रावण

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
13 Jun 2011 - 11:45 pm
गाभा: 

१) रामायणातील लढाई संपवायची रावणाला इच्छा होती . त्याला स्वतःच्या कृत्याचा पश्चाताप झाला होता.
पण एक प्रश्न पडल्यामुले समेट होऊ शकला नाही.
माफी कुठल्या तोंडाने मागायची?
२) रावण शाळेत असताना त्याला नेहमी मागल्या बाकावर बसवायचे.
कारण पुढच्या बाकावर रावण बसला की कोनालाच फळ्यावर लिहीलेले दिसायचे नाही
३)रावणाचे डोके दुखू लागले. त्याला डॉक्टरानी झेन्डू बाम दिला. थोड्यावेळाने रावण परत आला.
डॉक्टर कोणते डोके दुखतेय तेच कळत नाहिय्ये .
४) कुठलीही गोष्ट रावणाला सांगितली की ती षटकर्णी आपोआपच व्हायची.
५) लहानपणी रावण कंटाळला की कान गोष्टी खेळायचा.
६) रावण आला की सलुनमधल्या सगळ्या खुर्च्या बीझी व्हायच्या.
७) रावन एकाच वेळेस टोटल बाल्ड , गझनी , लीओनार्दी काप्री , तेरेनाम ,अमिताभ बच्चन , रीवर्स स्विन्ग , क्र्यू कट , सोल्जर्स कट या सगळ्या हेअर स्टाईल्स वापरायचा.

डिस्क्लेमर : हा धागा पूर्ण टाईमपास म्हणून काढलेला आहे. धाग्यात लिहीलेली मते ही लेखकाची असतील असेच नाही.

प्रतिक्रिया

एकदम चान चान...

डिस्क्लेमर: हा प्रतिसाद पूर्ण टाईमपास म्हणून दिलेला आहे. प्रतिसादात लिहीलेली मते ही प्रतिसादकाची असतील असेच नाही.

वाटाड्या...'s picture

14 Jun 2011 - 2:17 am | वाटाड्या...

तर रावण १०-१० टोप्यापण घालायचा.....अदलुन बदलुन ..:)
शिवाय एकाच वेळेला १० प्रकारच्या दारु आणि मुखशुद्धी पावडरी पण खायचा !! :))
लहानपणी म्हणे रावणाच्या आईला त्याच्या नक्की कुठल्या तोंडात भडकावुन द्यायची हा प्रश्न असायचा...
शिवाय रावण ज्या गल्लीत जायचा त्या गल्लीतील ट्रॅफिक दुसरीकडे वळवायला लागायची म्हणुन त्याला कोणीच बाहेर न्यायचे नाहीत.

- वानर वाट्या...

शैलेन्द्र's picture

14 Jun 2011 - 10:18 am | शैलेन्द्र

"रावणाला दहा तोंडांएवजी दहा पार्श्वभाग असते तर?"

त्याला कमोडऐवजी बाथटब वापरायला लागला असता..

चिंतामणी's picture

14 Jun 2011 - 11:37 am | चिंतामणी

__/\__

सोत्रि's picture

15 Jun 2011 - 12:20 pm | सोत्रि

__/\__ __/\__ __/\__

म्हणजे गोगोल ह्यांचा प्रतिसाद खंग्री, आणि त्या प्रतिसादावरचा हा प्रतिसाद महाखंग्री :)

- (एक् मुखी आणि एक XX) सोकाजी

नरेशकुमार's picture

14 Jun 2011 - 5:25 am | नरेशकुमार

(विचार करन्याची अजिब्बत इच्छा नसतानाही बळजबरी) विचार करायला लावनारी पोस्ट.
.
.
.
मला वाटले की रा-वन बद्द्ल काही असेल. पन पदरी सॉरी खिशात निराशा पडली.
.
.
.
बरं ते जाउंदे, रावन अल्प्संख्यांक होता का ?

राजेश घासकडवी's picture

14 Jun 2011 - 7:07 am | राजेश घासकडवी

लोक एका डोळ्याने तिरळे असतात, रावण अठरा डोळ्यांनी तिरळा होता.

