चविष्ट स्वादिष्ट नाष्टा २: सोप्पी कणकेची धिरडी

Pearl's picture
Pearl in पाककृती
6 Dec 2010 - 3:10 pm

साहित्यः गव्हाचे पीठ(कणिक), तिखट, मीठ, हळद, बारीक किसलेला लसूण, बारीक चिरलेली कोथिंबीर

क्रुति: एका मोठ्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ(कणिक) घेऊन त्यात थोडी हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, लसूण घाला. मग त्यात पाणी घालून दोस्याच्या पिठाइतके दाट मिश्रण बनवा. बनलेल्या मिश्रणाची छान पातळ धिरडी तेल लावलेल्या निर्लेप तव्यावर घाला. आणि तूप्/बटर घालून आवडेल त्या चटणी बरोबर वाढा. (चटणी शिवायही तितकीच छान लागतात. म्हणून चटणी नसली तरी नुसत्या तूपाबरोबरही छान लागतात.)

टिपः- या मिश्रणाची धिरडी घालताना थोडे विशेष कौशल्य अशासाठी लागते की धिरडी तव्यावर घातल्यानन्तर, एका कुंड्यात/बाउलमध्ये घेतलेल्या पाण्यात हात बुडवून त्या हाताने गरम धिरडे पसरावे लागते तरच ते पातळ आणि जाळीदार होते. अन्यथा ते जाडसर होते.

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

6 Dec 2010 - 3:39 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त लागतात...
यात गुळ घालुन गोडाचिहि करतात..

खापर पोळी पण अशीच करतात फक्त ती दुधाबरोबर खातात !!

पोळ्या करायचा कंटाळा आला कि कणकेची धिरडी करते पण हाताने पसरवत नाही......म्हणून जाळीदारही फारशी होत नाहीत, आता हाताने पसरवून बघते. पतेकी बात!

सोपी पद्धत - चवीलाही चांगली लागतात.
पण हाताने गरम धिरडे पसरावे लागते हे पहिल्यांदाच ऐकले - हाताने कशी पसरवतात धिरडी? मला फक्त डावाने किंवा वाटीने माहीती आहे. जाळीदार होत असतील तर नक्कीच करुन बघायला आवडेल.

रेवती's picture

7 Dec 2010 - 12:54 am | रेवती

आधी तव्यावर पीठ घातल्या घातल्या फारसं गरम नसतं तेंव्हा झटकन हातानं फिरवायचं असतं. हाताशी गार पाण्याचं भांडं ठेवायचं आणि त्यात हात बुडवून नंतर पिठावरून फिरवायचा.
ही आज्जीच्या काळातली पद्धत नंतर मागे पडली तीच दिलीये इथे.

सखी's picture

7 Dec 2010 - 1:26 am | सखी

धन्यवाद रेवती. थोडसं अवघड वाटतयं पण कदाचित सरावाने जमेल, नक्की करुन बघेन.

Pearl's picture

7 Dec 2010 - 12:51 pm | Pearl

बरोबर आहे रेवतीने सांगितलेले.
असेच पसरवतात हाताने. झटकन हातानं फिरवायचं असतं. तरीही थोडेफार गरम होतेच ते. कारण तवा छान गरम असतानाच (गॅस बारीक करून) ही धिरडी घालावीत म्हणजे लवकर निघतात. आणि डोशाइतकी फास्ट निघत नाहीत. थोडी हळूहळू प्रेमाने काढावी लागतात :) पिठात पाण्याचे प्रमाण योग्य हवे. २/३ धिरडी झाल्यावर पाण्याचा अंदाज येतो. पाण्याचे-पिठाचे प्रमाण कमी जास्त करून योग्य घनतेचे मिश्रण बनवा. आणि तवा निर्लेपच (non-stick) वापरा. तोही तेल लावून.

