पाखंडी लोकांच्या प्रश्नांचे उत्तरे

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
24 Feb 2011 - 2:43 pm
गाभा: 

मित्र हो,
आज अनेक दिवसांनी मिपावर चक्कर टाकता पुर्वीचे लेखन वाचले. हैयोंहैयैयोनी प्रकाशकाका घाटपांड्यांना उद्देशून केलेले खालील आवाहन पुन्हा जागृत करून त्यावर त्यांची सकारात्मक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. या धाग्याला उपसून काढायला कूटन लिपीच्या बेसनलाडूंचा धागा हे कारण. आणखी एक कारण असे की उपक्रमवर दिवाळी२०१० अंकात नाडीग्रंथ अभ्यासकार्यावर जन्मदिनांक व नवग्रहांची नाडीताडपट्यातील मांडणीवरील हैयोंचा प्रकाशित लेख. त्यावर प्रकाशकाकांच्या नाडीवरील प्रकाशित पुस्तकातील माहिती लेखांशिवाय त्यांनी नाडीताडपट्यांची त्यांच्या तमिळजाणकारांकडून कसून तपासणीकरून हैयोंचे म्हणणे साधार खोडून काढला असावा व त्यावर अधिक अभ्यासपुर्ण लेखन करण्यास ते विचारमग्न होत असावेत असा कयास बांधून वाट पाहिली गेली. अद्याप नाडीग्रंथांवरील त्यांचे आणि अन्य विचारवंतांचे वेळ, गरज, पैसे व पुस्तक न मिळणे आदि कारणांनी मौन संपले नाही असे वाटून या धाग्याने त्यांना प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा आहे.
मी अशी विनंती करू इच्छितो की खालील - पाखंडी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे प्रकाशकाका व अन्य पाखंडींनी आमच्यासाठी शोधून आम्हा नाडी ग्रंथप्रेमींना सादर करावीत कारण त्यामुळे आमचे मतपरिवर्तन व्हायला आधार मिळेल.शक्य असल्यास पुढील कार्यक्रम ठरवावा.

हैयो या ध्याग्यावरील प्रतिक्रियेत म्हणतात,

एक विचार मांडण्याचे स्वातंत्र्य घेतो. इ.स. २००८ मे महिन्यामध्ये काही मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली फलज्योतिष्याच्या सत्यासत्यतेविषयक एक ’परिक्षणयोजना’ करण्यात आली होती आणि तिचा अहवाल आला होता असे मला येथेच समजले होते. इतरांना देखील ह्याबाबत माहिती असावी असे मी गृहीत धरू इच्छितो. सदरील प्रकल्पात श्री. घाटपांडे सरांचा मुख्यत्वेकरून सहभाग होता असेही वाचनात आले आहे. ह्या पार्श्वभूमीवर नाडिज्योतिषावर जे काही लेखन करण्यात आले आहे, त्याची सत्यासत्यता तपासून वरीलप्रमाणे एक अहवाल सादर केला जावा असे सुचवू इच्छितो.

तरी श्री. घाटपांडे सरांनी स्वत: अथवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली इतर कोणी प्रातिनिधिक पुढाकार घ्यावा; श्री. ओक सर आणि त्यांच्याप्रमाणे मते बाळगणारी इतर मंडळी ह्यांस नाडिकेंद्रात घेऊन जावे आणि नाडिज्योतिषाचे खरे स्वरूप उघड करून ह्या मंडळींची सर्वांची दिशाभूल झाली असल्याचे प्रत्यक्ष पुराव्यानिशी सिद्ध करावे. पूर्वीप्रमाणेच अहवाल सादर करावा. इतरही कोणा व्यक्ति अथवा संस्थेस नाडिज्योतिषाच्या सत्यासत्यतेबद्दल शंकाकुशंका असतील तर त्यांनी ते श्री. घाटपांडे सरांचेकडे सादर करावेत. असे केल्याने ह्या कार्यास एक सामुहिक प्रतिनिधित्व प्राप्त होईल.

