मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फूनके

कच्ची कैरी · · पाककृती
funfeसाहित्य-तुर डाळ १ वाटी मूग डाळ ३/४ वाटी मठ डाळ पाव वाटी कोथींबिर जुडी १ कांदे २ मध्यम आकाराचे आलं १ ईंच लसुण ७-८ पाकळ्या मीठ मिरच्या ६-७ तेल तळण्यासाठी क्रुती- प्रथम तुर डाळ ,मूग डाळ, मठ डाळ पाण्यात ७-८ तास भिजत घालावे. त्यानंतर डाळी उपसुन घेउन मिक्सरवर जाड्सर वाटुन घ्याव्यात .मिक्सरमध्ये घालत असतांनाच त्यात आलं लसुण्,मिरच्या घालाव्यात व फिरवुन घ्यावे म्हनजे ते एकजीव होइल. नंतर तयार मिष्रणात कांदा बारिक चिरुन घालावा तसेच कोथिंबिरीची अख्खी जुडी निवडुन ,बारिक चिरुन घालावी व मिष्रण एक्जीव करावे .त्यानंतर ईड्लीपात्रात पाणी गरम करत ठेवावे व त्यातच हे तयार पीठ थोडे तेल लावुन टाकावे .१५ते २० मिनिट वाफवु द्यावे.थंड झाल्यावर कापुन गरम तेलात तळुन घ्यावे व कढी सोबत गरमागरम सर्व्ह करावे. img src="http://lh3.ggpht.com/_qw1hyOKg_lw/TL8qQrfqhZE/AAAAAAAAABc/PK-ZqyqBCgA/s144-c/Funke.jpg" width="350" height="350" alt="funke" />

वाचने 8078 वाचनखूण प्रतिक्रिया 32

प्रियाली 22/10/2010 - 00:01
मठ डाळ म्हणजे काय आणि पोळ्या कच्च्या का दिसतात चित्रात? बाकी पाककृती चांगली लागेल असे वाटते.

In reply to by प्रियाली

कच्ची कैरी 22/10/2010 - 10:55
ते काल्ह्ने आहेत त्यांची पाकाक्रुती ह्याप्रमाणे आहे- गव्हाची कणिक घेउन त्यात थोडे मीठ घालावे व मळुन घ्यावे .शक्य तितके बारिक लाटुन घ्यावे लाटलेल्या पोळीला तेल लावुन तिची फोटोत दाखवल्याप्रमाणे घडी करुन वाफवुन घ्यावे.

अनामिक 22/10/2010 - 00:12
मठ डाळ म्हणजे कोणती दाळ? आणि पिठ त्या पाण्यात सोडायचं की वर एखादं फडकं बांधून वाफवून घ्यायचं? फुनके दिसताहेत मस्तं. करुन बघायला हरकत नाही.

In reply to by अनामिक

कच्ची कैरी 22/10/2010 - 11:00
पीठ पाण्यात नाही तर आपण ईड्ली करतो त्याच पात्रात घालायचे म्हणजे ते ईड्लीसारखे गोल होतील मग त्यांना मधुन कापुन तळुन घ्यावे

रुपी 22/10/2010 - 03:05
फुनके / फुंदके हा खानदेशातला पदार्थ आहे ना? मी नुसतीच तूर दाळ घालुन करते. आणि वाफवायला ठेवताना तिळांत घोळते. तसंच, तळण्याऐवजी shallow fry करते. फोटोमध्ये ताटात दुसरा पदार्थ काय आहे?

कौशी 22/10/2010 - 03:42
आमच्या कडे त्याला दशमी म्हणतात... त्या पण वाफवून करतात

नेत्रेश 22/10/2010 - 13:16
कैरीताई, कॄती जरा सविस्तर सांगाल का? पहील्या दोन वाक्यांनंतर माझा गोंधळ झाला आहे. > नंतर तयार मिष्रणात कांदा बारिक चिरुन घालावा तसेच कोथिंबिरीची अख्खी जुडी निवडुन ,बारिक चिरुन घालावी व मिष्रण एक्जीव करावे. - कांदा व कोथिंबीर एकजीव करायला मिष्रणाबरोबर मिक्सरलाच लावायचे काय? की हाताने मिसळायचे? > त्यानंतर ईड्लीपात्रात पाणी गरम करत ठेवावे व त्यातच हे तयार पीठ थोडे तेल लावुन टाकावे. - ईडलीपात्रातील पाण्यात हे पीठ विरघळुन त्याचे सांबार होत नाही काय? कि तेल लावल्यामुळे ते विरघळत नाही? > १५ते २० मिनिट वाफवु द्यावे.थंड झाल्यावर कापुन गरम तेलात तळुन घ्यावे व कढी सोबत गरमागरम सर्व्ह करावे. - १५ ते २० मिनीटांनि त्या मिष्रणाचा मोठा गोळा होतो काय? तो करंजीच्या आकाराचा कसा कापलात? प्रत्येक स्टेपचे फोटो टाकलेत तर समजायला फार सोपे जाईल (गणपा स्टाईल). कुकींग मध्ये कच्चालिंबु नेत्रेश.

In reply to by नेत्रेश

कच्ची कैरी 22/10/2010 - 13:43
कांदा व कोथिंबिर बारिक चिरुन घालायचे व हातानेच एकजीव करायचे ईड्लीपत्रात ज्या भागात तुम्ही ईड्लीचे पीठ घालत असाल ना त्याएवजी फुनंक्यांचे पीठ टाकावे म्हणजे ते गोल होतील व कापल्यावर करंजीच्या आकाराचे होतील.

गणपा 22/10/2010 - 13:14
एकदम नवीन पदार्थ आहेत हे माझ्यासाठी. वाफवलेली पोळी आणि वाफवुन तळलेले फुनके.. जबराच. एक शंका : पोळी जर घडी घालुन वाफवली तर ती घडीत चिकटुन बसणार नाही का? की तेला मुळे सुट-सुटीत रहाते ?