नावं

सोनल कर्णिक वायकुळ's picture
सोनल कर्णिक वायकुळ in जे न देखे रवी...
28 Feb 2011 - 10:13 pm

नात्यांची नावं शोधायची नसतात
नात्यांना नावं ठेवायची नसतात

नावांच्या पिंजा-याबाहेर सुद्धा एक सुंदर बन आहे
त्यातल्या एकेक प्राण्यालाही एक सुंदर मन आहे
‘कोण आहे तो तुझा’ हे व्यवहाराला बर आहे
‘ओळख आहे आमची’ हेच उत्तर खर आहे

ओळख असते दाट जुनी चेहर्यामागच्या माणसांशी
जखमेवरच्या खपल्यांशी, भिजलेल्या दिवसांशी
ओळख असते गाता गाता जुळलेल्या सुरांशी
परसातल्या चाफ्याशी अन कुंपणाच्या तारांशी

ओळख पटते आगंतुक डोळ्यामधल्या हसण्याशी
आणि ओळख निघते गही-या लाघव डोळ्यामधल्या स्वप्नाशी
नातीच ना हो हि सगळी कळत नकळत जोडलेली
बहरलेल्या वेलीसारखी अंगा खांद्यावर वाढलेली

नावं देवून सांगा त्यांना व्याख्येत कस बांधायचं?
कस सांगायचं आतापासून पुढे असंच वागायचं?

पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो
यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो
नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात?
आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात?

नाही दिली नावं म्हणून काही अडत का?
आणि फक्त ‘नाव’ कधी मन आपली जोडतं का?
नावांच्या परिघात कोंडतात नाती
नियम तोडायला मग भांडतात नाती

म्हणूनच सांगू का
नात्यांची नावं शोधायची नसतात
नात्यांना नावं ठेवायची नसतात

कविता

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच मस्त..

सोनल कर्णिक वायकुळ's picture

5 Mar 2011 - 8:56 am | सोनल कर्णिक वायकुळ

आभार कीती वेळा मानु रे? :)

नगरीनिरंजन's picture

1 Mar 2011 - 9:48 am | नगरीनिरंजन

पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो
यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो
नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात?
आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात?

सुंदर!

प्रीत-मोहर's picture

1 Mar 2011 - 10:56 am | प्रीत-मोहर

अप्रतिम!!!!!

प्रत्येक शब्द भावला!:)

sneharani's picture

1 Mar 2011 - 11:15 am | sneharani

सुरेख कविता!
:)

प्रकाश१११'s picture

1 Mar 2011 - 11:49 am | प्रकाश१११

खूपच छान आवडली.!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

1 Mar 2011 - 12:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

ओळख असते दाट जुनी चेहर्यामागच्या माणसांशी
जखमेवरच्या खपल्यांशी, भिजलेल्या दिवसांशी
ओळख असते गाता गाता जुळलेल्या सुरांशी
परसातल्या चाफ्याशी अन कुंपणाच्या तारांशी

सुंदर विरोधाभास साधलात !!

खुप आवडली कविता........

अशोक७०७'s picture

1 Mar 2011 - 12:42 pm | अशोक७०७

सुन्दर

गुड्डु's picture

1 Mar 2011 - 1:55 pm | गुड्डु

छान आणि मनाला भिडणारी

फ्रॅक्चर बंड्या's picture

1 Mar 2011 - 2:13 pm | फ्रॅक्चर बंड्या

छान..

सुहास..'s picture

1 Mar 2011 - 6:45 pm | सुहास..

पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो
यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो
नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात?
आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात? >>>

कविता आवडली ..

गणेशा's picture

1 Mar 2011 - 7:52 pm | गणेशा

ओळख असते दाट जुनी चेहर्यामागच्या माणसांशी
जखमेवरच्या खपल्यांशी, भिजलेल्या दिवसांशी
ओळख असते गाता गाता जुळलेल्या सुरांशी
परसातल्या चाफ्याशी अन कुंपणाच्या तारांशी

बेस्ट

मनीषा's picture

1 Mar 2011 - 8:44 pm | मनीषा

तसही ' नावात काय आहे ? ' असं म्हणतात पण तरीही ...

नाही दिली नावं म्हणून काही अडत का?
आणि फक्त ‘नाव’ कधी मन आपली जोडतं का?
नावांच्या परिघात कोंडतात नाती
नियम तोडायला मग भांडतात नाती

सुंदर !

प्राजक्ता पवार's picture

1 Mar 2011 - 8:52 pm | प्राजक्ता पवार

सुरेख कविता .

निनाव's picture

2 Mar 2011 - 1:58 am | निनाव

कविता खूपच आतून आलेली आहे असे प्रत्येक शब्दातून जाणवते आहे.
छानच. - पु.ले.शु.

पाठीवर फिरणारा प्रत्येक हात आई असतो
यशोदेचा पान्हा कधी, कधी पन्ना दाई असतो
नावं नसलेल्या नात्यांसमोर जुळतातच ना हात?
आणि बारशी केलेली नाती सुद्धा करतातच ना घात?

अतिशय सुरेख कविता!! खूप आवडली.

राघव's picture

3 Mar 2011 - 10:36 pm | राघव

मनातलं अगदी छान मांडलंत.
खूप सुंदर! येऊ देत अजून!! :)

राघव

शैलेन्द्र's picture

4 Mar 2011 - 12:10 am | शैलेन्द्र

सुंदर...

सोनल कर्णिक वायकुळ's picture

5 Mar 2011 - 9:02 am | सोनल कर्णिक वायकुळ

आभार सगळ्यांचेच.
मी थे रोज येत नाही त्यामुळे प्रतिक्रिया द्यायला वेळ होतो. म्हणून दिलगीर आहे.
पण तुमच प्रोत्साहन असाच मिळू दे. त्याच बरोबर चुकाही दाखवा लिखाणातल्या. :)