पार्लेरी पाटी

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
25 Oct 2010 - 12:22 am

पुणेकरानीच फक्त पाट्यांचा तोरा मिरवावा अशी मक्तेदारी उरलेली नाही.
पार्ल्यात काल एक पाटी पाहिली आणि मला पार्ल्याचा जाज्वल्य अभिमान वाटून ऊर भरून आला .
मल्टीपर्पज स्टेनलेस स्टील मोदकपात्र
बहुगुणी उपयोग : कडधान्ये बटाटे अळूवड्यांचे रोल पालेभाज्या व अंडी उकडण्यासाठी
तयारकेलेल्या अळुवड्या इडल्या कोथिंबीरवड्या ढोकळा पुलाव बिर्याणी गरम करण्यासाठी
फळे ठेवण्यासाठी डिशचा वापर व फुलांची परडी म्हणूनही उपयुक्त
संकष्टी अंगारकी चतुर्थी ला घरात आवर्जून उकडीचे मोदक मोदकपात्रात तेल न वापरताही लवकर
उकडविण्यासाठी .
हे पदार्थ ज्या गृहिणीना येतच नसतील त्यांच्यावरही एक सोल्यूशन म्हणजे सुंदर फुलदाणी म्हणूनही
घरात वापरता येईल

pati

वावरशुभेच्छा

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

25 Oct 2010 - 1:18 am | शिल्पा ब

:bigsmile: धमाल पाटी आहे..

स्वछंदी-पाखरु's picture

25 Oct 2010 - 1:36 am | स्वछंदी-पाखरु

अरे गणपती बाप्पा धाव रे बाबा नहितर हे असले लोक तुला संकष्टी ला अंड्याचे मोदक नैवेद्य म्हणुन दाखवतील...

त्याच्या आधीच तु तुझ्या उंदरावर स्वार हो आनि लवलकर निघ.......

मोदक??? ते ही उकडीचे???? वा....... द्याहो कोणी तरी...

आदिजोशी's picture

26 Oct 2010 - 11:09 am | आदिजोशी

खरे मोदक उकडीचेच असतात.

सविता००१'s picture

25 Oct 2010 - 10:15 am | सविता००१

स्वछ्न्दी-पाखरू यान्च्याशी पूर्णपणे सहमत.

चिंतामणी's picture

25 Oct 2010 - 10:25 am | चिंतामणी

पुणेकरानीच फक्त पाट्यांचा तोरा मिरवावा अशी मक्तेदारी उरलेली नाही.

आपले आभार. आतातरी पुणेकरांववरील हल्ले कमी होतील (सं. "फक्त पुणेकर" आणि तत्सम धागे) अशी आशा करतो.

नावातकायआहे's picture

25 Oct 2010 - 10:28 am | नावातकायआहे

>>सुंदर फुलदाणी
आयला फुल वाफवाय्ला ठेवायची का काय?

चिरोटा's picture

25 Oct 2010 - 10:32 am | चिरोटा

हनुमान रोड का विजुभाउ? अग्रवाल मार्केट तर नक्कीच नसणार.बहुदा राम मंदिर मार्ग?

विजुभाऊ's picture

25 Oct 2010 - 10:51 pm | विजुभाऊ

राम मंदीर मार्ग. लोकमान्य सेवा संघात वाचली ही पाटी.

लिखाळ's picture

26 Oct 2010 - 12:10 am | लिखाळ

सर्दी झाली असता वाफारा घेण्यासही उपयोग होऊ शकतो.

सर्दी खोकला झालेल्यांना सांगा याचा उपयोग

मिसळभोक्ता's picture

26 Oct 2010 - 1:57 am | मिसळभोक्ता

पार्ले (पूर्व) मुंबई ५७ आणि पुणे - ३० ह्यांच्यात मला पूर्वी फार साम्य वाटायचे. आता पूर्व पार्लेदेखील गुज्जूंनी भरले आहे.

शिल्पा ब's picture

26 Oct 2010 - 1:58 am | शिल्पा ब

म्हणजे गुज्जू सुद्धा भैय्यांसारखे सगळीकडे पसरले आहेत असे म्हणायचेय का?

ती पार्ल्यात भरणारी.... भयंकर ग्रेट इत्यादी म्हणली जाणारी फुसकुली ग्राहक पेठ ना...
तिथली आहे पाटी.
काल याची देही याची डोळा दर्शन घेतले आणि फिस्कन हसू आले ग्राहक पेठेचं एवढं कौतुक करणार्‍यांचं.

अवांतर: ग्राहक पेठ हे पार्ल्यात भरणारे बोरींग प्रदर्शन असून. त्यात फारसं काही नसतं.

नाखु's picture

26 Oct 2010 - 10:43 am | नाखु

पार्ल्यात पण पुण्याची नक्कल.... कारण ग्राहकपेठ पुण्यात आहे... विजुभाऊनां नम्र विनंती हा दुकानमालक (चालक) पुण्यातलाच (?) असा जावईशोध लावावा म्हणजे ...
सगळ्यांचे पुणे "प्रेम" ऊफाळून येईल....

पार्ल्यातली ग्राहक पेठ हे दुकान नाहीये. प्रदर्शन आहे.