फक्त पुणेकर

रन्गराव's picture
रन्गराव in जनातलं, मनातलं
24 Oct 2010 - 11:46 pm

शुक्रवारी एका मित्राला भेटलो. गडी चांगलाच वैतागला होता! त्याला विचारलं-" कावलायस का भावा? शनिवार, रवीवार बी हाफिस हाय काय?" मित्र -" अर एक मराठी पोरग आलय आमच्या कंपनीत." मी-" भावा चांगल हाय की मग!" मित्र-"घंटा! खुळ्या ल@#$च हाय ते." मी-" आयला, आल्या आल्या काय केल भावान?" मित्र - " त्याला ईचारल- तु बी मराठी काय , तर ते म्हणतय - नाही मी पुण्याचा आहे!" ऐकून हसून हसून पुरेवाट झाली. लिहायला एक विषय भेटला!
तसा मी पुन्यात फार कमी वेळ राहिलेलो आणि पून्यातल्या लोकांचा पून्याबाहेरच संपर्क आला. त्यामुळे इथ त्यांच्याबद्दलचे काही समज, गैरसमज आणि काही नसमजलेल्या गोष्टी लिहून त्यांची मजा करन्याचा एक प्रयत्न. जरा अतिशयोक्ती करतोय खरा. पण असो !

खरे पुणेकर कोन? - हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण उत्तर फार विवादस्पद आहे. सदाशिवपेठेला केंद्र मानून एक किलोमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा आणि त्रिज्या एक-एक किलोमीटरने वाढवून नवीन वर्तुळं काढत जा ( पुणे महानगर पालि़केची हद्द आली की थांबायच बघा. प्रत्येक वर्तुळाच्या सीमेवरील लोक तुम्हाला सांगतील-" आमच्या वर्तूळातले लोक खरे पूणेकर बाहेरचे लोक नंतर आलेले." आताचं माहीत नाही पण पूर्वीच्याकाळी शनिवार वाडा आणि सदाशिव पेठ ह्यातील अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त असणार, कारण पेशवे बाह्रेरून आले होते.

आणि इथ प्रसिद्ध काय तर- सुरेखा पुनेकर आणि बुधवार पेठ, म्हणजे तिथली पुस्तकां ची दुकानं [;)]! आजकाल हवा कशाची आहे तर पूनेरी पाट्यांची! म्हणजे एक तर समोर येवून भांडायचा दम नाही. वर एक पाटी चिकटून देवून निघून जायच. ह्द्द म्हणजे असल्या पाट्या ढ्कल-पत्रातून पाठवून आमच एकोळी वाङ्गमयास कीती मोठ योगदान आहे अस दाखवायचा प्रयत्न! आपल्या भित्रेपणाचं साहित्यीक गौरवीकरण करन्याचा कुटीलपणा ह्यांच्या़कडूनच शिकावा.

संस्कृती: पूणे हे मराठी संस्क्रुतीच माहेर घर मानल जात. तिथ होणारे काही कार्यक्रम बरेच नावाजलेले पन आहेत. पण हीच पूणेकर मंडळी जेंव्हा महाराष्ट्रा बाहेर राहण्यास जातात तेंव्हा चित्र पालटून जातं. बाहेरची जी काही मराठी मंडळ असतात, त्यातले सांस्क्रुतिक विभाग पूणेकरांकड आहेत बर्यापैकी. आणि ह्या लोकांना पुण्याम्ध्ये स्पर्धा खूप असल्यामूळे कलागूण दाखवन्याची संधी मिळत नसनार, म्हूणून एकदा महाराष्ट्रा बाहेर पडल की हे लोक संधी सोडत नाहीत. सगळी पूणेकर मंडळी रंगमंचावर आणि कार्यक्रम पण पूणे आणि संबधीत विषय हयांच्या अवती-भवतीच घुटमळतो. म्हणजे लोक कविता वाचनार ते पण संदीप खरेच्याच! आता ह्या माणसाला काही दणकेदार लिहिता येत नाही का वाचनारे त्याची वाट लावतात ते माहीत नाही. पण त्या कवितावाचन आणि तथाकथित संस्क्रुतिक कार्यक्रम पाहीले की महाराष्ट्रात कोणी मर्द उरला नाही की काय अशी शंका येते. मग मर्दुनकी सिद्ध करण्याची जबाबदारी कोल्हापूरकर आणि नागपूरकर ह्यांना भाषास्वातंत्र्य आणि गरज पडली तर दोन हात करून पूर्ण करावी लागते!

