सोपे कोडे

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
8 Jan 2011 - 12:57 am

एकदमच सोप्पं कोडं घालते आहे. पण या धाग्यावर अधिक कोडी घालावीत.

(१) ३ खोकी आहेत.
(२) एका खोक्यात फक्त काळे हातमोजे, दुसर्‍या खोक्यात फक्त पांढरे हातमोजे आणि तीसर्‍या खोक्यात काळे आणि पांढरे हातमोजे आहेत.
(३) तीनही खोक्यांवर निखालस चूकीच्या रंगांच्या चिठ्ठ्या लावल्या आहेत.

प्रश्न - कमीत कमी किती प्रयत्नांत तुम्ही हातमोजा उपसून, खोकी आणि रंग बरोबर जुळवून व्यवस्थित चिठ्ठ्या लावू शकाल?

उखाणेआस्वाद

प्रतिक्रिया

राजेश घासकडवी's picture

8 Jan 2011 - 1:32 am | राजेश घासकडवी

एक मोजा काढणं म्हणजे एक प्रयत्न असं गृहीत धरलं तर कमीत कमी चार प्रयत्न लागतील. प्रत्येक खोक्यातून एक मोजा काढायचा, मग परत पहिल्या खोक्यातून एक मोजा काढायचा. त्यातून काढलेले मोजे जर दोन वेगवेगळ्या रंगाचे असतील तर चिठ्ठ्या लावणं सोपं आहे.

(कोड्याची शब्दयोजना अजून अचूक हवी. कारण 'कमीत कमी' प्रयत्न म्हटलं तर शून्य प्रयत्नांनी मोजे न उपसता अनमानधपक्याने चिठ्ठ्या लावून देखील बरोबर येण्याची शक्यता १/६ आहे)

दुसरं शक्य उत्तर म्हणजे काही मोजे उपसून दुसऱ्या खोक्यांत टाकायचे. यासाठी बहुधा सहा प्रयत्न लागतील. प्रत्येकी दोन दोन मोजे काढले की कुठच्यातरी एका खोक्यात फक्त पांढरे किंवा फक्त काळे मोजे आहेत हे कळेल. मग ते दोन मोजे उरलेल्या दोन खोक्यांत टाकायचे, व उरलेले मोजे पहिल्या खोक्यात टाकायचे. मग सगळ्याच खोक्यांत काळे-पांढरे मोजे राहातील. हाय काय नाय काय. (कदाचित या पद्धतीने कमी प्रयत्नांत देखील करता येईल...)

डावखुरा's picture

8 Jan 2011 - 1:36 am | डावखुरा

शुचि's picture

8 Jan 2011 - 1:39 am | शुचि

स्पष्टीकरण?

>> कोड्याची शब्दयोजना अजून अचूक हवी.>>
मी या वाक्याचे संपूर्ण समर्थन करते.

शून्यापेक्षा अधिक आनि कमीत कमी किती प्रयत्नांत ही गोष्ट हमखास, प्रत्येक वेळी शक्य आहे असे हवे होते.
________________________________________________

माझे उत्तर वेगळे आहे. वरील उत्तर चूकीचे आहे. जरी कोड्यात दिले नसले तरी असे मी गृहीत धरले होते आणि तसेच कोडे घालणार्‍याला अभिप्रेत आहे की - ३ चिकटवलेल्या चिठ्ठ्या पुढीलप्रमाणे आहेत -
(१) काळे हातमोजे
(२) पांढरे हातमोजे
(३) काळे व पांढरे हातमोजे
____________________________________
प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद घासकडवी साहेब.

सुहास..'s picture

8 Jan 2011 - 1:41 am | सुहास..

काय शुचि ? बरी आहेस ना आता?

शुचि's picture

8 Jan 2011 - 1:42 am | शुचि

का बरं?

"निखालस चूक" म्हणजे "नक्की चूक" असा अर्थ घेतला आहे.

उपसा १. "काळे-पांढरे" अशी चिठ्ठी असलेल्या खोक्यातून हातमोजा उपसावा.
शक्यता १अ. त्यातून जर पांढरा मोजा निघाला, तर ते खोके पांढर्‍या मोजांचे. "काळे" चिठ्ठीचे खोके काळ्या-पांढर्‍या मोजांचे, आणि "पांढरे" चिठ्ठीचे खोके काळ्या मोज्यांचे.
शक्यता १ब. त्यातून जर काळा मोजा निघाला, तर ते खोके काळ्या मोजांचे. "पांढरे" चिठ्ठीचे खोके काळ्या-पांढर्‍या मोजांचे, आणि "काळे" चिठ्ठीचे खोके पांढर्‍या मोज्यांचे.

