काही तरी आठवतंय ...

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
6 Dec 2010 - 1:02 am

आपला मेंदु किती विचित्र असतो नाही ? बरंच काही साठवलेलं असतं त्यात. पण बर्रंचसं चक्क विस्मृतीत गेलेलं असतं, अगदी धुळीने मख्ख मळलेल्या पि.एम.टी. बस सारखं. आणि कधीतरी १५ ऑगस्ट २६ जानेवारीला बस धुवावी आणि त्यावर लिहीलेली "स्वच्छ पुणे सुंदर पुणे" ची जाहिरात दिसावी तशा आपल्या स्मृती जाग्या होतात. काही गोष्टींचं आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. "अरेच्च्या, आपल्या आयुष्यात हे ही घडुन गेलं होतं ? " , "असे होतो आपण ? " , "काय बावळटपणा केला मी ? "

असंच काहीसं काल घडलं. आज नवी कंपनी जॉइन करायची म्हणुन काल जरा माझ्या फायलीवरची धुळ झटकली. काय काय डॉक्युमेंट्स लागणार म्हणुन सॉर्टींग करण्यासाठी फाईल चाळत होतो. आणि एकेक कागद पाहुन मला काय काय आठवत होतं.

एक सर्टीफिकेट होतं ऑरेंज बेल्ट चं. साल १९९५. मी कधीकाळी कराटे शिकलो होतो ? माझंच मला कौतुक वाटलं. तेंव्हा मी सहावीत होतो. अगदीच पाप्याचा पितर. तशी आमच्या गावात तालिम होती. तालीम म्हणजे संत सावतामाळ्याची एक मुर्ती, शेजारीच एक १० बाय १५ चा लाल मातीचा आखाडा. एक बेंच , २-३ बार्स , आणि ३-४ डंबबेल्स चे सेट्स. मित्रांबरोबर असाच हौस म्हणुन एका दिवशी गेलो. माझी ज्याच्याशी खुण्णस होती तो जगतापाचा बाळ्याही आमच्यात होता. मोठ्या पोरांना व्यायाम करताना पाहुन मी सुद्धा डंबेलं हातात घेतली, एका हाताने एक काही उचलला गेला नाही म्हणुन दोन हातांनी एकंच डंबेल उचलुन वाकडा तिकडा होऊन कवायत केली. लगेच बार वर आलो. बार काही उचलला गेला नाही. त्याच्या प्लेट्स काढताना त्या फरशीवर पडल्या, आधीच फुटलेल्या फरशीचा तुकडा निघाला, मग गुपचुप तो चिटकवला. आणि विना वजनाचे बार मारला. चार रिपीटेशन्स झाली नाही तो लगेच , आखाड्यात गेलो. बाळ्याने मुद्दाम माझ्या डोक्यात टपली मारली. तोच हौशीनं आणलेल्या लक्स आंड्रेड (हो आमची आंड्रेड चं होती) वर आखाड्यात उडी मारली. लाल मातीत लिंबु टाकलेले. कोंदलेल्या वातावरणात तो मातीचा लिंबाचा आणि घामाचा असा मिक्स्ड फ्लेवर आला होता, पण त्याची आम्हाला कसलीच फिकर नव्हती. बाळ्याबरोबर कुस्ती खेळताना त्याने मला फिरवुन त्याने जमिनीत दाबलं, मला श्वासही घेता येत नव्हता. दम लागला होता. नाकातोंडात माती गेली होती. आवाज फुटत नव्हता. शेवटी मी बाळ्या जोरात चावलो. त्यानं माझ्या हांड्रेड ला जोरात ओढलं आणि णको व्हायचं तेच झालं. बाकीचा "सिन" तर झालाच त्यात माझी आवडीची आंड्रेड फाटल्याचं दु:ख अधिक. मी रडायला सुरुवात केली तशी बाळ्यासगळ्या पोरांनी धुम्म ठोकली. कपडे घालुन घरी आलो.

"आंड्रेड" प्रकरणामुळं आईचे फटके खाल्लेच आणि तालमीत पुन्हा जायचा प्रसंगंच आला नाही. दुसर्‍या दिवशी हात-पाय हलवनं जड झालं होतं, चालताही येत नव्हतं पोरं खुप चिडवत होती. तेंव्हा मनात बाळ्याला एक दिवस लै रेमटायचा म्हणुन खुन्नस धरली. पण तो वयानं आणि अंगानं थोडा मोठा असल्यानं मी त्याला टरकुन होतो.

