असाच अजुन एक प्रवास !

माझीही शॅम्पेन's picture
माझीही शॅम्पेन in जनातलं, मनातलं
17 Apr 2011 - 3:29 am

पोरीच्या इवल्या इवल्या डोळ्यांनी जाऊ नका जाऊ नका म्हणत असताना जड पाऊलांनी निरोप घेऊन टॅक्सी एअर-पोर्ट कधी निघाली.
तोच रस्ता , तीच वळण तेच सोपस्कार पार पाडून विमानात स्थिरवलो. विमानाच्या खिडकीतून बाहेर बघत मनातील निराशा हळु हळु वाढु लागली होती. ढगांचे काळे-पांढरे पुंजके जितके घट्ट होत होते तितकेच मनातील निराशेचे ढग दाटले होते. अधून-मधून जमिनीवरचे पाण्यचे तलाव डोळ्यात कवडसे खुपसत होते. जे खर तर सुंदर दिसायला हव होत तेच खुपत होत.
कसला कंटाळा आला आहे , कसली निराशा आहे हेच कळेना. भूतकाळात मन गेल , बहुतेक हेच सगळ हव होत नोकरी लागताना हाय-फ्लाईंग करियर असाव , चांगल घर , मनासारखी सखी , नजरे आड करू नये अशी गोंडस पोरगी , स्वतच घर गाडी . सगळे चेक-पॉइण्ट्स चेक करून झाले आहेत.
मग निराशा कसली शोधायचा प्रयत्न चालू होता.

लांबलचक प्रवास संपून इमिग्रेशन , कस्टम वैइगरे सोपस्कार पार पाडून कनेक्टिंग फ्लाइट साठी वाट बघत बसलो ,
पुन्हा तोच निराशेचा गुंता वाढु लागला.

विमानाला अजुन ७ तासचा अवधी होता. विचारचक्र थांबावण्यासाठी एक फेर फटका मारताना अस वाटल की मी सोडून कोणीच निराश नाहीये. सगळे दिलखुलासपणे हसतयेत , आयुष्य उपभोगता आहेत. एरवी हेच सगळ किती छान वाटायाच. सगळ चकाचक , आताही तोकड्या कपड्यातील मान्सल मांड्या दिसत असाण्यारा मुली , त्याचाही हातात हात घेऊन बिनधास्त जोडीनी फिरणारी मुले.. टॉक टॉक उंच टाचंचे बूट घालून जाणार्‍या हवाई-सुन्दरी , स्मार्ट पायलट आणि एअर-लाईन स्टाफ
काहीच बघावसच वाटत नाहिये.

कसा बसा वेळ काढून विमानात बसलो , शेवटी खिडकी जवळची सीट मिळली कॉलेज मधील मुलगी आणि तिची आई बसल्या. संपूर्ण प्रवास हा जोरदार वार्‍यातून आणि पावसातून करायचाय वैमनिकनी जाहीर केल.
दिवसा उजेडी बाहेर अंधार होत होता .. विमानाला जबरी हादरे बसत होते चुकुन रोलार-कोस्टरमध्ये बसलो की काय अस वाटून गेल.

शेजारच्या मुलीशी आणि आईशी गप्पा सुरू झाल्या दोघो-बाजूच्या चौकश्या झाल्या. ती मुलगी कॉलेज मध्ये शिकत होती आणि आई तिच्या बरोबर राहत होती... थोड विचित्र वाटल
त्या मुलीला मी एवढ्या लांबून फक्त ४ आठवड्या साठी आलोय हे ऐकून नवल वाटल , पटकन ती उत्साहानी बोलून गेली मला अस करियर हवय. सारख अस लांब लांब फिरता आल पाहिजे वेग-वेगळे देश पाहता आले पाहिजेत
पण तिच्या आईनी एक उसासा टाकून सगळ देवावरच अवलंबुन आहे अस म्हणताच मी चमकुन त्या मुली कडे प्रश्नर्थक मुद्रेने पाहील.
थोडा वेळ शांतता पसरली
थोड्या वेळाने मुलीनेच भानावर येऊन संगितल की ती फुफुसाच्या कर्करोगने आजारी आहे. आजार पण सांभाळून ती कॉलेज मध्ये शिकतेय आणि तिच्या आईने तिला खूप मदत करतेय.
मी पटकन विषय बदलला काहीतरी बोलून नंतर परत खिडकीतून बाहेर बघू लागलो..
आता माझ विचारचक्र विरूध्ध दिशेने फिरू लागल
सगळी सुख पायाशी असताना उगाचच निराश होऊन कुढत बसायची लाज वाटायला लागली.
बाहेरही आता वातावरण बदलेल होत , सूर्याचा लख्ख उजेड पडला होता किती फ्रेश वाटत होत. थोड्याच वेळाने सूर्यास्त होणार होता पण मनाने मी आणि विमान दोघेही डेट्रॉइटच्या विमानतळकडे झेपवलो अर्थात त्या मुलीला खूप खूप बेस्ट विशेस देऊन