धिरडे दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या. आणि भाजताना धिरड्याला अधेमधे तेल लावा चमच्याने.

caution: योग्य घनतेचे मिश्रण न बनल्यास तव्यावर धिरड्याचा चिकट गोळा बनून frustration येण्याची शक्यता नाकारता येत नाही ;-)

स्पंदना's picture

7 Dec 2010 - 4:56 pm | स्पंदना

>>योग्य घनतेचे मिश्रण न बनल्यास तव्यावर धिरड्याचा चिकट गोळा बनून frustration येण्याची शक्यता नाकारता येत नाही>> एव्हढ्या साठीच काल पासुन वाचुन सुद्धा प्रतिसाद नव्हता दिला. हम बहोत बहोत frustrate हुए है ये सोप्पी धिरडी के कारण.
नाव सुद्धा नको वाटत मला यांच. फार अवघड!

aparna akshay,

तशी सोप्पीच आहेत ही धिरडी. पण प्रयत्न फसू शकतो. I can understand. कारण एखाद्याला एखादा पदार्थ लवकर जमतो करायला, तर एखाद्याला बर्‍याच प्रयत्नांनी. so its ok.

आतापर्यन्त मी अशाच रेसिपी शेअर केल्या आहेत ज्या बनवण्यासाठी,
- जास्त पूर्वतयारी लागत नाही (उदा. भिजवणे, शिजवणे इ.)
- ज्याचे साहित्य घरी easily available असते आणि
- ज्याचा processing time <= ३० मि. आहे
म्हणून अशा रेसिपींना सोप्पे म्हटले. बाकी काही नाही :)

आता तूप कढवणे सोपे की अवघड सांगा बरं. तर कोणीही म्हणेल की १दम सोप्पं. पण परवा मी पहिल्यांदाच तूप कढवत होते, तर तेव्हा जो havoc झाला त्याला काही तोडच नाही.

जेवायला बसल्यावर side by side एक काम हातावेगळे होइल म्हणून तूप कढवायला ठेवले. तर दर ५/१० मिनीटांनी ते पाहून, चमच्याने ढवळून येत होते. एका बेसावध क्षणी TV समोर १५-२० मिनीटांची तंद्री लागली आणि घात झाला :( तूप पार करपून आटून निम्मे झाले होते. त्यामूळे खूप चिडचिड झाली, वैताग आला. त्या वैतागातच 'विनाशकाले विपरीत' बुद्धि झाली की हे तूप लगेच गाळून ठेवावे नाहीतर ते थिजेल. तिरमिरीतच गाळणे काढले आणि तूप गाळायला लागले. तर हाय रे दैवा! चिडचिडीत steel ऐवजी प्लास्टिक गाळणे वापरल्याने ताबडतोब गाळण्याची जाळी वितळून काळी होउन तूपात पडून तूपातील बेरीशी समरस झाली. कोणती जाळी आणि कोणती बेरी कळेना. अशा प्रकारे १/२ किलो तूप वाया गेले आणि देवदिवाळी साजरी झाली. I mean आता पूढील ४/५ वर्षे तरी देवांसाठी निरांजनाला तूप पुरेल :)

स्पंदना's picture

8 Dec 2010 - 6:32 pm | स्पंदना

हा हा हा !

ए तुप बनवुन फार दिवस झाले ग! छान बनायच माझ तुप. गोकुळ दुधाच. भांड भांड भर दही साठायच सायीच! अन मग एक दिवस ताक करुन मस्त लोण्याचा गोळा काढायचा. तस्साच वाटीत घालुन लेकीला द्यायचा. त्या दुपारच जेवण म्हण्जे लोण्याचा गोळा अन तोंड बरबटलेली कन्या ! रात्री अक्षय बरोबर लोणी अन भाकरी , बरोबर मेथी वा शेपु ! ताज्या लोण्या बरोबर छान लागते म्हणुन! मग दुसर्‍या दिवशी तुप ! अन मग एक बडबड गीत, मसाले भात, मी नाही खात , का नाही खात? तुप नाही त्यात !
च च च कुठ गेले ते दिवस? काय समाधान होत त्या लोणी भाकरीत !

रेवती's picture

8 Dec 2010 - 7:18 pm | रेवती

काय हे? आँ?
पदार्थांची, लोण्याची आठवण करून दिल्याबद्दल अपर्णाबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

स्पंदना's picture

8 Dec 2010 - 8:15 pm | स्पंदना

बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला ।

ए रेवती आता तरी खुष होना . परवाच तर यशंता न घातलेल्या सामुहिक बारश्यात मी बाजुला बसुन तुझ्या बारश्याच्या घुगर्‍या खाल्ल्या ना.

