मासे २२) काटी/कर्ली

जागु's picture
जागु in पाककृती
16 Mar 2011 - 1:06 pm

काटी/करली नावावरुनच ह्याचा बोध होतो की ही काटेरी मच्छी आहे. छोटी करली दिसायला सुंदर असते. शेपुट व पर सोनेरी असतात. भरपुर काटे असतात ह्यात. त्यामुळे लहान मुलांच्या हातात देउच नका. त्यांना मांस काढून द्या. काटे भरपुर असल्याने अगदी हळू चविचविने खाण्याचा आनंद मिळतो. ही करली खुपच चविष्ट असते म्हणूनतर काटे काढण्याचा त्रास सहन करुनही आवडीने लोक खातात. करलीचे कालवणही छान लागते. इतर कालवणांप्रमाणेच हिचे कालवण करतात.

करली/काटी जर छोटी असतील तर त्यांची डोके, शेपुट काढुन, पोटातील घाण काढून तिन पाण्यांतुन धुवुन घ्यावीत. जर काटी मोठी असेल तर एक पुष्कळ होते. हया लांब काटीचे तुकडे तिरके करायचे म्हणजे काटे व्यवस्थित काढता येतात. कारण ह्याचे काटे तिरके पसरलेले असतात.
ही आहे मोठी कर्ली

लागणारे साहित्य :
करली/काटी
७-८लसुण पाकळ्या
हिंग, हळद
मसाला १ ते २ चमचे.
मिठ
तेल.

पाककृती:
तुकड्यांना पहिला हिंग, हळद, मिठ, मसाला लावुन घ्या.

मग गरम गरम तव्यावर तेल सोडून तुकड्या तव्यात टाका. गॅस मिडीयम ठेवा. ५ मिनीटांची पलटा ५ मिनीटांत गॅस बंद करा आणि तयार व्हा काटे काढून चविष्ट मांस खायला. हाय काय नी नाय काय ? १० मिनीटांचा खेळ.

प्रतिक्रिया

वेताळ's picture

16 Mar 2011 - 1:20 pm | वेताळ

लहानपणी आजोळी ह्याचे सुके खाल्ले होते. चव मस्त लागते.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

16 Mar 2011 - 1:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे

वा वा, जागुताई आल्या, जागुताई आल्या....

बरेच दिवस नवीन काही छान छान माशांच्या पाककृती पाहायला मिळाल्या नव्हत्या. कर्ली खाण्याची मज्जा औरच. काटे असले तरीही.

यावरून आठवले, माझ्या एका मित्राला मी विचारले होते की जास्त काटे असलेले मासे खाल्ले आहेस का? त्यावर त्याने हो असे म्हणून पापलेट, सुरमई, बांगडा अशी नावे सांगितली होती. मी कपाळावर हात मारला होता आणि घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्याला ह्या धाग्याचा दुवा देतो आता.

सदर मित्र अनेक वर्षे मासे खात असला तरी "जाति"वंत मासेखाऊ नाही. कोण किती मुरलेला मासेखाऊ आहे हे बघण्यासाठी पापलेट, सुरमई, बांगडा या व्यतिरिक्त नावे घ्यावीत, लगेच कळते :-)

लहान असताना अनंत वेळा घशात काटे अडकवुन घेतलेत.
दोन्ही अतिशय काटेरी असतात. पण चविलाही तितक्याच उच्च.

काटेरी शक्यतो तळलेलीच खल्ली आहे.(खावी.)
कर्ली कापण्याची एक विशिष्ठ पद्धत असते. ज्यामुळे खाताना काट्यांच्या जास्त त्रास होत नाही. सहज वेगळे करता येतात. कर्लीच्या पाठी कडच्या भाग तळायला वापरतात आणि पोटाकडचे कालवणासाठी.
आता मे पर्यंत वाट पहावी लागणार :(

तोंडाला खूप-खूप पाणी सुटले आहे. लहानपणी आईने हे मासे केलेले असले कि माझ्या कपाळाला मोठी आठी पडायची.. कारण काटे.. शाळेतून आल्यावर खूप भूक लागलेली असायची.. मस्त वास सुटलेला असायचा, पण खाताना हे काटे काढत बसाव लागायच.. हळूहळू मोठं झाल्यावर या माश्याची गोडी कागली..

गोळीचा काटा, काटी, कर्ली, मांदेळी, कालवं, खेकडे, शिंपल्या, रावस, खाडीची सफेद करंदी, मोदकं, बांगडे, ओले बोंबील, बोयमासा ( पुढे-पुढे बोय मासा खाडीच्या वासामुळे कटाप झाला ) या सार्‍या माश्यांपुढे पापलेट, सुरमय झक मारतात....
जागू किती छळशील ग... आता यापुढे तुझे धागे उघडणारच नाही जा.. :(

जागु's picture

16 Mar 2011 - 1:36 pm | जागु

वेताळ, विश्वनाथ धन्स.