कुठच्याही साध्या म्युझिकसिस्टिमवर गाणं लावलं तरी रावणाला ते डॉल्बी डिजिटल सराउंड साउंड ऐकू यायचं.

रावणाच्या क्रिकेटच्या टीमचं हडल खूपच मोठ्ठं व्हायचं.

रावण टाइमपास हिंदी सिनेमे बघत नसे, कारण डोकं बाजूला ठेवणं म्हणजे त्याच्या दृष्टीने खूप कटकट होती.

रावणाने गांधीवादाचा प्रयत्न सोडून दिला कारण एका गालावर थोबाडीत मारली दर त्याला एकोणीस गाल पुढे करायला लागत.

धर्मराजमुटके's picture

17 Aug 2013 - 4:35 pm | धर्मराजमुटके

खपलो !

रावण कधीच कुशीवर झोपू शकायचा नाही. :(
रावणाला कधीच टी शर्ट घालता आला नाही. :(

शैलेन्द्र's picture

14 Jun 2011 - 10:01 am | शैलेन्द्र

पायातुन घालायचा तो ...

मंदोदरीने रावणाला "ए.ऐक ना.एक माणूस की नाही बाब्बा होण्णार आहे" असे कोणत्या कानात सांगितले असेल?

मोस्ट प्रोबॅबली, उजवीकडुन / डावीकडुन विसाव्या कानाला !!!!

योगप्रभू's picture

14 Jun 2011 - 9:09 am | योगप्रभू

रावण महालात आला, की मंदोदरीला नसता ताप व्हायचा.
एकतर त्याच्या दहाही तोंडांना घाण वास यायचा.
बोलताना दहाही तोंडातून थुंकी उडायची.
दहा तोंडांची बडबड असह्य व्हायची
रावण लाडात आला, की 'दहाचा पाढा' कधी संपतो, असे तिला वाटायचे.

चार तोंडे असलेल्या ब्रह्मदेवांची पत्नी सरस्वती कशी आनंदात वीणा वाजवत बसलेली असते, याचे मंदोदरीला नेहमी कुतुहल वाटे. एकदा तिने तसे विचारलेसुद्धा. त्यावर सरस्वती म्हणाली, 'अगं आमच्या यांना पुस्तक वाचायचा नाद आहे. जेव्हा बघावं तेव्हा कसली तरी जडजड पुस्तकं वाचत बसतात. चांगलं आहे ते. मला कटकट नाही. म्हणून तर वीणावादनाचा छंद जोपासता आला.'

ब्रह्मदेवांची पत्नी सरस्वती कशी आनंदात वीणा वाजवत बसलेली असते

ब्रम्हा हे सोलो सेक्शुअल(चुभुद्याघ्या) असुन सेल्फ रीप्रोडक्टिव्ह होते . त्यातुन त्यांनी विष्वाची निर्मीती केली शिवाय सरस्वती ची ही केली . त्यामुळे सरवस्ती त्यांचं कन्यारत्न होतं . अधिक प्रकाश जाणकार टाकतील .

मृत्युन्जय's picture

14 Jun 2011 - 10:27 am | मृत्युन्जय

दोन्ही होती. नंतर ब्रह्माने सरस्वतीशी लग्न केले.

सूड's picture

14 Jun 2011 - 4:50 pm | सूड

क्कांय ?? जरा बैजवार सांगता काय ??

पण एकदा बिनबाईचं सगळं जमतय म्हटल्यावर पुन्हा लग्नाला बाई कशाला ?

Nile's picture

19 Jun 2011 - 12:09 am | Nile

=)) =)) =))

लै भारी!

विजुभाऊ's picture

14 Jun 2011 - 3:38 pm | विजुभाऊ

चारही दिशाना तोंडे होती म्हनून ब्रम्हदेवाला राग आला म्हणून तोंड फिरवुन बसता यायचे नाही.
शंका : ब्रम्हदेव झोपत कसा असेल. सरळ /उजव्या डाव्या कुशीवर की पालथा ?

