चिऊचं घर शेणाचं...

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जे न देखे रवी...
28 Oct 2010 - 3:17 pm

एक होता काऊ
एक होती चिऊ

काऊचं घर होतं मेणाचं
चिऊचं घर होतं शेणाचं

एकदा काय झालं,
जोराचा वारा आला
चिऊचं घर उडून गेलं

चिऊ आली काऊकडे
तिला वाटलं, तो आपलं ऐकून घेईल
त्याचं घर एवढं मोठं, त्यात जागा देईल

काऊदादा काऊदादा दार उघड
""नको, माझं घर लहान आहे''

काऊदादा काऊदादा दार उघड"
"नको, माझं घर खराब होईल''

काऊदादा काऊदादा दार उघड
""नको, माझे कपडे खराब होतील''

काऊदादा काऊदादा दार उघड
""नको, मला जायला उशीर होईल''

""असं काय रे करतोस? माझं घर वाहून गेलंय.
सगळे छळतील. टोचतील, त्रास देतील.
तू मला घरी घे; दाणे दे, पाणी दे.
जरा वेळाने बरी होईन. भुर्रकन उडून जाईन.''

""तुझं पटतंय गं चिऊताई, पण माझा इलाज नाही.
माझ्या मुलांना दाणे, पाणी घालायचंय.
त्यासाठी ऑफिसला जायचंय, काम करायचंय.
त्यापेक्षा तू असं कर. तूच दुसरं घर शोध!''

काऊनं मग तिला उचललं
पण चिऊ बसली होती हटून.
काऊच्या गाडीवर पाय रेटून!

ती जागेवरून हलेना
आपला हेका सोडेना

काऊनं जास्तच जोर केला
बिचारीचे पाय सोडवायला

चिऊ शेवटी दमली
भुर्रकन उडून गेली...
एका मैत्रीची कहाणी
अर्ध्यावरच संपली
---
(घरातून निघताना चिमणीचं एक पिल्लू माझ्या बाईकच्या हॅंडलवर बसलं होतं. उठता उठेना. त्याला उचलून बाजूला ठेवायला गेलो, तर घट्ट रोवलेले पाय सोडेना. त्याला कुणापासून तरी संरक्षण हवं असावं. मला काहीच करायचं सुचलं नाही. मी त्याला उचलून खाली ठेवायला गेलो, तर हात लावल्यावर भुर्रकन उडून गेलं. त्यावरून ही (कथित) कविता सुचली...)

करुणकविता

प्रतिक्रिया

सहज's picture

28 Oct 2010 - 3:24 pm | सहज

छान आहे.

धमाल मुलगा's picture

28 Oct 2010 - 3:27 pm | धमाल मुलगा

हा हा!
आधी काही समजेचना.. पण खाली कंसात दिलेलं 'पष्टीकरण' वाचून एकदम मस्त वाटलं. :)

मदनबाण's picture

28 Oct 2010 - 7:13 pm | मदनबाण

:)

गणेशा's picture

28 Oct 2010 - 7:14 pm | गणेशा

शेवट छान लिहिला आहे

धनंजय's picture

29 Oct 2010 - 12:47 am | धनंजय

छान

(मला वाटले श्री. युयुत्सु यांचा धागा वाचून हे काव्य स्फुरले की काय. चिमणीला कावळ्याकडून ठेवून घेतले जायचे आहे, कावळ्याला मात्र विवाहात गुरफटून राहायचे आहे.)

चित्रा's picture

29 Oct 2010 - 3:32 am | चित्रा

मला वाटले श्री. युयुत्सु यांचा धागा वाचून हे काव्य स्फुरले की काय.
:))

कविता आवडली.