ते झाड..

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
28 Feb 2011 - 3:09 am

रोजच्या जाण्याच्या रस्त्यावर होते एक झाड
पिंपळाचे..
ते भेटायचा मला रोज..
मी ही थांबून कधी दोन शब्द बोलयचो त्याच्याशी

लांबूनच बघायचे ते मला येतांना
अन त्याची पानं हालायची..
मज अभिनंदनच जणू काही
अन जवळ पोहोचताच
एक थंड झुळुक वार्याची माझा घाम पुसायची

असेच बघत भेटत राहिलो आम्ही
कित्येक वर्ष..अविरत
घरोबा खूपच वाढला होता तोवर
भेटावयास कधी मग..
तिच्या आठवणींना ही घेउन जायचो सोबत

कुणालाच समजली नाही आमुची संभाषणे
अनुबंध मात्र अमुचे झाले होते अधिकच घट्ट..
मग मी पाहिली त्याची पिकलेली पाने
अन, त्याने बघितले माझे केसांचे रंग बदळणारे

नोकरी निमित्त,
सोडावे लागले मग शहर मला
अन घेतला मी त्याचा निरोप
ते एवढंच म्हणाले...
मित्रा, लक्षात ठेव मज
आपण भेटलो नाही जरि रोज...

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

प्रकाश१११'s picture

28 Feb 2011 - 11:45 am | प्रकाश१११

निनाद -छान जमलीय. पु.ले.शु.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Feb 2011 - 11:52 am | मिसळलेला काव्यप्रेमी

कुणालाच समजली नाही आमुची संभाषणे
अनुबंध मात्र अमुचे झाले होते अधिकच घट्ट..
मग मी पाहिली त्याची पिकलेली पाने
अन, त्याने बघितले माझे केसांचे बदलणारे रंग

हे फारच सुंदर!!

कुणालाच समजली नाही आमुची संभाषणे
अनुबंध मात्र अमुचे झाले होते अधिकच घट्ट..
मग मी पाहिली त्याची पिकलेली पाने
अन, त्याने बघितले माझे केसांचे बदळणारे रंग

सुंदर