वेळ झाली!

गुंडोपंत's picture
गुंडोपंत in जनातलं, मनातलं
9 Mar 2011 - 9:35 am

मित्र हो,
उपक्रमाच्या सुरुवातीच्या दिवसांची ही कथा आहे. मी नवीनच तेथे दाखल झालो होतो. या पूर्वी माझा बाप मनोगतावर वास्तव्याला होता. पण तेथल्या दंडेलीचे वातावरण पाहून तो उपक्रमावर दाखल झाला नि सोबत मलाही जन्माला घातले. उपक्रमावर मी येताच नावाप्रमाणे दंगा सुरू केला. जन्मतः असलेल्या खोचक, भोचक आणि हलकट स्वभावामुळे अनेकांचा आवडता आणि अनेकांचा नावडता बनलो. माझ्या प्रदीर्घ खरडवहीत तुम्ही ते वाचू शकता. युयुत्सु यांच्याशी मात्र तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना, असे झाले होते. प्रियाली मात्र मी कोण हे शोधण्यात दंग झाली होती.

तरी नवीन सदस्यांना लेखनाचे प्रोत्साहन देणे त्यांच्यावर कुणी शुद्धलेखन विषयक चिखलफेक केली तर त्याचे परस्पर प्रत्युत्तर देणे वगैरे कामे मी आपलीच मानू लागलो. मला वाटते की, नवीन सदस्याला स्थळाचा अंदाज नसतो कंपू बाजी माहिती नसते. मराठीच्या आवडी पोटी हे स्थळ सापडलेले असते. अशा वेळी सदस्याला स्थिरस्थावर व्हायला काही काळ द्यायला हवा. असो,

दरम्यान या स्वभावाची नेमकी रचना कशी असावी या बद्दल चिंतन सातत्याने सुरू होते. त्यासाठी चक्क कागदावर माझे व्यक्तीचित्र लिहूनच काढण्यात आले. माझे वय, टक्कल, माझी 'ही', माझी व्यायामशाळा, माझे विचार, हिंदू कडवटपणा, स्पष्टवक्तेपणा, दिलदारी, माणुसकीवर, भविष्याच्या अभ्यासावर असलेली नितांत श्रद्धा, देवभोळेपणा, ख्रिस्तीकरणाप्रति असलेली भीतीची भावना आदी बाबींना स्थान दिले गेले. त्यांचा तिरसटपणा, एककल्ली विचार करण्याची प्रवृत्ती हे सगळे त्यात गोवण्याचे पक्के केले. त्या प्रकारचे वाचन सुरू केले. त्यासाठी अशा प्रकारच्या निरनिराळ्या लोकांना भेटायचा, त्यांच्याशी चर्चा करण्याचा सपाटाच लावला. वेगवेगळ्या नोटस काढल्या गेल्या. गुंडोपंत कसे दिसतात यासाठी त्यांचे एक रेखाचित्रही तयार केले गेले. यातून हे व्यक्तीमत्व उभे केले गेले. 'मी एक अतिशय सुमार बुद्धीमत्तेचा सामान्य इसम आहे' ही पंचलाईन ठरली. हे सर्व बर्‍यापैकी 'बापाच्या विचारांच्या, अनुभवांच्या आणि वाचनाच्या पलीकडचे' होते.