"निखालस चूक"चा वेगळा काही अर्थ असल्यास उत्तर वेगळे येईल. (म्हणजे चिठ्ठ्या यादृच्छिक-रँडम डकवल्या असतील, तर कदाचित चूक असतील किंवा कदाचित बरोबर असतील. मग वरील धोरण वापरता येणार नाही.)

शुचि's picture

8 Jan 2011 - 2:09 am | शुचि

अगदी बरोबर उत्तर :)
अभिनंदन धनंजय :)

कवितानागेश's picture

8 Jan 2011 - 2:00 am | कवितानागेश

जर मोजे काढून 'कुठेतरी' ठेवणे ही कृती धरली तर, व
जर निखलस चुकीच्या चिठ्ठ्या असतील तर
सुरुवातीची स्थिती;
खोके१- चिठठी काळा- मोजा मिश्र
खोके२- चिठठी पांढरा- मोजा काळा
खोके३- चिठठी मिश्र- मोजा पांढरा
कृती:
१- मिश्र मोजे खोका १ मधून काढून मिश्र (३) खोक्यात भरले
२- काळे मोजे खोका २ मधून काढून काळ्या(१) खोक्यात भरले.
३- मिश्र खोक्यातून (३) फक्त पांढरे मोजे काढून खोका २ मध्ये भरले.

अवांतरः कुणी करुन ठेवला हा गोंधळ?

प्लीझ माऊ तू मिश्र म्हणजे काळा व पांढरा असा दुरंगी मोजा समजते आहेस का?

नाही ग. एका खोक्यात दोन्ही रंगांचे मोजे आहेत. म्हणजे काळेसुद्धा आणि पांढरे सुद्धा :)

कवितानागेश's picture

8 Jan 2011 - 2:17 am | कवितानागेश

मिश्र मोजे आहेत असेच धरले मी. त्यात पुन्हा काळे मोजे ठेवले तरी ते मिश्रच रहाणार.

तुझं उत्तर ३ आहे बरोबर? आपल्याला कमीत कमी प्रयत्नात (> ०) चिठ्ठ्या लावायच्या आहेत. म्हणून १ हेच उत्तर बरोबर आहे.

सुनील's picture

8 Jan 2011 - 2:36 am | सुनील

काळ्या मोज्याचे खोके शोधण्यासाठी दत्त गुरूंचा धावा करावा आणि पांढर्‍यांसाठी उजव्या सोंडेच्या गणपतीची आराधना! जे उरेल ते मिश्र मोज्यांचे खोके.

दत्त गुरू आणि गणपती ही आउट सोर्स केलेली कामे करीत असताना आपण "ब्युटी अ‍ॅन्ड द बीस्ट" वाचीत निपचित पडावे!

(ह घ्या बर्रका!!)

शुचि's picture

8 Jan 2011 - 3:11 am | शुचि

दुसरे कोडे

(१) एक राजा आहे.
(२) राजाकडे मद्याचे खूप प्रकार आहेत. १०० प्रकारची उंची मद्यं अनुक्रमे १०० वेगवेगळ्या बाटल्यांमध्ये आहेत.
(३) एकदा एक चोर शिरतो आणि या मद्यांच्या बाटल्यांमध्ये वीष मिसळण्याचा प्रयत्न करतो.
(४) पण सुदैवाने चोर १०० पैकी एकाच बाटलीत वीष मिसळतो.
(५) हे वीषयुक्त मद्य जर कोणी घेइल तर त्याचा १० दिवसांनी मृत्यू ओढवतो.
(६) चोराला फासावर चढवतात पण पठ्ठा काही केल्या हे सांगत नाही की कोणत्या बाटलीत वीष मिसळले आहे.
(७) राजाला लवकरात लवकर म्हणजे अगदी ११ व्या दिवशीच मद्य प्यायचे आहे.
(८)पण राजाला कमीत कमी (>०) लोक वापरून हे शोधून काढायचे आहे की कोणत्या बाटलीमध्ये विषारी दारू आहे.

हे कसे शक्य आहे? कमीत कमी किती (>०) सेवक वापरून राजा ही बाटली शोधू शकेल?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jan 2011 - 4:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

९९ लोकांना ९९ वेगवेगळ्या बाटल्यांमधले द्रव्य प्यायला द्यायचे. जर त्यांतला एकही कोणी मेला तर त्या बाटलीत विष होतं, कोणीही मेला नाही तर राहिलेल्या बाटलीत विष आहे.
पण जर यांच्यापैकी कोणी (एक किंवा जास्त) दहा दिवसांच्या आत इतर काही कारणाने तिकिट काढले, तर तेरा क्या होगा राजा?

