त्री स्तरीय

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
13 Jan 2011 - 12:02 pm

धकधकत्या र्‍हदयाने किंवा धपापत्या उराने त्या बालेने प्रवेश केला.
तारुण्याच्या तृष्णेने तरारलेल्या नजरेने सभोवतालच्या तरुणांनी तीला तस्मात तिष्ठयामी म्हणत तेरा तोफांची सलामी द्यावी त्या प्रमाणे नजरेनेच तहे दिलसे तृप्तीची पावती दिली.
तिच्या एका नजरेने तरून जावे तरुतल निवास करण्याची त्यांची तयारी होती.
लाखो दिलांच्या पायघड्यांवरून ती नाजूक पदन्यास करीत त्या आसनावर स्थापन झाली.
ज्याला ती धुडकावेल त्यालासुद्धा ती त्याच्याशी बोलली याचे समाधान लाभायचे .
तीच्या तीव्र स्वरात देखील त्याला तेजस्वी पंचमाचा भास व्हायचा
त्या मदालसेच्या मैत्रीसाठी हपापलेले ते तरून तीचा शब्द हुकूम म्हणून झेलायला तयार होते.
मंद मंद पदन्यास टाकत ती त्या गवतावरून चालत गेली तेंव्हा कित्येक तरुणांच्या अंगावर शहार्‍याची तृणपाती शहारली.
तीला त्याची पर्वाच नव्हती. तिरक्या नजरेने तीने ते सारे न्याहाळले.
मदांध मनाच्या मानकर्‍याना ती इकडेच येईल याची खात्री होती. ती आपल्याशी निदान तिरकस का होईन बोलेल याची आशा होती. त्रैलोक्यात चर्चा होईल त्रीभुवन गाजवेल असे सौंदर्य आपल्या कडे आहे याची तीला जाणीव होती. त्रैलोक्यातील त्रिपुर सुंदरी होऊ शकेल अशी गात्रे असलेल्या त्या गीर्वाण सुंदरीला याची जाणीव होती .
तारुण्यसुलभ चंचल स्वभावाला तीच्या तीक्ष्ण बुद्धीने योग्य मुरड घातली होती.
तृषार्ताची तहान भागवताना त्याच्याकडून काही अपेक्षा करायची नाही त्याच वेळेस त्याला उपकृत करायचे हा धडा तीने नाकारायचे ठरवले होते.
तीच्या तीव्र बुद्धीला जे उमगत होते ते काही वेगळेच होते.
महामंत्री तीव्रमती तीन दिवसांपासून काही वेगळेच घडवत होते.
घडवंचीला चंचीत कोंडण्याचा त्यांचा डाव तीला उलथवून लावायचा होता.
तेरड्याला त्रिविष्टपात पोहोचवायचे त्रांगडे सोडवायचे होते
( क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

नन्दादीप's picture

13 Jan 2011 - 12:13 pm | नन्दादीप

>>( क्रमशः)
संपादक मंडळाला विनंती : ईवलुश्या लेखानंतर "( क्रमशः)" टाकल्यास त्या लेखावर प्रकाश न टाकता दोन भाग जोडून एकदम प्रकाश टाकावा.

विजूभौ टुमचा टिव्र णिषेढ.....एवढुस लिहून ( क्रमशः) टाकल्याबद्दल....

अवलिया's picture

13 Jan 2011 - 12:17 pm | अवलिया

शुद्धलेखनावर मेहेनत घेणे आवश्यक. लंगोटीभर लेख पाहून मौज वाटली. कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

(लंगोटीभर लिहुन पानभर प्रतिक्रिया हवी काय?)

विजुभाऊ's picture

13 Jan 2011 - 12:27 pm | विजुभाऊ

लंगोटीभर लेख पाहून मौज वाटली
असो. कुणाची लंगोटी किती मोठी आहे याचे त्रैराषीक कशाला मांडताय नाना ?
त्रागा करणे बरे नव्हे त्याने त्रासच होतो.

प्रतिक्रिया देत बसण्यापेक्षा पूढचा भाग लिहायचा होता. अर्थात कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

श्री राजकुमार , श्री नाना , आपली करामत पाहिली. अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले.

- एकनाथ कांबळे

छोटा डॉन's picture

13 Jan 2011 - 12:23 pm | छोटा डॉन

शप्पथ सांगतो ...
(आंतरजालीय) आयुष्यात पहिल्यांदाच एखादा लेख 'अजिबात न कळल्याची' घटना आज घडली, ज्याम ज्याम फ्रस्ट्रेशन आले आहे.
असो, प्रयत्न चालु आहेत, पुढच्या भागात लिंक लागु शकेल.

