मी बरेचदा शुक्रवारी संध्याकाळच्या जेवणासाठी असा पास्ता बनवते. बनवायला झटपट आणि रुचकर!
साहित्य :
३० मध्यम आकाराच्या कोलंब्या
३ टेस्पून बटर मऊ करुन
३-४ लसूण पाकळ्या बारीक किसून
१ टे.स्पून लिंबाचा रस
१ टी स्पून इटालियन सिझनिंग किंवा २ टे स्पून बारीक चिरलेली पार्सली
२ टेस्पून तेल
१/४ टी स्पून मीठ
१/४ टी स्पून मीरे पावडर
चिमुटभर साखर
१ लाल किंवा हिरवी ढब्बू मिरची, चौकोनी तुकडे करुन
१/२ पौड एंजल हेअर पास्ता किंवा थिन स्पागेटी
विकतचा बेसिल पेस्टो
किंवा घरी पेस्टो करणार असाल तर
२ कप बेसिलची पाने
४ लसूण पाकळ्या सोलून
१ कप अक्रोडाचे तुकडे
१ टीस्पून मीठ
१/२ कप एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव ऑईल
१/२ कप पर्मेजान चिज
वरुन घालण्यासाठी
१/२ चमचा चिली फ्लेक्स
पर्मेजान चिज
कृती
एका बोलमधे बटर घेऊन काट्याने हलके होईपर्यंत फेटा. त्यात लसूण, लिंबाचा रस, इटालियन सिझनिंग घालून फेटुन एकजीव करा. कोलंबी सोलून साफ करुन घ्या.
पेस्टो घरी करणार असाल तर बेसिल्,लसूण, अक्रोडाचे तुकडे आणि मीठ फूडप्रोसेसरमधे जरा ओबडधोबड वाटून घ्या. तेल घालून बारीक वाटून घ्या. चिज घालुन पेस्टो बोलमधे काढून घेऊन त्याला प्लॅस्टिक व्रॅप लावा किंवा वर थोडे तेल घाला म्हणजे रंग बदलणार नाही.
पास्ताच्या पाकिटावर दिलेल्या सुचनेप्रमाणे एकीकडे पास्ता शिजत ठेवा. पास्ता शिजत आला की एकीकडे फ्राईंग पॅन मधे २ टेस्पून तेल घालून मोठ्या आचेवर तापत ठेवा. कोलंबीला मीठ, मीरेपूड आणि साखर चोळून घ्या. तेल तापले की कोलंबी घालून परता. ढ्ब्बू मिरचीचे तुकडे घालून १ मिनिट परता. कोलंबी शिजली की आच कमी करुन बाजूला ठेवलेले बटर घालुन १ मिनिटाने आचेवरुन उतरवा.
शिजलेला पास्ता ड्रेन करुन घ्या. पास्ता शिजवताना वापरलेले थोडे पाणी बाजुला ठेवा. हे पाणी घालून पेस्टो जरा सरसरीत करुन घ्या. मोठ्या बोलमधे पास्ता घेऊन त्यात पेस्टो घालुन हलक्या हाताने ढवळा. सर्विंग प्लेट मधे काढुन वर कोलंबीचे मिश्रण घाला.
वाढताना वरुन आवडत असेल तर चिली फ्लेक्स आणि परमेजान चिज घाला.
प्रतिक्रिया
15 Feb 2011 - 9:04 pm | स्वातीदेव
एकदम मस्त. धन्यवाद रेसेपीबद्दल. :-)
15 Feb 2011 - 9:17 pm | प्रदीप
पास्त्याची आणि पेस्टो घरी बनवण्याची, दोन्ही छान पा. कृ. दिसताहेत. धन्यवाद
15 Feb 2011 - 9:20 pm | रेवती
कोलंबी सोडून बाकी रेसीपि झकास.
सूपात, पास्त्यात किंवा पिझ्झ्यात पेस्टो म्हणजे माझी मज्जा!
पेस्टो वापरून कोणतीही डीश असली की झाले.
ट्रेडर जोज् चा पेस्टो चांगला असतो.
15 Feb 2011 - 9:37 pm | विकास
ऑलीव्ह गार्डन मध्ये फोटू काढला आहे का? ;)
15 Feb 2011 - 10:38 pm | शुचि
पहीलं माझ्या मनात हेच्च (श्रिम्प स्कॅम्पी) आलं पण मग लक्षात आलं अरे इतक्या कोळंब्या नाही देत ते लोक.
15 Feb 2011 - 9:40 pm | प्राजु
तुफ्फान!!
लिंबाचा रस कोलंबी शिजताना घालायचा का? की सगळे तयार झाल्यावर वरून घालायचा.
15 Feb 2011 - 9:58 pm | यशोधरा
आईग्गं!! फोटोनेच मार डाला!! मस्त एकदम, कोलंबीसकट!!
15 Feb 2011 - 10:05 pm | चिंतामणी
सगळे सगळे छान आहे. पण एक प्रश्ण आहे.