एकदा स्वभाव निश्चिती झाल्यावर चर्चा आणि लेखांवर तशा वादग्रस्त प्रतिक्रिया येणे हे साहजिकच झाले. त्यातून अनेकदा वादंग उभे राहू लागले. संपादनाची कात्री पार तलवारीत परावर्तीत व्हायची वेळ आली. शिवाय काहीही झाले तरी अतिशय सुमार बुद्धीमत्तेचा सामन्य इसम आहे या भूमिकेमुळे अनेकांना वाद कसा करावा हेच समजेनासे होत असे. वादविवादात अनेक सदस्यांना आंतरजालीय आत्महत्यांतून त्यांनी वाचवले. तरीही त्यातल्या वादामुळे लेखच अप्रकाशित व्हायला लागल्यावर मग गुंडोपंतांची अनुदिनी उभी राहिली. त्याला तसेच नाव दिले - पुष्कळसे वादग्रस्त नि थोडेसे बिघडलेले डोके. मग तात्याने मिपा काढण्याची टूम काढली. त्यात त्याने निरनिराळे आयडी घेऊन धूम उडवली. त्यातल्या पोष्टमन प्रकरणाच्या वेळी मी आवाहन केले - झाले ते पुरे! आता मराठीला हवे तसे स्थळ मिळाले आहे आता सुरुच होऊन जा देत जलसा! पण तात्याच तो! तो काय ऐकणार माझे? त्याचे उद्देश निराळेच होते. असो. त्यामुळे मिपावरून परत उपक्रमवर येऊन वस्ती केली.

येथे मला पिडता येतील असे माझे मित्र प्रकाशराव, यनावाला आदी महापुरुष आहेत. त्यांच्याशी चर्चा करून की बोर्ड झिजले पण गुंडोपंत आणि ते ही आपापल्या जागेवर ठाम राहिले. पण एकुण मजा आली. दिलीप बिरुटे सर, सहजराव आदी मित्रमंडळी मिळत गेली. एकुण व्यक्तीमत्व खुलत गेले. मात्र योग्य वेळी गुंडोपंत म्हणजे कोण याचा खुलासा काही सदस्यांना करून देण्यात आला. कारण त्यात लपवण्यासारखे काही नव्हते. रिकामटेकडे सारख्या सदस्यांनीही याचा अंदाज घेतला आणि त्याची मजा लुटली! काही काळा नंतर असेही लक्षात आले की अनेक सदस्य गुंडोपंतांचे विचार आवडतात असे म्हणत आहेत. आता मात्र लोच्या झाला. कारण तोवर हे व्यक्तीमत्व आपल्या ताब्यात आहे असे वाटणार्‍या बापावर या व्यक्तीमत्त्वानेच अंमल गाजवू लागले. ज्योतिषाच्या विरोधात असलेला बाप आता त्यावरच्या वाचनानंतर त्याला 'तसा' विरोध करेनासा झाला. या व्यक्तीरेखेचे परिणाम बापावरच होऊ लागले!

असो, काळ मोठा मजेत गेला.
नीलकांतच्या आगमना नंतर मिपावर येणे सुरू केले. त्यासाठी मला सहजरावांनी उद्युक्त केले हे नमूद केलेच पाहिजे. मिपावर वावरण्यात एक मस्त मोकळेपण आहे मजा आहे, हे निश्चित!

गेल्या काही वर्षात मराठी आंतरजालाचे स्वरूप फार बदलले आहे. नवनवीन सदस्य येथे येत आहेत. त्यांचे सशक्त लेखन पाहिले की मराठी लेखनाला उर्जीतावस्था येते आहे असेही कधीकधी वाटते.

पण प्रत्येक चांगल्या आणि वाईट गोष्टीला शेवट असतोच. सारे प्रवासी घडीचे हे खरेच. आता असे वाटू लागले की 'पुरे आता'! जे रंगवले आणि रंगले तेव्हढे चित्र पुरे झाले. एक दिवस 'संपवण्याच्या' उद्देशाने अनुदिनी ही उडवून टाकली.
पण सहजरावांनी आग्रह केला की, 'पंत अखेरचा निरोप घ्यायला नक्की या' म्हणून आज आलो.

जाता जाता दोन गोष्टी - पहिली म्हणजे, आपले विचार आपल्याला लाख प्यारे असतात. पण फक्त तेच सत्य असतात असे मात्र मानू नका! दुसरी गोष्ट - आपल्या घरीही निवृत्तीला आलेली मंडळी असतील. त्यांच्याशी दोन घटका बसून बोला. त्यांचे चार शब्द ऐका. ही मंडळी तुमच्यापासून कधी दूर जातील हे सांगता येत नाही. त्यांना वेळ द्या. महत्त्वाचे निर्णय शक्य असल्यास त्यांना सांगा.

