साहित्य: एक मोठी कडक कैरी, साखर, केशर, वेलचीपूड, दोन पातेली, त्यावर बसेल असे झाकण, मोठा चमचा, किसणी, चाळणी.
कृती: पातेल्यात अर्धा तांब्या पाणी उकळण्यास ठेवावे. कैरीची साले काढून किसून घ्यावी अथवा साले न काढता मोठ्या फोडी करून किसणीवर पालथ्या ठेवून किसाव्यात.कीस वाटीने मोजून घ्यावा.
कैरीच्या आंबटपणानुसार साखरेचे प्रमाण बदलते. कैरी आंबट नसल्यास एकास एक प्रमाण अथवा सव्वापट, दुप्पट किंवा जास्त साखर घ्यावी. पाण्याला आधण आल्यानंतर पातेल्यावर चाळणी ठेवून कैरीचा कीस पसरावा.
झाकण ठेवून वाफ द्यावी. एका कैरीच्या किसासाठी ८ मिनिटे वाफ द्यावी लागली. खूप वाफवल्यास चोथा होइल.
वाफवलेला कीस ताटात पसरून गार होवू द्यावा.
आता दुसर्या पातेल्यात मोजलेली साखर व साखरेच्या निम्मे पाणी पाकासाठी ठेवावे. तीन तारी पाक झाल्यानंतर गार झालेला कीस त्यात घालावा. मध्यम आचेवर चमच्याने ढवळत रहावे. केशरपूड व वेलची पूड घालावी.
पातळ झालेला पाक पुन्हा तीनतारीच्या जवळ गेला की आच बंद करावी. गार झाल्यानंतर साखरांबा अजून घट्ट होणार आहे हे लक्षात असू द्यावे. पूर्ण गार झाल्यानंतर साखरांबा बरणीत भरून ठेवावा.
टीपा: १.कैरी किसण्यासाठी जाड किसणी वापरावी. माझ्याकडे तशी नसल्याने कीस बराच बारीक झाला.
२. कैरी अतिशय आंबट असल्यास कीस पिळून घेऊन मग चाळणीवर पसरावा.
३. साखरांबा गार झाल्यानंतर भरून ठेवायची बरणी आधीच अगदी स्वच्छ धुवून, उन्हात वाळवून ठेवावी म्हणजे वर्षभर साखरांबा टिकेल.
४. साखरांबा करण्यासाठी जड बुडाचे पातेले घ्यावे म्हणजे तळाला जळून त्याचा वास साखरांब्याला लागणार नाही.
प्रतिक्रिया
24 Mar 2011 - 10:35 pm | निवेदिता-ताई
नक्की शतक गाठणार
24 Mar 2011 - 10:45 pm | रेवती
हे हे...
बघुयात कोण किती वाद उकरून काढतय? त्यावर खरा रंग अवलंबून आहे.;)
माझ्या धाग्याच्या पायगुणानं आपण म्याच जिंकलो.;)
24 Mar 2011 - 10:58 pm | शेखर
तुम्ही साखरंबा सगळ्याना पाठवला तर कोण कशाला वाद घालेल ? ;)
24 Mar 2011 - 11:10 pm | निनाद मुक्काम प...
पाककृती प्रमाणे सामन्याचा शेवट गोड झाला .
आता मोहालीच्या सामन्यात मोठा राडा होणार ( तेथील मैदानावर )
तेव्हा एक राडेबाज पाककृती हवी .
24 Mar 2011 - 11:20 pm | गणपा
पुढाल्या बुधवारी अजुन एक गोड रेशीपी पायजेलाय. :)
24 Mar 2011 - 11:33 pm | पैसा
रेवतीचा धागा आला आणि म्याच जिंकली तर मी एकटीच २५ प्रतिसाद देईन!
24 Mar 2011 - 11:34 pm | मेघवेडा
असंच म्हणतो!
वरील बहुतेक प्रतिसादकांप्रमाणेच मधल्या सुटीत साखरांचा/मुरांबा इ. सोबत खाल्लेले खाल्लेले पोळीचे रोल्स आठवले.. आज आधीच मॅचमुळे घरची खूप आठवण येत होती त्यात हे.. कुफेहेपा? ;)
25 Mar 2011 - 7:11 pm | स्मिता.
या प्रस्तावाला माझे अनुमोदन!!
