बांड्या

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
27 Oct 2010 - 8:19 am

कुणी झुपके-दार, कुणाची लवलवती देखणी
कुणी केसांचे दोर, मिरविती झुलती केरसुणी
गर्वाने शेपूट उचलती रांपावर मखडुनी
सौष्ठवाचे करीती प्रदर्शन प्रेक्षकास पाहुनी

“शेवटची एन्ट्री येऊद्या” घोषणा ती ऐकुनी
घट्ट भुवरी खिळून राही श्वान पाय रुतवुनी
साखळी खेचित आणी मालक तरीही ओढूनी
हाय, दिले की चुचकारोनी रांपावर सोडुनी

जिथे सोडले तिथेच राही, मान जरा झुकवूनी
परी प्रयत्ने मध्यावरती आणिले परिक्षकांनी
पाहतसे बसलेल्या लोकां, धीर जरासा करुनी
दाद येतसे टाळीभरली, जमलेल्यांच्या कडूनी

क्षणात कळले आपण सुंदर, कडकडाट ऐकोनी
जरी टाकले अपुले शेपूट छाटून मालकानी
उगा चिडविती बाकी कुत्री, बांड्या संबोधुनी
पळत नाही मी त्यांच्या जैसा शेपूट घालोनी!

कविता

प्रतिक्रिया

चित्रा's picture

27 Oct 2010 - 8:39 am | चित्रा

कविता सुरेखच आहे. पण प्रतिमा जुनीच वाटली.

मिसळभोक्ता's picture

27 Oct 2010 - 11:22 pm | मिसळभोक्ता

मला ह्या कुत्र्यांच्या सौंदर्य स्पर्धांचा तिटकारा आहे.

रन्गराव's picture

27 Oct 2010 - 8:44 am | रन्गराव

कुठ अप्लाय करू आणि कुठं नको अस झालय कविता वाचून. एकदम परखड आणि धारदार तलवारीच्या पात्यासारखी! ;)

पाषाणभेद's picture

27 Oct 2010 - 8:57 am | पाषाणभेद

चित्रात्मक काव्य!