भाषा - अस्सल ( स ला किती स जोडावे लागतात ते माहीत नाही!) मराठी फक्त ह्यांचीच. ह्यांना शाळेत शिकवला जाणारा पहिला समानार्थी शब्द् म्हणजे -" सज्जन = शामळू" हाच असणार. कारण जरा कुठ आवाज करायचा असेल तर - सभ्य माणसानं ह्यात भाग घेवू नये अस म्हणून पळ काढन्यात हे लोक एक नंबर. कुठ वाद विवाद् हरायला लागले की ह्यांच ब्रह्मास्त्र - आवडती म्हण -" गाढवापूढे वाचली गीता.!" बघा म्हणजे कीती उद्धटपणा करायचो तो. ज्ञानेश्वर महाराजांनी पण एवढी हिंमत केली नव्हती. ते पण रेडा वगैरेच्या खाली गेले नव्हते. पण पूणेरी लोकांना आत्मविश्वास प्रचंड- चक्क डायरेक्ट गाढवासमोर गीता वाचन्याचा अट्टाहास. आणि बाहेरच कुणी जर काय बोललं तर ह्यांच लगेच -" शुद्ध मराठीत अस नसतं" हा रेमटा चालू. आज ज्ञानेश्वर महाराज इथ असते तर विचारल असतं- "पूणेरी मराठी देवे केली तर ईतर मराठी काय चोरे निर्मीली?"
बर ह्यांची वर्णनं पन एकदम पूचाट. कोण पूणेरी तरूण नील फीतीच वर्णन कस सांगेल ह्याचा नमुना -"तुम्हाला सांगतो अशी मज्जा आली. चित्रपटातली नगरवधू अशी होती की तिला पाहून चित्रपट ग्रुहातल्या सर्व सदगृहस्थांना अवघड्ल्या सारख झालं." असले न झेपणारे अवघड चित्रपट पाहाण्यास हे सदगृहस्थ का जातात देव जाणे. आणि अपशब्द कुठला तर -"शिंच्या." एकदा पूणेकरान एका नागपूरकरला ही शिवी दिल्यावर त्याला वाटल, बेट्याला सर्दी येवून शिंकतो आहे. त्याने आपुलकीन विचारल-" कुछ लेते क्यों नही? कोल्ड्रीन ली?" ईतर अपशब्दांचं फार सुतक ह्यांना! चार शिव्या हासडल्याकी, जेवायला जरी बसले असतील तरी उठून दुसर्या टेबलावर जावून बसतील. पूर्वीच्या काळी तर म्हणे असा शाब्दीक विटाळ झाला की गोमूत्रान कान धुवून काढत. पण गायी दुर्मीळ झाल्यान आजकाल पंचाईत झाली आहे.

धर्म आणि जात - पूण्यात धर्मभेद हा प्रकार नाही. आणि सगळ्यांची जात एकच कोकणस्थ बामन ( त्यालाच मानवता अस दुसर नाव आहे! देशस्थ का नाही हा खटला नंतर कधी तरी सोडवू). पूण्याबाहेर कुठही जा. मानसान एकदा तोंड उघडला की त्याचा धर्म, जात, भुगोल बर्यापैकी सांगता येतो. पण पुण्यातले इतर हिंदू सोडाच, मशिदीला मौला आणि चर्चमधला पाद्री पन दशग्रंथी बामनासारखेच बोलतात. ( बामन आणि ब्राम्हण हे वेगळे शब्द आहेत ह्याची नोंद घ्यावी. अशुद्ध लेखन झालं आहे असा गोड गैरसमज करून घेवू नका!)