आमच्या गावात कराट्याचे क्लासेस सुरु झाले तेंव्हा मोठ्या उत्साहानं क्लासला अ‍ॅडमिशन घेतली. तब्बल ३०० रुपये देऊन मी कराटेचा ड्रेस विकत आणला. त्याबरोबर व्हाईट बेल्ट मिळाला होता. मी घरुनंच ड्रेस परिधान करुन ऐटित कराटे क्लासला मिरवत जात असे. आमचा "सर" जाम डेंजर होता. त्याची कराट्याची कौशल्य पहाताना माझ्या मुठी आपोआप आवळल्या जात. जगतापाच्या बाळ्याला मी असाच धुवुन काढणार म्हणुन मी मनोमन सुखावत असे. कराट्याचा "सर" आमच्याकडुन खुप मेहेनत करुन घ्यायचा.प्राथमिक फेरीत मुठि आवळुन डिप्स मारणे,क्रंचेस,स्टमक्स ,साईडसिटप्स आणि भरपुर रनिंग. ह्या राक्षसी प्रकार केल्यानंतर माझ्यात चालायची देखील शक्ती उरत नसे.त्यातही जर थकलो किंवा बाकीच्यांबरोबर रिपिटेशन करताना मागे पडलो की आमचा राक्षस सर पोटात खौन पंच हाणायचा की मला देव दिसायचे. बैलासारखी भुक लागत असे. हा सर अजुन मला फायटींग का शिकवत नाही ? मला त्याचा लै राग यायचा.
माझा पेशन्स संपत होता. मला माझ्यावर हसणार्‍या क्लासमेट्सना , आणि माझी "हांड्रेड" फाडणार्‍याला बाळ्याला फाडायचा होता. पहिला महिना भर केवळ अवघड व्यायाम करुन घेतल्यावर मला थोडा आशेचा किरण दिसला. आम्हाला पंच, किक्स आणि ब्लॉक्स शिकवायला सुरुवात केली. पंच मारताना "ह्यूऊऊऊउईईई " करतांना अंमळ मौज वाटत असे. ह्या आवाजामुळे पंचला अधिक पॉवर मिळते असे सर सांगायचा.आणि ह्या "ह्युंऊऊऊउईईई" मुळे पंचची प्रॅक्टिस करण्याला उत्साह मात्र येत असे. फेस पंच, चेस्ट पंच आणि स्टमक पंच ह्या १-२-३ च्या क्रमाने आणि नंतर ३-२-१ च्या क्रमाने अगदी कसुन सराव करत होतो. नंतर आम्हाला ब्लॉक्स शिकवले, सिमिलर टु पंच , ब्लॉक सुद्धा फेस ब्लॉक चेस्ट ब्लॉक आणि स्टमक ब्लॉक ची उजळणी जशी जशी होत होती तसा मी अधिक काँन्फिडेंट होत होतो. मधेच कधी चुक झाली की सर कधी बरोब्बर स्टमक मधे एक जोरदार पंच मारायचा तर कधी कानाला सन्नकन एक किक घासुन जायची. मला कराटेचं व्यसन लागलं होतं. मी घरी सुद्धा पंच आणि ब्लॉक्स ची प्रॅक्टिस करायचो. रिकाम्या वेळात ह्यूऊऊऊईईई ह्यूऊऊऊईईई करायचो. नंतर मुहासी किक, साईड किक आणि स्पिनिंग किक्स चे धडे गिरवायला सुरुवात झाली. मी कराटे वेडाने पछाढलो होतो.

मला पोरं हसायची. " कराटे काय कामाचा नसतो , आपली गावठी पावर मजी पावर आस्ती." म्हणुन मला डिसकरेज करायची. पण मी लक्ष दिलं नाही. मला समोर फक्त बाळ्याला मारायचाय , ही एकंच गोष्ट दिसत होती.