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jun 2011 - 9:29 am | अत्रुप्त आत्मा

१)रावणासाठी कोणत्याच कंपनीला हेड फोन विकसित करता आला नाही.
२)तसेच रावणाला लहानपणी मऊ-मास-भात भरवायला १०आया लागायच्या.
३)एकदा एनाकोंडानी रावणाला गिळायचा प्रयत्न केला,पण तोच मुंडक्यावर पडला.
४)शिवाय रावणानी ब्रम्हदेवाकडे,अनेक ईतर कारणास्तव शरिराचे अवयवही वाढवुन मागितले होते,पण त्याचा चालु पसारा पाहुन ब्रम्हदेवाने ही मागणी फेटाळली....

शानबा५१२'s picture

14 Jun 2011 - 9:58 am | शानबा५१२

रावण एका तोडांने पान खायचा व सर्व तोंडे लाल व्ह्यायची.करण ती ईंटरकनेक्टेड होती अशी माहीती एका गाईडने सांगितली होती.

गेंडा's picture

14 Jun 2011 - 9:58 am | गेंडा

छाण छाण.

मग लिहीलेच कशाला??

रावण दहा सिगारेटचे एक पाकिट एकदम संपवत असे.
रावण सलून मध्ये गेला कि न्हाव्याला त्याचे काम दिवसभर पुरत असे.
एका डेंटिस्टने तर रावणाला सिरॅमिकच्या कवळ्या बसवून एका दिवसात नवीन "रिट्झ" घेतल्याचे ऐकिवात आहे. :)

आणि सर्वात महत्वाचे

रावण हा "पायाळु" होता.

;)

अभिज्ञ.

मृत्युन्जय's picture

14 Jun 2011 - 10:30 am | मृत्युन्जय

रावण हा "पायाळु" होता.

_/\__/\__/\__/\__/\_

अमोल केळकर's picture

14 Jun 2011 - 10:45 am | अमोल केळकर

५) लहानपणी रावण कंटाळला की कान गोष्टी खेळायचा. - हे खास आवडले

अमोल

नरेशकुमार's picture

14 Jun 2011 - 11:09 am | नरेशकुमार

रावनाने मिपावर सदस्यत्व घेतले, त्याने एक लेख लिव्हला आनि त्यानेच खंडीभर प्रतिक्रियांचा पाउस पाडला.
.
.
रावनाला १० नाही तर १०० तोंडे होती. असे ऐकुन आहे. कोनि खुलासा करेल काय ?

मनराव's picture

14 Jun 2011 - 11:13 am | मनराव

बकवास धागा.......... टाईमपास साठी दुसरे कितीतरी विषय आहेत एवढेच म्हणेण.......

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Jun 2011 - 11:36 am | मिसळलेला काव्यप्रेमी

सुचवा की राव!! नाहीतर याची मजा घ्या :)

शाहिर's picture

14 Jun 2011 - 12:14 pm | शाहिर

रावणाचा पास पोर्ट साइज फोटो म्हणजे लेण्डस्केप असायचा

तुम्हाला पॅनारोमा असे म्हणायचे आहे आहे का?

महेश कुलकर्णी

सुहास..'s picture

14 Jun 2011 - 12:31 pm | सुहास..

एस्क्युज मी !

मंदोदरी कपाळावर दहा कूंकवाचे ठिपके लावीत होती का ?

मृत्युन्जय's picture

14 Jun 2011 - 12:44 pm | मृत्युन्जय

मंदोदरी कपाळावर दहा कूंकवाचे ठिपके लावीत होती का

कुंकवाचा धनी एकच होता की राव ;)

खबो जाप's picture

12 Aug 2013 - 12:51 pm | खबो जाप

मला वाटत पांचाली ( द्रोपदी ) लावायची ५ पांडवांसाठी ५ कूंकवाचे ठिपके

प्रसाद गोडबोले's picture

14 Aug 2013 - 6:01 pm | प्रसाद गोडबोले

म्हणजे कपाळावर लावण्यात येणारे कुंकवाचे ठिपके हे शिरगणतीवर अवलंबुन नसावे ... ;)

नर्मदेतला गोटा's picture

14 Jun 2011 - 1:32 pm | नर्मदेतला गोटा

एवढा अभिषेक केला तरी
रावण फ्लॉप का झाला

आता गप्प का ?