वेषभूषा-
सणासुदीला कुर्ता किंवा शेरवानी असल काही घालून मराठीत गप्पा मारनारं टोळक दिसलकी हे पूणेकर म्हनून ओळखायच. म्रराठी लोक प्रत्येक सणाला दांडीया खेळातात असा लोकांचा समज झाला आहे आता!
आणि पूणेरी स्त्रियांची वेषभूषा हा लहानपनापासून आवडीचा विषय. त्याकाळी आमच्याकडं मुलींनी पंजाबी ड्रेस घालनही अति फॅशनेबल समजल जायचा. अशा काळात एका लग्न समारंभात एक पूणेरी काकू स्लिट स्कर्ट घालून आल्या होत्या. मी आपलेपणान त्यांना सांगितल-" काकू तुमचा फ्रॉक फाटला आहे. शेजारीच शिंप्याच दुकान आहे. जावून शिवून घेवून या!" ह्यावर तिथ उपस्थित महीला मंडळ असं काही हसल की आमच्या मातोश्रींनी पाठीत धप्पा घालून मला सुनावल-" खबरदार असल्या उचापत्या करशील तर पून्हा!" दुसर्यांची मदत केल्याने अस अडचणीत पडत माणूस ह्याची शिकवण मिळाली.
पूढ काही वर्षानी हाय्स्कूल मध्ये असताना एक कन्या तिच्या बाबांची बदली होवून आमच्या गावी आली. ती सर्रास जीन्स घालूल यायची. अशाच एके दिवशी " अरे आज तिचे बाबा गावाला गेले आहेत ना म्हणून" असा विनोद करून मित्र मंडळ खिदळत असताना बाईंनी एकल्यानं हातवर छड्यांचा पावूस पडला होता.
त्यानंतर पूढ काही दिवस पूण्यात राहण्याचा योग आला! मित्रांबरोबर एफ. सी रोड्ला गेलो. तिथली फॅशन बघून अजूनच गोंधळ. एक कन्या टाईट टी शर्ट घालून आली होती आणि त्यावर छातीवरच काही तरी बांधल होत. ह्या पूण्यातल्या पोरी आतलं बाहेर का घालतात असा एक निरागस प्रश्न मनात आला.
फॅशनचे अजून काही नमुन:-. डोक्यावर फकीरासारख काही तरी बांधायच. हे भले मोठले लांबलचक मोजे हातात घालायचे आणि डोळ्यावर बच्च्न गॉगल घालून गाडीवर बसायच. म्हणजे एक्दम घोड्याच्या ढापण्या लावलेल्या म्हशीवाणी! ह्यांना बिन बाह्याच्या अंगरख्याच काय इतक अप्रूप देव जाणे. अजून दहावीस रुपये जास्त दिले तर फुल बाह्याचा अंगरखा नाही का मिळणार आणि वर लांबलचक मोज्यांचा खर्च देखील वाचेल. ;) ह्या मूली दिवसेंदिवस जास्त चालू व्हायला लागल्या आहेत. इकड मराठी मंडळातील एक कन्या आल्या आल्या अध्यक्षाबरोबर फिरायला लागली. पूढ ती नवीन अध्यक्षा बरोबर दिसू लागली अस तीन वर्ष झाल. म्हणजे बघा आपण आनंदी बाईंना उगाच नावं ठेवतो. तिन तर फक्त राघोबाला पेशवा बनवण्याचा प्रयत्न केला होता. आणि ही तर जो पेशवा होईल तोच माझा राघोबा असं म्हणत होती ;)

योगदान- पूण्याबाहेर महाराष्ट्रात हल्ली जो काही ब्राम्हण द्वेष निर्माण झाला आहे, त्यात पूणेरी लोकांच मोठं योगदान आहे. हे लोक आपल्याकढं सुट्टीला कोणी पाहूणे येण्याआधी, उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व पाहुणे मंडळींकड रहायला जातात. तिथ काही ना काही किडा करून अस्सल मराठी भाषेत भाषणबाजी करून येतात. पुण्याबाहेर असल मराठी फक्त ब्राम्हणच बोलत असल्यामुळे, हे बेणं बामन हाय असा भोळ्या जनतेचा समज होतो.

असो- पूणे तिथे काय ऊणे ? - माणुसकी.

ह्यांची विनोदबुद्धी आता प्रतिक्रियांमध्ये दिसेलच!

अवांतर- अशुद्ध ले़खनाची आता काळजी नाही. ध चा मा अशा सुधाराणा करण्याचा सराव असल्यांमुळे सगळ ठीक होईल अगदी शीर्षकासकट :)

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

पुण्याचं व्यक्तीमत्व उठून दिसण्यासारखं आहेच्च्च त्यामुळेच अनादि काळापासून "पुणे आणि पुणेकर" या विषयावर अनेकांच्या प्रतिभेला धुमारे फुटत आले आहेत. म्हणतात ना - "Everybody pities the weak; jealousy you have to earn."

रन्गराव's picture

25 Oct 2010 - 12:11 am | रन्गराव

पण प्रतिक्रियेला अजून पूणेरी धार पूर्णपने आलेली नाही. पूने सोडून बरीच वर्षं झालेली दिसतात तुम्हाला!

खरय मी पुणेकर असले तरी अगदी जाज्वल्य वगैरे अभिमान नाहीये मला. तसा तो कशाचाच नाहीये. वेल स्वभाव आपला आपला.

अवांतर - कालच एक पुस्तक वाचत होते - तुम्हाला आयुष्यात काही मिळवण्यासाठी काही गोष्टींवर पाणी सोडावं लागतं म्हणजे उदाहरणार्थ अनुभव मिळतो पण तारुण्याची नव्हाळी आपण गमावतो वगैरे. तर काय सांगत होते काय गमावतो हे आपण स्वतःला कसे डिफाइन करतो यावर खूप अवलंबून असतं. म्हणजे - मी स्वतःला पुणेकर, अमुक जातीची, भारतीय, सालस , शिस्तप्रिय वगैरे विशेषणांनी माझ्याही नकळत डिफाइन करत असते . पुढे प्रत्येक वेळेला जेव्हा ते विशेषण आपल्याला काही कारणाने सोडून द्यावे लागते तेव्हा - इट इज अ पेन्फुल प्रोसेस. वगैरे त्या पुस्तकामधे मांडले होते.

मला पुणं खूप , अतिशय, फार आवडतं पण मी त्याच्या जाज्वल्य वगैरे अभिमानापासून डिटॅच्ड आहे.

