pm | अन्जलि
गाजरे चेचुन हलवा ह प्रकार जरा नविन वाटतो. नेहमि किसुन केला जातो म्हनुन
29 May 2008 - 5:55 pm | वरदा
पण पाणी काढून टाकलं की त्यातले व्हीटॅमिन्स जाणार ना..त्यापेक्षा पाणी एका बाऊल मधे काढून ठेवलं आणि चेचून झाल्यावर परत टाकलं तर चालेल का? बाकी तुला १०% का १% म्हणायचय दूध? कारण इथे फॅट फ्री, १%, २% आणि मग सरळ होल मिल्क मिळतं
29 May 2008 - 6:34 pm | स्वाती दिनेश
आमच्या इथे ४%,७.५%,१०% असे 'कोन्डेन्स्ड मिल्श' चे खोके साधारण ३०० मिलीचे मिळतात.त्यातले सगळयात जास्त फॅटवाले दूध मी घेते,म्हणजे आटवणे वगैरे करायला लागत नाही.तुमच्याकडे जर जास्त फॅटचे दूध मिळत नसेल तर होल मिल्क घे आनि थोडे आटव म्हणजे नंतर वेळ कमी लागतो.
ते पाणी फेकून न देता व्हेज स्टॉक सारखे सूपात इ. वापरता येईल पण परत हलव्यात टाकले तर पाणचट होईल आणि परत जास्त आटवत बसावे लागेल.:)
स्वाती
29 May 2008 - 6:41 pm | वरदा
म्हणजे सगळ्यात घट्टं दूध वापरायचय ना...मला हाफ ऍन्ड हाफ मिळतं ना ते घालेन...
ह्म्म्म पाण्याचा तसा प्रोब्लेम होईल खरा...थोडच असेल पाणी पिऊन टाकेन पटकन्.. ही हि ही...
तुला बदामाचा हलवा कसा करायचा माहीतेय का मला प्रमाण सांग ना.....
29 May 2008 - 10:12 pm | चकली
हाफ ऍन्ड हाफ नको वापरू, होल मिल्क वापर. छान होतो. आम्ही रविवारी केला होता.
मी यावेळी शेंग दाणे घातले प्रयोग म्हणून. (पातळ काप करून, झक्क लागले)
चकली
http://chakali.blogspot.com
29 May 2008 - 10:18 pm | वरदा
चालेल असंच करेन्....धन्यु चकली...
29 May 2008 - 6:47 pm | विजुभाऊ
मी पुण्यात पाहीलेला गाजर हलवा/ दूधी हलवा
रेसीपी:
एक मोठे लांब गाजर घ्यावे. स्वच्छ धुवुन घ्यावे. ते दोरीने दारात किंवा खूंटीला टांगावे व येता जाता टप्पल मारुन हलवावे.
आमच्या एका सदाशिव पेठी बांधवाने ही आयडीया वापरुन >"चार आण्यात गाजर हलवा" अशी पाटी लिहुन मंडळासाठी काही हजार रुपये जमवले अशी एक वदंता आहे. :)
(लोक रांगेत उभे होते व रांगेचे बाहेर पडणारे टोक दुसर्या गल्लीत बाहेर निघेल याची त्यानी खबरदारी घेतली होती.)
29 May 2008 - 10:07 pm | प्रभाकर पेठकर
>"चार आण्यात गाजर हलवा"
विजुभाऊ, 'चार आण्यात पोटभर गाजर हलवा'. अशी ती ट्रिक आहे. 'पोटभर' शब्दात जास्तीत जास्त (हावरट) गिर्हाईकांना आकर्षित करण्याची ताकद आहे.
29 May 2008 - 7:01 pm | वरदा
ये हुई ना बात! मलाही बाबा मी खूप लहान असताना दुधी आणि गाजर धरुन हलवायला लावायचे तेवढाच टाईमपास आणि आईला कामाला वेळ मिळावा आणि माझी लुडबुड बंद व्हावी म्हणून् त्याची आठवण झाली...
