कोजागिरी पौर्णिमा २०१०

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in जनातलं, मनातलं
22 Oct 2010 - 10:28 pm

आज शुक्रवार, आम्हा चाकरमान्यांची हक्काची सुट्टी, इकडची एमआयडिसी शु़क्रवारी बन्द असते.
त्यात आज सुट्तीच्या दिवशी कोजागिरी म्हणजे दुधात साखरच / गार्लिक ब्रेड विथ चिझ ;)
मी ठरवले होते कि आज काहितरी छान पदार्थ करायचा.
त्यात काल निवेदिता-टाईची काजुकतरीची पा़क्रु पाहिलि व ठरवलेच की करुन पहायचीच, सोपी पण वाटली.
एक मैत्रीण कायमची दुबई सोडुन गेली तेव्हा घरातले काजु तिने मला दिले हे लक्शात होतेच.
उगाच मी नाही बाइ विकतचे वैगरे आणुन करुन बघत.
३ तासापुर्वी नवरा कामानिमित्त बाहेर गेलाय सो मी ठरवले त्याला काजुकतरी करुन चकित करायचे.
कामाला लागले, निवेदिता-ताइने १ वाटी काजु घेतलेत मी ठरवले आपण २ वाटी घेउयात, उगाच छान झाली तर नंतर कमी नको पडायला. त्याप्रमाणे सगळे दुप्पट सामान घेउन काजु मिक्सरला बारिक केले, जरा जाडच पुड झाली पण मी दुर्लक्श केले. मी एवढी निगुतिने, निट्स संसार करणारी म्हणुन सान्गु कि काजु बारिक केले तेव्हाच मसाले दुधाची तयारी केली. मसाले दुधासाठी पण अजुन काजु, बदाम, पिस्ते बारिक करुन घेतले. आता गॅसपाशी उभी राहिले. पॅनमधे २ तारी पाक करायला घेतला. पाक झाला त्यात काजुपुड घातली. साय नव्हती सो ति नाहि वापरली. निवेदिता- ताईने म्हटल्याप्रमाणे एव्हाना काजुचा गोळा व्ह्यायला हवा होता. अरे बापरे, गोळा व्हायलाच तयार नाही :( मी घामाघुम झाले, टेन्शन आले. आता काजुपुड लाल व्हायला लागली होती, पण नो गोळा. अगो बाइ, आता आइला फोन लावु का? काय करु हे एवढे सगळे फुकट जायचे. आधी गॅस बन्द केला, धावत जाउन एक्सोस्त, चिमणी, एसी ऑन केले. मग थंड डोक्याने अजुन पाणी त्यात साखर घेउन वेगळा पाक तयार केला. पाक त्या काजुपुडीत घालुन परत गॅसवर ठेवले न एकदाचा गोळा होउ लागला. हुष्श्...
आता तो गोळा ताटात ओतला न मिश्रण पसरवले. मस्त सुरी घेतली व वड्या पाडायला घेतल्या. अहो, वड्या कसल्या पडतायत... सगळे सुरिला चि़कटत होते. मग म्हटले जरा गार होउ देत म्हणुन एसी मोठा केला. मधेच मिपावर डोकावुन गेले. झाल बाइ गार.... पाडल्या वड्या. जरा खडबडीतच झाल्या. एकिकडे मसाले दुध तयार केले. नैवेद्य दाखविला.
अहो पण चव सुरेख हो !!! बघा कि फोटो बघा.
kojagiri

समाजशुभेच्छा

प्रतिक्रिया

कुंदन's picture

22 Oct 2010 - 10:58 pm | कुंदन

मस्त च झालेल्या दिसतायत वड्या.

पैसा's picture

22 Oct 2010 - 11:07 pm | पैसा

तू एवढढे कष्ट घेतलेस म्हणजे व्हायलाच पायजेत ना!

वा!! चांगला प्रयत्न!
तुमचे लेखन वाचायला मलाच जरा जास्त वेळ लागतो कि सगळ्यांनाच नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो.

भारी गं चुचे..मगाशी व्यनीमधे तर फक्त मसाला दुध करणार म्हणालेलीस....

प्रीत-मोहर's picture

22 Oct 2010 - 11:32 pm | प्रीत-मोहर

चुचु सहीएस ग........ध्यान्राव काय म्हणले?

रन्गराव's picture

22 Oct 2010 - 11:49 pm | रन्गराव

वाचून तोंडाला पाणी सुटलं म्हनून धागा उघड्ला आणि अगागा, एवढ अवघड असतय ते वाचून तोंडाला फेस आला! लोक एवढ्या अवघड पाकक्रुति लिहून् का लो़कांना कामाला लावत्यात माहित नाय.

इथन पुढ पाककृती लिहीनारीन आपला पत्ता आणि फोन नंबर पाककृती सोबत नमूद करावा म्हंजी वाचून करणार्यांस त्रास नाही ;)

वड्या न दूध मस्तच दिसतय ग चुच्स

प्राजु's picture

23 Oct 2010 - 1:03 am | प्राजु

वेल्डन!! :)

अस्मी's picture

23 Oct 2010 - 10:07 am | अस्मी

मस्तच गं चुचे... :)

sneharani's picture

23 Oct 2010 - 10:26 am | sneharani

मस्त गं काजुकतली आपली आवडती!
एवढ्या कष्टाने केलेस म्हणजे चवीलापण चांगली झाली असणार.
थंड डोक्याने अजुन पाणी त्यात साखर घेउन वेगळा पाक तयार केला. पाक त्या काजुपुडीत घालुन परत गॅसवर ठेवले न एकदाचा गोळा होउ लागला. हुष्श्...

चल बाई एकदा का असेना डोकं वापरलसं.

अवलिया's picture

23 Oct 2010 - 11:20 am | अवलिया

मस्त !!

परिकथेतील राजकुमार's picture

23 Oct 2010 - 11:44 am | परिकथेतील राजकुमार

ध्यानकाकांना आवडल्या का नाही ?

अवलिया's picture

23 Oct 2010 - 11:45 am | अवलिया

हॅ हॅ हॅ

त्यांच्यासाठी नव्हत्याच त्या !

अधिक माहितीसाठी कुंद्याला व्यनी करणे

पर्नल नेने मराठे's picture

24 Oct 2010 - 10:45 am | पर्नल नेने मराठे

कुन्द्या न मी फोनवर बोलतो तर हा मनुश्य एवढा जळतो ....खरच कुन्द्या न मी भेटलो तर ह्याचे काय होइल?

शाहरुख's picture

25 Oct 2010 - 11:22 pm | शाहरुख

.

सुहास..'s picture

24 Oct 2010 - 10:54 am | सुहास..

शक्यच नाही !!

हा धागा,लिखाण आणी पाकृ चुचुचा असणे शक्यच नाही !!

चुचुचा आय-डी हॅक झाला आहे का ?

बाकी आताशी कुठं आवडाबाई शोभलीस ग !!

स्पंदना's picture

25 Oct 2010 - 6:42 pm | स्पंदना

बघा बघा !!

मी मिसळपाव वर नवी नवी नांदायला आले तेंव्हा या चु चु ला 'शिरा' कसा करायचा ते शिकवताना रेवती काकुंच्या म्हशी आठवल्या होत्या. अन आता ही लवकर काय उठते ! काजु कतली काय करते! खरच मुली किती भरा भर मोठ्या होतात ना हो रेवती काकु?

चुचे खर्र खर्र सांग, वड्या तू केल्यास का ध्यानाला करायला लावल्यास गं?

मदनबाण's picture

25 Oct 2010 - 7:45 pm | मदनबाण

चान चान... ;)