चिंतामणी's picture

25 Oct 2010 - 12:21 am | चिंतामणी

शिळ्या कढीला उत आणताना कढी उतु गेली आणि जळल्याचा वास आणि धुर आला.

राजकारणी's picture

25 Oct 2010 - 12:54 am | राजकारणी

काहिहि म्हना पन जे कै लिवल हाय एकदम बराबर हाय..
कुनाला पटो न पटो....

जगात भारी
---------------------------------
चन्दा हो या पारो..
क्या फरक पडता यारो...

नाहीतर "आम्ही पुणेंकर काय मेलों होतों काय रे शिंच्या?" असे उद्गार ऐकायला मिळाले असते!
बाकी पुणेकर मराठी अणि रत्नागिरीची मराठी यात बरेच साम्य आहे असे वाटते, जाणकारांचे मत वाचायला आवडेल.

शिल्पा ब's picture

25 Oct 2010 - 1:29 am | शिल्पा ब

:bigsmile: अजुन अस्स्सल पुणेकरांच्या प्रतिक्रिया कशा आल्या नाहीत ?

योगी९००'s picture

25 Oct 2010 - 1:40 am | योगी९००

वाचून मजा आली..

इकड मराठी मंडळातील एक कन्या आल्या आल्या अध्यक्षाबरोबर फिरायला लागली. पूढ ती नवीन अध्यक्षा बरोबर दिसू लागली अस तीन वर्ष झाल. म्हणजे बघा आपण आनंदी बाईंना उगाच नावं ठेवतो. तिन तर फक्त राघोबाला पेशवा बनवण्याचा प्रयत्न केला होता. आणि ही तर जो पेशवा होईल तोच माझा राघोबा असं म्हणत होती
ही ही ही..

आमच्या वर्तूळातले लोक खरे पूणेकर बाहेरचे लोक नंतर आलेले
हॅ हॅ हॅ..

माझा काही सामान्य पुणेकरांबरोबर तितका काही पंगा नसला तरी मी काही सदाशिव पेठी लोकांचे चांगलेच अनुभव घेतले आहेत..म्हणून हा लेख आवडला..

इंटरनेटस्नेही's picture

25 Oct 2010 - 2:00 am | इंटरनेटस्नेही

निषेध.

सविस्तर पंचनामा लवकरच.

***जागा आरक्षित***

रेवती's picture

25 Oct 2010 - 3:40 am | रेवती

आजच्या दिवशी आपल्या सदस्यत्वाचा कालावधी आहे ४ अठवडे आणि ५ दिवस.
असले छप्पन्न लेख येउन गेले आता मजा नाही उरली राव! जरा ताजा विषय घ्या कि!
चांगले वैचारिक लेखन येउद्या! आजूबाजूच्या मराठी मंडळांमध्ये भाग घ्या आणि चित्र पालटून दाखवा.
हे असले लेख लिहून काय साध्य होणार. नाही आवडत जाऊ नाही ना त्या गावात!
जायचं, नोकर्‍या करायच्या, पैसे कमवायचे आणि खाल्ल्या ताटात रेघोट्या, मग संस्कारांच्या नावानं बोंबलायचं!

प्रियाली's picture

25 Oct 2010 - 4:57 am | प्रियाली

आजूबाजूच्या मराठी मंडळांमध्ये भाग घ्या आणि चित्र पालटून दाखवा.

अहो रेवतीताई हे महाकठिण काम बहुतेक अशक्यच. काय टाप आहे एखाद्या नव्या व्यक्तीची मराठी मंडळांचे चित्र पालटून दाखवण्याची? वरचा लेख टंकून इथे प्रकाशित करण्याइतकं सोपं नाही ते. ;)

सविता's picture

25 Oct 2010 - 6:40 pm | सविता

प्रियाली शी बाडिस

प्रतीसादांच्या हव्यासापोटी हा लेख लिहीण्याचे कुटील कारस्थान लक्षात आले आहे.
शिवाय... तुम्हीच म्हटल्याप्रमाणे हा लेख अतिशयोक्त स्वरूपाचा आहे. त्यामुळे मग त्याचा समाचार घेण्याचा प्रश्नच नाही.

चालू द्या तुमचं.

समीरसूर's picture

25 Oct 2010 - 10:26 am | समीरसूर

लेख छान गमतीदार आहे; पण आधीच नमूद केल्याप्रमाणे प्रमाणाबाहेर अतिशयोक्त आहे. :-)

>> सणासुदीला कुर्ता किंवा शेरवानी असल काही घालून मराठीत गप्पा मारनारं टोळक दिसलकी हे पूणेकर म्हनून ओळखायच.

यात वाईट काय ते समजले नाही. चांगलं शुद्ध मराठी बोलणे यात कमीपणा का वाटावा? नुसती शिवराळ भाषा वापरून उपद्रवमुल्य वाढवण्यापेक्षा हे जास्त चांगले. अकारण दंडेली करणे यात कुठली मर्दुमकी?