29 May 2008 - 10:00 pm | यशोधरा
आहा!! गाजरहलवा!!!
बसले बरका स्वातीताई मी विमानात इथे!! :) गाजरहलवा घेऊनच या आता तुम्ही तिकडच्या विमानतळावर मला भेटायला :)
29 May 2008 - 10:09 pm | वरदा
बेटी यशोधरा मुझे पता है तुम्हे गाजर का हलवा बहोत पसंद है खाओ ना मैने अपने हाथोंसे बनाया है.... :))
29 May 2008 - 10:12 pm | प्रभाकर पेठकर
मैने अपने हाथोंसे बनाया है....
तो बाकी लोग क्या पाँवसे बनाते है?
29 May 2008 - 10:19 pm | वरदा
ते बॉलिवूडच्या समस्त डायरेक्टर्स ना जाऊन विचारावं लागेल.....
29 May 2008 - 10:34 pm | प्रभाकर पेठकर
हा: हा: हा:...! 'माझी फिल्ल्मबाजी'त शिरीष कणेकर म्हणतात ४० वर्षाचा घोडा नायक म्हणतो, 'माँ मैने फर्स्टक्लास मे बी.ए. पास किया है।' आणि त्या घोड्याला त्याची आई म्हणते,' आ बेटे! मैने तेरे लिए गाजर का हलवा बनाया है।'
आम्ही इतक्या परीक्षा दिल्या आणि प्रथम प्रयत्नातच पास होऊनही दाखविले पण आईने कधी साधे अळूचे फदफदेही केले नाही. असो.
29 May 2008 - 11:01 pm | वरदा
काका अगदी परवाच बोल्लो आम्ही हे....मी आईला सांगितलं मैने मास्टर्स कंप्लीट किया है तर म्हणाली तू इथे ये मग 'गाजर का हलवा' करते...आणि तिलाही अगदी ह्याच डायलॉगची आठवण झाली.......
29 May 2008 - 11:20 pm | चतुरंग
माझे पिताश्री मला म्हणालेले आठवतात "आ बेटे, मैंने तुम्हारा 'हलवा' बनाने की सोची है!!" :) B) :P
चतुरंग
30 May 2008 - 12:16 am | वरदा
चतुरंग =))
मला नाही वाटत पण तुम्ही कुठल्या परीक्षा काठावर पास होत असाल.... /:)
30 May 2008 - 5:01 pm | वैभव
पर हलवा तो गाजर से बनता है.................
30 May 2008 - 5:08 pm | प्रभाकर पेठकर
हलवा बहुत सारी चिजोंसे बनता है. पाव और पाँव मे फर्क होता है, इसपर जरा गौर हो।
29 May 2008 - 10:16 pm | यशोधरा
वरदा, पेठकरकाका!! =))
29 May 2008 - 11:28 pm | चतुरंग
आम्ही होल मिल्क (पूर्ण फॅट) वापरतो. दूध उकळून थोडे आटत आले की मग त्यात खिसून घेतलेली गाजरे घातली तर चटकन होतो असा अनुभव.
बदामाचे काप हवेतच त्याशिवाय मजा नाही! हवेतर बेदाणेही घालू शकता. =P~
चतुरंग
30 May 2008 - 12:14 am | स्वाती राजेश
गाजर किसायची कटकट नाही.:) मस्त!!!!!!!!! करून पाहायला पाहिजे या प्रकारे....
30 May 2008 - 8:03 am | सहज
गरम गाजर हलवा व जोडीला एक स्कुप व्हॅनीला आईसक्रीम.
ये दिल मांगे मोअर!
30 May 2008 - 8:07 am | आजानुकर्ण
गाजरहलव्याचा फोटू फारच झकास!
आपला,
(खादाड) आजानुकर्ण
30 May 2008 - 9:58 am | मनस्वी
स्वातीताई.. मजा आगया!
