साहित्य :
१ वाटी रवा
३/४ वाटी नारळाचे दूध
२ - ३ चमचे किसलेला गूळ
चिमूटभर वेलची पूड
चिमूटभर केशर दूधामधे भिजवून
चिमूटभर खाण्याचा सोडा
कृती :
एका भान्ड्यामधे नारळाचे दूध आणि गूळ एकत्र करून घ्या.गूळ दूधामधे पूर्ण विरघळून घ्या. मग त्यामधे रवा घालून मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण साधारण पणे अर्धा तास भिजवून ठेवा. अर्ध्या तासानी त्यामधे केशर , वेलची घालून मिश्रण एक्जीव करून घ्या. सगळ्यात शेवटी त्यामधे सोडा घाला.
मग कूकर च्या भान्ड्याला तूपाचा किन्वा लोण्याचा हात लावून घ्या. तयार मिश्रण भान्ड्यामधे ओतून कूकर मधे शिट्टी काढून १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या.
वड्या पाडून नारळाच्या किन्वा साध्या दूधाबरोबर खा.
प्रतिक्रिया
3 Dec 2010 - 8:50 am | चिंतामणी
पण एक सांग. "चिमूटभर केशर दूधामधे भिजवून" म्हणजे कोणत्या दूधात भिजवायचे? नारळाच्या की गाय/म्हशीच्या दुधात.
3 Dec 2010 - 9:44 am | अम्रुताविश्वेश
गाय/म्हशीच्या दूधात.
:)
3 Dec 2010 - 10:46 am | अब् क
फोटो???????????????????????????
बाकि मस्त!!!!!!!!!
3 Dec 2010 - 4:12 pm | मेघवेडा
मस्तच! एकदम टिपिकल कोकणी! फोटो दिसत नाहीये पण.. :(
अवांतर : आमच्या मातोश्री फणसाचं सांदण करतात ते ही असंच! सांदण हा प्रकारच झकास आहे!
3 Dec 2010 - 8:57 pm | प्राजु
मस्तच!!
धनंजय यांनीही २ वर्षापूर्वी ही सांदणाची पाकृ दिली होती.
3 Dec 2010 - 9:58 pm | सुनील
होम सिक व्हायला लावणारी पाकृ!
रवा नारळाच्या दुधात भिजवण्यापूर्वी किंचित भाजून घ्यावा. मग कुकरचीदेखिल गरज नाही कुठलेही (झाकण असलेले) सॉस पॅन पुरेल.
4 Dec 2010 - 5:57 pm | स्पंदना
खुप दिवस ऐकुन होते आज कृती समजली , धन्स अमृता!
5 Dec 2010 - 9:43 am | निवेदिता-ताई
या मध्ये आंब्याचा रस घालून पण सांदण बनवतात. कृती हीच..फक्त आंब्याचा रस वापरावा.