आदिती कमीत कमी सेवक वापरायचे आहेत. ९९ हे उत्तर चूकीचे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jan 2011 - 4:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मला वाटलं राजा (बेवडा असल्यामुळे) त्याला सगळ्याच्या सगळ्या दारवा ११ व्या दिवशी प्यायच्याच आहेत. अगदीच तसं नसेल, एकाच बाटलीत काम भागणार असेल तर एक माणूस पणाला लावूनही राजाची तहान भागेल.

आदिती त्याला सगळी मद्य ताबडतोब हवी आहेत. ते विषारी सोडून. त्याला सगळ्या चांगल्या दारू लगोलग प्यायच्या आहे. पण माणसं आणि दिवस कमी मोजायचे आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jan 2011 - 4:18 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

छ्या: असला बेवडा आणि चव-ढव नसणारा राजा मेलेलाच बरा. राजानेच सगळ्या दारवा लगोलग पिऊन टाकाव्या. त्यातून त्याचे ग्रह अगदीच उच्चीचे असतील तर तो जगेलच.

बिचार्‍या शुचीच्या कोड्याच खोबर करुन टाकलस

राजेश घासकडवी's picture

8 Jan 2011 - 4:03 am | राजेश घासकडवी

दहा दिवसांनी मरणार म्हणजे बरोब्बर दोनशेचाळीस तासांनी का? की फक्त १ तारखेला मद्य प्यायलं तर ११ तारखेला मरणार इतकंच सांगता येतं? जर आज १ तारीख असेल तर राजाला ११ तारखेला उत्तर हवं आहे का? की १२ तारखेला?

हो २४० तासांनी मरेल बरोब्बर. राजाला जितक्या लवकर मद्य पीता येईल तितक्या लवकर प्यायचे आहे.

राजेश घासकडवी's picture

8 Jan 2011 - 4:17 am | राजेश घासकडवी

मला वाटतं १२८ मद्यांपर्यंत ८ लोकांत शोधून काढता येईल. प्रत्येक बाटलीला नंबर द्यायचा, तो बायनरीमध्ये कन्व्हर्ट करायचा, व १ ते ८ स्थानांसाठी एक एक सेवक ठेवून १ वा ० नुसार त्या स्थानावरच्या सेवकाला द्यायचं अगर द्यायचं नाही. नंतर कोण कोण मेले त्यावरून तो आकडा शोधून काढता येईल.

शुचि's picture

8 Jan 2011 - 4:19 am | शुचि

यु गॉट इट :)
अभिनंदन घासकडवी.
इन फॅक्ट ७ लोकांत.

राजेश घासकडवी's picture

8 Jan 2011 - 4:41 am | राजेश घासकडवी

:)
कदाचित आठव्याला पॅरिटी बिट म्हणून वापरता येईल :) या सर्व दारवा मिक्स करायला कोणीतरी लागेलच ना!

सुनील's picture

8 Jan 2011 - 4:13 am | सुनील

राजाला ११व्या दिवशी मद्य पिण्यात रस आहे की विषारी बाटली शोधण्यात?

पिण्यात रस असेल तर दोघात काम भागेल.

पहिल्या ५० बाटल्यांतील मद्याचे कॉकटेल करून एकाला पाजायचे आणि दुसर्‍या ५० चे दुसर्‍याला. जो जिवंत राहील त्याच्या गटातील ५० बाटल्या नक्कीच विषमुक्त.

५० दिवस राजा फुल्ल्टू!!

ह्या ५० दिवसात असाच प्रयोग विषमिश्रित दुसर्‍या गटातील बाटल्यावर करून नक्की बाटली शोधता येईल.

बाकी चोर बाटल्या चोरण्याऐवजी विष मिसळायला कशासाठी आला होता?

तुमचे दिवस जास्त वाया चालले आहेत. ११ व्या दिवशी राजाला सगळ्या विषमुक्त मद्याच्या बाटल्या नाही मिळणार या पद्धतीने. पण चांगला तर्क आहे.

धनंजय's picture

8 Jan 2011 - 4:32 am | धनंजय

घात-२च्या आकड्यांप्रमाणे (बायनरी) बाटल्यांचा क्रमांक लिहावा. पण सात जागांपर्यंत शून्ये भरून लिहावा :
१ = ००००००१ (या बाटलीतले मद्य सेवक क्रमांक ७ला द्यावे, बाकीच्यांना देऊ नये)
२ =०००००१० (या बाटलीतले मद्य सेवक क्रमांक ६ला द्यावे, बाकीच्यांना देऊ नये)
३ =०००००११ (या बाटलीतले मद्य सेवक क्रमांक ६ व ७ ना द्यावे, बाकीच्यांना देऊ नये)
...
९९ =११०००११ ( या बाटलीतले मद्य सेवक क्रमांक १,२, ६ व ७ ना द्यावे, बाकीच्यांना देऊ नये)
१००=११००१०० ( या बाटलीतले मद्य सेवक क्रमांक १,२, व ५ ना द्यावे, बाकीच्यांना देऊ नये)

दहाव्या दिवशी जे सेवक मरतील त्यावरून विषारी बाटली क्रमांक समजेल.

