मुहब्बत में ताज छुटे...

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
30 Oct 2010 - 7:22 pm

देवानंदच्या "तेरे घर के सामने" ह्या चित्रपटात एक सुरेख गाणे आहे -

मुहब्बत में ताज बनें, ये भी तुम्हे याद होगा
मुहब्बत में ताज छुटे, ये भी तुम्हे याद होगा

अशा मुहब्बतीत बनलेल्या ताजबद्दल पुष्कळ काही लिहिले गेले आहे पण मुहब्बतीत सुटलेल्या, सोडाव्या लागलेल्या राजमुकुटाविषयी फारसे लिहिले गेलेले नाही.

मिपाकर रामदासांनी त्यांच्या प्रिन्सीच्या कथेत वॉलिस सिंप्सन ह्यांचा ओझरता उल्लेख केला आहे...

वॉलिस सिंप्सन ही अमेरिकन सौंदर्यवती.

तिचा पहिला नवरा होता एक अमेरिकन नौदल अधिकारी. लग्नानंतर अकरा वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. दुसर्‍या लग्नाच्या कालावधीतच तिचे तत्कालीन ब्रिटिश युवराज आठवे एडवर्ड ह्याच्याशी प्रेमसंबंध जुळू लागले.

पंचम जॉर्जच्या मृत्यूनंतर, त्याचे थोरले चिरंजीव आठवे एडवर्ड यांची ब्रिटनचे राजे म्हणून घोषणा करण्यात असली. तेव्हा एडवर्डशी लग्न करण्याच्या उद्देशाने वॉलिसने तिच्या दुसर्‍या नवर्‍याशी घटस्फोट घेतला.

एका दुहेरी घटस्फोटीत महिलेला, जिचे पूर्वीचे दोन्ही पती अद्याप जिवंत आहेत, ब्रिटिश जनता राणी म्हणून कदापी स्वीकारणार नाही, असे तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान बाल्डविन यांनी एडवर्ड यांना समजावून सांगितले. तरीही ह्या लग्नाबाबत एडवर्ड ठाम होते.

शेवटी बाल्डविन यांनी, मी ज्या जनतेचे प्रतिनिधित्व करतो, तीला न रुचणारा निर्णय राजेसाहेब बदलणार नसतील, तर त्यांनी माझा राजीनामा स्वीकारावा असे निक्षून सांगितले.

अखेर ११ डिसेंबर १९३६ रोजी, रेडियोवरून जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात एडवर्ड म्हणाले, "एका साम्राज्याचा राजा म्हणून ज्या जबाबदार्‍या मला पार पाडायच्या आहेत त्या जबाबदार्‍या माझ्या आवडत्या स्त्रीची साथ नसेल तर, पार पाडणे मला अशक्य आहे.....आणि म्हणून मी माझ्या राजेपदाचा त्याग करीत आहे"

त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू सहावे जॉर्ज राज्यावर आले. एडवर्ड आणि वॉलिस पॅरिस येथे स्थायिक झाले. १९७२ साली त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर वॉलिस जवळजवळ एकांतवासातच गेली. १९८६ साली तिचाही मृत्यू झाला आणि एक अजब प्रेमकहाणी संपुष्टात आली.

इतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

सहज's picture

30 Oct 2010 - 7:35 pm | सहज

रामदास यांच्या लेखातील सितादेवी यांना बडोद्याच्या राजाशी अशाच पद्धतीने लग्न करण्यावरुन वॅलीस ऑफ इस्ट असे संबोधले गेले होते.

१९५७ मधे एका पार्टी मधे ह्या दोघींची भेट झाली. वॉलीस यांच्या गळ्यातील हिर्‍याचा हार होता. त्यातील हिरा एकेकाळी सितादेवींच्या मालकीचा होता जो हॅरी विंस्टन या व्यापार्‍याकडून वॉलीस यांनी घेतला होता. तो हिरा पाहून सितादेवीं म्हणाल्या "ते हिरे माझ्या पायातच बरे दिसत होते " हा रिमार्क ऐकून डचेसनी हॅरी विंस्टन ला तो नेकलेस परत दिला. सितादेवींच्या पैंजणातले हिरे वापरून नेकलेस बनवला होता.

स्पंदना's picture

31 Oct 2010 - 10:20 pm | स्पंदना

सह्ही !

गर्भपात करण्याच्या एका प्रोसीजरमध्ये वॅलीस सिंम्प्सन यांना मातृत्वाचे हक्क कायमचे गमावायला लागले होते.

शिल्पा ब's picture

30 Oct 2010 - 9:50 pm | शिल्पा ब

अजब...दुर्दैवी

हम्म! लेखाचे शिर्षक वाचले आणि हिच प्रेमकहाणी आठवली!

विसोबा खेचर's picture

31 Oct 2010 - 8:43 pm | विसोबा खेचर

सलाम...!

कहाणी अन वरील दोन्ही प्रतिसाद सुरेख!