सदरील शोधाभ्यासात नाडिज्योतिषाप्रमाणे जातकास सांगण्यात आलेले भविष्य हे खरोखरच कथनाप्रमाणे सत्य ठरते काय? ह्या प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा:

१. नाडिपट्टींमध्ये खरोखरीच लेखन केलेले असते काय;
२. लेखन केले असल्यास
अ. ते कोणत्या लिपीमध्ये कोणत्या भाषेमध्ये असते,
ब. त्या भाषेस काही व्याकरण आहे काय,
क. व्याकरण असल्यास त्यावरून त्या लेखनाचा साधारण काल कोणता असावा;

३. लेखनामध्ये खरोखरच भविष्यकथन केलेले असते काय,
४. त्यायोगे जर कां नाडिपट्टीमध्ये संबंधित जातकाचे नांव, त्याच्या जन्मदात्यांचे नांव, त्याचे जातकम (कुंडली/पत्रिका) तथा वैयक्तिक माहितीचा उल्लेख असतो काय ह्या गोष्टीचा शोध घेण्यात यावा.

असे विषय ह्या शोधाभ्यासानिमित्ते चर्चिल्या जावेत. हे मुद्दे सिद्ध झालेच तर तेथून पुढे ’भविष्यकथन बरोबर येते की नाही’ हा विषय चर्चिल्या जाऊ शकतो.

श्री. घाटपांडे सरांनी तथा इतर मिपाकरांनी माझ्या सूचनेबाबत आपले विचार व्यक्त करावेत. शक्य असल्यास पुढील कार्यक्रम ठरवावा.
नाडी भविष्य - एक चिकित्सा
प्रेषक प्रकाश घाटपांडे दिनांक Sat, 20/09/2008 - 12:46
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ...प्रश्नोत्तरातून सुसंवाद या माझ्या पुस्तकातील काही भाग अवलोकनासाठी ठेवत आहे. चर्चा जरुर व्हावी. वस्तुत: हा विषय किती प्राधान्य क्रमावर असावा ? यात आपण आपला वेळ पैसा श्रम किती खर्च करावा हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.नाडी केंद्र जेव्हा पुण्यात फोफावली तेव्हा आम्ही नाडी केंद्राचा अनुभव स्वतः घेतला आहे.
नाडी-ज्योतिष आणि फलज्योतिष.....
......
पाखंडी लोकांचे प्रश्न
आता ओक साहेब काय म्हणतात ते ऐकण्याची उत्सुकता आहे
हैयोंचे म्हणणे...
(प्रकाशकाका) आपण म्हणतां तसे ह्या पाखंडी प्रश्नांची उत्तरे नाडिवाचक लोक अधिकारवाणीने देऊ शकतीलही. परंतु मी येथे आधीच म्हटल्याप्रमाणे; एखाद्या गोष्टीचे अस्तित्त्व चिकित्सकांस मान्य नसल्यास 'ती तशी अस्तित्त्वात नाही' असे सिद्ध करणे हे चिकित्सकाचे उत्तरदायित्त्व ठरते. नाडिग्रंथांच्याबाबतीत 'अस्तित्त्व दाखवा' असे आपण म्हणाल, तर नाडिवादी मंडळी अस्तित्त्व दाखविण्यास सिद्ध आहेतच. परंतु मग ती चिकित्सा कशी होणार?

थोडक्यात काय, तर सदरील प्रश्नांची उत्तरे नाडिग्रंथवादींनी दिली, तर त्यावर तुमचा विश्वास बसणार आहे काय? आणि जर तुमचा तसा विश्वास बसणार असेल, तर मग चिकित्सकांचे आणि त्यांच्या तथाकथित चिकित्साकांडाचे महत्त्व ते काय?

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

24 Feb 2011 - 4:39 pm | प्रकाश घाटपांडे

.

रमताराम's picture

24 Feb 2011 - 8:01 pm | रमताराम

घाटपांडे यांचे उत्तर आवडले.

निवांत पोपट's picture

24 Feb 2011 - 8:12 pm | निवांत पोपट

घाटपांडे यांचे उत्तर आवडले.