पंच, ब्लॉक्स आणि किक्स मधे बेसिक्स शिकल्यावर आमची "यल्लो बेल्ट"ची परिक्षा वाघोली गावात होती. तिथे आमच्या क्लास ची मुख्य अकासमी होती. व्हाईट टू ब्लॅक सगळ्या बेल्ट ची पोरं आम्हाला पहायला मिळणार म्हणुन मी उत्साहीत होतो. आमच्या गावात पहिलीच बॅच असल्यानं आम्ही सगळेच यलो बेल्ट साठी चाललो होतो. ही अगदीच प्रायमरी परिक्षा असली तरी आमच्या बॅचचे त्यातही ४ जण फेल झाले होते. आता मी व्हाईट बेल्टचा यलो बेल्ट झालो होतो. तो यलो बेल्ट आमच्या सर कडुन स्विकारताना मी ज्याम फुलुन गेलो होतो. आर्ध जग जिंकलो होतो जणु. आमच्या परिक्षे नंतर ऑरेज बेल्ट , रेड बेल्ट , ग्रीन बेल्ट , ब्राऊन बेल्ट , यलो ब्राऊन बेल्ट च्या परिक्षा बेल्ट च्या चढत्या क्रमाने झाल्या. मी अगदी मंत्रमुग्ध होऊन पहात होतो. त्यांच्या परिक्षांमधे वेगळ्यावेगळ्या प्रात्यक्षिकांचा समावेश तर होता. अजुन एक अनोखा प्रकार मी पाहिला तो म्हणजे कटास. कटास ह्या प्रकारात कराटे फायटर ला एका चौकोणात प्रिडिफाईन्ड मुव्हज परफेक्टली करुन दाखवायच्या असतात. प्रत्येक कटास ला नाव असतं. बेल्टची लेव्हल जशी वाढत जाते तसा कटास किचकट आणि अवघड होत जातो. क्लियर मुव्हज , वेळ , आणि बॅलंस इत्यादी गोष्टींवरुन कटास चे मार्क्स दिले जातात. त्यानंतर माझ्या आवडीचा प्रकार म्हणजे फाईट्स झाल्या. फाईट पहाताना माझ्यात इतका जोश चढला होता की मी अगदी नकळत समोरच्याला एक पंच लगावला(नंतर १० पंच खाल्ले हा भाग अलहिदा). सर्वांत शेवटी ब्लॅकबेल्ट्स साठीच्या सर्वांत अवघड परिक्षा झाल्या. त्यांन्ना फाईट्स,कटास शिवाय वेगवेगळी शस्त्र चालवण्याचीही प्रात्यक्षिकं सादर करायची होती.नंतर आमच्या सर लोकांनी हवेत उडी मारुन मडकी फोडणे , फोरआर्म्स ने फरशा, विटा , कौलं फोडणे इत्यादी फाईव्हस्टार आयटम पेश केले .त्या दिवशी मी खुप खुश होतो. मी आता लवकरंच बाळ्याच्या डोक्याची विट करणार होतो.

आता आमची ऑरेंज बेल्टसाठीची ट्रेणिंग सुरु झाली. सर आम्हाला फाईट्स चं एकेक तंत्र अगदी बारकाईनं समजुन सांगायचा. ह्यात त्याचा भर ब्लॉक टेक्निक सुधरवण्याबरोबर अटॅक कसा करावा ? ह्यावरही होता. मी मन लाऊन प्रॅक्टिस करत होतो. अ‍ॅब्ज,हात अगदी निबर झाले होते.सराचा पंच झेलण्याची क्षमता माझ्यात आली होती. आमची मॉक फायटिंग होत असे. फायटींग ची सुरुवात "बो" ने होते. बो म्हणजे वाकुन नमस्कार करणे. मुहासी किक मधे पायाचा तळवा समोरच्याच्या छातीवर असा पंच सारखा मारायचा असतो. ही किक जोरात मारायची नसते, तर जोरदार ताकद लाऊन समोरच्याला मागे ढकलुन मिसबॅलंस करण्यासाठी असते. साईड किक मधे डोक्यापासुन कमरेपर्यंत कोणत्या टेक्निक ने लाथ मारावी ? हे शिकवले गेले. तर सर्वांत अवघड स्पिनींग किक अशी वेगात मारायची असते.

