....... नरें निर्मिले

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
16 Feb 2011 - 1:04 am

जेपर्डी ह्या प्रश्नोत्तराच्या (खरे तर उत्तर-प्रश्नाच्या) कार्यक्रमात कालपासून एक आगळा-वेगळा प्रयोग सुरू झाला आहे. एरवी ह्या कार्यक्रमात तीन स्पर्धक व्यक्ती भाग घेतात. परंतु, १४, १५ आणि १६ फेब्रुवारी रोजी होणार्‍या कार्यक्रमांत दोन व्यक्तींसमवेत IBM ने बनवेली WATSON नावाची संगणक प्रणाली भाग घेणार आहे.

जगातील विविध विषयांवरील अब्जावधी बाईट्सचा विदा ह्यात भरलेला आहे. प्रश्न समोर येताच त्याचे पृथःकरण करून, विदा धुंडाळून उत्तर काढण्याचे काम ही प्रणाली करील.

कालच्या अपूर्ण राहिलेल्या कर्यक्रमाच्या अखेरीस, ही प्रणाली आणि एक स्पर्धक ५००० डॉलरची रक्कम मिळवून आघाडीवर होते. तर दुसरा स्पर्धक किंचित मागे होता. १६ तारखेला अंतीम विजेता ठरवला जाईल.

ह्यापूर्वी संगणक प्रणालीकडून बुद्धिबळ खेळण्याचे प्रयत्न झाले होते. परंतु, हा प्रकार मला अधिक आव्हानात्मक वाटला. कार॑ण ह्यात मानवी भाषेत विचारलेल्या प्रश्नाचे पृथःकरण करून मग उत्तर काढले जाते.

मानवाने केवळ देव आणि दानवच नव्हे तर, यंत्रेदेखिल बनवली आहेत. म्हणून ह्यात क्वचित यंत्राने मानवावर मात केल्याचे दिसले तरी ही यंत्रे शेवटी मानवी बुद्धीचाच अविष्कार आहेत, हे विसरता येणार नाही!

तंत्रबातमी

प्रतिक्रिया

विकास's picture

16 Feb 2011 - 1:33 am | विकास

हा विशेष कार्यक्रम बघायची उत्सुकता आहे. पण तो दोन्ही दिवस बघता येण्याची शक्यता कमीच वाटते. :(

म्हणून ह्यात क्वचित यंत्राने मानवावर मात केल्याचे दिसले तरी...

मात यंत्रे करत नसतात, त्यांना थोडेच कळतयं! त्यांच्या आहारी जाणारा मानवमात्र स्वतःच्या पायावर धोंड पाडून घेत असतो असे वाटते...

कालच ह्याबद्दल लिहावे असे मनात आले होते पण म्हटले तीन्ही भाग पुर्ण झाल्यावरच लिहावे. ह्या भागांचे विशेष म्हणजे हो दोन्ही स्पर्धक जेपर्डीतील सर्वोत्तम आहेत. दुर्दैवाने तीनही भाग पाहता येणार नाहीएत. :-( नंतरच.

इच्छुकांनी हा व्हिडिओपाहुन उत्कंठा शांत करुन घेणे.

रेवती's picture

16 Feb 2011 - 1:55 am | रेवती

होय, आम्हीही पाहतोय हा कार्यक्रम.
काल ब्रॅड आणि वॉटसनमध्ये बरोबरी झाली.
मागल्या अठवड्यात या आधी काय काय झाले आणि चार वर्षांपासून चाललेल्या संशोधनाबद्दल दाखवले. मला थोडे पहायला मिळाले.

नंदन's picture

16 Feb 2011 - 2:36 am | नंदन

वरील प्रतिक्रियांशी सहमत आहे. तिन्ही भाग पाहण्याची उत्सुकता आहे, पण ते शक्य होणार नाही :(
(अवांतर - न्यू यॉर्क टाईम्सच्या ह्या पानावर जाऊन तुम्हांलाही वॉटसनशी स्पर्धा करता येईल :))

इंटरनेटस्नेही's picture

16 Feb 2011 - 3:03 am | इंटरनेटस्नेही

मला तर मी आणि माझा पीसी एकत्र बसुन बीअर पितोय अशी स्वप्न पडतात कधीकधी! नंतर मला 'झाल्यावर', माझा पीसीच मला मझ्या घरी सुरक्षित पोचवतो.. आणी माझी आवडती 'मशीन' हसतमुखाने माझी वाट बघत असते असंही कधी कधी वाटुन जाते.
-
संगणक प्रेमी, इंट्या शिवाजीनगर.

सुनील's picture

16 Feb 2011 - 8:28 am | सुनील

आज दुसर्‍या दिवसाअखेर, संगणक ३५००० डॉलर्स जिंकून आघाडीवर आहे.

गेल्या दोन दिवसात संगणकाच्या दोन गफलती ध्यान्यात आल्या.

पहिल्या दिवशी, केन ह्या स्पर्धकाचे उत्तर चुकले म्हणून बझर दाबण्यात दुसरा आलेल्या संगणकावर उत्तर देण्याची पाळी आली, तेव्हा त्याने, पहिल्या स्पर्धकाने (केनने) दिलेले चुकीचे उत्तरच पुन्हा दिले! त्याजागी कुणी मनुष्य असता तर, ही चूक करता ना!

आज, अमेरिकेतील (युनायटेड स्टेट) शहरासंबंधी प्रश्न असतानाही त्याने कॅनडतील टोरँटो शहराचे नाव उत्तरादाखल दिले!

अर्थात, IBM चे तंत्रज्ञ ह्याकडे बारीक लक्ष देऊन असतीलच!

आगे आगे देखिये, होता है क्या!