कुठल्या कुटनतंत्रात उत्तर आहे ते समजून घ्यायला आवडेल.

रमताराम's picture

24 Feb 2011 - 10:07 pm | रमताराम

तुम्हाला आयती उत्तरे कशी हवीत हो. 'स्वतः अनुभव घ्या' हे जुनेच उत्तर पुन्हा देतोय.

पंगा's picture

24 Feb 2011 - 11:19 pm | पंगा

:)

Nile's picture

25 Feb 2011 - 1:41 am | Nile

ररा आजोबांनी ओकांची नाडी सोडली.. हे आपलं ओकांच्या नाडीची कोडी सोडवली...

विकास's picture

25 Feb 2011 - 2:08 am | विकास

जरा संक्षिप्त उत्तर दिले असते तर वाचायला कमी वेळ लागला असता... :-)

(घाटपांडेसाहेबांसाठी अनाहूत सल्ला: आपण आपली प्रतिसादाखालील स्वाक्षरीत, "आमच्या येथे सर्व नाड्यांचे पाखंड करून मिळेल" वगैरे म्हणू शकाल. ;) )

शशिकांत ओक's picture

25 Feb 2011 - 11:40 pm | शशिकांत ओक

गोची पुर्णविरामाची!
पुर्णविराम पाहून अनेकाना उत्स्फुर्त आनंद झाला.
प्रत्यक्षात त्यांची 'गोची' झाली. असे कुत्सितपणे मी म्हणत नाही.
तेच या ठिकाणी म्हणतात

अनेक चळवळींमधे हीच गोची होती. एकदा भुमिका घेतली की त्यात बदल करणे समाजमनाला रुचत नाही. प्रतिमा तयार झाल्यावर त्याला तडा जाउ नये म्हणुन अंतर्विसंगती पचवाव्या लागतात. कधी समाजच तुम्हाला तस करु देत नाही. ...
एक प्रसंग आठवतो. आठ नउ वर्षां पुर्वी असेल. अंनिसच्या मिटींग मध्ये एका कार्यकर्ता मित्राने टीकेची झोड उठवली . " निरंजन घाटे तुम्ही सुद्धा?" स्टाईलने. मग स्यूडो सायंटिस्ट, भंपक विज्ञानवादी अशी विशेषणे लावायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांनी त्यांना वाळीत टाकले. मी खालील मुद्दे मांडले
... परिणामी मी निरंजन घाट्यांची वकिली करतो म्हणून मलाच वाळीत टाकायला सुरुवात केली....

ज्यांनी(नाडीग्रंथांच्या विरोधाची) पालखी अनेक वर्षे खांद्यावर वाहिली त्यां अंनिसनी वाळीत टाकल्याचे वैषम्य त्या पुर्णविरामातून आले असावे.

एरव्ही हॅहॅहॅ हे बाकी खर ब्वॉ! मनोरंजन करता करता चिकित्सेला प्रवृत्त करण्याचा कुटील डाव ही आमच्या मनात असतो.

आम्ही फक्त संशयाचा किडा सोडण्याचे काम करतो

.
आदी वक्तव्य हिरीरीने करणारे इतके अबोल होते ना!

नितिन थत्ते's picture

25 Feb 2011 - 11:50 pm | नितिन थत्ते

ओक सौजन्याची सीमारेषा ओलांडत आहेत असे वाटते.

विजुभाऊ's picture

24 Feb 2011 - 11:42 pm | विजुभाऊ

हम्म
शिळ्या कढीला उत
आणि भरवशाच्या म्हशीला शिंगे.
ही म्हण खरी आहे.

तशी अस्तित्त्वात नाही' असे सिद्ध करणे हे चिकित्सकाचे उत्तरदायित्त्व ठरते.
एखाद्या ठीकाणी वीज पडली होती हे सिद्ध करता येवु शकते. पण तेथे वीज पडली नव्हती हे सिद्ध करणे अवघड असते.
एखाद्या गोष्टीच एआस्तित्व सिद्ध करता येते. अनास्तित्व ( शब्द पहिल्यांदाच मराठीत येतोय) सिद्ध करता येत नाही.