फाईट्स शिकल्यावर आम्हाला पहिला कटास शिकवला गेला. त्या कटासचं नाव होतं "तायकीसिदा". कटास सुरु करण्याआधी कटासचं नाव आदराने घ्यायचं असतं , मग सर ला "बो" करायचा असतो. आणि मुव्हज सुरु करायच्या असतात. १२ स्टेप्सचा तो कटास होता. दिसायला सोप्पा दिसला तरी करताना अंमळ गल्लत होत असे आणि सर ची किक बसत असे. शेवटी एकदाचे आम्ही कटास आणि बेसिक फाईट्स मधे निपुण झालो. पुन्हा परिक्षा जवळ आल्या.

आम्ही ७ जण परिक्षेसाठी क्वालिफाय झालो होतो. माझा नंबर आला तेंव्हा मी फार घाबरलेलो होतो. मी "तायकीसिदा$$$$$$" म्हणुन कटास सादर करण्यास सुरुवात केली. बावरल्याने मी ३ स्टेप्स मिस केल्या आणि मार्क्स गमावले. ह्यावेळी बेल्ट हुकणार म्हणुन खात्री पटली. पंच आणि किक्स मधे काही चुक झाली नाही. शेवटच्या फाईट राऊंडला माझ्या समोर थोडासा थुलथुल्या पण माझ्या दिडपट पोरगा उभा होता. त्याला पाहुन माझी अंमळ फाटली होती. पण "बो" करुन फाईट स्टार्ट म्हणताच माझ्यात कुठुन शक्ती आली कुणास ठाऊक, मी एक मुहासी किक अगदी परफेक्टली त्याच्या छातीवर मारली आणि तो भुईसपाट झाला. माझी फाईट ९ सेकंदात संपली होती. मला ऑरेंज बेल्ट सह एक प्रशस्तीपत्रक भेटलं, मी त्यादिवशी उड्या मारत मारत घरी आलो. आईनंही पोतंभर कौतुक केलं.

मी वाट पहात असलेली संधी तशी आयतीच चालुन आली. क्रिकेट खेळतांना मी बाळ्याला रन आउट केला, तोच बाळ्या माझ्या नकळत माझ्या मागे बॅट घेउन पळत आला , आणि त्याने रप्पकन माझ्या पाठीत बॅट मारली. मी कळवळलो. मरणाचं उन होतं, मी बेशुद्ध पडलो तसं कोणी हापश्यावरुन पाणी आणुन माझ्यावर शिंपडलं ... बाळ्या मला शिव्या देत होता. मी तसाच उठलो आणि बाळ्याच्या तोंडावर एक जोरदार पंच लावला. बाळ्यानं तो पंच खाऊनही माझ्यावर बॅट उगारली पण ह्यावेळी मी ब्लॉक वापरला. आणि उलटा फिरुन एक किक मारली ती बरोब्बर बाळ्याच्या काखेकाली बरगडीत बसली. ह्यावेळी बाळ्या कळवळला. त्याच्या हातातली बॅट खाली पडली. तशी बाळ्याला दुसरी किक पोटात बसली, बाळ्या जमिनीवर आडवा पडला. मी त्याच्या तोंवावर मारणार तोच त्याचा डोळा टरटरुन फुगला.आणि बघता बघता काळानिळा झाला. आधीच लाल असणार्‍या बाळ्याचा एक डोळा उघडलाही जाणार नाही इतपत सुजला होता. मी आणि बाकी सगळी पोरं पळुन गेलो. मी गुपचुप घरी येऊन बसलो.

थोड्यावेळाने बाळ्याची भांडकुदळ आई बाळ्याला आमच्याघरी आली. आई बाहेर गेली.नंतर बाळ्याची आई अखंडपणे बोलत होती. थोड्यावेळानं आई घरात आली, आतुन कडी लावली आणि लाटण्याने माझी यथेच्छ धुलाई झाली. माझ्यातला व्हायलंस पाहुन माझे कराटेचे फॅड बंद करण्यात आलं. थोड्या दिवसांनी जास्त पोरं नसल्याने सराला क्लास बंद करावा लागला.

