पनीर कढाई

अंतु बर्वा's picture
अंतु बर्वा in पाककृती
26 Jan 2011 - 9:38 am

नमस्कार मिपाकर्स...

बर्‍याच दिवसांपासुन फ्रिजमधला पनीर खुणावत होता. पनीर चिली च्या पुढे कधीही पनीर नामक पदार्थाचं काहीच बनवलं नसल्याने नेमकं काय करावं सुचत नव्हत... मिपाच्या पाकृ विभागात एक चक्कर टाकली, पण पनीर माखनवाला वगैरे पदार्थ जरा गोडसर लागत असल्याने काहीतरी तिखट बनवावंस वाटत होतं. मग काय गुगलदादा कडे याचना केली आणी पाच पन्नास रेसिपीज शोधुन काढल्या. पण यात नेमका घोळ असा झाला की इतक्या रेसिपीज पाहुन हम तो एकदम कन्फुजा गए... शेवटी दोन-तीन रेसिपीज मिक्स केल्या आणी जे काही झालं ते अस... तर मंडळी पेश है पनीर कढाई!!

साहित्यः
पनीर - ४०० ग्राम
सिमला मिरची - १
लाल मिरच्या - ६
धने - अर्धी वाटी (साधारण ३ चमचे)
लसूण - ६-७ पाकळ्या
आलं - पाव ईंच
टोमॅटो - ३-४
हळद, मिरची पावडर, मिठ - चवीनुसार
कोथिंबीर

कॄती:
लाल मिरच्या आणी धणे मिक्सर मधे बारीक करुन घ्या. लसूण, आले आणी हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करुन घ्या. टोमॅटो बारीक चिरुन घ्या. पनीर आणी सिमला मिरची चे १ सेमी आकाराचे तुकडे करुन घ्या.

एका भांड्यात २ चमचे तेल घ्या. लाल मिरची आणी धण्याची अर्धी पूड तेलात टाका आणी एखादा मिनिट परता. त्यात लसूण, आलं आणी हिरव्या मिरची चे तुकडे टाकून चांगले परतुन घ्या. त्यात कापलेले टोमॅटो टाका. त्यात हळद आणी मिरची पावडर टाकून १०-१५ मिनिटे शिजवा. टोमॅटोची पेस्ट होत आली की गॅस बंद करा.

एका पसरट भांड्यात तेल घेउन त्यात उरलेली लाल मिरची आणी धने पूड टाका. एखाद्या मिनिटानंतर सिमला मिरचीचे तुकडे टाकुन परतुन घ्या. त्यात पनीर चे तुकडे टाका आणी दोन ते तीन मिनिटे शिजु द्या. आता वरच्या भांड्यात तयार केलेला मसाला टाकुन झाकण ठेउन ५-१० मिनिटे शिजु द्या. बारीक केलेली कोथिंबीर टाका आणी गरमागरम सर्व करा.

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

26 Jan 2011 - 9:42 am | नरेशकुमार

मस्त, तोंडाला पाणि सुटले.
त्याबरोबर मउ लुसलुशीत छान बटर नान, चवीला कांदा.
ब्बास अजुन काय पाहीजे ?

सहज's picture

26 Jan 2011 - 10:00 am | सहज

छान दिसतेय पनीर भाजी.

कुंदन's picture

26 Jan 2011 - 11:52 am | कुंदन

सोपी दिसतेय पाकृ.
लवकरच करुन बघिन.

कच्ची कैरी's picture

26 Jan 2011 - 1:47 pm | कच्ची कैरी

वा मस्तच्!!!!!आणि फोटो तर फॅन्टाबुलसच आहेत .

आह्ह्ह, पनीर बोले तो अपुनका फेवरीट आयटम... ;)

(पनीर प्रेमी) :)

मी नेमका डायेटचा विचार सुरु केला की हे अशा काहीतरी पाकक्रिया टाकतात आणि मग मला पण फ्रिज मधल्या काही काही गोष्टि खुणावायला लागतात.

नको नको कशाला हात लावु नकोस, आजचा कोटा संपलाय हा बायकोचा डायलॉग पुन्हा रिपिट होतो.

यशोधरा's picture

27 Jan 2011 - 9:19 am | यशोधरा

मस्त दिसतय.

विजुभाऊ's picture

27 Jan 2011 - 11:02 am | विजुभाऊ

पनीर कढाई आणि अंतु बर्वा........
भाईकाकाना यात कोकणचे बदलते वास्तव दिसले असते

प्यारे१'s picture

7 Feb 2011 - 10:51 am | प्यारे१

अगदी हाच विचार डोक्यात आला होता.

पनीर कढाई बघूनही जड आणि जाड झाल्यासारखे (आणखी) वाटते.

टारझन's picture

27 Jan 2011 - 11:25 am | टारझन

तोंड लाळावले :)

कुंदन's picture

27 Jan 2011 - 11:35 am | कुंदन

एकदा अशी फक्कड डिश आमचे मित्र परा यांना खाउ घातली पाहिजे.

प्राजक्ता पवार's picture

28 Jan 2011 - 11:29 am | प्राजक्ता पवार

मस्तं आणि सोप्पी पाकृ.

मयुरपिंपळे's picture

3 Feb 2011 - 10:37 pm | मयुरपिंपळे

तोंडाला पाणी सुटले

खादाड अमिता's picture

4 Feb 2011 - 11:13 am | खादाड अमिता

:)

मस्त, तोंडाला पाणि सुटले.
फोटो खुपच सुन्नदर आहे.