दहावीचा निकाल.

तर्री's picture
तर्री in जनातलं, मनातलं
19 Jun 2011 - 3:52 pm

दहावीचा निकाल नुकताच लागला होता. वर्तमान पत्रामध्ये गुणवान मुलां-मुलींचे सचित्र कौतुक सुरु होते. डॉ.अनिल आपल्या तासावर भाड्याने घेतलेल्या कन्सलटिंग रूम मध्ये पोहोचले. आज एक-दोनच अपॉईंटमेंत्स होत्या . सेविकेने वर्तमान पत्रे समोर ठेवली . वाचता वाचता डॉ़क्टर एकदम भूतकाळात गेले.
बारा वर्षापूर्वी दहावीच्या निकालाचा दिवस आठवून त्यांचे अंग शहारून आले. फर्स्ट एम.बी.बी.एस. ला असताना अनिल को़कणात आजोळी आला होता. आजोबा गेल्यापासून अनिलचे आजोळ आटले होते. तोही आता कॉलेज-कामात अडकत चालला होता.
अनिल खूप हुशार होता. दहावीला तो बोर्डात येणार हे जणु सर्वानी गृहित धरले होते. पण झाले भलतेच. अनिल ला खूप कमी गुण मिळाले. तरीही आजोळी त्याचे भरपूर कौतुक होत असे. पुढे बारावीत ही तसेच झाले. कशी तरी मेडीकल ला अ‍ॅडमिशन मिळाली. मेडीकलला अ‍ॅडमिशन मिळाली तरीही बोर्डात येण्याचे सगळ्यांचे स्वप्न आपण पूर्ण करू शकलो नाही , ह्याची बोच अनिलच्या मनात राहिली.

" दोनच दिवस का होईना , जावून आजीला भेटून ये रे . बरे वाटेल तिला. तुझ्यासाठी लोणचे केलेन , गरे तळून थेवलेन " आईच्या विनवणीला त्याने होकार भरला. आणि आजोळी आला. त्याच दिवशी दहावीचा निकाल होता.
पोहोचे पर्यंत २ वाजून गेले होते. आजी दारापाशी वाट पहात होतीच.
" ये रे बाबा ये " आजीचा आनंद आसाडून वहात होता. अनिल आजीच्या पाया पडला आणि नेहमी प्रमाणे घट्ट मिठी मारली .
"हळू रे पोरा. तुझी आ़जी म्हातारी झाली आता" . खरच आजी बरीच म्हातारी दिसू लागली होती . हालचाली हे संथ झाल्या होत्या. "ब्रेन अ‍ॅट्रोफी " बद्दल नुकतेच अभ्यासले होते.
मी एम.बी.बी.एस. होई पर्यंत आजी ...........अनिल शहारला. ......मेडीकल हे येडझव शास्त्र आहे ...काय घाणेरडे आपले विचार.
आजीने आमरस पुरी केली होती . अनिल भुकावला होताच. गप्पा मारता मारता त्याने आमरस ओरपायला सुरवात केली.
"हात धु आणि जरा पड ओटी वर "
अनिल ला एकदम हसू फुटले.
मला हसलास का रे अन्या ? आजीने विचारले. आजोबा गेल्यापासून त्याला अन्या कोणिच म्हणत नसे.
अग , तुला नही हसलो .
"पड ओटी" म्हणालीस ना...तर मला ओटी म्हणजे "ऑपरेशन थेटर" वाटले.
"बाबा , आता मी पडायचे तिकडे आणि तू ऊपचार करायचेस....."
" काहेतरीच बोलतेस ग तु आज्जी. ऊगाच सांगेतले. "
"आता झोप घटका भर . ऊठलास की तुला कामगिरी आहे. शांताराम येणार आहे आंबे ऊतरायला."
आंबे ऊतरवणे हे अनिलचे आवड्ते काम होते. मे महिन्याच्या सुट्टीत आला की दिवस भर तो आंब्याच्या मागे असे. झेला , शिकारणी घेवून आंबे ऊतरणॅ ( काढणे) आंबे पोत्यात भरणे , आढी लावणे , आमरस काढणे, जास्त रस आटवणे...... ते आठवता तो झोपी गेला.

(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

पुधिल भागाचि वाट पहात आहे

पुधिल भागाचि वाट पहात आहे

बहुगुणी's picture

19 Jun 2011 - 6:40 pm | बहुगुणी

..टाका पुढचा भाग.

चिरोटा's picture

19 Jun 2011 - 10:16 pm | चिरोटा

छान! आंब्याचा मोसम संपायच्या आधी पुढचा भाग येवू द्या.

सुनील's picture

20 Jun 2011 - 1:51 pm | सुनील

अगदीच त्रोटक भाग. जरा मोठा भाग लिहा की!

RUPALI POYEKAR's picture

20 Jun 2011 - 2:24 pm | RUPALI POYEKAR

सहमत

आनंदयात्री's picture

20 Jun 2011 - 10:31 pm | आनंदयात्री

येस इतर प्रतिसादकांसारखेच म्हणतो. येउद्या पुढला भाग.