काल ते सर्टिफिकेट पाहुन मला माझे तायक्वांदो चे दिवस आठवले. अ‍ॅक्चुली अजुनही बरीच वेगवेगळी सर्टिफिकेट्स होती. आणि अजुन बरंच काही आठवलं , आणि मी ह्या लेखात बरंच काही लिहीणारंही होतो, पण हा एकंच किस्सा भरभर लिहीता लिहीता एवढा मोठा झाला की बाकी गोष्टी पुढच्या भागात (अर्थात जमल्यास)

- (कराटे फायटर) टार ली - दी ऑरेंज बेल्ट ओनर

मौजमजाप्रकटन

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

6 Dec 2010 - 1:13 am | शिल्पा ब

अय्या!!! माझ्याकडेसुद्धा एक ऑरेंज बेल्ट आहे...शोतोकानचा.
जुन्या वस्तू पहिल्या कि अशा गोष्टी आठवतात खऱ्या.

सुनील's picture

6 Dec 2010 - 1:13 am | सुनील

कथा आवडली! (रूपकात्मक नसावी हे अपेक्षा!!!)

हिंसक सॉरी सॉरी हिंसक नाही हिंसाविषयक पण आतून आलेले लेखन. पुलेशु.

यकु's picture

6 Dec 2010 - 1:39 am | यकु

:)

इंटरनेटस्नेही's picture

6 Dec 2010 - 3:24 am | इंटरनेटस्नेही

मस्त.. लिहिलयं टारुभाऊ... आवडला.. अंमंळ जुन्या आठवणी जाग्या झाल्या..

आपलं नशीबच साला एवढ बेकार की आपण कराटे क्लास लावला आणि अपेंडिक्सच्या ऑपरेशनसाठी आपल्याला कराटेला अखेरचा जय महाराष्ट्र करावा लागला.. :(

Pain's picture

6 Dec 2010 - 4:07 am | Pain

हाहाहा ! आवडला. भा. पो.

त्यातही जर थकलो किंवा बाकीच्यांबरोबर रिपिटेशन करताना मागे पडलो की आमचा राक्षस सर पोटात खौन पंच हाणायचा की मला देव दिसायचे.

आमचे सर स्ट्रेचिंगच्या वेळी कोणाचे हात-पाय पाहिजे तेवढे स्ट्रेच न झाल्यास पाठ जोरात दाबायचे किंवा हात मागे ओढायचे. अ‍ॅब्स केल्यावर पोटावर उभे राहायचे. (पोटावर पाय देणे हे अगदी शब्दश: अनुभवलेले आहे !)

नगरीनिरंजन's picture

6 Dec 2010 - 7:04 am | नगरीनिरंजन

लेख आवडला! त्रास देणार्‍या मुलाला धडा शिकवण्यासाठी कथानायकाने (टारझनने) केलेली मेहनत आणि त्याचा योग्य वेळी शास्त्रोक्त पद्धतीने केलेला वापर मनाला भिडला! चौथीत असताना ज्युदोच्या स्पर्धेत टारझनच्या प्रतिस्पर्ध्यासारखी झालेली अवस्था आठवून अंमळ वाईट वाटले, पण असो.

अवांतरः- आजकाल ब्लॉग टू मिपा आणि व्हाईस वर्सा डेटा ट्रान्स्फरची फ्याशन आहे असे दिसते.

अवांतरः- आजकाल ब्लॉग टू मिपा आणि व्हाईस वर्सा डेटा ट्रान्स्फरची फ्याशन आहे असे दिसते.

आमचे ९९% लेखण आधी मिपावर पडायचे मग चार दिवसांनी ब्लॉग वर. :) बाकी हम करे सो फ्याशन :)

प्रतिक्रिये बद्दल आभार !@!

अवांतर : तुम्हाला ह्या गोष्टीवरुन कोणीतरी लै बेक्कार चावलेला दिसतोय :)

नगरीनिरंजन's picture

6 Dec 2010 - 1:17 pm | नगरीनिरंजन

>>तुम्हाला ह्या गोष्टीवरुन कोणीतरी लै बेक्कार चावलेला दिसतोय
नाय हो. मिपावरच लिहीलं जातं सगळं त्यामुळे ब्लॉगकडे दुर्लक्ष होतं म्हणून आता असंच सुरु करावं या विचारात आहे.

टारझन's picture

6 Dec 2010 - 2:15 pm | टारझन

खुलाश्याबद्दल धन्यवाद.

- टार्‍या
चु*चा*चमुचा सदस्य आहे.