काय बा क्रूर राजे एकेक! इतक्या इमानी नोकराची किंमत बाटलीपेक्षा जास्तच जोखायला पाहिजे. त्यापेक्षा "नोकर आजारी पडतात" किंवा "कत्तलखान्यात मरायला ठेवलेल्या कुठल्याशा जनावरांना दारू पाजली" असे काहीतरी कथानक हवे होते.

बाटली क्रमांक ६३ आणि ९५ मधील थोडे थोडे मद्य ६ सेवकांना द्यावे लागेल, बाकीच्या बाटल्यांमधले मद्य त्याहून कमी सेवकांना द्यावे लागेल. जर मद्याच्या किमतीत काही क्रम असेल, तर सर्वात महागाचे मद्य असेल त्याला कोड नंबर १, २, ४, ८, १६, ३२, ६४ द्यावा. वगैरे.

शुचि's picture

8 Jan 2011 - 4:48 am | शुचि

उत्तर बरोबर आहे.

utkarsh shah's picture

8 Jan 2011 - 9:58 am | utkarsh shah

हे नाही समजले. सुरुवातीला ६वाच का?

विजुभाऊ's picture

8 Jan 2011 - 3:43 pm | विजुभाऊ

काही प्रश्न
१) एक नोकर किती पेग पिऊ शकतो ( नियम नाही क्षमता विचारली आहे)
२) एक पेग किती मिली चा आहे?
३) कमी क्वान्टीटीचा पेग हा कमी विशारी होऊ शकतो का?
४) चखण्याचा विषावर काय परीणाम होतो?
५) नोकराना पाजून पाजून बाटली संपली तर काय?
६) एका वेळेस नोकर किती प्रकारच्या दरवा पिउ शकतो.
७) मानवाधिकार रक्षण वगैरे काही नियम आहेत का?
८) नोकर मेल्यास त्याच्या घरच्याना काय काँपेन्सेशन मिळेल?
९)दारु पिऊन मृत्यू या कारणावरून त्याला मृत्यूउपरान्त मिळणारे कॉम्पेन्सेशन रद्द केले जात नाही असा नोकराच्या एच आरअ‍ॅग्रीमेन्ट मध्ये उल्लेख आहे का?
१०) नोकर सेवेत असताना मृत्यू पावला तर त्याच्या मुलाना/बायकोला कोणत्या खात्यात नोकरी मिळेल?
११) नोकरीत घेताना " दारू पित असल्यास प्राधान्य" असा काही क्लॉज होता का?

एकच प्रश्न

कीती पेग घेतल्यावर इतके प्रश्न पडतात? ;-)

मराठे's picture

9 Jan 2011 - 1:04 am | मराठे

बाटली वीशारी. नाहीतर यूरेका यूरेका लोगीक पण लागॉ शकते एथे

राजेश घासकडवी's picture

8 Jan 2011 - 3:23 am | राजेश घासकडवी

'निखालस चूक'चा अर्थ मी हिरवे, पिवळे असा घेतला होता. डोळ्यांच्या रंगाच्या कोड्यात ही अलिखित शक्यता होती. हे कोडं घालताना कदाचित मुळात चिठ्ठ्यांची अदलाबदल कशा प्रकारे झाली हे सांगितलं असतं (खोका क्र १ व २ च्या चिठ्ठ्यांची अदलाबदल, मग २ व ३ यांची अदलाबदल व खोक्यांची पुनर्रचना) तर हे गोंधळ झाले नसते.

शुचि's picture

8 Jan 2011 - 3:28 am | शुचि

हो तसा अर्थ निघू शकतो आहे. आत्ता मी त्या दृष्टीने वाचले आणि तसा गैरसमज होऊ शकतो आहे. शब्दरचना फार म्हणजे फारच अचूक तरी पाहीजे किंवा प्रश्न विचारून ती स्पष्ट करून घेतली पाहीजे.

अवलिया's picture

8 Jan 2011 - 8:47 am | अवलिया

मिपा "प्रगल्भ" संकेतस्थळ होण्याकडे वेगाने वाटचाल करत आहे.

शुभेच्छा !!

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jan 2011 - 11:04 am | परिकथेतील राजकुमार

मिपा "प्रगल्भ" संकेतस्थळ होण्याकडे वेगाने वाटचाल करत आहे.

+१ सहमत आहे.

मिपाक्रमाला अनेक शुभेच्छा.

अनुराग's picture

8 Jan 2011 - 4:04 pm | अनुराग

+ २

आत्मशून्य's picture

9 Jan 2011 - 2:12 am | आत्मशून्य

मी.