विश्वनाथ अगदी बरोबर. बर्‍याच जणांना कोलंबी, पापलेट, बांगडा ह्या व्यतिरिक्त माहीतीच नसते.

स्पंदना's picture

16 Mar 2011 - 3:17 pm | स्पंदना

हो आम्ही त्यातलेच आहोत.

सुरमाई राहिली तुमच्या कडुन. ती ही अशीच फार जाणकार नसलेली माणस खातात, आम्च्या सारखी.

गणपा पण कर्लिचे कालवणही खुप चविष्ट लागते.
काटे मी पण बरेच वेळा अडकवलेत आणि मग सुका भात काउन जिरवलेत.

विशाखा राऊत's picture

16 Mar 2011 - 3:04 pm | विशाखा राऊत

कर्ली खायची एक वेगळिच मज्जा असते.. केसायेवधे बारीक काटे तरीही याची चव दुसर्या कुठल्या माशाला नाहि

धन्यवाद जागु.
बरोबर मीही लहानपणी असेच गळ्यात काटे अडकायचे पराक्रम केलेत.मग कोरडा भात ढकलून गळा मोकळा करावा लागायचा किंवा मग केळे.
बहिण किंवा वडील दोघांपैकी कोणीतरी निवडून देत असे पण आता तीही सोय राहिली नाही.

अपर्णा अजुन बरेच मासे आहेत टाकायचे. सुरमई मी अजुन आख्खी नाही आणली त्यामुळे फोटो राहीला आहे. आख्खी आणेत तेंव्हा फोटो काढुन रेसिपी टाकेन.

कच्ची कैरी's picture

16 Mar 2011 - 3:47 pm | कच्ची कैरी

मस्त आहेत मासे आत्ता गावी गेले होते तेव्हा भरपूर काटे असलेले मासे खाल्ले पण त्यामाशांच नाव मला माहित नाही :(

परिकथेतील राजकुमार's picture

16 Mar 2011 - 3:50 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त !

शाकाहारी असुनही आम्ही फक्त जागु-पेश्शल फोटू बघण्यासाठी जागुतैचे धागे उघडतो :)

दीविरा's picture

16 Mar 2011 - 3:56 pm | दीविरा

मासे आवडतात पण काट्यांचे फारसे खाल्ले नाहीत.

आता आणुन पाहीन :)

बाकी तुम्ही फारच नवनवीन प्रकार दाखवता त्याबद्दल आभार

वसईचे किल्लेदार's picture

16 Mar 2011 - 4:17 pm | वसईचे किल्लेदार

लय भारी आणी चवीष्ट!
काटीला गाभोळी असेल तर अजुनच चव येते.

प्रियाली's picture

16 Mar 2011 - 6:04 pm | प्रियाली

करलीसारखा चविष्ट मासा नाही दुसरा. करलीचे कटलेट्स मस्त लागतात फक्त वाफवल्यावर त्यातले काटे काढणे म्हणजे महत्प्रयास.

सानिकास्वप्निल's picture

16 Mar 2011 - 6:32 pm | सानिकास्वप्निल

वाह!
खुपच चविष्ट पा़कृ आहे
मी ही मासे खाते पण फार काटे असलेले मासे खाल्ले नाहीत ह्या भितीने की काटे अडकतील :(
एकदा खाऊन बघीतले पाहिजे ....

रेवती's picture

16 Mar 2011 - 7:01 pm | रेवती

छान फोटू आणि पाकृ.

अन्या दातार's picture

16 Mar 2011 - 9:57 pm | अन्या दातार

इथे जो मासा मिळतो त्यात पन फार बारीक बारीक काटे असतात, पण कर्ली नसावा (कारण टेस्ट नसते! :( )

प्राजु's picture

16 Mar 2011 - 11:28 pm | प्राजु

छान आहे पाकृ... पण मी करेन की नाही ,माहिती नाही!! नाहीच बहुधा..! :(

संदीप चित्रे's picture

17 Mar 2011 - 6:15 pm | संदीप चित्रे

एवढंच बोलून हा अट्टल मासेखाऊ प्रतिसाद संपवतोय :)

खुप खुप धन्यवाद सगळ्यांचे.

श्रीराम गावडे's picture

18 Mar 2011 - 3:29 pm | श्रीराम गावडे

जागुताई आता एकदा पिवळी वाम होउन जाउ दे.

वाम आम्ही खात नाही. पण आता खाउन बघेन आणि रेसिपी टाकेन.

निकिता_निल's picture

21 Mar 2011 - 8:35 pm | निकिता_निल

व्वा, सुंदर फोटो . करली ,माझा अतिशय आवडता मासा.