अरुण मनोहर's picture

6 Dec 2010 - 9:46 am | अरुण मनोहर

मिपावर पुरनागमना निमित्य स्वागत.
इतके दिवस न वाचलेली टारगेट शैली पुन्हा वाचायला मिळणार!

गवि's picture

6 Dec 2010 - 9:51 am | गवि

टारझन,

मला वाटतं प्रत्येकाच्या लाईफमधे / टीनएज मधे हा कराटे-कुंग फु-वू शू- तायक्वांदो किडा येऊन चावून जातो.

"कराटे काय कामाचा नसतो , कराटे आपली गावठी मेथडच खरी" हे शब्द अस्सेच्या अस्से ऐकलेत.

मी ही कुंग फु वगैरे शिकायला दोन तीन वर्षं जात होतो. फिटनेस आला होता हे खरं. आणि अशीच खुन्नस धरून कोणत्यातरी "बाळ्याला मारायचाय" हेही. आमचा बाळ्या वेगळा..इतकाच फरक !!

१९९५ मधे तू सहावीत होतास हे वाचून मला मात्र एकदम धक्कादायक जाणीव झाली की मी तर मागच्या पिढीतच गेलो की एकदम. १९९५ ला मी टी. वाय. ला होतो.

असो..खूप मजा आली आणि मला वाटतं आम्हाला सर्वांनाच तू आमच्या त्या दिवसांत पोहोचवलंस.

इथे मिपावर मध्यंतरी तू नसताना "रँचो"सारखं "बेहती हवा सा था वो..कहां गया उसे ढूंढो.." इतक्या तीव्रतेनं तुला मिस करताना इथल्या मित्रांना पाहिलं आणि आता वाचून खात्रीच झाली की तू सर्वांच्या इतका जवळ कसा ते.

राजेश घासकडवी's picture

6 Dec 2010 - 10:18 am | राजेश घासकडवी

परवाच ब्लॉगवरती हा लेख वाचला होता, पण पुन्हा वाचायला मजा आली. अगदी सहजसाध्या, ओघवत्या भाषेत लिहिलेलं आहे.

वाचून हम दोनो मधलं अजरामर भजन आठवल्यावाचून राहिलं नाही...

'निर्बल को बल देने वाले
बलवानो को दे दे ग्यान'

या जगातील बलवानांची आपली शक्ती दाखवण्यासाठी दुर्बळांना बुली करण्याची इच्छा/गरज संपो, व पंच किक करण्याची शक्ती व धैर्य दुर्बळांनाही मिळो ही सदीच्छा. देवावर माझा रूढ अर्थाने विश्वास नाही, पण ही इच्छा पूर्ण झाली तर बसेलही.

स्वानन्द's picture

6 Dec 2010 - 1:02 pm | स्वानन्द

सहमत

स्वाती दिनेश's picture

6 Dec 2010 - 12:44 pm | स्वाती दिनेश

टारु, ऑरेंजबेल्टच्या आठवणी आवडल्या.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2010 - 2:23 pm | परिकथेतील राजकुमार

टारबा, जबर्‍याच रे . आवडले एकदम.

अवलिया's picture

6 Dec 2010 - 2:32 pm | अवलिया

लेख छान. पण प्रयोजन कळाले नाही ;)

स्पंदना's picture

6 Dec 2010 - 3:56 pm | स्पंदना

च्य! मस्त लिहिलय! खरचा आपण जरा दुबळी दिसलो की मस्तवाल माणस अथवा पोर असाच त्रास द्यायला बघतात. बर झाल तुम्ही निदान एकदा तरी त्याला हिसका दाखवलात! आईचा मार काय हो , भाग्यवानांना मिळतो तो. नाही का?

सूर्यपुत्र's picture

6 Dec 2010 - 4:36 pm | सूर्यपुत्र

आयला... मला वाटले की तुमच्या गाडीचे नाव आहे, कारण मी ते "हंड्रेड" वाचले. म्हटले असेल "बजाज पल्सर ११५" सारखं... ;)

ज्याला टारझन आंड्रेड म्हणत आहे (जी टारझनची हरिणाच्या किंवा सिंव्हाबिंव्हाच्या कातड्याची पण असेल..) तिला आमच्या लहानपणी रत्नागिरी (सडा) एरियात "जाँग" म्हणायचे.

