एगलेस केक

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
27 Jan 2011 - 3:38 pm

अंड्याशिवायच्या केकच्या पाककृती खूप जणांनी खव तून आणि धाग्यातून विचारल्या आहेत, बिनाअंड्याचा केक मी फारसा करत नाही.. त्यामुळे मी एगलेस केक करणार आणि फटू काढणार मग ती केकृ (केकच्या पाकृला आमच्यात केकृ म्हणतात,:) )मिपावर टाकणार.. ह्यात बराच काळ लोटेल आणि विचारणार्‍यांचा केक करण्याचा उत्साह निघून जाईल.. म्हणून केकृ देते आहे, संबंधितानी करुन पहावे आणि पुराव्यासाठी ह्या धाग्यावर फोटो टाकावेत. बिनाअंड्याच्या केकच्याही अनेक रेशिप्या आहेत, ह्या पाकृचा फोटो प्रतिसादात आला की (च) दुसरी पाकृ मिळेल.
सुरुवात सोप्या केकने करुया-
हा केक फार पटकन आणि छान होतो. शिवाय क्यालरी पण जरा बेतात आहेत..
साहित्य- १ वाटी मैदा, १ वाटी पिठीसाखर, पाऊण वाटी दही, १ च. चमचा बेकिंग पावडर, १ चिमूट मीठ, १ च. चमचा कॉर्नफ्लोअर, ५ च.चमचे तेल, ५ च. चमचे पाणी, २-३ च. चमचे कोको पावडर (कोको फ्लेवर/चॉकलेट फ्लेवर नको असेल तर १ च. चमचा वॅनिला किवा आपल्या आवडीचा इसेन्स)
च. चमचा= चहाचा चमचा म्हणजेच टी स्पून आणि वाटी म्हणजे आमटीची वाटी..;)
(हे म्हणजे रुचिरा ष्टाइल झालं..)
कृती-
तेल + पाणी एका भांड्यात एकत्र करुन भरपूर फेटणे.
त्यात इसेन्स घालून फेटणे.(कोको घालणार असाल तर इसेन्स घालायची गरज नाही.)
दही घालून फेटणे. साखर घालून फेटणे.
मैदा+बेकिंग पावडर+ मीठ + कॉर्नफ्लोअर एकत्र करणे. कोको पावडर घालणार असाल तर तीही त्यात मिसळणे.
चॉकलेट फ्लेवर नको असेल तर कोको पावडर घालू नका, त्या ऐवजी आपण इसेन्स घातलेला आहेच.
हे म्हणजेच मैदा+बेकिंग पावडर+ मीठ + कॉर्नफ्लोअर +कोको पावडर (ऑप्शनल) वरील मिश्रणात घालून फेटणे.
सर्व वेळी फेटताना भरपूर फेटणे आवश्यक आहे हे आता वाचून वाचून तुम्हाला माहिती झाले आहेच .
१८० अंश से वर प्रिहिटेड अवन मध्ये साधारण ३० मिनिटे बेक करणे.
नेहमीप्रमाणेच -
केक झाला की नाही हे (त्याच्या)पोटात विणायची सुई किवा सुरी खुपसून पाहणे.
केक झाला तरी लगेच अवन बाहेर न काढता अवनचे दार उघडून तसाच पाच मिनिटे राहू देणे.
नंतर जाळीवर काढणे, पूर्ण थंड झाला की स्लाइस करणे.
(केक जाळीवर काढला की आणि स्लाइस केले की - फोटो काढणे आणि ह्या धाग्यावर इतरांना जळवण्यासाठी टा़कणे व माझ्याकडून येणार्‍या पुढच्या बिनाफोटोच्या, बिनाअंड्याच्या रेशिपीची वाट पाहणे)

प्रतिक्रिया

रुचिरा श्टाईल केक आवडला.. आमची विनंती पुर्ण केल्याबद्दल स्वातीतायचे शतःश आभार..

- पिंगू

नरेशकुमार's picture

27 Jan 2011 - 4:18 pm | नरेशकुमार

केक झाला की नाही हे (त्याच्या)पोटात विणायची सुई किवा सुरी खुपसून पाहणे.

कुर्‍हाड घाललेली चालनार नाय का ?

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2011 - 4:42 pm | स्वाती दिनेश

केकवर कुर्‍हाड घातली तर ती आपल्याच पायावर मारुन घेण्यासारखे होईल,;) म्हणून विणायची सुई किवा सुरीच हवी..

