किल्ली हरविली

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
5 May 2011 - 7:03 am

हरवली आहे एक किल्ली
मनाच्या कपाटात बंद केलेली गुपिते
ओरखडे न पाडता बाहेर काढणारी

हरवली आहे एक किल्ली
बंद केलेल्या कानांचे कुलूप उघडून
वादविवादात मूकपणे आक्रोशणारे सत्य ऐकणारी

हरवली आहे एक किल्ली
अपचनानंतर देखील उफ़ाळलेली भूक शमवून
दयेची कोठारे उघडणारी

हरवली आहे एक किल्ली
अन्यायाच्या वणव्यात विझलेली वाणी चेतवून
क्रांतीचा वणवा धडधडा बाहेर पाडणारी

हरवली आहे एक किल्ली
प्रौढत्वाच्या बेडयांमधे जखडलेले
शैशवाचे निरागसपण मुक्त करणारी

कविता

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

5 May 2011 - 9:43 am | स्पंदना

अशी गुरुकिल्ली हरवुन बसलो आपण?
मग शोधा स्वस्थता, स्ट्रेस्स रिलिफ सेशन्स मध्ये, योगा मध्ये !!

सुन्दर काका! फार छान रचना आहे.

नरेशकुमार's picture

5 May 2011 - 11:45 am | नरेशकुमार

मी digital lock वापरतो, त्यामुळे किल्लि हरवायच्या प्रशन्च येत नायी.

गणेशा's picture

5 May 2011 - 1:36 pm | गणेशा

nice

प्राजु's picture

7 May 2011 - 2:04 am | प्राजु

क्या बात है!! सुंदर!