उजेड आहे हे सिद्ध करता येते पण अंधार आहे हे सिद्ध करता येत नाही.
उष्णता आहे हे सिद्ध करता येते. पण उष्णता नाही हे सिद्ध करणे अवघड असते. ( उदा: तापमान उणे ३७५ डीग्री सें च्याखाली गेले आहे हे सिद्ध करता येत नाही. )

पंगा's picture

25 Feb 2011 - 1:17 am | पंगा

( उदा: तापमान उणे ३७५ डीग्री सें च्याखाली गेले आहे हे सिद्ध करता येत नाही. )

तापमान अब्सोल्यूट शून्य (-२७३.१५ डि से) याहून खाली जाऊ शकत नाही, असे काहीतरी कॉलेजात शिकल्याचे आठवते बॉ.

(बाय द वे, भरवशाच्या म्हशीला शिंगे, की टोणगा?)

शशिकांत ओक's picture

26 Feb 2011 - 2:32 am | शशिकांत ओक

अस्तित्त्वात नाही' असे सिद्ध करणे हे चिकित्सकाचे उत्तरदायित्त्व ठरते.
आपण म्हणता ते अगदी बरोबर आहे.
उजेड, उष्णता आहे हे सिद्ध करता येते.
नेमके तसेच नाडीग्रथाचे ताडपट्याच्या रुपात अस्तित्व आहे.
त्यातील मजकुरची शहानिशा जो ते ग्रंथ पहातो. त्या प्रत्येकाला करता य़ेते, नव्हे तो प्रत्येकजण आपापल्यापरीने स्वतःचे नाव, जन्मदिनांक व अन्य माहितीची १०० टक्के शहानिशा मान्यकरूनच पुढील काळाचे भविष्य कथन ऐकायचे का नाही ते ठरवतो. त्यामुळे नाडीग्रंथ अस्तित्वातच नाहीत हा दावा करणाऱ्या अंनिस समान विचारकांवर आपण म्हणता त्या चिकित्सेचे उत्तरदायित्व येते. ते आपण अमान्य करू शकत नाही.
अंनिस किंवा तत्सम विचारकांना ते ही मान्य आहे, त्यावर १५ वर्षांपुर्वी डॉ.दाभोळकर, डॉ.नारळीकर आदींनी आपले विचार व्यक्त करून प्रकाश काका, मा.श्री. रिसबुडांच्या पुढाकाराने शोधाला सुरवात ही केली. सातारचे शहा ज्यांनी नाडीग्रंथांचे अस्तित्व व महत्व आपल्यापाशी मान्य केले. त्यां व ओंकार पाटील यांचा तो इतिहास आपल्याला साद्यंत माहित आहे. ओंकारांनी फक्त संभाषण टेपकरून आपल्याकडून माहिती काढून ती आपल्याला ताडपट्टीतून सांगितली जातेय असे भासवतात असा घिसापिटा आक्षेप घेतला. पण प्रत्यक्ष ताडपत्रांची त्यातील मजकुराची शहानिशा करायची टाळली. कै. रिसबुडांच्या सांगण्यावरून मला त्यांनी भेटायचे ही टाळले. कारण मग मी त्यांची तेथल्या तेथे त्यांना दिल्या गेल्या वहीतील मजकूर व तीच ताडपट्टी परत नाडी केंद्रवाल्यांना काढाय़ला लावून नाडी केंद्राच्या लोकांव्यतिरिक्त तमिळ जाणकार त्रयस्थांच्या मदतीने ताबडतोब शहानिशा करून त्यांना - पर्यायाने अंनिसला - ज्यांनी मला ५ लाखाचे तेंव्हा जाहीर आव्हान दिले होते - त्यांनी मिळवलेल्या पुराव्याची सत्यता काय ते दाखवून दिले गेले असते. पण त्यांचा तेंव्हा नकारचा पवित्रा व आज ही आपल्यासारखे विचारक नाडीच्या सत्यतेची 'अस्तित्वाची' कसोटी घ्यायला नाकारता असे हे नाकारणे किती दिवस तुम्ही ढकलत नेणार. आता आपल्याला अस्तित्वाला धक्का पोचायला लागला आहे. कारण हैयो हैयैयों सारख्या भाषातज्ज्ञांनी ताडपट्टीताल प्रत्येक ओळीओळीचा शोध घेण्याला सुरवात केली आहे. त्याचा प्रत्यय आपणास यंदाच्या उपक्रम दिवाळी अंकातील त्यांच्या लेखवरून आला आहे. त्यातील मजकूराची व कथनाची शहानिशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंडॉलॉजीचे लोक करू लागले आहेत.