जय - गणेश's picture

14 Jun 2011 - 1:43 pm | जय - गणेश

रावण जन्माच्या आघी त्या च्या घरी, अली बाबा आणी चाळीस चोर हा चित्रपट ब्ररे झाला लावला नाही.

शाहिर's picture

14 Jun 2011 - 2:18 pm | शाहिर

रावण एकटाच समूह गीत म्हणायचा

अत्रुप्त आत्मा's picture

14 Jun 2011 - 3:18 pm | अत्रुप्त आत्मा

ग्रेट ग्रेट ग्रेट...शाहिर...लगे रहो...मुळ पद गाताना उरलेली ९तोंड दुसय्रांना धरुन ठेवावी लागत असतील.

कसं काय? तोंडं १० असली तरी गळा आणि स्वरयंत्र एकच होते ना?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jun 2011 - 1:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

विजुभाऊ's picture

14 Jun 2011 - 2:30 pm | विजुभाऊ

रावण औट झाला की त्याची क्रीकेट ची व्हायची. त्याची विकेट घेणाराला एका डावात संपुर्ण संघ गारद केल्याचे समाधान मिळायचे
रावण विकेट किपिंग करायचा तेंव्हा ३ स्लीप दोन गली आणि चार लेग स्लीप ही ठरलेली फिल्ड अ‍ॅरेन्जमेन्ट असायची .

५० फक्त's picture

14 Jun 2011 - 3:17 pm | ५० फक्त

१. रावण एकटाच लंकन आयडॉल मध्ये भाग घ्यायचा आणि महाफायनलचा महाविजेता व्हायचा.
२. होळीला रावण एकटाच दहा वेगवेगळ्या स्टाईल्नं बोंबलायचा.

रावणामुळे दशमान पद्धतीचा वापर वाढला.( तो केळी सुद्धा डझना ऐवजी दहाच घ्यायचा )

अनिरुद्ध प's picture

12 Aug 2013 - 12:35 pm | अनिरुद्ध प

बहुतेक कौरवान्पासुन पुढे शतमान पद्ध्तिचा वापर वाढला असावा.

रावणाच्या लग्नात मंदोदरीच्या वडिलानी २० हारांची ऑर्डर नोंदवली होती.

टारझन's picture

14 Jun 2011 - 4:05 pm | टारझन

हारांची ऑर्डर नोंदवली होती.

दिल हारा रे ... दिल हारा रे ओ दिल हारा रे दिल हारा .. दिल हारा रे ... दिल हारा रे ओ दिल हारा रे दिल हारा .. दिल हारा रे ... दिल हारा रे ओ दिल हारा रे दिल हारा .. दिल हारा रे ... दिल हारा रे ओ दिल हारा रे दिल हारा ..

- दिलहारा फर्नांडो

स्मिता.'s picture

14 Jun 2011 - 10:27 pm | स्मिता.

२० हारांची काय बरं गरज?
रावणाला १० डोकी असली तर मान एकच होती ना :P

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

14 Jun 2011 - 4:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

रावणाला १० मेंदू होते कां? असतील तर प्रत्येक मेंदू स्वतंत्र होता कां? स्वतंत्र असतील तर त्यात समन्वय कसा होत असेल? त्याचे सगळे मेंदू एकदम काम करत असतील कां? विचार करतांना नक्की कोणता मेंदू वापरायचा हे ठरविण्यात त्याचा किती वेळ जात असेल?

आनंदयात्री's picture

14 Jun 2011 - 7:52 pm | आनंदयात्री

अरे वा .. म्हणजे रावणाला पॅरॅलल कॉम्प्युटिंगचा जनक म्हणता येईल. बरे झाले अजुन एका पेटंटसाठी आता भांडता येईल.
कॉलिंग सर्किट, कॉलिंग सर्किट ! !!!

