लेमन ट्री

लतिका धुमाळे's picture
लतिका धुमाळे in जनातलं, मनातलं
12 Dec 2010 - 9:55 pm

लेमन ट्री.
चित्रपटा बद्द्ल मी प्रथमच लिहित आहे.

सिनेमाचे नाव_ लेमन ट्री(२००८)
दिग्दर्शक_ इरान रिकिल्स
कलाकार_ हैना अब्बास, अली सुलेमान,डोरॉन टॅवोरी, रोना लिपाझ-मिशेल.
मराठी, हिन्दि, इग्लिश चित्रपट आपण नेहमीच बघत असतो. या वेळेल जर्मनीत आल्यावर ठरवले की दुसऱ्या भाषेतील चित्रपट पहायचे, अर्थात इंग्रजीत डब केलेले.त्यामुळे असे चित्रपट मिळतात का हे बघायला सुरवात केली. तसे निरनिराळ्या भाषेतील चित्रपट होते खूप, पण फ़क्त मूळ भाषा आणि जर्मन भाषेत डब केलेले, त्यामुळे ते सर्व बाद. मग एक मिळाला हिब्रू आणि अरब भाषेतील व जर्मन सबटायटल्स असलेला. तो मी घेऊन आले. समजणार नाही तिथे नवऱ्याची मदत घ्यायची असे ठरवले.(मला थोडे जर्मन येते पण पूर्ण चित्रपट बघण्या एवढे येत नाही.)

गोष्ट तशी अगदी लहानच. पॅलेस्टाईन आणि इस्त्रायलच्या सरहदीवर दोन्ही बाजूना घडणारी.सलमा, मध्यम वयाची, विधवा पॅलेस्टाईन स्त्री. मुलीचे लग्न झालेले व मुलगा अमेरीकेत. पिढ्यांपासून असलेल्या भल्यामोठ्या लिंबाच्या बागेवर चरितार्थ चाललेला. मदतीला एक म्हातारा नोकर.
चित्रपटाची सुरवात होते तीच ईस्रायली संरक्षण मंत्री नॅव्हान सलमाच्या शेजारील मोठ्या घरात रहायला येतो. मंत्रालय म्हणते लिंबाच्या बागेतील झाडांच्या गर्दीमुळे सुरक्षिततेल धोका आहे. लिंबाची संपूर्ण बाग नाहिशी करण्याचा हुकूम निघतो आणि त्याला राजकिय रंग दिला जातो.

आणि सलमाचा लढा सुरू होतो.मशिनगन्स, वॉचटॉवर्स एकाबाजूला आणि सलमा एकटी एका बाजूला. गावातील प्रतिष्ठीत लोक "कशाला या भानगडित पडते" असे सांगणारे. पण वकिलाच्या मदतीने सलमा इस्त्रायली सर्वोच्च न्यायालया पर्यन्त जाते. सर्व जगाचे व मिडियाचे लक्ष वेधून घेते. अशिक्षित नोकराची कोर्टातील साक्ष - तो सांगतो झाडांना आपल्यासारखाच जीव असतो, त्यामुळे बागेत काम करतांना काधीही हत्यारे वापरली नाहीत. मंत्र्याची बायको मिरा तिला या गोष्टी पटत नसतात.मिराला सलमा बद्दल सहानुभुती वाटत असते पण नवऱ्याच्या अजेंड्यामुळे काही करू शकत नाही. सलमा व मिरा या दोघींमध्ये एक मोठी दरी असते तरीही एक अद्रुश्य असा बंध दोघींमध्ये होतो. एकही अक्षर न बोलता नजरेने त्या दोघींनी हा बन्ध फ़ारच छान दाखवला आहे. तीचा वकील सार्थ उक्तिवाद करतो की उपजीविकेचे साधन असे हिरावून घेता येत नाही. ह्या सर्व लढ्या मध्ये वकिल आणि सलमा दोघांमध्ये एक आगळीच जवळीक तयार होते, ती खूपच नाजूकपणे दाखवली आहे.

आणि शेवटी सुप्रीम कोर्टाचा निकाल. सुरक्षिततेचा प्रश्न असल्यामुळे,बागेतील सर्व झाडे दोन फ़ुटाच्यावर छाटून टाकावीत.

हा काही पत्तेदारी (डिटेक्टीव) चित्रपट नाही, तरी शेवट सांग्त नाही, तुम्ही बघाच.

"लेमन ट्री वेरी प्रिटी" या गाण्या बरोबर टायट्ल्स दाखविल्या जातात. मी हे गाणे कंट्री म्युझिक स्टाईल मध्ये ऐकले होते. इथे त्याला छान अरेबिक डूब दिली आहे. हिंदुस्तानी संगीत आणि अरेबिक संगीतात असलेले साम्य लक्षात येते. त्याच गाण्यातील " द फ़्रुट ऑफ़ द लेमन ट्री इज इम्पॉसिबल टू इट" हे पूर्ण सिनेमा बघितल्यावर पटते.

बघावा असा एक चित्रपट. कसा, कोठून डाऊनलोड करायचा ते मला माहित नाही. जर कोणाला माहित असेल तर लिंक द्यावी.

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

रन्गराव's picture

12 Dec 2010 - 11:04 pm | रन्गराव

चित्रपटाचा विषय छान आहे. हा धागा काढून माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद :)

पैसा's picture

12 Dec 2010 - 11:09 pm | पैसा

करून दिल्याबद्दल धन्यवाद. विकिपिडिया वर शोधले असता, हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे अशी माहिती मिळाली. तसंच या चित्रपटाला अनेक आंतर्राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. कधी बघायला मिळतोय पाहूया.

रन्गराव's picture

12 Dec 2010 - 11:10 pm | रन्गराव

टोरंट वर आहे चित्रपट. EtZ limon नावाने शोधा ;)

चित्रपटाची कथा छानच दिसते आहे.
कधी पहायचा योग येतोय देव जाणे!

शुचि's picture

13 Dec 2010 - 12:06 am | शुचि

छान ओळख लतिका ताई.

ओळखीइतकेच प्रतिसादकर्त्यांचेदेखील आभार.

मी प्रतिसाद, धागा, प्रतिसाद, धागा असा लपाछुपी खेळ खेळत ठरवत असते की धागा पूर्ण वाचायचा की नाही. त्यामुळे ध्याग्याइतकेच, सकारात्मक प्रतिसाददेखील उपयोगी पडतात.

शिल्पा ब's picture

13 Dec 2010 - 11:49 am | शिल्पा ब

छान ओळख....नेटफ्लिक्सवर इन्स्टंटवॉचमधे आहे.

लतिका धुमाळे's picture

13 Dec 2010 - 1:03 pm | लतिका धुमाळे

नेटवर चित्रपट कोठे बघता यईल या माहिती साठी धन्यवाद. सर्व सकारात्मक प्रतिक्रियांसाठी धन्यवाद.
लतिका धुमाळे