रिटे किंवा घासकडवी म्हणतात त्याप्रमाणे 'पाश्चात्य शास्त्रीय मासिकांत जेंव्हा नाडीग्रंथांना मान्यता मिळेल तेंव्हा आम्ही ते मानायचे का नाही ते ठरवू'. आश्चर्य असे की जी गोष्ट भारतातील आहे, ती सत्य किंवा शास्त्रीय आहे किंवा नाही असे ठरवणे परदेशातील शोधकांनी का ठरवावे. आम्हा भारतीयांचे ते काम आहे.
पुर्वी प्रा. गळतग्यांनी डॉ. नारळीकारांना म्हटल्याप्रमाणे गॅलिलिओच्या दुर्विणीतुन समोरील 'पाखंडी व मुर्दाड सत्य' पहायलाही तयार नसलेल्या धर्ममा्र्तंडांची इतिहासात गणती होत नाही. आपणाला तसे व्हायला नको असेल, नाडी ग्रंथांचे अस्तित्व अमान्य करायचा हेका सोडा. पुर्वग्रह सोडा. निर्मळ मनाने प्रत्यक्ष पुरावा तपासायला पुढे या. आत्तापर्यंतच्या शास्त्राला मान्य होणाऱ्या अनुभवांपेक्षा काही नवीन अनुभवायला येत असेल तर तोंड देखले अमान्य करू नका. पुढील काळ आपल्याला माफ करणार नाही. नाडी ग्रंथांच्या अस्तित्वाला नाकारून आपण एक ऐतिहासिक चूक पुन्हा उगाळता आहात.
नाडी ग्रंथ महर्षींनी, पर्यायाने नाडी केंद्रवाल्यांनी अंनिसचे किंवा जगातील बुद्धिवादी मंडळींचे वाकडे केलले नाही. ना त्यांनी लाखोंचे बक्षिस ठेवले आहे किंवा नाडीग्रंथांना पुढे करून आव्हानाचे दंड थोपटले आहेत.
माझ्यावर व या पुढे हैयोंवर व्यक्तिगत आरोप वा निंदा करून काही उपयोग होत नाही हे आपण जाणता. मी ही एक दिवस नाडी ग्रंथांना थोतांड म्हणूनच सामोरा गेलो होतो. आपण, मित्र प्रकाश घाटपांडे आणि आणखी कोणी एकत्र येऊ इच्छिणाऱ्यांनी सचोटीने नाडी ग्रंथांचा अभ्यास करावा. नाडी ताडपट्यातून जे वर्णन तिथल्यातिथे पडताळता येते ते त्याची तपासणी करायला काय हरकत आहे?
एकाद्या केंद्रात कार्यकऱ्त्यांचा फौजफाटा घेऊन जायचे व केंद्रातील कर्मचाऱ्यांना ज्यांना नीट संभाषण देखील करायला येत नाही अशांशी मोठ्या आवाजात वाद घालून त्याला भंडावून सोडायचे. तमिलभाषा व कुटलिपी आम्हाला येत नाही अशा तोकड्या सबबी सांगुन त्या ताडपट्यात काय लिहिले आहे याचा छडा न लावताच प्रत्यक्षात काहीही अभ्यास न करता आम्ही 'जिंकलो' असे म्हणायचे. त्याचे परिपत्रक काढून प्रसिद्धी माध्यमांतून शेखी मिरवायची की लगेच नवीन सावजाला घेरायला पुढे चालू. असे किती दिवस करणार?
डबलबार बंदुकीने उंदराची शिकार करणाऱ्या आढ्य शिकाऱ्याचे रुपचित्र मी पहातो. नाडी ग्रंथ असा पिटुकला उंदीर नाही. हे आता पर्यंतच्या नाडी वाचून आलेल्या हजारोंच्या अनुभवावरून आपण जाणता. तो प्रत्येक जण खोटे बोलतो असे तुम्ही किती वेळ म्हणणार?
नाडीग्रंथाच्या उत्साहावरच्या विरजणाचे श्रीखंड होऊन आता वर्षे लोटली.