मल्टी कोअर प्रोसेसर ची आयडीया रावणापासुन घेतल्याची शक्यता आहे.

अहो शक्यता कस्ली, अ‍ॅक्च्युअल त्याच्यापासूनच आयड्या घेतलीये.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jun 2011 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते

मी धाग्याचे शीर्षक चुकून 'श्रावण' असे वाचले... गोंधळ वेळीच क्लिअर झाला म्हणून बरं!

आनंदयात्री's picture

14 Jun 2011 - 7:52 pm | आनंदयात्री

खिक्क

सूड's picture

14 Jun 2011 - 4:54 pm | सूड

वारंवार बिघडत असे.

पिशी अबोली's picture

12 Aug 2013 - 11:02 pm | पिशी अबोली

नाही.
रावण नऊ तोंडांनी वेगवेगळ्या खाद्य प्रकारांचा आस्वाद घ्यायचा आणि शेवटच्या तोंडाने एरंडेल प्यायचा.

मोरोपंतांच्या "त्या" आर्येत साखरेऐवजी एरंडेल घालता येईल तर मग =))

उदरकंडुअतिशमनार्थ तेलें एरंडेलें प्यावी |
तेही नसतां मग.....रिकामी जागा पाहिजें तशी भरावी || :P :P

रावणाला ढेकर आली की त्याला कुठल्या तोंडाने बाहेर काढावी हे समजत नसे.

JAGOMOHANPYARE's picture

14 Jun 2011 - 5:02 pm | JAGOMOHANPYARE

रावण एकाच वर्षात एकेका तोम्डाने पहिली ते दहावी शिकला.

तिमा's picture

14 Jun 2011 - 7:12 pm | तिमा

रावण रामरक्षा म्हणायला लागला की आरेसेस ची शाखा भरलीये असं वाटायचं.

भारी समर्थ's picture

14 Jun 2011 - 7:19 pm | भारी समर्थ

रावणाला दहा तोंडे होती पण कान किती असावेत?

भारी समर्थ

मी-सौरभ's picture

14 Jun 2011 - 7:26 pm | मी-सौरभ

रावण एक्टाच ग्रुप डिस्कशन करत असे..
पण एका डोक्याला कसे सिलेक्ट करायचे हा प्रश्न असल्याने पुढ्च्या राउंड ला सीलेक्ट होत नसे.

हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर विरोध होता.

हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर विरोध होता

च्यायला .. असंही होतं होय :) तरीच पाकिटमार होता तो ;)

परिकथेतील राजकुमार's picture

15 Jun 2011 - 12:56 pm | परिकथेतील राजकुमार

हेल्मेट सक्तीला रावणाचा प्रखर विरोध होता.

ऑ ? आम्ही तर धृतराष्ट्राचा विरोध होता असे ऐकले होते.

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Jun 2011 - 11:26 am | बिपिन कार्यकर्ते

विरोध दोघांचाही होता. फरक डेफिनिशनचा होता.

वारा's picture

15 Jun 2011 - 7:23 pm | वारा

रावणाला दहा ब्रान्डच्या सिगारेट लागायच्या.....

रावणाचे बहुतेक मास्तर म्हणत असत "एक गोष्ट दहा वेळा सांगावी लागते "

इरसाल's picture

16 Jun 2011 - 11:22 am | इरसाल

ह्यो खरा.....

ह्याला ९ तोंड

कि ह्यो...

आणि ह्याला १० नक्की कोणता खरा ?

कि ह्यो

शेवटी जो रावण दाखवल्या गेला आहे .. त्याला एकंही डोंक नाही असे ह्या हळव्या क्षणी णमुद करु इच्छितो.

- बावन

नरेशकुमार's picture

17 Jun 2011 - 5:32 am | नरेशकुमार

शेवटच्या रावनाचि मंडोदरी रॉय खुप फेमस आहे.
तीला पळवुन आनावि म्हनतो.

