हुनान हा चीन देशातला एक प्रदेश आहे. इथल्या स्वयंपाकाच्या पद्धतीला 'हुनान' पद्धत म्हणतात. त्यात पण बरेच प्रकार असतात. हुनान पद्धतीचे वैशिष्ठ्य म्हणजे आलं, लसूण आणि काळी मिरी व कांद्याचा जास्त प्रमाणात वापर. चायनीज पदार्थात आणि एक प्रख्यात स्टाईल म्हणजे सिशुआन (sichuan). ह्यात सिशुआन मिरी आणि लाल मिरच्यांचा खूप जास्त प्रयोग असतो कि ज्यानी नाक, तोंड, डोळे, कान जिथे शक्य तिथून (:)) धूर निघतो. (इथे हसा. :D)
सामग्री:
२०० ग्रॅम बोनलेस चिकन
१ मोठी रेड पेप्पर
१ मोठी यलो पेप्पर (ह्या लाल पिवळ्या भोपळी मिरच्या मिळत नसल्यास २ शिमला मिरची लांबट चिरून वापर. माझं म्हणजे उगीच फ्याड!)
१०० ग्रॅम किंवा १ कप, चिरलेले मशरूम (आवडत नसल्यास वगळत तरी 'मेरा क्या जाता है'? काय? )
३ चमचे कॉर्न फ्लॉर
१ बोटा एवढा लांब आल्याचा तुकडा. ह्याला किसून घ्या. तयार पेस्ट वापरलीत तर तुमचा अस्सल हुनान चिकन होणार नाही, इमिटेशन!
१ मूठभर लसणीच्या पाकळ्या, किसलेल्या
१ मोठा कांदा, लांबट चिरलेला
ताजी मिरीपूड, २ चमचा (झेपत नसेल तर कमी घाला बरं का?)
१ मोठा चमचा सॉय सॉस
२ मोठे चमचे तेल
२ कप पाणी किंवा चिकन stock
चवीनुसार मीठ
कृती:
चिकन नीट धुवून, त्याला चाळणीत निथळत ठेवा. चांगलं कोरडं झालं कि मग त्यावर एक चमचा कॉर्न फ्लॉर, १ चमचा काळी मिरीपूड, १ चमचा लसूण, १ चमचा आलं घालून सगळा छान कालवून एका बाजूला ठेवा, १० मि.
एका मोठ्या भांड्यात तेल गरम करून घ्या. मग त्यात ते चिकन घालून थोडं शिजवून घ्या. चिकन वरून खरपूस दिसायला हवे. आता हे चिकन एका डिश मधे काढून ठेवा.
उरलेल्या तेलात बाकी लसूण, आलं, कांदा घालून मोठ्या आचेवर भरभर परता (ते ठेल्यावारचे चायनीज वाले करतात न, तसे!).
मग शिमला मिरची आणि मशरूम घाला. चायनीज पदार्थात भाज्या खूप शिजवत बसायच्या नसतात. १ मिनिट परतलं कि मग ते चिकन घाला. मिरीपूड घाला. सॉय सॉस घाला. शेजार पाजार सगळ्यांना कळलं पाहिजे, आज स्पेशल बेत आहे ते- इतपत घमघमाट होईल.
आता उरलेला कॉर्न फ्लॉर पाण्यात व्यवस्थित मिसळून घ्या आणि त्याला त्या चिकन वर ओतून न थांबता हलवत रहा (नाहीतर गुठळ्या होतील). फोटोत दिसतंय तसं जरा दाट झालं (बुडबुडे पण येतील) कि मग सर्व्ह करा. आहो नुसताच नाही, ह्या हाक्का नूडल्स बरोबर.
प्रतिक्रिया
23 Mar 2011 - 9:41 pm | प्राजु
माते.. तुझ्या रेसिपिंइतकीच तुझी लिहिण्याचि इष्टाईल.. खमंग, चमचमीत आणि झटकेदार असते..!
उद्याच करेन हा प्रकार. :)
23 Mar 2011 - 10:03 pm | सानिकास्वप्निल
एकदम झकास!
अतिशय सोप्पी पा़कृ आहे नक्की म्हण्जे नक्की करून बघतेच :)
24 Mar 2011 - 4:07 am | चित्रा
पाककृती छान आहे. मला असे चिकन किंचित कमी दाट आवडते.
24 Mar 2011 - 7:55 am | शिल्पा ब
छान दिसतेय डिश. कॉर्नफ्लॉवर नाही घातले तर चालेल का?
24 Mar 2011 - 10:09 am | गवि
मांचुरियन टाईप बनते का? वा..!!
एक शंका :
या प्रकारात कोंबडी आणि भाज्या नीट (पूर्ण) शिजत नसल्यास (शिजवणे अपेक्षितच नसल्यास) त्यातून काही पोटखराब (हा शेतजमिनीचा प्रकार नव्हे..!!) नाही ना होणार?
24 Mar 2011 - 10:21 am | खादाड अमिता
@ शिल्पा ब : कॉर्न फ्लॉर नाही घातला तरी चालेल, फक्त हे मग सुपी (soupy) डिश होईल.
@ गवि: मंचुरियन टाईप आहे, हो. मंचुरियन मधे चिकन ला आधी कॉर्न फ्लॉर च्या batter मधे बुडवून तळून घेतात. मग ग्रेव्हीत घालतात. ह्या पाक्रुत भाज्या, किंचित कमी शिजलेल्या राहतील पण कोंबडी दोनदा शिजवली गेल्या मुले कच्ची राहणार नाही. असा पण बोनलेस ब्रोईलर कोंबडी शिजायला वेळ लागत नाही.
24 Mar 2011 - 10:42 am | टारझन
त्या एवढ्या मोठ्या ढलप्या दिसत आहेत ते आख्खे लसुण आहेत काय? अबब .. असा पुर्ण लसुण पाहिला की मला ससुण मधे ऍडमिट व्हायला होतं :(
बाकी चिकन चा प्रकार असल्यामुळे आवडण्याची शक्यता नाकारता येत नाहि
- रदाड जनता
24 Mar 2011 - 10:49 am | शिल्पा ब
त्या ढलप्या म्हणजे मश्रुम्स आहेत. गावठी तिज्यायचं ;)
24 Mar 2011 - 10:52 am | टारझन
ऑये .. मॉड .. ते मष्रुम्स् नाही काय .. ते मष्रुमच्या खाली आणि उजवीकडे जे आहे ना.. त्या विषयी बोलतोय मी ...
- तिज्यायचं गावठी
24 Mar 2011 - 1:48 pm | स्पंदना
सोपा प्रकार दिसतोय.
या रवीवारी करुन बघेन.
लिहिण्याची ईष्टाइल आवडली
24 Mar 2011 - 2:05 pm | परिकथेतील राजकुमार
__/|\__ कातील !!
तू आणि जागुतै ह्यांच्या पाकृ मी निव्वळ प्रेक्षणिय फोटुंसाठी बघतो कारण मी शाकाहारी आहे.
फोटु बघुन मी 'हि डबल बी ची उसळ आहे' असे मनाचे समाधान करुन घेतले आहे ;)
24 Mar 2011 - 3:14 pm | कच्ची कैरी
मस्त मस्त मस्त मस्त !!!!!!!!!!!!!!!!!!
24 Mar 2011 - 3:38 pm | स्मिता.
पाकृ तर लई भारी दिसतेय. फोटु बघून तोंपासु.
नक्कीच करून बघणार...