असतील काही लोकांना नाडीविषयी शंका किंवा अविश्वास. पण नाडीवाल्यांना तरी पुर्ण भरवसा आहे ना त्याच्या सत्यते विषयी. मग आपल्या मार्गाने जा ना. मग का उगीच बाकी लोकांना पा़खंडी म्हणुन हीणवता आणी त्यांनाच ती गोष्ट अस्तित्वात नसल्याचे सिद्ध करण्याचे आवाहन करता?

की तुम्हालाच या नाडीच्या सत्यतेविषयी शंका आहे आणी नाडी पांखंडी लोकांच्या कसोटीला उतरुन त्यांची मान्यता मिळावी अशी तुमची ईच्छा आहे? तसे असेल तर सरळ त्यांची मदत मागा, ताकाला जाउन भांडे लपविण्यात काय हशिल?

जर तुम्हाला नाडी विषयी पुर्ण खात्री असेल तर धागे काढण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही तुमच्या मार्गाने जा, 'पाखंडी' त्यांच्या मार्गाने जातील. पण तुम्हाला 'पाखंडी' लोकांचे मत परीवर्तन करायचे असेल तर मात्र त्यांनी या आधी उपस्तित केलेल्या प्रश्नांची नि:संदिग्ध उत्तरे द्यावी लागतील.

शशिकांत ओक's picture

26 Feb 2011 - 12:01 am | शशिकांत ओक

अहो मला काय पडलीय विरोघकांनी नाडीला नावे ठेवली तरी.
नाडीमहर्षींच्या कार्याची ओळख जनसामान्यांना करून देणे इतकीच माझी भूमिका आहे. पण त्या निमित्ताने नाडी ग्रंथांना थोतांड म्हणायची संधी काही संस्था व विचारवंत घेतात त्यांच्या (खोटेपणाच्या ) ताकाला जाऊन (प्रत्यक्ष तपासणीत ताडपट्यातील तमिळलेखन तपासायचे) भांडे लपवणाऱ्या वृत्तीला जोरदारपणे उत्तर दिले गेले नाही तर ते अयोग्य ठरेल असे वाटून लेखन प्रपंच.

रेकॉर्ड अडकलीये एवढंच म्ह्णेन

क्लिंटन's picture

25 Feb 2011 - 1:25 am | क्लिंटन

फार दिवसांपासून विचारू विचारू असे म्हणत होतो पण मधल्या काळात नाडीविषयी मिपावर काही आले नव्हते म्हणून विसरायलाच झाले बघा. बरं झालं त्या निमित्ताने आठवण झाली.

एक मूलभूत प्रश्न: ही नाडी म्हणजे नक्की काय भानगड आहे?

Nile's picture

25 Feb 2011 - 1:52 am | Nile

काय राव तुम्हा शिकल्या सवरल्या झंटलमन लोकांना इतकं सोप्पं कळत नाय?

अहो नाडी म्हणजे जी सोडवली की विश्वरुप दर्शन घडतं ती.

ओकांच्या मते त्यांची नाडी* सोडवलीत तर तुम्हाला तुमच्या भविष्याची चिंता करायचं कारण नाही.

बाकी अधिक माहीती करता ओकांच्या "नाडीत्रस्त.. हे आपलं नाडीग्रस्त (वाट)चालीवर" नजर टाका ना म्हणजे कळेल. ;-)
*म्हणजे ज्या नाडीवर त्यांचं प्रेम आहे ती, भलता आचरटपणा करु नये.