त्या मंदोदरी रॉय मधे लोकांना काय दिसतं कुणास ठाऊक ? टमाट्याचा क्रॉससेक्शन कुठली ;) त्यापेक्ष्या त्या अबु हजामाची सुन पळवुन आणने वर्थ आहे ;)

- टारेशा नोकिया

बिपिन कार्यकर्ते's picture

17 Jun 2011 - 11:25 am | बिपिन कार्यकर्ते

+१

टार्‍या, तू लड बाप्पू!

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jun 2011 - 5:58 pm | परिकथेतील राजकुमार

त्यापेक्ष्या त्या अबु हजामाची सुन पळवुन आणने वर्थ आहे

टार्‍याच्या कार्यास सुयश चिंततो व लागेल ती मदत देण्याचे कबुल करतो.

लष्करे परोबा

जेडी.. दोन नंबरच्या रावणाच्या (त्याच्या) डाव्या बाजूच्या हातामध्ये कोणता साप आहे..?? ;-)

अनिरुद्ध प's picture

13 Aug 2013 - 7:25 pm | अनिरुद्ध प

दोघानाही नउच आहेत की दहावे काय ईमर्जनसि म्हणुन राखुन ठेवले काय?

यापेक्ष्या त्या अबु हजामाची सुन पळवुन आणने वर्थ आहे
अरेरे .काय हे अध्ध्ध्ध्ध्पत्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्न्न्न्न्न्न्न
कोण्या भल्या माणसाने कल्याणच्या सुभेदाराची सून साडी चोळी खण नारळ देवून पर्त पाठवलीहोती म्हणे.
बहुतेक इथले मावळे पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करताहेत.
तुम्ही लाख सुना पळवून आणाल .तुमचे थोरले आबासाहेब तुमच्यावर नजर ठेवून आहेत हे लक्ष्यात असू द्या.

टारझन's picture

17 Jun 2011 - 11:03 am | टारझन

कोण्या भल्या माणसाने कल्याणच्या सुभेदाराची सून साडी चोळी खण नारळ देवून पर्त पाठवलीहोती म्हणे.

कमॉन अं विजुभाउ ... आम्ही साडीचोळी अन खण नारळ देऊन परत नाही पाठवणार .. यापेक्षाही छाण छाण नजराणे देऊ :)

भारी समर्थ's picture

17 Jun 2011 - 11:46 am | भारी समर्थ

नजार्‍यांशिवाय नजराणे कुठले द्यायला तुमी (आमी)... तिथं व्हर्जिनल (बिर्जे) अडला होता जंगलात काटकर म्होरं, तुमची काय कथा महाराज....

भारी समर्थ

विजुभाऊ's picture

17 Jun 2011 - 2:52 pm | विजुभाऊ

कमॉन अं विजुभाउ ...
सून सायबा सून
कुणाची ही सून
तिलाच इच्यार की
कुटं हुती म्हनून
सून सून सून सून

नर्मदेतला गोटा's picture

18 Jun 2011 - 1:16 am | नर्मदेतला गोटा

>> मंदोदरीची ऐश होती हं पण Smile १०-१० व्हेरियेशन्स

मग वटपौर्णिमेचं काय ?

** मंदोदरीला वटपौर्णिमेच्या दिवशी फेर्‍या मारुन चकरा यायच्या.....
** अंगाईगीत गाताना रावणाच्या आईसोबत ९ दासी आजुबाजुला बसुन रावणाचे डोके मांडीवर ठेउन थोपटत असत....
** रे-बॅन कंपनीने रावणासाठी गॉगल बनवण्याकरिता वर्ल्ड बँकेकडुन कर्ज घेतल्याचे ऐकिवात आहे.....
** रावणाला वाईड बॉल टाकण्याचे रेकॉर्ड श्रीसंतच्या नावावर आहे.....

कपाळावर ठाप्पकन हात मारल्याची स्मायली रावणाला नौ वेळा चोप्य पस्ते करावी लागायची

जय - गणेश's picture

19 Jun 2011 - 11:09 am | जय - गणेश

रावणाच्या खेळायच्या पत्त्यामधे १० जोकर होते, आणी प्रतेक जोकराला १० तोंड होती.