या माझ्या वास्तव्यात मी जे काही कुणाला लागट बोललो असेन हलकट छद्मीपणाने वागलो असेन, त्याबद्दल मला माफ करावे. माझ्या व्यक्तीमत्वावर, बिन्धास्त लेखनावर आणि प्रतिक्रियांवरही मनापासून प्रेम करणार्‍या सदस्यांचे कसे आभार मानावेत हे कळत नाही! मी त्यांचा सदैव ऋणी राहीन. तुम्हा सगळ्यांच्या वेळोवेळी मिळालेल्या प्रोत्साहनाने येथेवर आलो. हे यश तुम्हा मायबाप वाचकांचेच आहे!
तरी आजवर जे झाले ते पुरे करावे आणि आंतरजालीय समाधी घ्यावी हीच इच्छा!

सर्वांना माझा नमस्कार, आता आ़ज्ञा द्यावी ही नम्र विनंती!

आपला
अतिशय सुमार बुद्धीमत्तेचा सामान्य इसम
गुंडोपंत

नाट्यप्रकटन

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

9 Mar 2011 - 9:47 am | स्पंदना

बरच काही ऐतिहासिक संदर्भ असलेल दिसतय. त्या मूळे इतिहासाची माहिती नाही अस खर सांगुन , तरी पण कुणी जाताना दिसल की साधा हात हलवुन टा टा करायला काय हरकत आहे असा विचार करुन, टा टा!!

१. आपला बाप कोण ? हे अद्याप उमगले नाही.
२. आपण कोण ? हे सुद्धा समजलेले नाही.
३. आपला उद्देश काय होता हे कळलेच नाही.
४. आपण चाललात का ? हे ही कळले नाही.
५. आपण सुमार बुद्धिमत्तेचे सामान्य इसम आहात हे देखिल कुठे वाचल्या नाही :)

बाकी माझ्याकडुनही तुम्हाला जर कधी कमी जास्त शब्द गेल्या असेल तर नम्र माफी मागतो आणि अखेरचा रामराम घेतो ! आमच्या कोपरखळ्या / मस्कर्‍या / कुस्कर्‍या हे लेखकावर नसुन लेखनावर असतात ;)

पुढच्या जन्मात भेटणे शक्य झाल्यास आनंद होईल :)
पु.ज.शु.

- टारोपंत
आत्ता नाही येणे जाणे | आता नाही येणे जाणे ||
जनगणमण अधिनायक | जयहे ||

विकास's picture

9 Mar 2011 - 9:56 am | विकास

आशा करतो की फक्त "गुंडोपंत" आयडी आणि अनुशंगाने त्या आयडीचे व्यक्तीमत्व जात आहे. :-)

तसेच या (गुंडोपंतांच्या) विरुद्ध व्यक्तीमत्वाचा "पंतोगुंड" म्हणून नवीन व्यक्तीमत्व येथे येणार नाही तेव्हढे बघा. ;)

असो. गुंडोपंतांना मनःपुर्वक शुभेच्छा!

५० फक्त's picture

9 Mar 2011 - 10:00 am | ५० फक्त

मी तुम्हाला फार ज्युनिअर, त्यामुळे जास्त ओळख नाही, म्हणुन फक्त टाटा बाय बाय.

सहज's picture

9 Mar 2011 - 10:01 am | सहज

मी मराठी आंतरजालावर पहील्यांदा आलो तेव्हा आवर्जून विचारपूस करणारे, मला लिहायला प्रोत्साहन देणारे गुंडोपंत पहीले. मला आलेली पहीली खरड त्यांचीच. उपक्रमावर.