>> पण पुण्यातले इतर हिंदू सोडाच, मशिदीला मौला आणि चर्चमधला पाद्री पन दशग्रंथी बामनासारखेच बोलतात.

हेच तर खरे पुण्याचे वैशिष्ट्य आहे. हे असे एकमेव शहर आहे (किंबहुना होते) जिथे सगळ्या जाती-धर्माची माणसे गुण्यागोविंदाने एकत्र राहून अस्खलित मराठीत बोलायची. अगदी मारवाडी, माहेश्वरी, मुसलमान, पारशी, ख्रिश्चन, बोहरी इत्यादी सगळे लोकं घरीसुद्धा मराठीतच बोलायचे. ते पुण्याचं एक लोभस आणि इतर सगळ्या शहरांनी डोळे झाकून अनुकरण करावं अस रुपडं होतं. काळाच्या ओघात पुण्याचा चेहरा बदलला. बकालपणा वाढला, अकारण पुण्याचा चेहरा विद्रुप करण्याचा अट्टाहास वाढला. काही संघटनांनी पुण्यात बिनबुडाचे गोंधळ घालण्याचे सत्र सुरु केले. बाहेरून येणार्‍या लोकांना पुण्याचे हे आपापसातले हेव्यादाव्याचे वातावरण दिसले आणि आता परिणामस्वरूप पुण्यातही बर्‍याच ठिकाणी हिंदी बोलावे लागते. एकेकाळी टूमदार खेडी असलेले औंध, पिंपळे सौदागर, वाकड, पिंपळे निलख, बाणेर, पाषाण या सगळ्या भागांमध्ये आता सर्रास हिंदीची चलती आहे. ही महाराष्ट्रातल्या तमाम मराठी म्हणवून घेणार्‍या जनतेची हार आहे. छातीठोकपणे मराठी बोलून मराठीची शान वाढवणे म्हणजे भित्रेपणा आणि दंडेली करून दुसर्‍यांना त्रास देणे म्हणजे मर्दुमकी या व्याख्या झेपत नाहीत.

>> म्हणजे लोक कविता वाचनार ते पण संदीप खरेच्याच! आता ह्या माणसाला काही दणकेदार लिहिता येत नाही का वाचनारे त्याची वाट लावतात ते माहीत नाही. पण त्या कवितावाचन आणि तथाकथित संस्क्रुतिक कार्यक्रम पाहीले की महाराष्ट्रात कोणी मर्द उरला नाही की काय अशी शंका येते. मग मर्दुनकी सिद्ध करण्याची जबाबदारी कोल्हापूरकर आणि नागपूरकर ह्यांना भाषास्वातंत्र्य आणि गरज पडली तर दोन हात करून पूर्ण करावी लागते!

या विधानांचा अर्थ लागला नाही. संदीप खरेच दर्जेदार कवी आहे आणि म्हणून तरुण मराठी जनतेत लोकप्रिय आहे. त्याच्या कविता वाचल्या तर काय बिघडले? तसं पाहिलं तर तरुण मराठी रक्तात मराठी काव्याची, गाण्यांची आवड निर्माण करून त्यांना आपल्या कवितांच्या अस्सलपणाच्या जोरावर मराठी संस्कृतीच्या जवळ आणणारा कवी म्हणून संदीपचे नाव आदराने घेतले जाते. यात वावगे ते काय? "आता लोकं चित्रपट बघणार ते सलमान खानचेच" असं म्हणतो का आपण कधी? किंवा "आता लोकं मिठाई खाणार ती चितळ्यांचीच" किंवा "आता लोकं संत्री खाणार ती नागपूरचीच" या विधानाला काय अर्थ आहे? अर्थातच, लोकं जे दर्जेदार असते त्याच्या मागे जाणारच; यात दु:खी होण्यासारखे काय आहे? एक काळ होता (अजूनही आहे) की मराठी जनता सुरेश भटांच्या कवितांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.

आणि कुठल्या प्रकारची मर्दुमकी सिद्ध करण्याची जबाबदारी कोल्हापूरकर आणि नागपूरकर यांच्यावर आहे? कुणालाही जाऊन शिव्या द्यायच्या किंवा ठोसा हाणायचा ही मर्दुमकी? की शांतता राखण्यात भरीव मदत करायची ही मर्दुमकी? कुठली मर्दुमकी समाजाच्या हिताची आहे? भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रावर दारूच्या नशेत हल्ला करून जबर नुकसान करण्याची मर्दुमकी? की पुण्यातील लोकांनी जनमताच्या आग्रही आणि अहिंसक क्षोभासमोर नमते घेऊन रस्ते सुधारण्यास भाग पाडले ही मर्दुमकी?