विजुभाऊ's picture

26 Jul 2012 - 2:05 pm | विजुभाऊ

@ रावणाच्या मोबाईल ला दहा ब्ल्यू टूथ होते
@ दात घासताना रावणाला दहा ब्रश काठीला प्यारलल बांधावे लागायचे.
@रावणाचा भांग पाडताना दहा मिनी ड्राफ्टर प्यारलल काम करायचे
@ रावण शाळेत शीर्शासन कधीच पडायचा नाही
@ रावणाला त्याच्या सरानी "डोक्यावर पडलास का?" असे कधीच विचारले नाही.
@ रावणाला परीक्षा हॉल मध्ये एकटाच बसवायचे. तो एकाच वेळेस प्रत्येक प्रश्नाचा स्वतंत्र विचार करु शकायचा

मदनबाण's picture

28 Jul 2012 - 11:38 am | मदनबाण

अरे वा... इजुभाऊ परत एकदा रावण रावण खेळायला लागले वाट्ट !
मागच्या जन्मी तुमच्या जिगरी दोस्त होता वाट्ट ! ;)

असो...
आता सगळे इतके रावणावर प्रेम दाखवत आहेत,तर मी म्हणतो... मागे कशाला रहावे ?
जरासा चावटपणा करुन घेतोच ! ;)

रावणाला दहा डोकी आणि २० डोळे असले; तरी सुंदर स्त्रीया पाहिल्यावर त्याच्या एका *जागी फार ताण यायचा ! ;)

(*हॄदयावर... आले लगेच सगळे इथे काय लिहलं आहे ते वाचायला !)

१)रावणाने ग्राहक मंचात जावुन नये म्हणून जिलेट ने प्रेस्टो ची जहिरात बदलली. अगोदर ती एक ब्लेड करे काम दस दिन. अशी होती. ती बदलून जिलेट ने नंतर ती एक ब्लेड दस शेव अशी केली.
२)रावण विमानात बसल्यावर दहाही सीट्स ऑक्युपाय व्हायच्या. दहा ही तोंडाना खिडकीला नाक लावून बसण्यासाठी मारामारी करावी लागायची.
३)रावण डोके दुखू लागले की अ‍ॅनासीन ची अख्खी स्ट्रीप संपवायचा.
४)रावणाला स्पॉन्ड्युलायटीस झाला होता.
५)तो स्टाफ पैकी कोणालाच डोक्यावर चढवून ठेवायचा नाही.
६)रावणाला हिन्दी फिल्म मध्ये इर्शाद हशमी सारखा रोल हवा होता. चुंबन दृष्यातच सगळी फिल्म सम्पायची म्हणून रोल मिळाला नाही

मिसळ्पाव .कॉम तर्फे रावणाला मरणोत्तर भारतरत्न देण्याची शिफारस संपादक मंड्ळाने सरकारकडे करावी अशी विनंती करतो.

arunjoshi123's picture

12 Aug 2013 - 5:18 pm | arunjoshi123

रावणामधे मध्यप्रदेशच्या दहा मंत्र्यांकडून एका झटक्यात राजीनामा घ्यायची क्षमता होती.

विजुभाऊ's picture

12 Aug 2013 - 5:38 pm | विजुभाऊ

रावण लंकेचा नागरीक होता. त्याला भारतरत्न कसे देणार?
फार तर निशान ए पाकिस्तान देता येईल. ते इतर देशांच्या नागरीकाना देता येते.

विजुभाउ , काहितरी मार्ग काढा की ,भारताशी फार निकट्चा संबंध होता हो त्याचा.

नको राव आपण मार्ग काढायचा अन त्यावर नंतर भाजप ने सेतु समुद्र म्हणुन हक्क सांगायचा. कशाला उगाच

बहुगुणी's picture

13 Aug 2013 - 12:47 am | बहुगुणी

अरे वा... इजुभाऊ परत एकदा रावण रावण खेळायला लागले वाट्ट !
मागच्या जन्मी तुमच्या जिगरी दोस्त होता वाट्ट ! smiley

असो...