गाजर हलव्याची वेगळी पद्धत माहित झाली.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
30 May 2008 - 10:04 am | विसोबा खेचर
तुझ्या जर्मनीत सध्या थंडी आहे की काय? इथे भारतात सध्या मरणाचा उन्हाळा सुरू आहे त्यामुळे गाजरहलव्यास योग्य अशी गाजरं मिळत नाहीत! आम्ही शक्यतोवर डिसेंबर जानेवारीतच हा हलवा करतो. तो तू इथे भर मे महिन्यत देऊन आमची अंमळ पंचाईतच केली आहेस! :)
असो, पाकृ मात्र नेहमीप्रमाणे झकास!
तुझा,
(शाळूसोबती) तात्या.
2 Jun 2008 - 2:14 pm | स्वाती दिनेश
तात्या,आमच्याइथे एप्रिल ते सप्टे. श्रावणच असतो ..
"क्षणात येते सरसर शिरवे,क्षणात फिरुनि उन पडे.. "अशी हवा असते.
गाजरे मिळतात वर्षभर,त्यामुळे कधीही करते.आपल्याकडे मात्र डिसे.जाने मध्ये जी गाजरं मिळतात त्याचा हलवा मस्तच होतो हे बाकी खरंच..
स्वाती
30 May 2008 - 12:59 pm | ईश्वरी
>>आयडिया छान आहे.
गाजर किसायची कटकट नाही. मस्त!! करून पाहायला पाहिजे या प्रकारे....
हेच म्हणते मी पण.
ईश्वरी
30 May 2008 - 1:25 pm | प्रगती
फोटो ईतका छान तर गाजर का हलवा प्रत्यक्षात किती छान असेल. @)
30 May 2008 - 6:25 pm | शितल
गाजरे उकडुन घेंण्याची कल्पना छान आहे, आता लवकरच गाजरचा हलवा.
तुला खव्याच्या पोळ्या येत असतील तर मला पाककृती सा॑गशील का ? मला त्या खुपच आवडतात.
30 May 2008 - 6:50 pm | वरदा
मी गेल्या वेळी तुला जोरात सांगितलं होतं ना मी देते म्हणून दिली नाही आणि काही नाही सॉरी गं शितल्....सध्या ऑफिसमधे जरा जास्त काम आहे पण स्वाती टाकेलच रेसिपी.....
30 May 2008 - 8:53 pm | प्रभाकर पेठकर
तुला खव्याच्या पोळ्या येत असतील तर मला पाककृती सा॑गशील का ? मला त्या खुपच आवडतात.
मी गेल्या वेळी तुला जोरात सांगितलं होतं ना मी देते म्हणून दिली नाही आणि काही नाही सॉरी गं शितल्....सध्या ऑफिसमधे जरा जास्त काम आहे पण स्वाती टाकेलच रेसिपी.....
ही खरडवही आहे की पोष्टऑफिस?
30 May 2008 - 10:29 pm | वरदा
तो वरचा मेसेज शितल ने माझ्यासाठी नाही स्वाती साठी टाकला होता....मीच मधेच उत्तर दिलं... चलता है ना कधी कधी?
31 May 2008 - 6:18 am | चित्रा
स्वाती,
गाजरहलवा मस्त. ह्या अशा पदार्थांची छायाचित्रे मिपावर देणे सुरू झाल्यापासून रोजच्या रोज उठून आपण अनेक दिवसात नक्की कोणता पदार्थ केलेला नाही अशा विचारांनी अपराधी वाटायला लागले आहे.
अवांतर - गोश्त बिर्यानी पण मस्त!
2 Jun 2008 - 2:11 pm | स्वाती दिनेश
खवय्यानो धन्यवाद!
स्वाती
6 Jun 2008 - 6:00 am | विसोबा खेचर
आता काहितरी खास देवगडी बोलणार होतो पण जाऊ द्या! :)
तात्या.
10 Jun 2008 - 2:14 am | अभिता
:S गाजर का किसायचे. मिक्सर असल्यावर