- ( एकेकाळचा सर्वज्ञ ) छोटा डॉन

=)) =)) =)) =)) =))
अर्थात कोणाला काय कळावं हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही. मी माझं एक निरिक्षण नोंदवलं :)

- (चोता दोन चा फॅन) टारझन

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jan 2011 - 12:34 pm | परिकथेतील राजकुमार

श्री. छोटा डॉन, श्री. टारझन, श्री. अवलिया,

गेल्या काही दिवसात काही जुन्या सदस्यांनी असेच लंगोटी धागे काढले आणि त्यांना जुने आणि नवे सभासद त्यांच्या स्टाईलमध्ये "उत्तम लज्जारक्षण" करत आहेत. त्यात काही नवल नाही. तुम्ही मात्र संघ बदललेला पाहून मौज वाटली. कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

अन्या दातार's picture

13 Jan 2011 - 12:44 pm | अन्या दातार

चुकुन त्री-स्तरिय च्या ऐवजी 'स्त्री-स्तरीय' असे वाचले ;)

आपली करामत पाहिली. अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले. अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2011 - 1:10 pm | बिपिन कार्यकर्ते

संदर्भ : 'मुन्नाभाई एम. बी. बी. एस.'

सर्किट : ए भाय, ये खोली कितना छोटा है. चालू होनेके पैलेइच खतम हो गया!

खत्तरनाक प्रतिसाद बिका ,
जियो ...
अए असुरा , तुला काम्पिटिशन आली रे .. :)
अर्थात असुराने कोणाला कॉम्पिटिशन द्यावी हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी माझे एक निरिक्षण नोंदवले.

आपली करामत पाहिली. अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले. अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2011 - 1:17 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

विनायक प्रभू's picture

13 Jan 2011 - 1:47 pm | विनायक प्रभू

अहमदाबादेत थंडी खुप वाढलेली दिसतेय.

मुलूखावेगळी's picture

13 Jan 2011 - 2:18 pm | मुलूखावेगळी

विजुभौ,
हि काय सस्पेन्स स्टोरी आहे का?
आनि एवढेसेच लिहिलेत?
जास्त लिहा ना जरा
घडवंचीला चंचीत कोंडण्याचा त्यांचा डाव तीला उलथवून लावायचा होता.
तेरड्याला त्रिविष्टपात पोहोचवायचे त्रांगडे सोडवायचे होते
>>>> घडवंची,त्रिविष्टपात हे काय त्रान्गडे आहे सान्गाल का?
म्हन्जे पुढील भाग कळेल

विजुभाऊ's picture

13 Jan 2011 - 3:27 pm | विजुभाऊ

घडवंची = बैठक , स्टूल सादृष वस्तु

स्टूल सादृष वस्तु

आणि स्टुल म्हणजे ते डॉक्टर लोकं स्टुल सॅम्पल पॅथॉलॉजी लॅब मधुन टेस्ट करुन घ्यायला लावतात तेच काय?

अवलिया's picture

13 Jan 2011 - 3:34 pm | अवलिया

तरीच परवा पराकडे कूणीतरी स्टुल मागितलं तर त्याने माझे स्टुल बुटके आहे आणी सध्या बिका बसला आहे त्यावर, तुम्ही समोरुन घ्या त्यांचे उंच आहे अस्से काहिस्से सांगित्तले

बहुदा उंची तुम्ही स्टुल कसा ठेवता त्यावर अवलंबुन असावी :) कुतुबमिनार सारखा स्टुल असेल तर तो उंचंच असेल :) मात्र पेंटॅगॉन सारखा असेल तर बुटका असेल :)

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jan 2011 - 3:35 pm | परिकथेतील राजकुमार

आपली करामत पाहिली. अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले. अर्थात कुणी कसे वागावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.

नन्दादीप's picture

13 Jan 2011 - 3:36 pm | नन्दादीप

हा हा हा......जबरा जोक...

मुलूखावेगळी's picture

13 Jan 2011 - 3:58 pm | मुलूखावेगळी

घडवंची = बैठक , स्टूल सादृष वस्तु
>>>मग
घडवंचीला चंचीत कोंडण्याचा त्यांचा डाव तीला उलथवून लावायचा होता.
>>> म्हन्जे काय?

तेरड्याला त्रिविष्टपात पोहोचवायचे त्रांगडे सोडवायचे होते
>>>त्रिविष्टपात म्हन्जे कसला पात हे पन सान्गा

स्टुल म्हणजे ते डॉक्टर लोकं स्टुल सॅम्पल पॅथॉलॉजी लॅब मधुन टेस्ट करुन घ्यायला लावतात तेच काय?

विजुभाऊ's picture

13 Jan 2011 - 4:05 pm | विजुभाऊ

ते नाय रे ...ते स्टूल्स.

नावातकायआहे's picture

13 Jan 2011 - 7:03 pm | नावातकायआहे

>>ते नाय रे ...ते स्टूल्स.

म्हंजी एका पेक्शा जास्त का?
एक बुटक आन एक उंच??

विजुभाऊ's picture

13 Jan 2011 - 4:04 pm | विजुभाऊ

त्रिविष्ठप = तिबेट , स्वर्ग

तिमा's picture

13 Jan 2011 - 6:51 pm | तिमा

असे गूढ प्रवचन दिलेत तर आसारामबापूंची जागा तुम्हालाच.

स्वानन्द's picture

13 Jan 2011 - 11:21 pm | स्वानन्द

अहो ते रजनीशांचे चाहते आहेत. :)

५० फक्त's picture

13 Jan 2011 - 11:31 pm | ५० फक्त

चला, माझ्या जोडिला आहे कुणितरी सिनियर, बरं वाटलं, मजा आली.

हर्षद.