पालकांच्या दिसण्यावर जाऊ नका. ही पालकं दिसायला ओबड धोबड असली तरी चविला तर छान असतातच शिवाय कॅल्शियम युक्तही असतात. खुबड्यांप्रमाणे समुद्रात दगडांवर चिकटलेली किंवा वळवळताना सापडतात. ही भरपुर घासुन आणि बर्याच पाण्यात धुवुन घ्यावीत म्हणजे ह्यात अडकलेली रेती निघुन जाते.
साहित्य :
पालकं
५ ते ६ लसुण पाकळ्या ठेचुन
१ ते २ कांदे चिरुन
हिंग, हळद
मसाला १ ते २ चमचे
आल, लसुण, मिरची, कोथिंबिर वाटण १ ते २ लहान चमचे
सुके खोबरे + कांदा भाजुन केलेले वाटण ४ ते ५ चमचे
तेल, मिठ
गरम मसाला १ चमचा.
ही पालके
पालकं साफ करणे हे खुप किचकट काम आहे. पालक ही खडबडीत असतात त्यात रेती चिकटलेली असते. ही पालकं खडबडीत दगडावर मधुन मधुन पाणी टाकुन हाताने घासुन गुळगुळीत करावी लागतात.
मग ही पालके चिरुन त्यातील घाण काढून टाकुन चिरुन घ्यावीत.
आता तेलावर लसुण टाकुन कांदा गुलाबी रंगावर तळावा मग त्यात हिंग, आल लसुण पेस्ट, मसाला घालावा. आता पालक घालुन थोड पाणी घालुन शिजवावीत. जर सुकी करायची असतील तर पाणी नाही घातल तरी चालेल. नुसत्या वाफेवर शिजवावीत. मग साधारण १५ ते विस मिनीटांनी शिजली का पाहून त्यात कांदा खोबर वाटण, मिठ, गरम मसाला घालुन थोडे शिजु द्यावे जर रस हवा असेल तर थोडे पाणी टाका. उकळल्यावर गॅस बंद करा.
हे आहे पालकांचे सुके
पालकांचा रस्सा मटणाच्या रस्श्याप्रमाणे करतात. पालकांच्या बेसन घालुन वड्याही छान होतात.
प्रतिक्रिया
7 Apr 2011 - 1:03 am | संदीप चित्रे
असं वाटायचं पण ह्या पाकृमालेतले एक एक मासे पाहिले की तो वृथा अभिमान गळून पडतो :)
7 Apr 2011 - 1:13 am | गोगोल
मध्ये स्पिनॅच घातला तर मस्त "पालक पालकं" तयार होईल.
रेसेपी मस्तच पण मला नाही वाटत मी कधी ट्राय करीन.
7 Apr 2011 - 2:39 am | गणपा
मी पण हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला आणि ऐकला.
दगडाला चिकटलेली म्हणजे कालव्या* सारखी का?
च्छ्या उगाच आठवण काढली कालव्याची. :(
*कालव = ऑइस्टर.
7 Apr 2011 - 2:45 am | वेदनयन
ऐकावे ते नवलच!!! नशिब फुटके साले आपले. न आपली बायडी असले प्रकार करायची, न हाटलित असले प्रकार खायला मिळणार. असो डोळ्यांना बघायला मिळाले तेवढेच भरपूर.
7 Apr 2011 - 2:53 am | गणपा
काहुन नशिबाले अन बायडीले दोष देता सायेब. जगुतैंनी दिल्याय नवं रेशीपी. या घीउन, बनवानी द्या बायडीले बी सरप्राईज. ;) काय म्हंताव?
8 Apr 2011 - 1:20 am | वेदनयन
आपली बायडी तुझ्या बायडीसारखी नशिबवान नाहीये. लेका तुच बिघडलास; काय काय रेशिपी टाकायला लागला. तुझ्यामुळे आमच्यासारख्यांना घरात टोमणे खायला लागतात. आजकाल भांडी घासण्यावर तडजोड झाली आहे :)
जागुतै मात्र लै प्रेमाने रेशिपी टाकते. निलकांताला सांगुन पाकृचा भाग टॉपवर सरकावयाला हवा. नाडया बिडया वाचण्यापेक्षा खादाडी कधिही चांगली.
7 Apr 2011 - 10:44 am | जागु
संदीप अभिमान गाळु नका. तुम्ही मासेखाउचा अभिमान धरला आहे मासेकरुचा नाही.
गोगोल मी सुद्धा पहिल्यांदाच केली. आमच्याइथे खातात सगळे पण मी कधी ट्राय नव्हती केली. बर्याच जणांकडून पालकांची स्तुती ऐकल्यावर म्हटल चला एकदा करुन पाहू. आणि मला आवडली. ही पालक खोबर्यासारखी कडक लागतात.