25 Mar 2011 - 12:20 am | कवितानागेश
या पाककृतीमध्ये साखरेचे प्रमाण थोडे कमी करुन मीठ घातले
आणि केशराऐवजी लाल तिखट घातले तर जे काही तयार होईल,
त्याला छुंदा म्हटलेलें चालेल का?
- नसलेले ज्ञान पाजळणारी माउ
25 Mar 2011 - 12:39 am | रेवती
छुंदा पाकृ माहित नाही.
पुस्तकात बघावी लागेल.
25 Mar 2011 - 12:21 am | लंबूटांग
धाग्याने अशीच शंभरी गाठल्याने मी आपला साधा सोज्वळ प्रतिसाद देत आहे..
साखरांब्यामुळे बर्याच जुन्या आठवणी जाग्या झाल्या..
मी लहानपणी पक्का गोडघाशा होतो त्यामुळे साखरांबे (कैरीचा आणि करवंदाचा) म्हणजे जीव की प्राण...
ते वर कोणीतरी लिहील्याप्रमाणे पोळीला तूप लावून साखरांबा खाणे सततच चालायचे..
सद्ध्या फारसे गोड खात नाही त्यामुळे ३.५. वर्षांपूर्वी पहिल्यांदा भारतातून आलो तेव्हा आणलेला साखरांबा अजूनही पडून आहे..
25 Mar 2011 - 1:38 am | Nile
या धाग्यावर कीतीही अवांतर प्रतिसाद दिला तर डिलीट होणार नाही अशी टीप मिळाल्याने प्रतिसाद देत आहे. ;-)
बाकी साखरांबा मिळणार असेल तर अजुन दहा प्रतिसाद देउ, हाकानाका. ;-)
25 Mar 2011 - 1:41 am | लंबूटांग
मग 'तिकडचे' उडालेले प्रतिसाद चोप्य पस्ते करून टाक पटकन ;)
25 Mar 2011 - 1:43 am | Nile
हा हा हा. गुड आयडीया.. तसेही दोनचार प्रतिसाद द्यायचे राह्यलेच होते माझे तिकडे.. देउ काय? =))
25 Mar 2011 - 3:45 am | दिपाली पाटिल
आच्रत बव्ल्त ..
मी आपली प्रतिसाद वाढवायचं काम करतेय....
25 Mar 2011 - 4:22 am | विकास
साखरांबे (कैरीचा आणि करवंदाचा)
करवंदाचा साखरांबा कसा करतात? ;)
25 Mar 2011 - 4:50 am | लंबूटांग
हाहा, त्याला साखरकरवंदा म्हणायला पाहिजे खरं तर.
बाकी कसा करतात वगैरे काय माहिती नाही ब्वॉ. कसा खातात ते माहित आहे फक्त.
25 Mar 2011 - 8:46 am | दिपाली पाटिल
इकडे दे पाठवून तो साखरांबा... असाही तू खात नाहीस...
25 Mar 2011 - 12:36 am | चिंतामणी
मी आपला साधा सोज्वळ प्रतिसाद देत आहे.. असे आधीच जाहीर केल्याने अनेकांनी (पक्षी- सं.मं., विविध परदेशस्थ वगैरे) हुश्यश्यश्यश्यश्यश्यश्य केले असणार. ;)
25 Mar 2011 - 4:33 am | राजेश घासकडवी
९८ प्रतिसाद झाल्यामुळे
हा धागा वाचनमात्र करण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी मिसळपावची संपादकीय धोरणे पहावीत.
-जेवती
25 Mar 2011 - 4:38 am | गणपा
हुश्श् झाले एकादचे १०० ;)
25 Mar 2011 - 4:51 am | रेवती
धन्यवाद! धन्यवाद!! धन्यवाद!!
सर्व प्रतिसादकांचे आभार! त्यांनी बारीऽऽक लक्ष ठेवून शेवटी माझ्या धाग्याला शतकापार नेले.:)
धाग्याआधी दोन दिवस येताजाता दिसेल त्याला 'माझा धागा येतोय' असे अप्रत्यक्षपणे सांगून ठेवले होते.
त्यातूनही जर कुठे गणित फसले तर भारतात आणि घरात काही छुपे प्रतिसादक तयार ठेवले होते.
जाहिरातबाजी करताना आपण मागे पडता कामा नये. आपला सर्वसाधारण दिसणारा मालही खपवता आला पाहिजे.