टारझन's picture

27 Jan 2011 - 4:21 pm | टारझन

"जानी , जिस मे अंडा नही .. वो केक नही ... " और जो केक नही .. केकृ कैसे ?

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2011 - 4:21 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त ग :)

एकदम हाकेसरशी धावलीस ;)

RUPALI POYEKAR's picture

27 Jan 2011 - 4:50 pm | RUPALI POYEKAR

धन्यवाद

लय भारी.
मी तेल्-पाणी घालून कधी केला नहीये.
मात्र वरच्या प्रमाणाला.. अर्धा टीन कोक, स्प्राईट किंवा कोणतेही सोडा ड्रिंक घालून करते मी एग लेस केक. !

स्वाती दिनेश's picture

27 Jan 2011 - 6:55 pm | स्वाती दिनेश

कोक घालूनच्या केकमध्ये प्रमाण थोडे बदलते, ती ही रेसिपी देईन हवी असेल तर .. आधी एगलेस केक विचारणार्‍यांपैकी हा केक करुन फोटो टाका कोणीतरी इथे.. मग पुढची एगलेसकेक रेसिपी मिळेल..:)
स्वाती

नरेशकुमार's picture

27 Jan 2011 - 7:05 pm | नरेशकुमार

आधी एगलेस केक विचारणार्‍यांपैकी हा केक करुन फोटो टाका कोणीतरी इथे....मग पुढची एगलेसकेक रेसिपी मिळेल..

कोनि जर काहीतरी करुन एखादा केकचा फटू टाकलाच, तरि तो एगलेसच आहे कसे काय समजनार ?

कच्ची कैरी's picture

27 Jan 2011 - 7:04 pm | कच्ची कैरी

स्वाती ताई तुम्ही केकमध्ये ph.d केलेली दिसते ,मस्त पाकृ

प्राजु's picture

27 Jan 2011 - 7:14 pm | प्राजु

केक मध्ये पी एच डी करणार्‍यांसाठी ती गाईड म्हणून काम करते आजकाल. :)

धिन्गाना's picture

31 Jan 2011 - 9:15 pm | धिन्गाना

माझा कोणताहि केक बाजुने भाजला तरि मधे ओला आणि मउ रहातो. उपाय काय?

स्वाती दिनेश's picture

31 Jan 2011 - 9:42 pm | स्वाती दिनेश

केक मध्ये मऊ आणि ओला राहतो याचा अर्थ तुम्ही केक पूर्ण व्हायच्या आधी अवन बाहेर काढला आहे.
तुम्ही केक कशात भाजता? अवन मध्ये भाजत असाल तर १८० अंश से वर २५ -३० मिनिटे भाजा, नंतर केक मध्ये विणायची सुई किवा सुरी खुपसून पहा, जर सुरीला केक मिश्रण चिकटले नसेल तर केक झाला, तसे नसेल तर १८० अंश से वर अजून ५ मिनिटे अवनमध्ये ठेवा, पुन्हा सुरी खुपसून पहा... जेव्हा केकमधील सुरी क्लिन बाहेर येईल तेव्हा केक झाला असे समजा.
जर वरुन केक ओव्हरब्राऊन होऊ लागला असेल आणि आतून झाला नसेल तर तपमान कमी करा आणि केकचे भांडे अ‍ॅल्युमिनियम फॉइल ने झाका व पुढे अजून ५ मिनिटे अवन चालू ठेवा,
स्वाती

गणपा's picture

1 Feb 2011 - 7:05 pm | गणपा

स्वाती ताईने उपाय सांगीतलेच आहेत.
माझेही २ पैसे.
ओव्हनला शक्यतो दोन कॉईल्स असतात एक वर आणि एक खाली. जर वरुन केक तांबुस झाला असेल आणि आत शिजला नसेल तर वरची कॉईल थोडावेळ बंद ठेवावी. अन्यथा वरुन केक करपु शकतो.

धिन्गाना's picture

7 Feb 2011 - 2:15 pm | धिन्गाना

धन्यवाद्,स्वातितै आणि गणपाभौ.
मी ३०मि. ठेवुन नन्तर काचेचे झाकन १ मि. साठि अर्धवट ठेवुन बघितले. मधला भाग फुगुन वर येतो आणि झाकणावर आतुन वाफ धरते.
मायक्रोवेव ला वरचि कोइल बन्द कशि करायचि?टेम्प. मात्र कमि करुन बघितले नाहि.