त्यावेळी २००७मधे मराठी जालावर रिटायर्ड सिनियर सिटीझन्स लोकांची मोठी संख्या होती, त्यातलेच आमचे व्यायामशाळा चालक गुंडोपंत. नाशीकचा खवट म्हातारा, ज्योतिषप्रेमी, रोखठोक बोलणारा. रोज सकाळी लवकर उठून व्यायामशाळा उघडणार, विजेचे बील, पाण्याचे बील वाढते आहे ह्या तक्रारी. तरुण वयात नाशीक मधे केलेला दंगा अभिमानाने सांगणारे, अधुन मधुन लफंग्यांच्या मानगुटी धरणारे पोलीसमित्र गुंडोपंत.
व्यक्तिरेखा तयार करणे, कॅरेक्टर मधे घुसणे म्हणजे काय हे गुंडोपंतांकडून जबरदस्त प्रात्याक्षीक मिळाले.
सुरवातीला मिपावर सदस्यत्व घेतले पण फारसे येईनासे झाल्यावर सध्या चष्मा, नंबरचा त्रास आहे, डोळ्यात पाणी येते, स्क्रीनकडे बघायला डॉक्टरने बंदी केली आहे इ सांगून माझ्या डोक्यात हा नाशीकचा म्हातारा हे पात्र फिट्ट बसले होते. जालावर कोण डु आयडीने वावरत आहे याचा हिशोब लावण्यात सदस्यांचा वेळ कसा निघुन जातो हे ज्याचे त्याला ठावूक असेलच. डु आयडी कोण हे शोधल्यावर मिळणारा आनंद देखील अवर्णनीय पण पुढे जेव्हा गुंडोपंत ही एक व्यक्तिरेखा आहे असे कळले तेव्हा मला तो खराच धक्का होता. त्यावेळी खरच वाटले की अरे हा म्हातारा खरा असायला पाहीजे होता, त्याला प्रत्यक्ष भेटायला मजा आली असती.

डु आयडी म्हणजे फक्त काड्या करणारे पाताळयंत्री लोक ह्या समजाला सुरूंग लावणारे हे आमचे गुंडोपंत!

गुंडोपंत तुमची आठवण कायम येत राहील्!! धन्यु!!!

चित्रा's picture

9 Mar 2011 - 10:13 am | चित्रा

अवतार संपवला तो निर्णय तुमचाच आहे, पण खर्‍या नावाने येत राहा :)

सुरवातीला मिपावर सदस्यत्व घेतले पण फारसे येईनासे झाल्यावर सध्या चष्मा, नंबरचा त्रास आहे, डोळ्यात पाणी येते, स्क्रीनकडे बघायला डॉक्टरने बंदी केली आहे इ सांगून माझ्या डोक्यात हा नाशीकचा म्हातारा हे पात्र फिट्ट बसले होते

अगदी. मला हा प्रकार खराच वाटला होता :)

नंतर "गुंडोपंतां"नी स्वतः होऊनच नाव सांगितले.

भडकमकर मास्तर's picture

9 Mar 2011 - 1:51 pm | भडकमकर मास्तर

टाटा

डु आयडी कोण हे शोधल्यावर मिळणारा आनंद देखील अवर्णनीय

सहजरावांना डुप्लिकेट आयडी शोधाशोध करायचा भयंकर नाद आहे... हा अनुभव घेतला आहे

शिल्पा ब's picture

11 Mar 2011 - 12:35 pm | शिल्पा ब

मला तर भडकमकर मास्तर हा आय डी सुद्धा ड्युप्लिकेट वाटतोय...

निखिल देशपांडे's picture

9 Mar 2011 - 10:10 am | निखिल देशपांडे

गुंडोपंताच्या बापाचे काय??? ते येत राहणार ना???

