मासे २४) पालकं
पालकांच्या दिसण्यावर जाऊ नका. ही पालकं दिसायला ओबड धोबड असली तरी चविला तर छान असतातच शिवाय कॅल्शियम युक्तही असतात. खुबड्यांप्रमाणे समुद्रात दगडांवर चिकटलेली किंवा वळवळताना सापडतात. ही भरपुर घासुन आणि बर्याच पाण्यात धुवुन घ्यावीत म्हणजे ह्यात अडकलेली रेती निघुन जाते.
साहित्य :
पालकं
५ ते ६ लसुण पाकळ्या ठेचुन
१ ते २ कांदे चिरुन
हिंग, हळद
मसाला १ ते २ चमचे
आल, लसुण, मिरची, कोथिंबिर वाटण १ ते २ लहान चमचे
सुके खोबरे + कांदा भाजुन केलेले वाटण ४ ते ५ चमचे
तेल, मिठ
गरम मसाला १ चमचा.
ही पालके
पालकं साफ करणे हे खुप किचकट काम आहे. पालक ही खडबडीत असतात त्यात रेती चिकटलेली असते. ही पालकं खडबडीत दगडावर मधुन मधुन पाणी टाकुन हाताने घासुन गुळगुळीत करावी लागतात.
मग ही पालके चिरुन त्यातील घाण काढून टाकुन चिरुन घ्यावीत.
आता तेलावर लसुण टाकुन कांदा गुलाबी रंगावर तळावा मग त्यात हिंग, आल लसुण पेस्ट, मसाला घालावा. आता पालक घालुन थोड पाणी घालुन शिजवावीत. जर सुकी करायची असतील तर पाणी नाही घातल तरी चालेल. नुसत्या वाफेवर शिजवावीत. मग साधारण १५ ते विस मिनीटांनी शिजली का पाहून त्यात कांदा खोबर वाटण, मिठ, गरम मसाला घालुन थोडे शिजु द्यावे जर रस हवा असेल तर थोडे पाणी टाका. उकळल्यावर गॅस बंद करा.
हे आहे पालकांचे सुके
पालकांचा रस्सा मटणाच्या रस्श्याप्रमाणे करतात. पालकांच्या बेसन घालुन वड्याही छान होतात.
वाचन
7211
प्रतिक्रिया
0