झट्पट ब्रेड वडा ..(पाव वडा)
ब्रेड वडा
साहित्य :- ब्रेड, उकडलेले बटाटे ४-५ ,जीर ,मोहरी ,१ वाटी चिरलेला कांदा , १ टी स्पून लाल तिखट ,१ टी स्पून मॅगी मसाला ,मीठ ,ओवा ,
तिळ १ चमचा ,आणि भरपूर कोथिंबीर ,बेसन २ वाटी बस ........
कृती :- कढइत थोड तेल गरम करून त्यात जीर मोहरी तडतडवा,कांदा परतून घ्या ,लाल तिखट घाला ,चवीनुसार मीठ ,हळद घाला .आता या मिश्रणात उकडलेले बटाटे बारीक करून घाला,कोथिंबीर घाला छान मिक्स करा ,मिश्रण थोड गार होऊ द्या ,मग हाताने बटाटा थोडा कुस्कुरून घ्या
एका बाउल मध्ये बेसन ,मीठ ओवा ,तिळ,कोथिंबीर ,थोड लाल तिखट ,मॅगी मसाला,यांचे मिश्रण करून घ्या (जास्ती पातळ नको ,आणि जास्ती घट्ट हि नको ,मध्यम )
ब्रेडच्या स्लाईस वर बटाटा मिश्रण पसरून दुसरी स्लाईस लावा मिश्रण बाहेर येऊ नये म्हणून बेडच्या कडा पाण्याचा हात लावून दाबून घ्या
आता हे भरलेले स्लाईसेस बेसनात छान घोळवून तेलात डीप फ्राय करा ...
सॉस बरोबर गरम गरम सर्व्ह करा ............................:)
प्रतिक्रिया
18 Mar 2011 - 11:09 am | पिंगू
मस्त मस्त.. कधी येऊ हादडायला..
- पिंगू
18 Mar 2011 - 6:21 pm | टारझन
फोटू बघुन खायची वासनाच उडाली ... निदान ह्या जन्मात तरी ही रेशेपी खाईल की नाही शंकाच आहे. खाणार्याबद्दल सहाणुभुती , एवढंच म्हणेन.
अतिषय सुमार फोटो.
स्पष्ट प्रतिक्रीयेबद्दल राग मानु नये ( कारण मानला तरी फरक पडणार नाहीये :) )
-(स्पष्टवक्ता) शेहेंशा
20 Mar 2011 - 12:18 pm | पियुशा
अतिषय सुमार फोटो.
मोबाइल्वरुन काधलेत,समझा !
एक्दा सान्गितल ना आम्चा धागा इग्नोर करा
कशाला आपला अमुल्य वेळ वाया घालतोस
शिसारि बसेपर्यन्त !;)
20 Mar 2011 - 3:07 pm | टारझन
आम्ही लेखकाला इग्नोर करतो , लेखणाला नाही. तेंव्हा तुम्हाला इग्नोर केल्या आहे. पब्लिक फोरम वर धागे टाकुन वर इग्नोर करण्याच हक्क तुम्हाला नाही. :)
- शाशाशा
20 Mar 2011 - 3:18 pm | पर्नल नेने मराठे
20 Mar 2011 - 3:55 pm | टारझन
ह्याला म्हणतात ब्रेड पकोडा , आणि हा आहे खरा फोटु ;) पुन्हा खावेसे वाटत आहेत ब्रेड पकोडे .. धन्यवाद चुचे :) चटणी खुप टेंप्टिंग आहे.
18 Mar 2011 - 11:16 am | गणेशा
छान आहे रेसिपी
18 Mar 2011 - 11:21 am | वपाडाव
वाह्ह्ह.....
व्हेज मेजवानी....
ढेकर देउन तृप्त होतोय...
18 Mar 2011 - 3:04 pm | परिकथेतील राजकुमार
वाह वाह !
क्या बात है ;) कधी बनवुन घालते आहेस ?
18 Mar 2011 - 3:05 pm | अवलिया
कधी येऊ?
18 Mar 2011 - 3:37 pm | महेश काळे
मस्त पाक्रु!!
धन्यवाद!!
18 Mar 2011 - 5:35 pm | कच्ची कैरी
मस्त रेसेपी !तोंडाला पाणी सुटले :)
18 Mar 2011 - 6:01 pm | मुलूखावेगळी
मस्त ग छान
काय ग खास व्हेज डिश फर्माइशीवरुन का?
18 Mar 2011 - 9:36 pm | सानिकास्वप्निल
मस्तच पा़कृ आहे :)
18 Mar 2011 - 11:44 pm | नि३
मस्त कुरकुरीत वाटत आहे.
19 Mar 2011 - 10:30 am | ५० फक्त
करायचं, फोटो काढायचे आणि इथं छापायचं, आयला त्या पेक्षा एक डाव बोलवा की समद्यांना खायाला. म्हणजे प्रत्यक्श सांगता येईल कसं झालंय ते .
हा पदार्थ खायची सवय पार सोलापुरापासुनचिच, तिथं याला संगम वडा म्हणतात. आणि पुण्यात बिपिन कडं मिळणारं पाव पॅटिस याचाच चुलत भाव म्हणाना.
असो, यानंतर्च्या पाक्रु बरोबर आमंत्रण नसेल तर प्रतिसादाची संख्या व पातळी खालावु शकते या शक्यतेचा विचार करावा.
आणि हो जे झालंय ते भारीच असणार. पण एक शंका आहे, मॅगीचा मसाला यात घातल्यावर मॅगीत काय एव्हरेस्ट मटण मसाला घालणार काय ?
19 Mar 2011 - 11:00 am | चिंतामणी
यानंतर्च्या पाक्रु बरोबर आमंत्रण नसेल तर प्रतिसादाची संख्या व पातळी खालावु शकते या शक्यतेचा विचार करावा.
+ १
(नाव बदल. ५० फक्त वाचून कोण डेअरींग करणार आमंत्रण द्यायचे. बाकी ज्याची घरी सोय आहे त्यांना बोलावण्यापेक्षा 'परा'धिन माणसाला बोलवेल ती..;) )