भुलेश्वर - एकदा जा नक्कीच...

५० फक्त's picture
५० फक्त in कलादालन
26 Nov 2010 - 7:56 am

भुलेश्वर बरेच दिवस मनांत होतं पण होत नव्हतं शेवटी जुलॅ महिन्यात एका रविवारी जमवलंच. मी,अश्विनी,आई व ह्रुषीकेश होके मिंटी मँ सवार, निघालो. वारजे ते यवत साधारण १ तास लागतो.
यवतच्या अलीकडे - पूण्याकडुन सोलापुर कडे जाताना, उजवीकडे एक कालव्याच्या बाजुने रस्ता आत जातो, तोच रस्ता भुलेश्वरकडे जातो. एकदा उजवीकडे वळलं की सतत एक टेलिफोन टॉवर दिसत राहतो. तोच आपल्याला गाठायचा असतो हे लक्षात ठेवा. खबरदारी या गोष्टीची घ्यावी लागते की, शेवटचा घाट हा फार अवघड आहे, फक्त एक म्हणजे एकच चार चाकी जाउ शकते.
आता मंदिरा बद्दल - हे एका टेकडीवर असलेल्या पठारावर आहे. बाहेरुन मंदिर मोठ्या वाड्यासारखे दिसते. उन्हातुन आत गेलात तर वाटेल की समोर मुर्ती पण नाही आणि सग़ळा अंधार आहे. या अंधाराला थोडे डोळे सरावले की डाव्या बाजुला पहा एक दिड फुटी या मापाच्या ४ पाय-या आहेत.
त्या चढुन वर गेलात की मग आधी लक्ष जातं ते या नंदीकडे. अतिशय रेखीव्,प्रमाणबद्ध खुप मोठा आहे.

आता डोळे या पुढच्या मंदिरच्या भव्यतेच्या तयारीत असतांत्,आणि ती अशी आहे. मी फार लिहित नाही या छायाचित्रांनाच बोलु देत.
हे नक्षीदार खांब

हे छत तोलुन धरणारे गंधर्व (बहुधा, जाणकारांनी खुलासा करावा)

ही पिंड, ह्या पिंडीच्या खाली पुन्हा पिंडी आहेत, तसेच या पिंडीला असणा-या छिद्रातुन भुंगे बाहेर येउन त्यांनी यवन सॅन्याला पळबुन लावल्याच्या कथा हे पुजारी सांगतीलच.

आणि हे मंदिरातल्या नक्षीकामाचे असंख्य नमुन्यांपॅकी काही..

ही स्त्री गणेशाची प्रतिमा आहे, आम्ही पहिल्यांदाच प्रत्यक्ष पाहिली.

आणि ही बहुधा स्त्री कार्तिकेयाची (जाणकारांनी खुलासा करावा)

संपुर्ण मंदिराची, म्हणजे गर्भग्रुहाची बाहेरची भिंत अशा नर्तकींच्या मुर्तींनी नटवलेली आहे.

हे शिल्प गंगावतर्णासारखं वाटलं मला (पुन्हा तेच जा.खु.क.)

या जाळ्या अखंड दगडात कोरलेल्या आहेत.

सुरुवातीला भेटलेल्या नंदीचे जवळुन घेतलेले छायाचित्र

काही खांबावर अशा नर्तकी आहेत.

मंदिरात काही मॅथुन शिल्पं ही असावीत्,त्यातली काही पुन्हा लावण्याचा प्रयत्न केलेला आहे.

हे मुळ मंदिर संपुर्ण दगडी आहे, तर बाहेर्च्या बाजुला पेशव्यांनी या मंदिराचा मातीच्या बांधकामांत जिर्णोद्धार केलेला आहे.
पाउस पडायला सुरुवात झाल्यानं त्याची छायाचित्रे काढता आली नाहीत.
आपणां सर्वांना नम्र विनंती आहे की, पुण्यात असाल तर ३-४ महिन्यांत एकदा आणि नाहीतर जंव्हा याल तेंव्हा भुलेश्वरला जरुर भेट द्या.
हर्षद

हे ठिकाण

प्रतिक्रिया

क्या बात हे.......

फारच सुंदर फोटू.......

नंदी बैल आणि स्त्री गणेश ...... अफलातून....

कधी जमलं तर नक्की जैन.....

शिल्पा ब's picture

26 Nov 2010 - 9:31 am | शिल्पा ब

सुंदर !!
दगडात कोरलेल्या मुर्त्या छानच .... पण नेहमीप्रमाणेच अर्धवट तोडलेल्या पाहून वाईट वाटले..."या " लोकांना फक्त उत्तम दर्जाची तोडफोडच माहिती :-( निर्माण काहीच नाही..

..."या " लोकांना फक्त उत्तम दर्जाची तोडफोडच माहिती निर्माण काहीच नाही..

