फूनके

कच्ची कैरी's picture
कच्ची कैरी in पाककृती
21 Oct 2010 - 11:28 pm

funfeसाहित्य-तुर डाळ १ वाटी
मूग डाळ ३/४ वाटी
मठ डाळ पाव वाटी
कोथींबिर जुडी १
कांदे २ मध्यम आकाराचे
आलं १ ईंच
लसुण ७-८ पाकळ्या
मीठ
मिरच्या ६-७
तेल तळण्यासाठी
क्रुती-
प्रथम तुर डाळ ,मूग डाळ, मठ डाळ पाण्यात ७-८ तास भिजत घालावे.
त्यानंतर डाळी उपसुन घेउन मिक्सरवर जाड्सर वाटुन घ्याव्यात .मिक्सरमध्ये घालत असतांनाच त्यात आलं लसुण्,मिरच्या
घालाव्यात व फिरवुन घ्यावे म्हनजे ते एकजीव होइल. नंतर तयार मिष्रणात कांदा बारिक चिरुन घालावा तसेच
कोथिंबिरीची अख्खी जुडी निवडुन ,बारिक चिरुन घालावी व मिष्रण एक्जीव करावे .त्यानंतर ईड्लीपात्रात पाणी गरम
करत ठेवावे व त्यातच हे तयार पीठ थोडे तेल लावुन टाकावे .१५ते २० मिनिट वाफवु द्यावे.थंड झाल्यावर कापुन गरम तेलात तळुन घ्यावे व कढी सोबत गरमागरम सर्व्ह करावे.
img src="http://lh3.ggpht.com/_qw1hyOKg_lw/TL8qQrfqhZE/AAAAAAAAABc/PK-ZqyqBCgA/s1..." width="350" height="350" alt="funke" />

प्रतिक्रिया

मितान's picture

21 Oct 2010 - 11:54 pm | मितान

मस्त मस्त मस्त मस्त !!!!
तोंडाला पाणी सुटले :)

शिल्पा ब's picture

21 Oct 2010 - 11:57 pm | शिल्पा ब

मस्त..

पैसा's picture

21 Oct 2010 - 11:59 pm | पैसा

पण मठ डाळ म्हणजे कसली डाळ?

चिंतामणी's picture

22 Oct 2010 - 12:00 am | चिंतामणी

मठ डाळ म्हण़जे कुठली डाळ?

बाकी "मिष्रण एक्जीव" ही मराठीला दिलेली नवी शब्द रचना भावली. :)

प्रियाली's picture

22 Oct 2010 - 12:01 am | प्रियाली

मठ डाळ म्हणजे काय आणि पोळ्या कच्च्या का दिसतात चित्रात?

बाकी पाककृती चांगली लागेल असे वाटते.

अनामिक's picture

22 Oct 2010 - 12:18 am | अनामिक

भाजायला विसरल्या असतील!

कच्ची कैरी's picture

22 Oct 2010 - 10:55 am | कच्ची कैरी

ते काल्ह्ने आहेत त्यांची पाकाक्रुती ह्याप्रमाणे आहे-
गव्हाची कणिक घेउन त्यात थोडे मीठ घालावे व मळुन घ्यावे .शक्य तितके बारिक लाटुन घ्यावे लाटलेल्या पोळीला तेल लावुन तिची फोटोत दाखवल्याप्रमाणे घडी करुन वाफवुन घ्यावे.

मठ डाळ म्हणजे कोणती दाळ?
आणि पिठ त्या पाण्यात सोडायचं की वर एखादं फडकं बांधून वाफवून घ्यायचं?

फुनके दिसताहेत मस्तं. करुन बघायला हरकत नाही.

कच्ची कैरी's picture

22 Oct 2010 - 11:00 am | कच्ची कैरी

पीठ पाण्यात नाही तर आपण ईड्ली करतो त्याच पात्रात घालायचे म्हणजे ते ईड्लीसारखे गोल होतील मग त्यांना मधुन कापुन तळुन घ्यावे

अनामिक's picture

22 Oct 2010 - 5:44 pm | अनामिक

वोक्के!
मस्तं आहेत फुनके! धन्यवाद कैरी.

पदार्थ छान आणि वेगळा आहे.
मठ डाळ म्हणजे मटकी स्प्लीट केलेली असते.
पोळ्याही वाफवलेल्या असाव्यात.
जे काही दिसतय ते भारीये!:)

फुनके / फुंदके हा खानदेशातला पदार्थ आहे ना? मी नुसतीच तूर दाळ घालुन करते. आणि वाफवायला ठेवताना तिळांत घोळते. तसंच, तळण्याऐवजी shallow fry करते.
फोटोमध्ये ताटात दुसरा पदार्थ काय आहे?

कौशी's picture

22 Oct 2010 - 3:42 am | कौशी

आमच्या कडे त्याला दशमी म्हणतात...
त्या पण वाफवून करतात

प्राजु's picture

22 Oct 2010 - 4:54 am | प्राजु

जे काही आहे ते इतकं तुफान दिसतंय!!! क्या कहने!! वा!