माझा प्लॅन चिंतामणरावांनी अनवधानाने का होइना पण ओळखला. आपल्या प्रोत्साहनामुळे लवकरच माझा लाळेर्यांचा बिझनेस भरभराटीला येइल अशी आशा वाटते.;)
25 Mar 2011 - 6:57 am | स्पंदना
रौप्य! सुवर्ण ! हिरक! माहिताहेत.
१००री ला काय म्हणतात?
आता तु तुला कोणी आज्जी म्हंटल म्हणुन तक्रार नाही ना करणार?
( असा १००रे गाठायचा अस्तो होय? मला वाटल आच्रत बच्रत लिहुन गाठता येतो)
25 Mar 2011 - 7:05 am | रेवती
शतक पूर्ण होणार असेल तर पणजी म्हटले तरी खपवून घेईन.;)
25 Mar 2011 - 8:47 am | दिपाली पाटिल
१०० ला प्ल्याटीनम म्हणातात बहूतेक... प्ल्याटीनम पणजी कसं वाटतंय?
25 Mar 2011 - 8:56 am | नगरीनिरंजन
२५ :- रजत महोत्सव
५० :- सुवर्ण महोत्सव
७५ :- हीरक महोत्सव
१०० :- अमृत महोत्सव.
अजूनही येणारे प्रतिसाद पाहून रेवतीआज्जी चांदीच्या वाटीतून अमृतांबा खाणार असं दिसतंय. सर्वात लोकप्रिय (आणि वेल मार्केटेड) पाककृतीचा पुरस्कार या धाग्याला देण्यात येत आहे.
- अमृती
25 Mar 2011 - 2:15 pm | रमताराम
ओ दादा, गणित चुकलं की हो. ६० ला 'हीरक' नि ७५ ला 'अमृत' महोत्सव असतो. १०० ला शतकच म्हणतात. मधे ८०-८१ च्या आसपास कुठेतरी 'सहस्रचंद्रदर्शन' असते.
25 Mar 2011 - 5:53 pm | नगरीनिरंजन
तुमचं बराबर हाय दादा, पण आपण रेवतीआज्जीच्या वयाबद्दल नाय ना बोलत? मग हे पाहा.
A Diamond Jubilee is a celebration held to mark a 60th anniversary in the case of a person (e.g. wedding anniversary, length of time a monarch has reigned as King or Queen, etc.) or a 75th anniversary in the case of an event.[1]
25 Mar 2011 - 7:03 am | नगरीनिरंजन
व्वा! मस्त दिसतोय साखरांबा!
(प्रतिसाद दिलेला आहे याची नोंद घ्यावी.(स्साला पब्लिक इथं दणादण शतकं ठोकतंय आणि आमचं घोडं मात्र हाफ सेंच्युरीच्या आधीच बसतं. सोचनाऽऽ पडेंगाऽऽऽ ) )
25 Mar 2011 - 7:06 am | रेवती
झायरात तंत्र आत्मसात करा ननि!;)
आपला कंपू नसला तरी कंपूतलेच असल्याप्रमाणे वावरता आले म्हणजे झाले!
25 Mar 2011 - 7:16 am | मदनबाण
आपला कंपू नसला तरी कंपूतलेच असल्याप्रमाणे वावरता आले म्हणजे झाले!
ख्या ख्या ख्या खी खी खी... यशस्वी धाग्याचे सुत्र सांगितलेस गं मुली... ;)
बाकी +१ आणि तू सहमत आणि मी सहमतचे राजकारण पण करता आले पाहिजे बरं... कसे ? ;)
25 Mar 2011 - 8:41 am | दिपाली पाटिल
अर्रेच्च्या संधी हुकली, शंभरावा प्रतिसाद लिहाय्ला ऑफीसात काम पण केलं नाही आज..
25 Mar 2011 - 9:22 am | निवेदिता-ताई
चला आता द्विशतकाकडे वाटचाल सुरु आहे....
25 Mar 2011 - 2:26 pm | पुष्करिणी
आगामी (बुधवार) आकर्षणाबद्दलही सांगाकी रेवतीतै...मॅच मात्र जिंकली पाहिजे हां
25 Mar 2011 - 2:26 pm | मुलूखावेगळी
साखरांब्याला खुपच मुंग्या लागलेल्या दिसत आहेत ;)
25 Mar 2011 - 3:17 pm | गणपा
नीट पाह्य गो, काही डोंगळे पण दिसतील. ;)
25 Mar 2011 - 2:59 pm | बिपिन कार्यकर्ते
पाकृ : झक्कास!