प्रकाश घाटपांडे's picture

9 Mar 2011 - 10:10 am | प्रकाश घाटपांडे

गुंडोपंत पाहुण्याच्या वेषात येतील व आपल्याला कधी भेटुन जातील ते आपल्याला समजणारच नाही.
पुष्कळसं वादग्रस्त नि थोडंसं बिघडलेलं डोकं! जे ताळ्यावर येणार नाही पण तीच त्यांची जगण्याची उर्मी आहे.
http://gundopant.wordpress.com/ हा काढून टाकला हे चांगल नाही केल. तो आत्म संवाद असतो.
आपुलाची वाद आपणाशी म्हणुन वैतागुन काढलेला ब्लॉग पुनर्प्रस्थापित होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना .

गुंडोपंत ही खरी व्यक्ती आहे असे मलाही सुरुवातीला वाटले होते. नंतर कुणाचे पोर असे इकडुन तिकडुन कळल्यावर सुरुवातीला विश्वासही बसला नव्हता. गुंडोपंत अवतार का जन्माला आला वगैरेशी आम्हाला काही घेणे देणे नाही. गुंडोपंत अवतार आम्हाला त्याच्या(अवताराच्या) वृत्तीसाठी आवडत नव्हता. असो, अवतार नकोच अशी आमची भुमिका असल्याने निर्णयाचे स्वागत. खर्‍या अवतारात खरी मते आणि सहभाग(स्वेच्छेनुसार) असेल अशी शुभेच्छा आणि आशा.

अवलिया's picture

9 Mar 2011 - 12:14 pm | अवलिया

:)

असो, फार काही कळलं नाही. पण (इथला)शेवटचा दिस गोड व्हावा ही शुभेच्छा !!

विजुभाऊ's picture

9 Mar 2011 - 12:28 pm | विजुभाऊ

गुंडोपंत परकाया प्रवेशाचा तुमचा प्रयोग उत्तम जमला.
गुंडोपंत ही प्रत्यक्ष नाही हे आज समजले आन इ२२१बी बेकर स्ट्रीट नावाचा पत्ता प्रत्यक्षात नाहीय्ये हे समजल्यावर जितका धक्का बसला होता तितका धक्का बसला

नगरीनिरंजन's picture

9 Mar 2011 - 12:30 pm | नगरीनिरंजन

आम्ही खरडलेल्या दोनचार ओळींवरचा दिलेला गुंडोपंतांचा अभिप्राय खरेच की अभिनयाचा भाग असा प्रश्न पडला. पण असो. गुंडोपंतांना आमचा रामराम.
जालावर वावरताना संवाद व्यक्तींशी नसून आयडींशी होतो हे पुन्हा ठसठशीतपणे लक्षात आले.

परिकथेतील राजकुमार's picture

9 Mar 2011 - 12:43 pm | परिकथेतील राजकुमार

गुंडु आजोबा वुई विल मिस यू ;)

मुलूखावेगळी's picture

9 Mar 2011 - 12:48 pm | मुलूखावेगळी

आता माझ्या शुद्धलेखनाच्या चुका कोण काढनार ?

मदनबाण's picture

9 Mar 2011 - 1:24 pm | मदनबाण

पंत हे काय ? अहो तुमचे आणि माझे बोलणे तसेच फारच कमी झाले... पण तुमचे हे आयडीधारी व्यक्तीमत्व मला भावले !!! :)
जाल सन्यास कशास घ्यावा ? मला तर नेहमी वाटते की, कोणीही असे जालव्यक्तीमत्व मागे सोडुन जावु नये / जाल सन्यास घेउ नये... :(
तुमचे या मागे नक्कीच काही तरी विचार असतील हे मला माहित आहे, पण जालावरच्या इतक्या सुरेख संस्थाळावर असणारं प्रत्येक व्यक्तीमत्व हरवु नये असेच मला वाटतं...
बाकी हे वाक्य माझ्या टाळक्यात परत आलं, ते डकवतो इथे :---
Arriving at one point is the starting point to another.
John Dewey
जाता जाता :--- विकासराव म्हणतात तसं पंतोगुंड व्यक्तीमत्व तर परत येणार नाही ना ? ;)

आयडी डुब्लीकेट असला म्हनुन त्यामागील माणुस थोडाच लपलेला असतो ?
मी मिपा वर सक्रीय झालो म्हनजे अलिकडेच .. आपली तशी ओळख नाही ..