--------------------
शॅम्पेन

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

पुर्वार्ध वाचुन माझ्या बद्दलच वाचतोय असं वाटलं. :(
बाकी पेला अर्धा भरलेला की रिकामा हे ठरवताना मनाचा नेहमी गोंधळ होतोच.
छान लिहिलयस रे.

माझीही शॅम्पेन's picture

19 Apr 2011 - 6:17 am | माझीही शॅम्पेन

बाकी पेला अर्धा भरलेला की रिकामा हे ठरवताना मनाचा नेहमी गोंधळ होतोच

धन्यवाद - तुम्ही छान शब्दात मांडले आहे ! बहुतेकांची ही कथा असु शकते :)

बाकी इतर प्रतिक्रिया देण्यरणही धन्यवाद !

सुनील's picture

17 Apr 2011 - 4:21 am | सुनील

मुक्तक आवडलं.

दीविरा's picture

17 Apr 2011 - 11:34 am | दीविरा

लेखन आवडले

असे प्रसंग खूप काही शिकवून जातात.

आपला पेला अर्धा रिकामा वाटला की आजुबाजूचे रिकामे पेले पहायचे. मग आपोआप लक्षात येत कि आपला पेला बराच भरलेला आहे.. शेवटी 'जगी सर्व सुखी असा कोण आहे?' :)

वपाडाव's picture

21 Apr 2011 - 6:34 pm | वपाडाव

लेख वेक लंबर...
अन प्रतिक्रिया काय म्हणावं....
बाकी, कुणाला जर तो सदरा हवा असेल तर व्य.नि. करा...

निनाव's picture

17 Apr 2011 - 11:51 am | निनाव

व्वाह. खूपच सुंदर आहे मित्रा. मस्तच. आपल्या पैकी खूप लोकं अश्या (विदेश दौरा) अनुभवातून जातातच. घरातून निघतांना काय वाटते हे अत्यंत सुंदर लिहिले आहेस. तेन्व्हा हे खूपच जवळ्चे अनुभव कथन वाटले. गणपा ला अनुमोदन. आणिक शब्द रचना मस्तच आहे. छान.
- शुभेछा . निनाव.

मृत्युन्जय's picture

17 Apr 2011 - 4:15 pm | मृत्युन्जय

छान लिहिले आहे

स्पंदना's picture

21 Apr 2011 - 7:33 am | स्पंदना

आपण बर्‍याच गोष्टीत तुलना करतो, म्हणजे माझी कार , तुझी कार; माझ करिअर , अमक्याच करिअर; त्याच यश, माझ यश;
पण दु:ख मात्र उगाळुन उगाळुन स्वतःच फार मोठ असल्याच दाखवतो. "माझ्या सारखा कमनशिबी मीच" हे तर वाक्य अगदी गोडीन उच्चारल जात अ‍ॅक्चुअली! पण अस अचानक समोर काही उभ ठाकत अन ताबडतोब आपण ताळ्यावर येतो.
अर्थात त्या किशोरी साठी वाईट वाटतच , पण 'आपका स्क्रू टाइट हुआ' याच एक सहकारी म्हणुन सुख आहे.

माझीही शॅम्पेन's picture

7 May 2011 - 12:33 am | माझीही शॅम्पेन

पण 'आपका स्क्रू टाइट हुआ' याच एक सहकारी म्हणुन सुख आहे.

कळल नाही ! ह्या वाक्याला काही संदर्भ आहे का ?

सांजसखी's picture

7 May 2011 - 12:50 am | सांजसखी

आवडले ... मनास भावले..