आणि नागपूरकर आणि कोल्हापूरकर यांची देखील खास वैशिष्ट्ये आहेतच. जशी पुण्याची आहेत तशी नागपूरची आणि कोल्हापूरची देखील खास चांगली आणि वाखाणण्याजोगी वैशिष्ट्ये आहेतच. एखादे शहर जर शांत असेल, त्या शहरात सलोखा असेल, जातीय तेढ, धर्मांधता नसेल, मुंबईसारखे डान्सबार कल्चर नसेल, मराठी भाषेचे खासे अस्तित्व एखाद्या शहरात असेल, तिथला सामान्य माणूसदेखील सुंदर मराठी बोलू शकत असेल, विनाकारण कुणाला त्रास न देता आणि किरकोळ गोष्टींचा बाऊ न करता एकमेकांचा आदर राखत जर एखाद्या शहरातली माणसे राहत असतील, फक्त 'शिंच्या' अशा निरुपद्रवी आणि भावनेचा भडका न उडवणार्‍या शिवीने जर छोटे-छोटे प्रश्न सहजी सुटत असतील, आई-बहीणीचा उद्धार करणारर्‍या शिव्या देऊन भावना न दुखावू देण्याचा सभ्यपणा एखाद्या शहरातल्या लोकांमध्ये असेल....तर हे सगळे चांगले की वाईट?

माझ्यामते भारतातल्या सगळ्या शहरांनी या सद्गुणांचे ५०% जरी अनुकरण केले तरी भारताचे खूप हित साधले जाईल.

बाकी सगळे छान!

--समीर

सविता's picture

25 Oct 2010 - 6:43 pm | सविता

कशाला इतके लांब उत्तर देण्याचे कष्ट घेतलेत?

उगाच काड्या करून मजा बघण्यासाठी टाकलेला लेख आहे हा!!!

मृत्युन्जय's picture

25 Oct 2010 - 7:59 pm | मृत्युन्जय

छे ब्वॉ अजिबातच विनोदबुद्धी नाही तुमच्याकडे. पुणेकर असलेच सगळे.

त्या रन्गरावांनी कित्ती छान विनोदी लेखन केले आणि तुम्ही त्यातला असल्या काहीतरी पुचाट चुका शोधत राहिलात. आता अजुन कोणितरी पुणेकर येइल आणि रन्गरावांना फालतु माहिती पुरवेल की सदाशिव पेठ शनिवार पेठेनंतर वसविली गेली म्हणुन. करायचीय काय असली फुटकळ माहिती. "आताचं माहीत नाही पण पूर्वीच्याकाळी शनिवार वाडा आणि सदाशिव पेठ ह्यातील अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त असणार, कारण पेशवे बाह्रेरून आले होते. " हा छान विनोद तर तयार झाला ना त्यातुन?

आणि हो तो बामन शब्दाचा वापर करुन कित्ती सुंदर विनोद साधला गेला. रन्गरावांनी नंतर जाहीर पण करुन टाकले की त्यांना योग्य शब्द माहिती आहे.

आणि हा लेख किती माहितीपुर्ण आहे हे कळाले तरी का तुम्हाला? अहो महाराजा पुण्यात सुरेखा पुणेकर आणि बुधवार पेठ सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहेत. रन्गरावांनी एवढी महत्वपुर्ण माहिती दिली तुम्हाला माहिती तरी होते का?

आणि संदीप खरे दीडदमडीचा कवी आहे. "व्यर्थ हे सारेच टाहो" वाचले आहे का तुम्ही. अगदीच फुटकळ. तो कविता लिहितो, मुक्तक लिहितो, गझला लिहितो, कव्वाली लिहितो, बालगीते लिहितो, पोवाडे लिहितो म्हणुन काय खुप मोठा झाला का बे? सगळी पुणेरी साजुक तुपातली वाक्य लिहितो बे तो. अर्रे आमच्या नागपुरात येउन रहा म्हणाव. नागपुरी वडाभात खाउन थोडा झणझणीतपणा येउन राहिल ना लिखाणात भौ. हे .असलं मिळमिळीत लिखाण काय कामाचं . आई*व, *डेच्या, अश्या ५-१० शिव्या येउ द्यात कवितेत म्हणजे कविता कशी दमदार होते. मर्दानगीची साक्ष पटते. (शिव्या दिल्याशिवाया मर्दानगी सिद्ध होत नाही.) म्हणजे कविता कशी असायला हवी बघा:

व्यर्थ हे सारेच टाहो
हे भडव्यांनो तुमच्या सदैव ध्यानात राहो
हाथ पोलादी जयाचे
ही धरा दासी तयाची.

अशी एक शिवी प्रत्येक कडव्यात हवीच. जास्त असतील तर अजुन उत्तम. यात यमक, अनुप्रास याकडे दुर्लक्ष केले तरी चालेले. पण कविता मर्दानी हवी.

अजुन बरंच काहीकाही लिहायचं होतं. पण तुम्ही पुणेकर. त्यामुळे तुम्हाला विनोदबुद्धी नसणारच. त्यामुळे आवरते घेतो.

जाउदे नको एवढा त्रागा..येडे येतात आणि जातात.