गणपा नाही कालव ही कवचात अडकलेली असतात. वरील कवच कोयता किंवा खरळाने फोडून आतील कालव काढला जातो पण पालक ही दगडावर फिरत असतात.
वेदनयन- गणपांचा सल्ला रास्त आहे तुमच्या वेदना कमी व्हायला.
7 Apr 2011 - 11:48 am | पंगा
यात अभिमान बाळगण्यासारखे काय असते? आवडते तर खा, नाहीतर खाऊ नका. त्यात विशेष काय करता? सगळेच जण काही ना काहीतरी खातातच.
"गर्व से कहो हम हिंदू हैं' इतकेच बिनबुडाचे आणि निर्बुद्ध वाक्य नाही काय हे?
7 Apr 2011 - 10:48 am | विजुभाऊ
काहुन नशिबाले अन बायडीले दोष देता सायेब. जगुतैंनी दिल्याय नवं रेशीपी. या घीउन, बनवानी द्या बायडीले बी सरप्राईज. Wink काय म्हंताव?
म्या काय करू गन्पा भावजी. म्या चुकीच्या घरात जलम घ्येत्लाय. घरी रेशीपी करयला घेत्ली तर माजी बायडी मला फ्राय करेल पण माशाला जीवदान देईल
8 Apr 2011 - 1:26 am | वेदनयन
इजुभाऊ, आपण गन्पाकडेच जाऊया. तो मन लावुन सैंपाक करेल, आपण नुस्ते पोट भरेस्तोवर खायचे आणी तोंड फुटेस्तोवर वा वा म्हणायचे. काय म्हणता?
7 Apr 2011 - 10:52 am | सहज
एकदा खुबड्या, शिंपले, पालकं व अजुन काही वेगळ्या नावाने असलेले हे जीव यात कुठला वास उग्र ते सौम्य अशीही एक उतरंड सांगा.
जागुतै यांच्या लेखमाला (रानभाजी, जलचर) मिपाचा अमूल्य ठेवा आहे.
7 Apr 2011 - 11:03 am | रामदास
जागुतै यांच्या लेखमाला (रानभाजी, जलचर) मिपाचा अमूल्य ठेवा आहे.
मिपाच्या किचनची द्रौपदीची थाळी.
7 Apr 2011 - 11:31 am | गवि
अजून एक ग्रेट पाकृ.
पण असले अनवट प्रकार मिळतात कुठे. मी मासे आणायला जातो तिथे मासे, खेकडे, झिंगे फारतर शेवंड असतात. त्यापलिकडे हे पालक मागायला जायचे कुणीकडे?
7 Apr 2011 - 1:52 pm | दीविरा
मी पण हा प्रकार पहिल्यांदाच पाहिला
अजिबात माहित नसलेला प्रकार.
तुमचे लिखाण वाचनिय असते :)
छान महिती :)
धन्यवाद
7 Apr 2011 - 4:04 pm | विशाखा राऊत
पहिल्यांदाच पाहिला ...
8 Apr 2011 - 1:36 am | प्राजु
टोट्टली न्यु!! जागु... धन्य आहे तुझी!
8 Apr 2011 - 1:52 am | धनंजय
खजिना आहे!
(शिंपल्यांचे प्रकार चिरायला मला फार कठिण जाते. कारण शिपल्या जिवंतच विकत घ्यायच्या असतात. धुतल्यानंतर सुरीने उघडायला जावे, तर इतके घट्ट बंद होतात... सुरूने शिंपल्याचे वारीक तवके उडतात, आणि मग रांधलेल्या शिंपल्यात कचकच लागते. याबाबत मी दोन गोष्टी करून बघितल्या आहेत (दोन्ही पटलेल्या नाहीत) :
१. शिंपले वाफेवर ठेवायचे. आपोआप उघडतात. पण थोडे शिजवलेही जातात, जे नको असते.
२. शिंपले फ्रीझरमध्ये १० मिनिटे ठेवायचे. नीट उघडत नाहीत :-( आणि थोड्या शिंपल्यांत तेवढ्यात बर्फ साचतो, तेही नको असते.
कोणी शिंपले चिरण्याबद्दल युक्ती सांगितली, तर मला हवे आहे.)
8 Apr 2011 - 2:14 am | गणपा
धनंजयराव, शिंपल्या शिंपल्या दार उघड अशी आर्त हाक मारुन पहा बर. ;)
आमच्याकडे तरी शिंपल्या वाफवुनच घेतल्या जातात.
खेकडे, निवट्यांसाठी फ्रिजर उपयोगात आणला जातो. :)
9 Apr 2011 - 12:44 am | कुक
पालकानचा पातोळा मस्त लागतो
आज डब्यावर कोलीम आनला होता