नविन सदष्य बद्दलची आपली मते पण पटली .. पण काय आहे ना. नविन सदश्यांना प्रोत्साहन पर लिहिण्यासाठी रिप्लाय देण्यापेक्षा असे निघुन जाणे मला तरी योग्य वाटत नाही.

डुप्लीकेट आयडी असल्याने माणुस काही खोटे बोलत नाही.. आणि सध्या मिपा ला गरज आहे .. रोखठोक खरे रिप्लाय असण्याची .. आणि ती ही नविन सदश्यांना ..

निघुन जाण्याने तुमच्या जुन्या मित्रांना .. येथील जुन्या सदश्यांना वाईट वाटेल ही ..पण येथे राहिल्याने नविन सदश्यांना .. नविन मित्रांच्या हाकेला ओ देताना कदाचीत तुम्हालाच जास्त आनंद मिळेल .

- गणेशा

सुहास..'s picture

9 Mar 2011 - 1:56 pm | सुहास..

पंत !! दिस ईज नॉट फेयर :(

सुत्रधार's picture

9 Mar 2011 - 2:20 pm | सुत्रधार

जुन टाकून कसे चालेल? निदान तुमचे विचार तरी राहू द्यात..

आत्मशून्य's picture

9 Mar 2011 - 2:57 pm | आत्मशून्य

गूंडोपंत नेवर बॉर्न, नेवर डाइड, ओन्ली विझीटेड धिस वेबसाईट इन बीटवीन....

स्वानन्द's picture

9 Mar 2011 - 7:28 pm | स्वानन्द

हा हा.. हे लई भारी!!

सूर्यपुत्र's picture

9 Mar 2011 - 8:32 pm | सूर्यपुत्र

डायरेक्ट ओशो??

-सूर्यपुत्र.

ब्रिटिश टिंग्या's picture

9 Mar 2011 - 3:02 pm | ब्रिटिश टिंग्या

गुंडोपंतजी, रामराम घ्या!

शाहरुख's picture

9 Mar 2011 - 9:01 pm | शाहरुख

के.

आनंदयात्री's picture

9 Mar 2011 - 9:09 pm | आनंदयात्री

गुंडोपंत हा आयडी आमचा हितचिंतक आहे, हे जाणुन होतो. त्याचा बाप इथे वावरत राहो अशी इच्छा दर्शवतो.

अविनाशकुलकर्णी's picture

9 Mar 2011 - 9:14 pm | अविनाशकुलकर्णी

तुमची एक शृंगार कविता आमचि खुप आवडति आहे..
असो..
टाटा बाय बाय

पिलीयन रायडर's picture

9 Mar 2011 - 11:07 pm | पिलीयन रायडर

मला खरच काहीच कळल नाही... कुणीतरी सोप्पा करून सांगेल का?
आणि हो.. डू आय डी म्हणजे काय नक्की?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Mar 2011 - 7:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गुंडोपंतांचा लेख वाचून काय प्रतिक्रिया लिहावी काही कळेना. संगणकाच्या पडद्यावरलेख उघडून ठेवलाय. एक व्यक्ती 'आयडी ' सोडत आहे. अन्य सदस्यांसाठी फार काही विशेष नाही. पण सालं आमच्यासाठी गुंडोपंत आयडी खूप विशेष आहे.