रन्गराव's picture

25 Oct 2010 - 8:27 pm | रन्गराव

आपल्या सारखे हुशार लोकच अमरत्वाचा वरदान घेवून आले आहेत! ;)

रन्गराव's picture

25 Oct 2010 - 8:25 pm | रन्गराव

माहितीपूर्ण् प्रतिक्रिये बद्दल आभार! हो तशी विनोद बुद्धी थोडी कमीच आहे त्यांची. उद्धट पाट्या लावणे ह्या चांगूलपणाचा कळस आणि अपशब्द् म्हणजे असंस्कृतपणा. हा विनोद असेलच कसा नाही का?
आणि संदीप खरे बद्द्ल बोलायच असेल तर एकदा जे लिहिल आहे ते नीट वाचा. मग जे काय विनोद करायचे आहेत ते करा.

मृत्युन्जय's picture

25 Oct 2010 - 11:16 pm | मृत्युन्जय

मी कुठे विनोद केला ब्वॉ? तो मक्ता तर तुम्हीच घेतला आहे. पुणेकर लोकांना असाही विनोद कळत नाही.

बाकी संदीप खरे बद्दल काय लिवलेले वाचाया पायजं होते रन्गराव? ही अतिशयोक्ती आहे हे की हा विनोद आहे हे. बाकी तुमचे चालु द्या.

परिकथेतील राजकुमार's picture

25 Oct 2010 - 6:25 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदर !

लेखन आपल्या बुद्धीमत्तेची साक्ष पटवुन देणारे आहे.

( बामन आणि ब्राम्हण हे वेगळे शब्द आहेत ह्याची नोंद घ्यावी. अशुद्ध लेखन झालं आहे असा गोड गैरसमज करून घेवू नका!)

ह्या दोन शब्दांचा अर्थ समजुन घेण्यास अतिशय उत्सुक आहे :) आणि ते आपल्याला जमणार नसल्यास वरिल वाक्य त्वरेने लेखातुन हटवावे.

अवलिया's picture

25 Oct 2010 - 6:27 pm | अवलिया

सहमत आहे. मी पण विवेचन वाचण्यास उत्सुक आहे.

सद्दाम हुसैन's picture

25 Oct 2010 - 7:36 pm | सद्दाम हुसैन

उई उई उई ... ह्या रन्गरावाचा कोणत्या तरी पुणेकराने कार्पोरेट तमाशा केलेला दिसतोय =)) =)) =))
त्या पुणेकराचे तोंडभर कौतुक .. आणि रन्गरावाला बेस्ट ऑफ लक :)

Dhananjay Borgaonkar's picture

25 Oct 2010 - 7:44 pm | Dhananjay Borgaonkar

नाना, पराशी सहमत.
लेखकाने आपली बौद्धिक पातळी, विचार करण्याची कुवत दाखवल्या बद्दल धन्यवाद.

मृत्युन्जय's picture

25 Oct 2010 - 7:56 pm | मृत्युन्जय

छ्या काय रे परा तुझ्याकडे विनोदबुद्धीच नाही. पुणेकर ना तु. अर्रे विनोदाने म्हटले आहे तसे. आणि अतिशयोक्ती पण आहे त्याच्यात असे लेखकच नाही का म्हणाले. तरी नाही कळाले? पुणेकरांना विनोदबुद्धीच नाही ती कशी. आता यात विनोद काय म्हणुन विचारतोस? अं अं अं अं . मला सापडला की लगेच सांगतो हं. तेवढा वेळात लेखक महाशय सांगतीलच

प्रियाली's picture

25 Oct 2010 - 6:28 pm | प्रियाली

अकलेचे तारे तोडणे या वाक्प्रचाराचा सही सही उपयोग या लेखात केल्याबद्दल आभार. या वाक्प्रचाराचा उत्तम नमुना म्हणून या लेखाचा वापर केला जाईल.

धन्यवाद!

रन्गराव's picture

25 Oct 2010 - 7:51 pm | रन्गराव

लेख फारच मनावर घेतलेला दिसतोय. एकाच लेखावर चोवीस तासात दोन प्रतिक्रिया. इतका त्रास नका करून घेवूत! तसं लेखाच्या आधी "विडंबन", "विरंगुळा" असे बटबटीत शब्द आहेत की नाही सांगा बघू. तसच लेखात अतिशयोक्ती हा अतिशय शुद्ध शब्दही वापरला आहे. तरी का त्रास व्हावा बरे?
आपला सकाळचा प्रतिसाद वाचून आपण हुशार आहात हा गैरसमज झाला होता. पण दुसर्या प्रतिसादात आपण तोडलेले अकलेचे तारे पाहून तो दूर झाला. :) धन्यवाद

सद्दाम हुसैन's picture

25 Oct 2010 - 7:54 pm | सद्दाम हुसैन

उगी उगी रन्गुबाळा :)

प्रियाली's picture

25 Oct 2010 - 8:01 pm | प्रियाली

माझे दोन प्रतिसाद आपल्याला खटकावे? पेश्शल केस दिसता आपण.