कवितानागेश's picture

11 Dec 2010 - 1:05 pm | कवितानागेश

हा अनुभव वाचून मझ्या नवर्‍याला खूप आनंद झालाय, समपराक्रमी व्यक्ती बघून.
लोणी/तूप हे पदार्थ तसे धोकादायकच.
एकदा त्यानी मिक्सरमध्ये ताक करायची युक्ती काढली होती आणी माझ्यासाठी स्वैपाकघरात रांगोळी काढून ठेवली.

पर्ल सविस्तर सुचनांबद्दल मनापासुन धन्यवाद. धिरड्याच्या चिकट गोळ्याचे टेंशन आहेच पण धिरडी करताना चिकाटी लागते हे ही आता अनुभवाने कळले आहे :). सुरवातीला वाईट वाटायचे की आई-आजीसारखी कधीच करता येणार नाहीत, पण हळुहळु जमायला लागली आता अजुन सुधारणा झाली तर चांगलेच आहे.

निवेदिता-ताई's picture

6 Dec 2010 - 11:38 pm | निवेदिता-ताई

सखी...तु बघ आधी हाताने पसरवुन, मग मला सांग........

हे चांगलय हं निवेदिता ताई - मला तर गिनिपिगच करुन टाकले तुम्ही!!
पण कळवेन नक्की मला जमली तर :)

सुनील's picture

6 Dec 2010 - 11:47 pm | सुनील

छान, चविष्ट प्रकार.

पहिले धिरडे (तवा थंड असल्यामुळे) थेट तव्यावर थापता येते. नंतरची कठिण जातात. तेव्हा बटरपेपरवर आधी पीठ पसरावे आणि मग त्याला अलगदपणे हातात घेऊन तव्यावर टाकावे.

पुष्करिणी's picture

7 Dec 2010 - 12:08 am | पुष्करिणी

हे डोश्याच्या पिठाच्या कंसिस्टंसीच असल्यानं बटरपेपर वरून हातात कसं घ्यायच?

सुनील's picture

7 Dec 2010 - 12:10 am | सुनील

किंचित घट्ट करावे, थालिपिठासारखे.

कवितानागेश's picture

7 Dec 2010 - 3:10 pm | कवितानागेश

थापतात ते थलिपीठ हो.
धिरड्याचे पीठ सरसरीत भिजवून तव्यावर पसरायचे.
रवा डोश्याच्या 'पीठा'इतके पातळ.
त्यात २ चमचे ताक घातले तर चटकन आम्बते, आणि धिरड्याची जाळी छान पडते.

स्वानन्द's picture

7 Dec 2010 - 5:23 pm | स्वानन्द

बटरपेपर हा काय प्रकार आहे? दिसतो कसा? केव्हा वापरतात? एकदा वापरल्यावर परत वापरता येतो का?

पर्नल नेने मराठे's picture

7 Dec 2010 - 5:32 pm | पर्नल नेने मराठे

मिठाइच्या बॉक्समधे हा पेपर असतो.
बदामी हलवा / ,माहिमी हल्व्याला गुन्डाळलेला अस्तो.
paper

स्वानन्द's picture

7 Dec 2010 - 6:02 pm | स्वानन्द

अच्छा. याचा उपयोग काय? तेल शोषून घेणे?

पर्नल नेने मराठे's picture

7 Dec 2010 - 6:51 pm | पर्नल नेने मराठे

फार्च बै हा कार्‍ता प्र्श्न विचार्तो

स्वानन्द's picture

7 Dec 2010 - 10:10 pm | स्वानन्द

फार्च कमी उत्र देते बॉ ही

भुभु

पुष्करिणी's picture

7 Dec 2010 - 7:17 pm | पुष्करिणी

नाही, हा कागद तेल शोषून घेत नाही..म्हणूनच वापरायचा. ग्रीसप्रूफ असतो.