कस बोललात निळू भाऊ... अहो, अमेरिकेच्या पुर्व अध्यक्ष भल्यामाणसा,
मग ठरवा नाडीचा नाद धरायचा की... भलता आचरटपणा करु नये ते.

क्लिंटन's picture

26 Feb 2011 - 12:18 am | क्लिंटन

कस बोललात निळू भाऊ... अहो, अमेरिकेच्या पुर्व अध्यक्ष भल्यामाणसा,
मग ठरवा नाडीचा नाद धरायचा की... भलता आचरटपणा करु नये ते.

सल्ल्याबद्दल आभारी आहे. :)

काय ओकआजोबा, बरेच दिवस नव्हतात, साठीची शांत वगैरे करायला गेला होतात काय? मुहुर्त चुकला की मंत्र गडबडले?

सचिन भालेकर's picture

25 Feb 2011 - 6:44 am | सचिन भालेकर

तर ज्यातल आपल्याला काय कलत नाय, त्या बद्द्ल काय कोकलायच नाय........... हा माझा नियम हाय.

नरेशकुमार's picture

25 Feb 2011 - 6:47 am | नरेशकुमार

म्या पन कोकलून कोकलुन ह्येच बोल्तो.

प्राजु's picture

25 Feb 2011 - 11:53 pm | प्राजु

नॉट अगेन!! :-|

शशिकांत ओक's picture

26 Feb 2011 - 12:18 am | शशिकांत ओक

इन फॅक्ट, वन्स अगेन विनंती
मादाम,
'सर्वव्यापी' या आपल्या नामविधानाला शोभेल असा नाडी ग्रथांचा अनुभव गाठी असेल तर आपल्या लेखन भावविश्व प्राजक्ताचा दरवळ सर्वार्थाने सर्वव्यापी होईल.

पाषाणभेद's picture

26 Feb 2011 - 10:00 am | पाषाणभेद

जावूंद्या ना भली मान्सं तुमी

नगरीनिरंजन's picture

26 Feb 2011 - 10:11 am | नगरीनिरंजन

एकदा जाऊन पाहावंच नाडी काढून असं वाटतंय.

रमताराम's picture

26 Feb 2011 - 2:47 pm | रमताराम

चला धाग्याचा हेतू साध्य झाला एकदाचा. :)

राजेश घासकडवी's picture

26 Feb 2011 - 10:55 am | राजेश घासकडवी

अरेच्च्या, मला वाटलं नाडीविषयी नेचर किंवा सायन्स जर्नल मध्ये एखादं आर्टिकल आलं त्याविषयी तुम्ही सांगायला लिहिलं की काय. जेव्हा आर्टिकल येईल तेव्हा जरूर कळवा. तोपर्यंत तुमचे चिकित्सेचे जोरदार प्रयत्न चालू ठेवा.

अप्पा जोगळेकर's picture

26 Feb 2011 - 11:01 pm | अप्पा जोगळेकर

पाखंडी म्हणजे काय ?

निवांत पोपट's picture

26 Feb 2011 - 11:08 pm | निवांत पोपट

सोप्पं आहे. पाखंडी म्हणजे इलॅस्टिकवाले. जे नाडी वापरत नाहीत ते!

अप्पा जोगळेकर's picture

26 Feb 2011 - 11:12 pm | अप्पा जोगळेकर

अहो पण मी घरात वापरतो त्या हाप चड्डीला इलॅष्टिक आहेच आणि ते लूज झालं तर पंचाईत नको म्हणून शिवाय नाडीसुद्धा आहे.

निवांत पोपट's picture

26 Feb 2011 - 11:27 pm | निवांत पोपट

आणि इलॅस्टिक लूज असताना नाडी तुटली तर ? हेच ते! सगळ्या नकॊ त्या शक्यतांचा विचार करणाय्रालाच पाखंडी म्हणतात.

रमताराम's picture

26 Feb 2011 - 11:38 pm | रमताराम

निपोशी बाडिस.