उगी हं!

नावातकायआहे's picture

25 Oct 2010 - 7:50 pm | नावातकायआहे

ह्या लेखाला, लेखकाला आणि त्याच्या विचारांना फाट्यावर मारण्यात आले आहे.

मालोजीराव's picture

26 Oct 2010 - 1:03 am | मालोजीराव

फाट्यावर मारा पण चौफुल्याच्या ! कारण - सुरेखा पुणेकर

फाट्यावर मारा पण चौफुल्याच्या ! कारण - सुरेखा पुणेकर >>.

अरे रे !!

ही ईतकी पुणे-ज्ञान-दरिद्रता आपण कुठे शिकलात Mr.jagdaleomkar5?

असो आपल्या माहीती करता !!

विल्हेवाटी चौफुला आणी महाराष्ट्रीय तमाशाच्या संस्कृतीला गतवैभव प्राप्त करून देणार्‍या,मॉडर्नाईजेशन* आणणार्‍या,सुरेखा पुणेकरांचा काहीही संबध नाही !!

*= शब्द माहीत नसल्यास विकीपिडीयात पहावा हि नम्र विनंती

चौफुल्या चा चुकीचा अर्थ घेतलात !
' नटरंगी नार ',' रंग उधळू चला ','चौफुला',' सोळा हजारांत देखणी ' ....यातल्या चौफुल्या बद्दल बोलत होतो,
आणि याचा संबंध नक्कीच सुरेखा पुणेकरांशी आहे.

सुहास..'s picture

25 Oct 2010 - 7:47 pm | सुहास..

या लेखाचा ऊत्तरायणरूपी पंचनामा करण्याची खुप ईच्छा झाली होती पण नको, तुर्तास रणांगणरावांना ईनो घेण्याची शिफारस करत आहे.

अवांतर : बामन ब्राम्हण वा ईतरेतर जातीयवादी शब्दप्रयोगांविषयी मिपाची धोरणे काय आहेत.

रन्गराव's picture

25 Oct 2010 - 7:55 pm | रन्गराव

पावणं. जरा दमानं! "जातीयवादी शब्दप्रयोग" हे पूर्ण विचार न करता, निष्कर्श काढू नकात.

Dhananjay Borgaonkar's picture

25 Oct 2010 - 7:49 pm | Dhananjay Borgaonkar

कुठे "न" वापरायचा आणि कुठे "ण" याची थोडीदेखील अक्कल नसल्याने रावाला मौजे फाट्यावर मारण्यात आलं आहे.

सद्दाम हुसैन's picture

25 Oct 2010 - 7:53 pm | सद्दाम हुसैन

तुम्ही टारझन ला ओळखता काय हो ? त्यांना देखिल अशी अक्कल नव्हती का मग ? :) गॉड ब्लेस यु
बाकी एक पेक्षा जास्त प्रतिसाद देणे म्हणजे फाट्यावर मारणे नाही.

मला खुप वेळा फाट्यावर मारयची सवय आहे. तुम्हाला काही त्रास??

स्वाती दिनेश's picture

25 Oct 2010 - 8:33 pm | स्वाती दिनेश

पॉपकॉर्न घेऊन झाडावर चढलेली आहे.
बाकी चालू द्यात..
जाता जाता- प्रियाली, तू 'हुशार' असल्याचे सर्टिफिकिट वाचून 'प्रवीन भ्पकर' ची आठवण झाली.
स्वाती

ब्रिटिश टिंग्या's picture

25 Oct 2010 - 8:52 pm | ब्रिटिश टिंग्या

आंजावरील प्रस्थापितांच्या आयडिया चोप्यपस्ते करुन स्वत:चा टीआरपी वाढवण्याचा अजुन एक केविलवाणा प्रयत्न!

रंगराव, असेच लिहिते रहा! तशीही आजकाल फाट्यावर मारायला लागणार्‍या लेखांची संख्या रोडावतेय!

Raju S's picture

28 Oct 2010 - 3:26 pm | Raju S

रग्णराव ..... तुम्हि पुण्याला जास्त काळ न राहता पुण्या बद्दल मत देउच कसे शकता ?......
आधि स्वताहाचि भाशा सुधारा ..... पुण्याचि काळजि तुम्हि नका करु त्यासाथि आम्हि समर्थ आहोत ... पुण्यामधे प्रसिद्ध काय आहे हे बरे कळाले तुम्हाला ... म्हने बुधवार पेट .. आशे तुम्च्यासार्खे बाहेरुन येनारेच त्या गल्लित चकरा मारत अस्तात

शिल्पा ब's picture

29 Oct 2010 - 3:16 am | शिल्पा ब

शुद्ध पुणेरी भाषा वाचून मन आनंदित झाले..