बर्याच दिवसांपासून मित्रांकडून काजु कतली या पदार्थाचे नाव ऐकत आहे.. मी तरी कधीही हा पदार्थ पाहिला नाही, खाण्याचे तर दूरच .. पण माझ्या मित्रांना हे समजल्यावर त्यांनी मला वेड्यात काढले. ते विश्वास ठेवायलाच तयार नाहीत कि मी काजु कतलीपासून ईतका अनभिज्ञ असेल. मलाही एकवेळ वाटले कि मला हा पदार्थ माहितीही असेल पण कदाचित वेगळ्या नावाने.. म्हणून मी मित्राला फोन करून काजु कतलीचे एक 'सुरेख' चित्र पाठवायला सांगितले.. पण त्या बहाद्दराने मला text message करुन चित्र पाठवले, ते साधारण असे होते : <> <> <> <>
पण यामुळे माझा संभ्रम अधिकच वाढला व शेवटी मिपाचे समृद्ध पाककलादालन आठवले. पण तिकडेही शोध घेता काहीच निष्पन्न झाले नाही. आता शेवटचा पर्याय म्हणून 'मिपाकरीणींना' शरण आलो आहे. तरी कुणीतरी पुढे येऊन काजु कतली या पदार्थाची सचित्र पाककृती येथे सादर मज पामरास ऊपकृत करावे विनंती !
(गुगलभाऊने कदाचित मदत केली असती, पण त्यात कुठे आलाय आपलेपणा ? म्हणून मिपाकरीणींनो मदत करा ! )
प्रतिक्रिया
2 Nov 2010 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
काय सांगताय काय ? मिपाच्या समृद्ध पाकृविभागात तुम्हाला काजु कतली सापडली नाही ?
घ्या हे घ्या :-
http://www.misalpav.com/node/15032
आणि शक्य झाल्यास संपादकांना सांगुन आता हा धागा उडवा :)
2 Nov 2010 - 12:27 pm | पंख
खूप खूप आभार..
संपादक मंडळाला विनंती आहे कि हा धागा आता व्यर्थ असल्याने ऊडविला तरी चालेल !
2 Nov 2010 - 8:08 pm | कौशी
चिरोते.. पाकातले आणि बिनपाकातले... रेसिपी ची मिपावर ची लिन्क असेल तर द्या...मला शोधता येत नाही.
धन्यवाद...........
2 Nov 2010 - 12:25 pm | चिरोटा
बनवण्याआधी कोठेतरी खावून पहा.
---
चिरोटा
2 Nov 2010 - 12:29 pm | पंख
चिरोटा, तुमचेही खूप आभार !
2 Nov 2010 - 1:14 pm | ५० फक्त
मला वाटलं की काजु कतली संपवायला मदत पाहिजे आणि पत्ता हुडकायला सुरुवात केली तुमचा.
परांनी वर मदत केलेलीच आहे, त्यामुळे रिपिट करीत नाही.
हर्षद
2 Nov 2010 - 1:14 pm | ५० फक्त
मला वाटलं की काजु कतली संपवायला मदत पाहिजे आणि पत्ता हुडकायला सुरुवात केली तुमचा.
परांनी वर मदत केलेलीच आहे, त्यामुळे रिपिट करीत नाही.
हर्षद
2 Nov 2010 - 2:55 pm | आशिष सुर्वे
मला वाटलं की काजु कतली संपवायला मदत पाहिजे आणि पत्ता हुडकायला सुरुवात केली तुमचा.
>>
अस्सेच म्हणतो राव.. च्यामारी आताच जेवून झाले होते.. तरी काजू-कतली साठी पाहिजे तेवढी जागा आहे हो ह्या उदरात!!
नसेल तर्र खड्डा करून घालू!!
3 Nov 2010 - 9:55 pm | चिगो
मलाही हेच वाटलं.. खायला आपण कधीही मदत करायला तयार असतो..
(खादाड) चिगो
2 Nov 2010 - 8:44 pm | निवेदिता-ताई
पंख-----------अरे मी इथेच दिलेली काजु कतलीची सोप्पी रेसिपी दिलि आहे ति पहा..न .
3 Nov 2010 - 10:39 am | पंख
बघितली निवेदिता ताई.. :)
2 Nov 2010 - 8:46 pm | निवेदिता-ताई
http://www.misalpav.com/node/15032
हे पहावे.