साहित्य:- दोन जुड्या कोथिंबीर, एक वाटी खिसलेले सुक्के खोबरे, अर्धी वाटी पांढरे तिळ, गोडा मसाला दोन टे. स्पुन, मिठ , साखर दोन टे.स्पुन. चिच कोळ अर्धी वाटी,तळणीसाठी तेल.
पारीसाठी-- बेसन पिठ एक वाटी, कणीक अर्धी वाटी, तेलाचे मोहन कडकडीत एक डाव.अर्धा टे.स्पुन हळद,
मिठ एक टी. स्पुन.
कृती-- कोथिंबीर निवडून धुवुन ठेवावी, खिसलेले खोबरे भाजावे व नंतर कुस्करावे, तिळ भाजून अर्धवट कुटावेत, कोथिंबीर बारीक चिरावी, त्यात खोबरे, तिळ कुट, मसाला, मिठ, साखर हे सर्व एक्त्र करुन ठेवावे,
बेसन पिठ व कणीक एक्त्र करुन त्यात तेलाचे मोहन कडकडीत एक डाव घालुन घट्ट भिजवा. त्याची पारी लाटून त्यावर चिंचेचा कोळ सगळीकडे लावा, त्यावर सारण पसरा, हाताने सारण घट्ट थापा,
त्याची घट्ट सुरळी बनवा...
आता वड्या सुरीने कापुन घ्या,
मंद आचेवर तळा,
पुडाच्या वड्या(बाकर वड्या) तय्यार.
ह्या घ्या --
प्रतिक्रिया
9 Nov 2010 - 7:45 pm | रेवती
मस्त दिसताहेत.
वड्या कापून तळताना त्यातले सारण बाहेर येउन तेलात पसरत नाही का?
माझे एकदा असे झाले आणि या वड्यांचा उत्साह संपला.
आत्ता एक कल्पना सुचलिये कि अख्खा रोल तळायला घालायचा आणि अगदी गरम असताना सुरीने वड्या कापायच्या.
9 Nov 2010 - 8:29 pm | निवेदिता-ताई
अख्खा रोल तळायला घालायचा आणि अगदी गरम असताना सुरीने वड्या कापायच्या.
नाही तसे होत नाही..मी करुन पाहिले त्यासाठी सारण घट्ट लावायचे पारीवर म्हणजे तेलात पसरत नाही.
9 Nov 2010 - 8:33 pm | रेवती
अच्छा!
10 Nov 2010 - 1:30 am | रमणरमा
मी करते आक्खा रोल तळून... थोड्याशा गव्हाच्या पिठात पाणी घालून पेस्ट सारख करून घ्यायच. पोळी लाटून तिच्यावर मधोमध भरपूर सारण घालायच. नंतर पोळी च्या उजवी बाजू दुम्दय्चि. तिच्या कडेला पेस्ट लावायची. आता दुसरी बाजू त्या पेस्ट लावलेल्या भागावर ठेवायची. उरलेल्या दोन बाजू पण अशाच चिकटवायच्या. एन्व्लोप सारखे दिसते साधारण सर्व बाजू बंद केल्यावर. अशा वड्या पण छान होतात. सारण बाहेर पडून तेल खराब व्हायची पण भीती नाही....:)
10 Nov 2010 - 1:35 am | रमणरमा
फक्त त्या कापता येतील की नाही माहीत नाही... आम्ही तशाच खातो पूर्ण. टोमॅटो सॉस बरोबर अप्रतिम लागतात.. छोट्या छोट्या वड्या करायच्या असतील तर मला वाटत निवेदिता तैईंचीच पाकृू छान आहे :)
9 Nov 2010 - 8:43 pm | पैसा
खरं तर सगळं साहित्य घरात असतंच, पण आम्ही चितळ्यांच्या आणतो! आळशीपणा घालवायला हवा..
9 Nov 2010 - 10:41 pm | दिपाली पाटिल
पुडाच्या वड्या आणि बाकरवडी सारख्याच असतात कां?
10 Nov 2010 - 12:05 pm | परिकथेतील राजकुमार
हाच प्रश्न पडला आहे. माझ्यामते ह्या दोन्ही पाकृ वेगवेगळ्या आहेत.
कोणी जाणकार हाय काय ?
हि पाकृ तर बेष्टच वाटत आहे.
9 Nov 2010 - 10:51 pm | स्वाती दिनेश
मस्त दिसत आहेत वड्या...
स्वाती
10 Nov 2010 - 12:00 am | ज्योति प्रकाश
बघुन तोन्डाला पाणी सुटल्,माझा आवडता पदार्थ अर्थात कोणी तयार दिला तर पण आता करुन बघेन्.फोटु झकास.
10 Nov 2010 - 2:55 am | प्राजु
स्वाती राजेश ताईने हि याची पाकृ इथे दिली आहे.
या वड्याही मस्त दिसताहेत. :)
10 Nov 2010 - 7:37 am | स्पंदना
किती छान दिसताहेत.
माझ खुप आल असत या सारणात अन त्या चिम्चेच्या कोळाऐवजी आम्ही लसुण पेस्ट लावतो फार खमंग होतात. मी केल्यात या वर्षी पण .
10 Nov 2010 - 12:01 pm | विसोबा खेचर
लै भारी..
जियो..!
तात्या.
10 Nov 2010 - 12:14 pm | सहज
फोटो मधे शेव वाटू शकेल असे ते जरासे मोठे खिसलेले खोबरे आहे का?
यात शेव घातली तर कसे?
10 Nov 2010 - 1:07 pm | निवेदिता-ताई
जरासे मोठे खिसलेले खोबरेच आहे ते...
हो आणी क्षमा करा-- ह्या पुडाच्या वड्या आहेत,
बाकरवड्या नाहीत....चुकुन तसे लिहिले गेले.
10 Nov 2010 - 12:20 pm | जागु
रेसिपी मस्तच.
बाकरवडीत शेव पण घालतात.
10 Nov 2010 - 8:59 pm | स्वाती२
तोंडाला पाणी सुटले!
11 Nov 2010 - 8:17 am | शुचि
MMMMM ...... TASTY!!!! यम्मी!!!
11 Nov 2010 - 5:37 pm | खादाड
मस्त!!!