चीझी स्प्रिंग ओनिअन ऑम्लेट

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in पाककृती
6 Jan 2011 - 11:37 am

सध्या मुंबईत पण चक्क जरा थंडी वाजते. तेव्हा सकाळी एक मस्त 'आलं मारके' चहा आणि असं 'heartwarming' ऑम्लेट मिळालं म्हणजे 'मोगाम्बो बहुत खुश हुआ'!

सामग्री:
२ अंडी
२ मोठे चमचे दूध
१/४ कप कांद्याची पात, बारीक चिरलेली (अंदाजे एक मूठभर)
१ मोठा चमचा, किसलेलं चीज
चवीनुसार मीठ आणि मिरपूड
१ चमचा तेल किंवा बटर

कृती:
- तेल वगळून बाकी सगळी सामग्री फेटून चांगलं मिक्स करून घ्या.
- एका नोन स्टिक pan वर थोडं तेल किंवा बटर गरम करून त्यात अंड्याच मिक्स्चर ओता.
- मग त्याला अगदी मंद आचेवर झाकण ठेवून शिजवा.
- आता त्या ऑम्लेट ला मधून फोल्ड करा आणि मुउसर शिजल्यावर गरम गरम सर्व्ह करा.

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

6 Jan 2011 - 11:44 am | परिकथेतील राजकुमार

ह्यांचे खाते बंद करुन टाका रे !! त्रास आहे रोजचा.

नगरीनिरंजन's picture

6 Jan 2011 - 11:49 am | नगरीनिरंजन

अनुमोदन आणि बिनशर्त पाठिंबा!
पाकृंवर सेन्सॉरशिप आलीच पाहिजे. आमच्या वासना चाळवल्या जातात हे असले फोटो पाहून. ;-)

अवांतरः असा नाष्टा तयार असेल तर भल्या पहाटेही आम्ही आनंदाने अंथरूण सोडू.

छोटा डॉन's picture

6 Jan 2011 - 11:54 am | छोटा डॉन

अनुमोदन आणि बिनशर्त पाठिंबा!

बाकी अजुन काही बोलण्यासारखे रहात नाही :(

- छोटा डॉन

अवलिया's picture

6 Jan 2011 - 3:26 pm | अवलिया

काय बोलायचे :(

शक्यता नाकारता येत नाही

गवि's picture

6 Jan 2011 - 11:54 am | गवि

+१

मोहनराव's picture

21 Nov 2011 - 10:27 pm | मोहनराव

+१०००००....

तुमच्या या दूध मिसळण्याच्या आयडियेने ऑम्लेट मस्त फुगतं आणि लुसलुशीत होतं हे मी करुन पाहिलं आहे.

इराणी (हाटेलवाले..!!) चोरतील ही पाकृ.. "ऑम्लेट्-बन" साठी .. त्याआधी कॉपीराईट करुन घ्या.. :)

करुन बघितल आणि आवड्ल हे ऐकुन आनन्द झाला.

:)

खादाड अमिता's picture

6 Jan 2011 - 1:01 pm | खादाड अमिता

धन्यु

गणपा's picture

6 Jan 2011 - 1:30 pm | गणपा

मस्तच :)

नंदिनी राणे's picture

6 Jan 2011 - 3:01 pm | नंदिनी राणे
खादाड अमिता's picture

6 Jan 2011 - 6:11 pm | खादाड अमिता

मला सॉया सॉस करता येत् नाही. मी ते विकत आणते.

इथे http://www.wikihow.com/Make-Your-Own-Soy-Sauce दिलेली आहे. बघा उपयोगी आहे का.

फटु बघुनच खल्लास झालो.

बेसनलाडू's picture

7 Jan 2011 - 3:38 am | बेसनलाडू

(प्रयोगशील)बेसनलाडू
फोटो पाहूनच तोंडाला पाणी सुटले आहे.
(खवय्या)बेसनलाडू

आनंदी गोपाळ's picture

21 Nov 2011 - 8:38 pm | आनंदी गोपाळ

नसलं तरी चालतं तुम्हाला? :P

गणपा's picture

21 Nov 2011 - 8:48 pm | गणपा

चवीनुसार मीठ आणि मिरपूड

लिव्हलय की. :)

ए पर्‍या तुझी चाळीशी दे पाहू थोडा वेळ. नव गिर्‍हाईक आलय. ;)

अविनाशकुलकर्णी's picture

21 Nov 2011 - 10:16 pm | अविनाशकुलकर्णी

तुमच्या या दूध मिसळण्याच्या आयडियेने ऑम्लेट मस्त फुगतं आणि लुसलुशीत होतं हे मी पण करुन पाहिलं आहे...

मजा आ गया...

अन्या दातार's picture

21 Nov 2011 - 10:37 pm | अन्या दातार

काय अकुकाका, डिट्टो चोप्य पस्ते केलीत की गविंची निम्मी प्रतिक्रिया.