नमोगत [मनोगत] ढासळलं तेव्हा आत्ताच्या सारखी मराठी संस्थळाची गर्दी नव्हती. एक राज जैनचे माझे शब्द होते. पण फार कुठे गप्पा टप्पा जमत नव्हत्या. एकदा तात्याचा मेल आला. बिरुटे साहेब, नमोगतासारखं उपक्रम नावाचं मराठी संस्थळ सुरु झालंय आणि आम्ही उपक्रमवर हजर झालो. उपक्रमवरील सदस्यांशी ओळख होतांना गुंडोपंतांशीही संस्थळावर खरडा-खरडी होत गेली. गुंडोपंत आयडीशी गप्पा जमायला लागल्या. एक म्हाता-याशी असा सूर जमल्यावर मग हा माणूस कसा दिसत असेल उगाच मनातल्या मनात चाचपणी चाललेली असायची. भरदार मिशा, रांगडा चेहरा. असे गुंडोपंताचे रूप वाटायचे. कधी कधी वाटायचे हा नाशकातल्या पंचवटीत पुजा पुजापाठ करणारा ब्राह्मण असावा. आणि पहाटेच्या वेळी व्यायाम शाळा उघडून तरूणांना प्रशिक्षण देणारा गृहस्थ. अशा काय नी किती कल्पना. प्रतिसाद तर खळखळून हसवणारे. हिंदूंचा कट्टर समर्थक. उपक्रमच्या माहितीपूर्ण विचारांच्या देवाणघेवाणीत फिट्ट बसणारा सदस्य. संपादकांना बीझी ठेवणारं व्यक्तिमत्त्व. आणि मला मराठी विकिची गोडी लावणारा गुंडोपंत.

असाच एक दिवस सहजरावांना म्हणालो आज नाशकाला जातोय तेव्हा काहीही होवो गुंडोपंताची भेट घेणार म्हणजे घेणार. गुंडोपंतांना व्य.नि. टाकला. नाशकात कुठे भेटायचं. काहीच उत्तर नाही. सहजरावांच्या आणि त्यांच्या व्य.नि.मनीच्या गोष्टी नक्कीच झाल्या असाव्या आणि भर दुपारी एका मराठी आंतरजालीय सज्जन व्यक्तिमत्त्वाचा फोन आला. फोन रुटीन होता. गप्पा मारता मारता ते म्हणाले तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. मी ’गुंडोपंत’. क्षणभर विश्वास बसला नाही. काहीच बोलणे सुचले नाही. प्रचंड आश्चर्य. मग गुंडोपंतावर खूप गप्पा झाल्या. एक तर मी गुंडोपंताशी व्य.नि. खरडी करत होतो. आणि वरीजनल व्यक्तीशीही खरडी व्य.नि. चाललेले असायचे. खरं म्हणजे गुंडोपंत हे कोणी वेगळेच असले पाहिजे असे मला तेव्हाही वाटत होते. एक वेगळीच छबी या माणसाने उभी केली होती. गुंडोपंताच्या मस्त मस्त आठवणी आहेत. गुंडोपंत माझा खास मित्र आहे. कधी-कधी वाटतं. आभासी जगातील वाढवत चाललेला हा आणखी एक भावनिक गुंता आहे. दूर राहिले पाहिजे. पण कुछ लोग हटके रहते है. जालावर काही आयडींना नेहमी भेटावं वाटतं. असाच हवाहवासा आयडी म्हणजे गुंडोपंत आयडी. मला आजही वरीजनल व्यक्ती कमी आणि 'गुंडोपंत' जास्त आवडतो. असो, पंत वी विल मिस यू.........!

-दिलीप बिरुटे
[हळवा]

श्री गावसेना प्रमुख's picture

10 Mar 2011 - 9:48 am | श्री गावसेना प्रमुख

आमच्या गावचा आहे वाटत?

मराठी_माणूस's picture

10 Mar 2011 - 11:41 am | मराठी_माणूस

ठणठणपाळ ची आठवण झाली.

रमताराम's picture

10 Mar 2011 - 12:32 pm | रमताराम

गुंडोपंत आमचे मित्रच आहेत. भेटत राहूच.