सगळी परीमाणे कप, चमचे असे असताना एकच परीमाण पौंडात का?
(जमल्यास दशमान पध्दतीत म्हणजे ग्रॅममधे सांगावे)
15 Feb 2011 - 10:26 pm | स्वाती दिनेश
मस्त फोटो आणि पाकृ..
संध्याकाळी पास्ता आमच्याकडेही बरेचदा होतो, (वेगवेगळ्या सॉसांमधील वेगवेगळ्या प्रकारचा पास्ता.. )
स्वाती
15 Feb 2011 - 11:22 pm | स्वाती२
धन्यवाद मंडळी! :)
@प्राजू लिंबाचा रस बटर मधे घालायचा
>>एका बोलमधे बटर घेऊन काट्याने हलके होईपर्यंत फेटा. त्यात लसूण, लिंबाचा रस, इटालियन सिझनिंग घालून फेटुन एकजीव करा.
>>
@चिंतामणी
इथे पास्त्याचे १ पौडाचे पाकिट मिळते. त्यातला अर्धा पास्ता आम्हाला तीघांना पुरेसा होतो म्हणुन १/२ पौड. बाकी मी पास्ता करताना पास्ताचा जुडगा हातात घेऊन अंदाजे सर्विंग साईज ठरवते. तुम्हाला ग्रॅममधे हवे असेल तर साधारण २२५ ग्रॅम म्हणजे अर्धा पाउंड.
15 Feb 2011 - 11:26 pm | गणपा
वाह लाजवाब !!!
कोळंबी मग ती कसलाही साज लेउन येवो, आपला तर जीव की प्राण. :)
16 Feb 2011 - 11:13 am | कच्ची कैरी
वा मस्त पाकृ.आहे आणि पेस्टोची पाकृ.दिल्याबद्दल धन्यवाद!
16 Feb 2011 - 1:43 pm | लवंगी
एक्दम ए१!!
16 Feb 2011 - 9:50 pm | सहज
थोडे विरझण...
शिवाय अजुन थोडे गार्लिक+ऑलिव्ह + हर्ब काँबो ऑईल घालून पास्ता कोरडा दिसू दिला नसता. उदा हा फोटो पहा

लुक्स ड्राय एन्ड बिट बोरींग. सोबत एक सॅलेड बाउल असता तर आवडले असते.
वरचा फोटो जिथुन घेतला तो हा ब्लॉग मला आवडतो. आशा आहे की तुम्हा लोकांना पण आवडेल. येथील फोटो, इन्ग्रेडियन्ट्स, वन डिश मिल्स पाहून मला नेमके काय म्हणायचे आहे ते कळेल असे वाटते. पुढच्या वेळी स्वाती तै जी डिश द्याल ती अशी हटके असु दे! मिपाच्या बल्लवाचार्यांनो आता अप युअर गेम, आय नो यु कॅन डू इट!!
17 Feb 2011 - 4:44 am | स्वाती२
पुन्हा एकदा धन्यवाद!
सहजराव पास्ता काहीसा ड्राय दिसतोय-मान्य! तुम्ही सुचवलेला ब्लॉग एकदम एक्झॉटिक आहे. मात्र माझ्या लेकाची जीभ अजून तेवढी अॅडवेंचरस झाली नाहिये. मिड्वेस्ट मधल्या छोट्याशा गावात लॉबस्टर देखील एक्झॉटिक. स्क्वीड इंक पास्टा म्हणजे ....
17 Feb 2011 - 6:10 am | चित्रा
स्वाती२ यांचा पास्ता मला आवडला.
स्वाती२ म्हणतात तसे एक्झॉटिक (उदा. रेडीमेड 'स्मोक्ड') इनग्रीडीयंट वापरून केलेल्या वस्तू जरी छान लागल्या तरी खिशाला बरीच चाट देऊन जातात.
ह्या वस्तू कधीतरी करून पहायच्या तर ठीक आहे. स्मोक्ड मासे लगेच संपतील पण सहज यांनी दिलेल्या ब्लॉगवरच्या एका रेसिपीत आहेत तशा समजा hoisin sauce, oyster sauce आणि soy sauce अशा गोष्टी एका वस्तूत घालायच्या तर मग त्यांना पुन्हा कधीतरी खप असला पाहिजे. मागे मी अशा भरपूर वस्तू आणत असे आणि मग त्या अर्धवट संपलेल्या बाटल्या माझ्या फ्रीजची धन होऊन राहायच्या.
हल्लीचा माझा नियम असा आहे की एका गोष्टीत एखादाच नवीन पदार्थ असला पाहिजे, दोन तीन असले तर ती करायची नाही, किंवा बदलून करायची.
16 Mar 2015 - 5:35 pm | कपिलमुनी
तोंपासू
17 Mar 2015 - 8:49 am | यशोधरा
वा! भारी दिसते आहे ही पाकृ :)