सहज's picture

22 Oct 2010 - 7:39 am | सहज

+१

अवलिया's picture

22 Oct 2010 - 6:48 pm | अवलिया

+२

प्रभो's picture

22 Oct 2010 - 7:01 pm | प्रभो

+३

मराठमोळा's picture

22 Oct 2010 - 7:59 am | मराठमोळा

समोर वाढलेल ताट पाहुनच भुक चाळवेल असा फोटु आहे. :)

मठाच्या डाळीची आमटी पण आवडते. :)

स्मिता_१३'s picture

22 Oct 2010 - 11:10 am | स्मिता_१३

असेच म्हणते

जागु's picture

22 Oct 2010 - 12:02 pm | जागु

वा छान आहे रेसिपी. एकदा मैत्रीणीने दिले होते हे फुंदके. कढीबरोबर सर्व करायचे म्हणजे कढीत टाकायचे का ?

कच्ची कैरी's picture

22 Oct 2010 - 1:45 pm | कच्ची कैरी

कढीत बुडवुन खायचे

विसोबा खेचर's picture

22 Oct 2010 - 12:32 pm | विसोबा खेचर

वा!

नेत्रेश's picture

22 Oct 2010 - 1:16 pm | नेत्रेश

कैरीताई,
कॄती जरा सविस्तर सांगाल का? पहील्या दोन वाक्यांनंतर माझा गोंधळ झाला आहे.

> नंतर तयार मिष्रणात कांदा बारिक चिरुन घालावा तसेच कोथिंबिरीची अख्खी जुडी निवडुन ,बारिक चिरुन घालावी व मिष्रण एक्जीव करावे.
- कांदा व कोथिंबीर एकजीव करायला मिष्रणाबरोबर मिक्सरलाच लावायचे काय? की हाताने मिसळायचे?

> त्यानंतर ईड्लीपात्रात पाणी गरम करत ठेवावे व त्यातच हे तयार पीठ थोडे तेल लावुन टाकावे.
- ईडलीपात्रातील पाण्यात हे पीठ विरघळुन त्याचे सांबार होत नाही काय? कि तेल लावल्यामुळे ते विरघळत नाही?

> १५ते २० मिनिट वाफवु द्यावे.थंड झाल्यावर कापुन गरम तेलात तळुन घ्यावे व कढी सोबत गरमागरम सर्व्ह करावे.
- १५ ते २० मिनीटांनि त्या मिष्रणाचा मोठा गोळा होतो काय? तो करंजीच्या आकाराचा कसा कापलात?

प्रत्येक स्टेपचे फोटो टाकलेत तर समजायला फार सोपे जाईल (गणपा स्टाईल).

कुकींग मध्ये कच्चालिंबु
नेत्रेश.

कच्ची कैरी's picture

22 Oct 2010 - 1:43 pm | कच्ची कैरी

कांदा व कोथिंबिर बारिक चिरुन घालायचे व हातानेच एकजीव करायचे
ईड्लीपत्रात ज्या भागात तुम्ही ईड्लीचे पीठ घालत असाल ना त्याएवजी फुनंक्यांचे पीठ टाकावे म्हणजे ते गोल होतील व कापल्यावर करंजीच्या आकाराचे होतील.

नेत्रेश's picture

23 Oct 2010 - 3:58 am | नेत्रेश

आता सगळी 'प्रोसिजर क्लियर' झाली.
धन्यवाद.

एकदम नवीन पदार्थ आहेत हे माझ्यासाठी.
वाफवलेली पोळी आणि वाफवुन तळलेले फुनके.. जबराच.

एक शंका : पोळी जर घडी घालुन वाफवली तर ती घडीत चिकटुन बसणार नाही का? की तेला मुळे सुट-सुटीत रहाते ?

कच्ची कैरी's picture

22 Oct 2010 - 1:37 pm | कच्ची कैरी

पोळीच्या प्रत्येक घडीला तेल लावावे म्हणजे ते चिकटनार नाहित

प्राजक्ता पवार's picture

22 Oct 2010 - 3:12 pm | प्राजक्ता पवार

मस्त . फुनके व काल्हे दोन नविन पाकृ मिळाल्या.

निवेदिता-ताई's picture

22 Oct 2010 - 11:39 pm | निवेदिता-ताई

मस्तच..............

दिपाली पाटिल's picture

22 Oct 2010 - 11:51 pm | दिपाली पाटिल

मस्त लागतात हे फुंडके आणि ही मी टाकलेली पाकृ

स्वाती२'s picture

24 Oct 2010 - 5:32 am | स्वाती२

मस्त!

शुभा...'खान्देशी मुलगी''s picture

25 Oct 2010 - 9:08 am | शुभा...'खान्देश...

काल्हे म्हनजे आमच्याकदे कानवले जे नाग पन्चमीला करतात....अनि सोबत गव्हाची खीर्...मस्तच्!!!अन फुनके तर्...मस्तच आहेत....