व्यक्तिशः गुंडोपंतांशी कधी खरडींतुन व्यनी मनीच्या गुज गोष्टी केल्या नाहीत. पण म्हणुन त्यांची माझी ओळख नाही अस म्हणवत नाही. पुर्वी मनोगतावर असतानापासुन त्यांचे लेखन्/प्रतिसाद वाचलेल आहेत.
पण का कोण जाणे असं एखादी व्यक्ती वा व्यक्तिमत्व सोडुन जातय म्हटल्यावर आत खोलवर कुठेतरी चुक चुकल्या सारख वाटलं.
अन्य कुठल्या व्यक्तिमत्वाने / आयडीने परत आमच्यात वावराल / वावरत असालही पण आम्ही गुंडोपंतांना नक्कीच मिस् करु.

पर्नल नेने मराठे's picture

10 Mar 2011 - 2:44 pm | पर्नल नेने मराठे

खरेतर गुन्ड्झ काळा कि गोरा ते पण माहित नाही पण..
गण्प्झ म्हणतोय त्याप्रमाणेच,
पण का कोण जाणे असं एखादी व्यक्ती वा व्यक्तिमत्व सोडुन जातय म्हटल्यावर आत खोलवर कुठेतरी चुक चुकल्या सारख वाटलं.
अन्य कुठल्या व्यक्तिमत्वाने / आयडीने परत आमच्यात वावराल / वावरत असालही पण आम्ही गुंडोपंतांना नक्कीच मिस् करु.

नरेशकुमार's picture

10 Mar 2011 - 5:32 pm | नरेशकुमार

वाचुन कायबी दोस्क्यात गेलं नाही,
जाउदे झोपायचि वेळ झाली.

गुंडोपंत गुड नाईट.
सी यु टुमारो

तिमा's picture

10 Mar 2011 - 7:34 pm | तिमा

आपण असे सोडून जाणे आम्हाला योग्य वाटत नाही तरी पुनर्विचार करावा ही विनंति.

धमाल मुलगा's picture

10 Mar 2011 - 8:07 pm | धमाल मुलगा

'त्याच्या' इच्छेपुढे कुणाचा इलाज चालतो काय? चालायचंच!
पंत आजवर आपल्यात होते. कधी हक्कानं कान धरायचे, कधी मजेमजेत हसवायचे, जाताजाता चार गोष्टी शिकवून जायचे.
आता पंत पुन्हा दिसणार नाहीत ह्याचं दु:ख राहिलच. पण पुढे तर चालावं लागेलच.
मला खात्री आहे, पंत पुन्हा येतील..कदाचित ते नाशकात नसतील, व्यायामशाळा चालवत नसतील, स्क्रीनकडे पाहून डोळ्यातून पाणी येत नसेल, जाड भिंगांचा चष्मा नसेल...पण पंत परत येतील. वेगळ्या रुपात परत येतील....पुन्हा स्नेहबंध जुळतील आणि पुन्हा बहार येईल.

चला, पंतांना आमचाही रामराम!
राम राम गुंडोपंत....राम राम!!

विकास's picture

10 Mar 2011 - 9:44 pm | विकास

पंत आजवर आपल्यात होते....आता पंत पुन्हा दिसणार नाहीत ह्याचं दु:ख राहिलच.

खरं आहे! :( आणि "पंत गेले, राव चढले" असे होण्याची भिती! ;)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Mar 2011 - 1:00 am | निनाद मुक्काम प...

@तरी नवीन सदस्यांना लेखनाचे प्रोत्साहन देणे त्यांच्यावर कुणी शुद्धलेखन विषयक चिखलफेक केली तर त्याचे परस्पर प्रत्युत्तर देणे वगैरे कामे मी आपलीच मानू लागलो.

तुम्हीच आमचे निकम वकील
ही व्यक्तीरेखा तुमच्या वास्तविक जीवनावर अतिक्रमण करू लागली का ?

''आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा रामराम ध्यावा ''.