मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुडाच्या वड्या--

निवेदिता-ताई · · पाककृती
साहित्य:- दोन जुड्या कोथिंबीर, एक वाटी खिसलेले सुक्के खोबरे, अर्धी वाटी पांढरे तिळ, गोडा मसाला दोन टे. स्पुन, मिठ , साखर दोन टे.स्पुन. चिच कोळ अर्धी वाटी,तळणीसाठी तेल. पारीसाठी-- बेसन पिठ एक वाटी, कणीक अर्धी वाटी, तेलाचे मोहन कडकडीत एक डाव.अर्धा टे.स्पुन हळद, मिठ एक टी. स्पुन. कृती-- कोथिंबीर निवडून धुवुन ठेवावी, खिसलेले खोबरे भाजावे व नंतर कुस्करावे, तिळ भाजून अर्धवट कुटावेत, कोथिंबीर बारीक चिरावी, त्यात खोबरे, तिळ कुट, मसाला, मिठ, साखर हे सर्व एक्त्र करुन ठेवावे, Image removed.From बेसन पिठ व कणीक एक्त्र करुन त्यात तेलाचे मोहन कडकडीत एक डाव घालुन घट्ट भिजवा. त्याची पारी लाटून त्यावर चिंचेचा कोळ सगळीकडे लावा, त्यावर सारण पसरा, हाताने सारण घट्ट थापा, Image removed.From त्याची घट्ट सुरळी बनवा... Image removed.From आता वड्या सुरीने कापुन घ्या, Image removed.From मंद आचेवर तळा, Image removed.From पुडाच्या वड्या(बाकर वड्या) तय्यार. ह्या घ्या -- Image removed.From

वाचन 6374 प्रतिक्रिया 0