[बाकी १९९० चं भारतरत्न अ-भारतीय डॉ. नेल्सन मंडेलांना दिलं होतं, तेंव्हा लंका-रहिवासी रावणालाही चान्स आहे ;-)]

बाळ सप्रे's picture

14 Aug 2013 - 10:46 am | बाळ सप्रे

श्रीलंकेच्या संस्कृतीत रावणाचे स्थान काय असेल? देव की दानव? की त्यांना माहितीच नसेल की भारतात एक व्हिलन लंकेतला म्हणून इतकी वर्ष ओळखला जातोय!!! :-)

प्रसाद गोडबोले's picture

14 Aug 2013 - 6:06 pm | प्रसाद गोडबोले

नशीब रावण स्त्री नव्हता ...नाहीतर किलकिलाटाने बिच्चार्‍या मंदोदरीचा जीव गेला असता =))

सूड's picture

19 Aug 2013 - 3:23 pm | सूड

आता तो रावण जर स्त्री असता तर मंदोदरी कशाला आली असती त्याच्या आयुष्यात. आणि समजा आलीच असती तर तिला दहा तोंडांच्या आपल्या या मैतरणीची कंपनीच नसती का मिळाली!!

प्यारे१'s picture

17 Aug 2013 - 12:01 am | प्यारे१

आजचा सवाल वर निखिल वागळे बरोबर रावण एकटाच(?) बोलायचा.
नि तरी निखिल त्याला 'मी तुमच्याकडं नक्की परत येतो आत्ता मला ट्राय च्या नियमानुसार कम्पल्सरी ब्रेक घ्यावा लागणार आहे ब्रेकपूर्वी प्रश्न पहा असं म्हणायचा.... ;)

म्हैस's picture

19 Aug 2013 - 11:56 am | म्हैस

रावानाबद्दाल हे असल लिहिलेल थिक अहे. पन ब्रह्म देवन बद्दल ? हिन्दु धर्मा बद्दल साध्या साध्या गोश्ति माहित नसनअरे मुसल्मान , ख्रिस्चान का होत नहित ? सरवस्ती त्यान्चि मानस पुत्रि होति. त्यान्च्या पत्निचा नाव सवित्रि. मूर्खा मुलिशि कोनि लग्न कर्त का?

दादा कोंडके's picture

19 Aug 2013 - 2:58 pm | दादा कोंडके

म्हशीशी सहमत.

- (धर्मा मांडवकर) दादा

विजुभाऊ's picture

19 Aug 2013 - 3:18 pm | विजुभाऊ

म्हैस काका/ताई मौशी
ब्रम्हदेवाच्या या गुणापायीच त्याचे कोठे मंदीर बांधत नाहीत. (अपवाद:पुश्कर) त्याला बेटीचो* असेही म्हंटले जाते.
हिंदु धर्माबद्दल एवढ्या साध्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील असे वाटते

केजीत असताना रावणाला " हाताची घडी तोंडावर बोट" असे कोणी साम्गितले की त्याची फार पंचाईत व्हायची

त्रिवेणी's picture

19 Aug 2013 - 3:58 pm | त्रिवेणी

रावणाला एका वेळी एकाच नाकाला सर्दी व्ह्यायची की दहाही नाकांना.

म्हैस's picture

20 Aug 2013 - 2:42 pm | म्हैस

विजुभाऊ ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्यांची पूजा करत नाही ह्या मागे वेगळी गोस्त आहे. त्याचा कारण सरस्वतीशी लग्न हे नाहीये. ब्रह्मदेव , गाय आणि केतकी ची फुले अश्या तिघांना ह्या गोष्टीत शाप मिळालाय. आणि विष्णूंना आशीर्वाद मिळाला कि तुम्ही प्रत्येक अवतारात पूजनीय असाल. सांगा बारा हि कोणती गोष्ट आहे.? माहित आहे न तुम्हाला बेसिक गोष्टी.

दादा कोंडके's picture

21 Aug 2013 - 2:30 pm | दादा कोंडके

म्हशीशी परत एकदा सहमत.
व्हॅंअ‍ॅंअ‍ॅंअ‍ॅं....

रावणाचे दर डोई उत्पन्न नक्की किती असेल?