सूर्यपुत्र's picture

6 Dec 2010 - 5:06 pm | सूर्यपुत्र

गेंड्याच्या कातडीची पण असू शकते काय? ;)

संग्राम's picture

6 Dec 2010 - 4:57 pm | संग्राम

बर्‍याच दिवसांनी मिपा वर आलो आणि टारुशेठचा लेख वाचायला मिळाला .... अहो भाग्यम !!!

गगनविहारींनी म्हटल्याप्रमाणे ...
मला वाटतं प्रत्येकाच्या लाईफमधे / टीनएज मधे हा कराटे-कुंग फु-वू शू- तायक्वांदो किडा येऊन चावून जातो. ....
मलाही अगदी असचं म्हणायच आहे....

मी पण कराटे शिकायच म्हणून बाबांच्या मागे लागून कराटेचा ड्रेस विथ व्हाईट बेल्ट विकत आणला होता. २/३ महीने अगदी रेग्युलरली जात होतो .... पुढे मित्राला उभा करुन डोक्यावरून किक मारायची भारी होस ... एकदा असच करताना दोन्ही पाय हवेत उचलले जाउन मी मस्त आपटलो होतो .... त्यानंतर कराटे बंद :)

ह्यूऊऊऊईईई ह्यूऊऊऊईईई !!!!

प्रदीप's picture

6 Dec 2010 - 6:34 pm | प्रदीप

लेख. बाळ्याला अगदी निश्चयाने झोडून काढण्यासाठी केलेले प्रयत्न व शेवटी हाती आलेले यश, सगळे आवडले, तुमच्या लेखन शैलीसकट (नेहमीप्रमाणेच).

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Dec 2010 - 1:20 pm | बिपिन कार्यकर्ते

क्लास!

विजुभाऊ's picture

7 Dec 2010 - 1:31 pm | विजुभाऊ

क्लास!

सुरू करा

विजुभाऊ तुम्ही विविध शाळांमधे जाऊन कराटेचे क्लास घेता , त्यांना डोक्याने विटांचा भुगा कसा करावा यावर माग्लदर्शन करता असं ऐकुन आहे :) ते मास्तुरे पण तुमच्या संगतीला असतात म्हणे ? खरंय ?

दिपक's picture

7 Dec 2010 - 1:47 pm | दिपक

भारी आठवणी सांगितल्यात रे. मस्तच :-)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Dec 2010 - 1:11 am | निनाद मुक्काम प...

मस्तच
तू टायकांदोचे नाव काढले त्याहून आठवले .माझे काही सौथ कोरियन मित्र मैत्रिणी आहेत .एरवी आपल्या नेपाली बांधावासारखे दिसतात .पण एकदा आपला एक हरयाणाचा पिंड द पुत्तर त्याच्यातील एका मुलाला नडला .त्याने चार लाथा लागोपाठ हवेत उडवल्या .नि हा पुत्तर गारद म्हणजे बेशुध्द पडला .(माझी मैत्रीण म्हणली ती तर दोन लाथामध्ये हा कार्यभाग सिद्धीस नेऊ शकते .) मग काही दिवस हा क्रीडा प्रकार आत्मसात करण्याचा प्रयत्न केला .
आता ह्या लेखामुळे गतस्मृतींना उजाळा मिळला आहे .एक फिट नेस म्हणून परत एकदा ट्राय करायला काहीच हरकत नाही .
लेख काहीच्या काही जबरा
(बाळ्या काय करतो हल्ली ?)

उपास's picture

10 Dec 2010 - 6:32 am | उपास

मस्त लिहीलेय.. आम्ही नाना फडवणींसांच्या कॅटेगरितले.. समोरासमोर नाही पण मागून प्रचंड उगल्या ;)
असो, पण कधी खण आवरायला घेतला की तो आवरणं बाजूलाच पण प्रत्येक जुन्या गोष्टीवरुन हात फिरवताना भूतकाळात हरवल्याने शेवटी 'आवर तो पसारा' असा दट्टा मिळाल्याशिवाय राहात नाही..
तुझी ठेट लिहायची ष्टाईल झक्कासच रे.. पंखा!
बरं तो बाळ्या काय करतो हल्ली. . हे बुक्कलेलं आहे लक्षात त्याच्या? :)