साहित्यः
उडदाची डाळ - १ वाटी
तांदुळाचे पिठ - १/२ वाटी
साखर - १ वाटी
पाणी - १ वाटी
वेलची पावडर - १ चमचा
केशर - १/४ चमचा
खायचा लाल रंग - १/४ छोटा चमचा
तेल तळण्यासाठी
मिठ अगदी चिमुटभर
कृती:
१. उडदाची डाळ ८ तास भिजवुन ठेवावी. भिजवलेली डाळ मऊ वाटुन घ्यावी.
२. ह्यात १/२ वाटी तांदुळाचे पिठ टाकुन हाताने निट फेटुन घ्यावे. ह्याच पिठात मिठ व खायचा लाल रंग टाकुन मिक्स करुन घ्यावे.
३. एका पातेल्यात १ कप साखर व १ कप पाणी घेउन, त्याचा १ तारी पाक करावा. ह्या पाकात वेलची पावडर व केशर टाकावे.
४. एका खोलगट pan मधे तळणीसाठी तेल गरम करण्यास ठेवावे. तेल हे जास्त गरम नाही झाले पाहिजे.
५. आता इमरती काढण्यासाठी तुम्ही सॉसची बाटली वापरु शकता. माझ्याकडे सॉसची बाटली नसल्यामुळे मी प्लॅस्टिकची पिशवी वापरली.
६. पिशवीला एका गरम काडीच्या मदतीने भोक पाडले.
७. आता ह्या पिशवीत वाटलेल्या डाळीचे मिश्रण टाकावे.
८. गरम झालेल्या तेलात, मध्यम आचेवर इमरती काढाव्यात.
९. एका बाजुने ह्या कडक झाल्यावर काटे चमच्याने पलटाव्यात.
१०. इमरती दोन्ही बाजुने कडक झाल्यावर पाकात टाकाव्यात. ह्या जास्त वेळ पाकात ठेवु नये. १-२ मिनिटात लगेच काढाव्यात.
११. इमरती खायला तयार आहेत.
प्रतिक्रिया
21 Jun 2011 - 3:35 am | सानिकास्वप्निल
मी सुध्दा ह्याच प्रमाणे बनवते.
फोटो छान आले आहेत :)
रबडीबरोबर तोडे जिलबी खुपच अप्रतिम लागते तोंपासु
21 Jun 2011 - 10:47 am | पर्नल नेने मराठे
तोडे जिलबी नाव छान आहे...मला शिंदेशाही तोडे आठवले ;)
21 Jun 2011 - 3:41 am | कौशी
फोटो पण मस्त...
एक प्रश्नः--डाळ वाट्ल्याबरोबर लगेच करायला घ्यायचे काय?
21 Jun 2011 - 4:15 am | Mrunalini
धन्स कौशी.. :)
हो, डाळ वाटल्यावर लगेच करायला घ्यायचे. जिलेबी साठी जसे पिठ रात्रीच भिजवायला लागते, तसे ह्यात पिठ आंबवायला लागत नाही.
21 Jun 2011 - 4:31 am | आनंदयात्री
देव तुमचे भले करो !!
धन्यवाद.
21 Jun 2011 - 5:17 am | priya_d
मृणालिनी
खुप छान! रेसिपी तशी सोपी व सुटसुटीत वाटतेय. नक्की करून बघेन. धन्यवाद!
प्रिया
21 Jun 2011 - 5:19 am | priya_d
मृणालिनी
खुप छान! रेसिपी तशी सोपी व सुटसुटीत वाटतेय. नक्की करून बघेन. धन्यवाद!
प्रिया
21 Jun 2011 - 9:59 am | पियुशा
मस्त ग :)
21 Jun 2011 - 10:19 am | पिंगू
झक्कास.. आवडली पाककृती..
- पिंगू
21 Jun 2011 - 3:23 pm | इरसाल
ते झाले हो पण खायला कधी देताय ते सांगा
21 Jun 2011 - 8:41 pm | निवेदिता-ताई
मस्त ग...मला खुप आवडते......पण जमतच न्हवती....आता करुन पाहिन..
21 Jun 2011 - 8:45 pm | निवेदिता-ताई
मस्त ग...मला खुप आवडते......पण जमतच न्हवती....आता करुन पाहिन..
21 Jun 2011 - 8:50 pm | निवेदिता-ताई
मस्त ग...मला खुप आवडते......पण जमतच न्हवती....आता करुन पाहिन..
जांगरी -- हे नाव पहिल्यांदाच कळले...
21 Jun 2011 - 8:55 pm | मीली
जिलेबीचे नाव पाहिल्यावर २ वेळा धागा उघडला ! पण सारखे महामानवास प्रणाम करून जावे लागले!
मस्त जिलेबी बनवलीस ग! आणि सोपी वाटतेय ! करून बघायला हवी! पण सध्या रंग नाही आहे न !
फोटो पण मस्त आहेत उचलून घ्यावीशी वाटतेय !
22 Jun 2011 - 12:28 am | Mrunalini
सगळ्यांना पाकृ आवडल्याबद्दल धन्यवाद. :)
22 Jun 2011 - 2:08 pm | परिकथेतील राजकुमार
ख ल्ला स !
फटू एक कातील !
23 Jun 2011 - 10:40 am | स्वाती दिनेश
तोड्यांची जिलेबी बघायलाच इतकी नखरेवाली दिसते ना!
जिलेबी करणे इज नॉट माय कप ऑफ टी... असंच नेहमी वाटत आलं आहे, त्यामुळे कधी करुन पाहिली नाही.. पण खायला मात्र खूप आवडते.
साध्या,नेहमीच्या जिलेबीसाठी पीठ भिजवा, वाट बघा पेक्षा हे जरा सोपं वाटत आहे, एकदा प्रयोग करुन पहायला हवा,:)
स्वाती
24 Jun 2011 - 12:19 am | Mrunalini
हो, मला हिच जिलेबी जास्त आवडते. नक्की करुन बघ आणि मग सांग कशी झाली ते. :)
23 Jun 2011 - 9:14 pm | रेवती
माझ्या मुलानं हा प्रकार भारतात कुणाकडं तरी खाल्ला आणि त्याला बराच आवडला.
मला कृती माहित नव्हती. आता वेळ मिळाला कि करून बघते.
तू नेहमीच सगळे पदार्थ अगदी व्यवस्थित करतेस.
24 Jun 2011 - 12:18 am | Mrunalini
धन्स रेवती. :)
अगं, मला आणि माझा नवरा दोघांना साध्या जिलेबी पेक्षा हि इमरती जास्त आवडते. त्यामुळे मी ही करुन बघितली. तसा आकार एवढा जमला नाही, पण चव खुप छान झाली होती. नक्की करुन बघ. सोपी आहे. तेलामधे इमरती निट टाकता येत नसेल, तर पिठात अजुन थोडे तांदुळाचे पिठ टाकायचे. असे १-२ वेळ केल्यावर नक्की जमेल. मला पण काही लगेच पहिल्या वेळी जमल नाही.
25 Jun 2011 - 9:38 pm | विसोबा खेचर
क्या केहेने..!
28 Jun 2011 - 9:32 pm | इंटरनेटस्नेही
तोंडाला पाणी सुटले!
28 Jun 2011 - 9:33 pm | इंटरनेटस्नेही
तोंडाला पाणी सुटले!