इमरती / जांगरी
साहित्यः
उडदाची डाळ - १ वाटी
तांदुळाचे पिठ - १/२ वाटी
साखर - १ वाटी
पाणी - १ वाटी
वेलची पावडर - १ चमचा
केशर - १/४ चमचा
खायचा लाल रंग - १/४ छोटा चमचा
तेल तळण्यासाठी
मिठ अगदी चिमुटभर
कृती:
१. उडदाची डाळ ८ तास भिजवुन ठेवावी. भिजवलेली डाळ मऊ वाटुन घ्यावी.
२. ह्यात १/२ वाटी तांदुळाचे पिठ टाकुन हाताने निट फेटुन घ्यावे. ह्याच पिठात मिठ व खायचा लाल रंग टाकुन मिक्स करुन घ्यावे.
३. एका पातेल्यात १ कप साखर व १ कप पाणी घेउन, त्याचा १ तारी पाक करावा. ह्या पाकात वेलची पावडर व केशर टाकावे.
४. एका खोलगट pan मधे तळणीसाठी तेल गरम करण्यास ठेवावे. तेल हे जास्त गरम नाही झाले पाहिजे.
५. आता इमरती काढण्यासाठी तुम्ही सॉसची बाटली वापरु शकता. माझ्याकडे सॉसची बाटली नसल्यामुळे मी प्लॅस्टिकची पिशवी वापरली.
६. पिशवीला एका गरम काडीच्या मदतीने भोक पाडले.
७. आता ह्या पिशवीत वाटलेल्या डाळीचे मिश्रण टाकावे.
८. गरम झालेल्या तेलात, मध्यम आचेवर इमरती काढाव्यात.
९. एका बाजुने ह्या कडक झाल्यावर काटे चमच्याने पलटाव्यात.
१०. इमरती दोन्ही बाजुने कडक झाल्यावर पाकात टाकाव्यात. ह्या जास्त वेळ पाकात ठेवु नये. १-२ मिनिटात लगेच काढाव्यात.
११. इमरती खायला तयार आहेत.
८. गरम झालेल्या तेलात, मध्यम आचेवर इमरती काढाव्यात.
९. एका बाजुने ह्या कडक झाल्यावर काटे चमच्याने पलटाव्यात.
१०. इमरती दोन्ही बाजुने कडक झाल्यावर पाकात टाकाव्यात. ह्या जास्त वेळ पाकात ठेवु नये. १-२ मिनिटात लगेच काढाव्यात.
११. इमरती खायला तयार आहेत.
वाचने
7813
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
छान आहे
In reply to छान आहे by सानिकास्वप्निल
तोडे जिलबी नाव छान आहे...मला
छान रेसिपी!!!!
In reply to छान रेसिपी!!!! by कौशी
धन्स कौशी.. हो, डाळ
देव
मृणालिनी खुप छान! रेसिपी तशी
मृणालिनी खुप छान! रेसिपी तशी
मस्त ग
झक्कास.. आवडली पाककृती.. -
ते झाले हो पण खायला कधी
मस्त ग...मला खुप
मस्त ग...मला खुप
मस्त ग...मला खुप
सही !
सगळ्यांना पाकृ आवडल्याबद्दल
ख ल्ला स ! फटू एक कातील !
मस्त..
In reply to मस्त.. by स्वाती दिनेश
हो, मला हिच जिलेबी जास्त
माझ्या मुलानं हा प्रकार
In reply to माझ्या मुलानं हा प्रकार by रेवती
धन्स रेवती. अगं, मला आणि
क्या केहेने..!
तोंडाला पाणी सुटले!
तोंडाला पाणी सुटले!