स्वानन्द's picture

7 Dec 2010 - 10:06 pm | स्वानन्द

अच्छा.. माहितीबद्दल धन्यवाद, पुष्करिणी.

शीर्षक कणकेची सोप्पी धिरडी असे हवे होते. कारण सोप्पी कणिक म्हणजे काय असा प्रश्न पडतो!

त्यांनी सोप्प्या कणकेची धिरडी असं नाही लिहिलं, त्यामुळे सोप्पी हे 'विशेषण' इथे धिरडी लाच लागू पडतं (बर्‍याच वर्षांनी परत शाळेत गेल्यासारखं वाटत आहे!).

अविनाशकुलकर्णी's picture

7 Dec 2010 - 12:10 am | अविनाशकुलकर्णी

जाळीदार कणकेची सोप्पी धिरडी ...

पुन्हा तेच? :-O कणिक जाळीदार असू शकत नाही. परत १दा नेटकेपणाचा अभाव ;-)

म्हणून कणकेची सोप्पी जाळीदार धिरडी :-)
किंवा
सोप्पी, कणकेची जाळीदार धिरडी

पुष्करिणी's picture

7 Dec 2010 - 12:17 am | पुष्करिणी

चांगली पाकॄ. पण हातानं धिरडं कसं पसरवायच ते माहित नाही. फोटो देता येइल का?

मी अशी पण करते:
गव्हाच्या पिठात ( किंवा जी असतील ती सगळी पिठं कशाही प्रमाणात एकत्र करून + मैदा + रवा) थोडंसं ताक आणि पाणी घालून डोश्याच्या पिठासारखं करा.
ज्या तव्यावर धिरडी करायची आहेत त्या तव्यावरच फोडणी करा ( मोहरी,जिरे, हळद, हिरव्या मिरच्या, लसूण, कांदे इ.) . फोडणी त्या भिजवलेल्या पिठांत, ही धिरडी पण छान लागता. पिठातच फोडणी असल्यानं तव्यावर तेल, बटर घालायची गरज नाही.

प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद.

पुष्करिणीताई,
फोटो देऊ शकत नाही. क्षमस्व. परंतु वर रेवती ताईंनी धिरडी कशी पसरवायची ते छान लिहिले आहे. आणि तुम्ही सांगितलेला फोडणीचा प्रकार करून पाहिन.

अन्या दातार's picture

7 Dec 2010 - 1:25 pm | अन्या दातार

लहानपणी आजीच्या हातची धिरडी अजुनही आठवतात. बाकी मि एकदा प्रयत्न केला होता तेंव्हा वाटीने धिरडे पसरले होते. मस्त जाळीदार झाले होते. बटर पेपरवर टाकून चव कितपत येइल याबाबत शंका वाटते.
शिवाय खुसखुशीतपणा/खमंगपणा सुद्धा येइल का नाही याबाबत शंकाच आहे मला.

पर्नल नेने मराठे's picture

7 Dec 2010 - 1:34 pm | पर्नल नेने मराठे

मला पोळ्या /फुलके करायचा भयंकर कंटाळा येतो. हे करुन पाहिन. टिफिन मधे पोळ्यांची रिप्लेसमेन्ट म्हणुन कसे वाटेल?

टिफिन मधे पोळ्यांची रिप्लेसमेन्ट म्हणुन नक्कीच छान वाटेल. पण ऑफिसमध्ये microwave असेल तर फारच छान. गार धिरडी फारशी छान लागत नाही.

आणि वेळेच्या (पदार्थ बनवण्यासाठी लागणारा वेळ) द्रुष्टीने ही पोळ्यांची रिप्लेसमेन्ट होउ शकत नाही. (पोळी+भाजी) ची रिप्लेसमेन्ट होउ शकते.
कारण पोळ्या २/३ खाल्ल्या तरी पोट भरते. पण ही धिरडी ५/६ आरामात खाल्ली जातात.

पर्नल नेने मराठे's picture

7 Dec 2010 - 1:52 pm | पर्नल नेने मराठे

माइक्रो आहे...मला वर्शानुवर्शे पोळ्या लाटुन कंटाला आलाय... :(