१०० % सहमत.

जागु's picture

26 Nov 2010 - 11:00 am | जागु

नंदीबैल अगदी जिवंत वाटतोय.
शंकराचे दर्शन घडविल्याबद्दल धन्यवाद.

चिंतामणी's picture

26 Nov 2010 - 12:30 pm | चिंतामणी

जायला हवे आता.

पण एक सांग. वरती जायचा रस्ता कसा आहे? म्हणजे चांगला आहे की खराब आहे?
सोलापुर रोडकडुन येणारा रस्ता चांगला आहे की सासवड/जेजुरी कडुन येणारा रस्ता चांगला आहे?

५० फक्त's picture

26 Nov 2010 - 1:16 pm | ५० फक्त

सोलापुर रोड कडुन रस्ता चांगला आहे. या रोडवर दोन छोटे घाट आहेत. पहिला या डोंगराला वळसा घालणारा जो थोडा मोठा आहे, म्हणजे १२ फुट वगॅरे. नंतरचा जो घाट आहे,जो या डोंगरावर चढतो , तो मात्र अगदी छोटा आहे, खराब आहे आणि जर समोरुन एखादी चार चाकी आली तर खुपच पंचाईत होते.

तसेच मुख्य रस्त्यावरुन या डोंगराकडे जाणारा देखील फार मोठा नाही, समोरुन गाडी आल्यांस दोन्ही गाड्यांना अर्धे अर्धे रस्त्याच्या खाली उतरावे लागते.

दुस-या घाटाच्या आधी एक प्राथमिक आरोग्य केंद्राची की कसलीतरी इमारत आहे, तिच्या बाजुला गाडी पार्क करुन वर चढणे हा एक पर्यायआहे, पण काही अंतर चढल्यावर गाडी दिसत नाही, दिसते ती एकदम मंदिराजवळुनच.

पुढ्च्या महिन्यांत एका रविवारी सकाळी लवकर निघुन भुलेश्वर - सासवड- एकमुखी दत्त - बालाजी हे देवोबा आणि येताना शिवापुरला कॅलास गार्डन मध्ये भाकरी- पिठलं- कढी - भात हा पोटोबा असा फकड्ड बेत आहे.

कोणी येणार असल्यास स्वागत आहे.

हर्षद.

मेसेज करा .. नक्की येइन मी ..

फोटो छान आहेत ..

५० फक्त's picture

1 Dec 2010 - 3:11 pm | ५० फक्त

नक्की, जाण्याच्या आधी ३-४ दिवस तुम्हाला व्यनि करेन.

हर्षद.

५० फक्त's picture

26 Nov 2010 - 1:56 pm | ५० फक्त

या फोटोतील स्त्री गणेश, स्त्री शिव व स्त्री कार्तिकेय या बद्दल कोणि जाणकार काही अधिक माहिती देउ शकतील काय ?

हर्षद.

अमोल केळकर's picture

26 Nov 2010 - 2:10 pm | अमोल केळकर

सुंदर ......

अमोल

५० फक्त's picture

26 Nov 2010 - 2:16 pm | ५० फक्त

स्पा, जागु, शिल्पा, अमोल, चिंतामणी व बबलु, आपणां सर्वांना अतिशय धन्यवाद.

हर्षद.

दीपा माने's picture

27 Nov 2010 - 12:21 am | दीपा माने

फारच सुंदर!
मी गुगुल वरुन खालिल माहीती घेतलीय.
Bhuleshwar
( A Temple of Pandav Era )
Just about 50 Kms. from Pune. Bhuleshwar is a nice and cool place to visit. Bhuleshwar is famous for the temple of Lord Shiva. The temple situated on a hill, was built during the era of Pandavas.

Originally , it was a fort called as 'Mangalgadh'. The temple was built in 13th century. Here beautiful carvings dominate the walls from the beginning enhancing it's stone structure. Bhuleshwar has historical significance as it is the place where Devi Parvati danced for Lord Shiva and after they went to Kailas and get married. Thus this place is very important both historically and mythologically. Though this is place is having such importance, Bhuleshwar is one of the ignored places in Pune region. This is place is crowded in Shrawan and Mahashivratri only.
You can see Jejuri on south and Purandar on south-west and Dhavaleshwar on West.

Truly Bhuleshwar is a place worth to visit and spend a day.

Photo Gallery

Bhuleshwar Temple

Restaurant : Not Available
Lodging : Not Available
How to Go : Regular buses from Swargate and Pune Station ST Stand to Yawat and PMT Buses from Pune Station, Poolgate and Swargate to Theur.
Map : Click Here
Connecting Places : Theur

५० फक्त's picture

27 Nov 2010 - 4:16 pm | ५० फक्त

हर्षद.

छान फोटो...
भग्न शिल्प पाहिली की लयं त्रास व्हतो बघा... :(