फोटो : खल्लास!
दंगा : मस्त!
रेवती : महान!
25 Mar 2011 - 3:12 pm | टारझन
णिळ्या लायनीत विसर्ग द्यायचा राहिल्या गेला आहे का ?
- शाहिन सिटीकर्ते
25 Mar 2011 - 3:34 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
_/\_
टारझन : विरजण
25 Mar 2011 - 3:49 pm | इंटरनेटस्नेही
चुकुन दोनदा प्रकाशित झाल्यामुळे प्रकाटाआ.
25 Mar 2011 - 3:53 pm | इंटरनेटस्नेही
हेच आणि असेच म्हणतो!
-
(आनंदी) इंट्या.
25 Mar 2011 - 4:39 pm | रेवती
अरे बाबांनो/ बायांनो, बास, बास!!
कशीबशी शंभरी गाठायची होती........माझ्याकडून जाहिरात जरा जास्तच झाली वाट्टं!;)
इंट्या, टार्या, पैसाताई बास! हवीतर खरड करून नवी पाकृ सुचवा.:)
दिपाली, अगं तुझा मॅणेजर मला शिव्या घालेल ना!
आता यावर उपप्रतिसाद नकोयत.;)
25 Mar 2011 - 5:55 pm | नगरीनिरंजन
नाही नाही, आमचा आग्रहाचा हा एक घ्याच. आणि झायरातीचं कंत्राट घेणार का?
25 Mar 2011 - 5:58 pm | लंबूटांग
पाकृ मुरवायसाठीच्या काही टिप्स?
आमची पाकृ थंड व्ह्यायच्या आधीच संमं ने खाल्लेली दिसते :(.
25 Mar 2011 - 6:10 pm | सूर्यपुत्र
आणि धाग्याने शतक झळकवले की.
इतरजणांच्या धाग्यांना प्रतिसाद देऊन-देऊन जमा केलेले पुण्य कामी आले की.. ;)
-सूर्यपुत्र.
27 Mar 2011 - 8:22 pm | स्पंदना
एव्हढा उहापोह झाला पण कुणाला हा साखरांबा ब्रेड बरोबर कसा लागेल हा प्रश्न कसा काय नाही प्डला?
ब्रेड बरोबर टॉर्टीला, नान, एट्सेट्रा एट्सेत्रा ची पण उद्बोधक चर्चा व्हावी,
29 Mar 2011 - 10:06 pm | वहिनी
खूप छान ?
5 May 2011 - 1:08 pm | दीप्स
शमव तुझी भूक रेवती. हा घे अजून एक प्रतिसादअजून एक प्रतिसाद, गुळांबा/साखरांबा/मुरांबा/छुंदा हे सगळे अतिशय आवडीचे
27 May 2011 - 12:06 pm | विलासराव
आमचाही एक प्रतिसाद.
आत्ताच बनवला. हा पहा:
खाण्यासाठी जाहीर आमंत्रण.
27 May 2011 - 12:23 pm | कवितानागेश
आहा!
मस्त दिसतोय.
28 May 2011 - 6:11 am | गोगोल
कळतय की किती चांगला झालाय ते.
7 Jun 2011 - 8:44 pm | रेवती
धन्यवाद!
आता बास हो प्रतिसाद!
पुन्हा म्हणून म्हणायची नाही मी!
हौस फिटली!
8 Jun 2011 - 1:31 am | सखी
असं काय करते रेवती - हा अजुन एक आग्रहाचा प्रतिसाद, माहेरचा समज आणि घेच ;)
8 Jun 2011 - 11:18 am | स्वाती दिनेश
रेवती, साखरांबा माझ्या नजरेतून कसा काय सुटला? माहित नाही, पण भारी आवडीचा !
फोडींच्या पेक्षा असा किसलेलाच जास्त आवडतो, माझा भाऊ किसाच्या साखरांब्याला दोर्याचा साखरांबा म्हणायचा (कैरीचा कीस दोर्यांसारखा दिसतो पाकात घातल्यावर त्याच्या मते,:) )
स्वाती
हा प्रतिसाद म्हणजे शतकोत्तर अर्धशतकाकडे होणार्या वाटचालीतला खारीचा वाटा,;)