मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

किल्ली हरविली

अरुण मनोहर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
हरवली आहे एक किल्ली मनाच्या कपाटात बंद केलेली गुपिते ओरखडे न पाडता बाहेर काढणारी हरवली आहे एक किल्ली बंद केलेल्या कानांचे कुलूप उघडून वादविवादात मूकपणे आक्रोशणारे सत्य ऐकणारी हरवली आहे एक किल्ली अपचनानंतर देखील उफ़ाळलेली भूक शमवून दयेची कोठारे उघडणारी हरवली आहे एक किल्ली अन्यायाच्या वणव्यात विझलेली वाणी चेतवून क्रांतीचा वणवा धडधडा बाहेर पाडणारी हरवली आहे एक किल्ली प्रौढत्वाच्या बेडयांमधे जखडलेले शैशवाचे निरागसपण मुक्त करणारी

वाचने 1566 वाचनखूण प्रतिक्रिया 4

स्पंदना 05/05/2011 - 09:43
अशी गुरुकिल्ली हरवुन बसलो आपण? मग शोधा स्वस्थता, स्ट्रेस्स रिलिफ सेशन्स मध्ये, योगा मध्ये !! सुन्दर काका! फार छान रचना आहे.

नरेशकुमार 05/05/2011 - 11:45
मी digital lock वापरतो, त्यामुळे किल्लि हरवायच्या प्रशन्च येत नायी.