गिलक्याचे भरीत

मीरसिका's picture
मीरसिका in पाककृती
21 Oct 2010 - 12:51 pm

गिलक्याचे भरीत कसे करतात ते कोणी सांगू शकेल काय? वांग्याचे भरीत जसे करतात तसेच गिलक्याचे पण भरीत करतात काय?

प्रतिक्रिया

योग्य प्रतिसाद दिला असता पण माझंच भरित व्हायचे म्हणुन प्रदेनन

पर्नल नेने मराठे's picture

21 Oct 2010 - 1:01 pm | पर्नल नेने मराठे

गिलक्याची भजी खाल्लित लहानपणी ...भरित जसे वान्ग्याचे करतात तसेच करुन पहा ना ;)
पण गिलके भाजु नका उकडवा...करुन पहाच.

गिलके म्हणजे नक्की काय ?

सविता's picture

21 Oct 2010 - 1:24 pm | सविता

माझ्या माहितीप्रमाणे... त्याला घोसाळे...घोसावळे असेही म्हणतात.

अच्छा घोसाळे. मी लावलेल्या वेलीवर सध्या एकतरी रोज घोसाळे मिळते.
घोसाळ्याची भजी चांगली होते.
मी अजुन घोसाळ्याचे भरीत कधी केले नाही. कुणीतरी लवकर रेसिपी टाका.

नरेशकुमार's picture

21 Oct 2010 - 1:38 pm | नरेशकुमार

गिलके वांग्यात भरा.
वांग्याचा भरीत करा.
झालेल्या भरतातून वांगी वेगळे काढा.
उरलेले गीलाक्याचे भरीत
सोप्प्पाय. नंतर मला फोने करून खायला बोलावा. नंबर तुला माहितीये.

कृती :-
गिलकी अगदी बारीक चिरून घेणे...
शेंगदाणे भाजून थोडे जाडसर वाटून घेणे...
मग एका भांड्यात तेल टाकणे(तब्येतीनुसार )...
जिरे ची फोडणी देणे, त्यात कडीपत्ता , लसून आणि कांदा घालून छान परतणे , कांदा छान गुलाबी झाला कि मसाल्याचे जिन्नस घालून परतवणे....
मसाला तेलात छान भाजायला हवा..
मग त्यात गीलीकीचे बारीक केलेले तुकडे टाकून देणे.. आपल्या आवडीप्रमाणे मीठ आणि किंचित गुळ घालून परतवणे... शेवटी दाण्याचा कुट घालून मस्त पैकी वाफ येऊ देणे... झाल कि गिलक्याचा भरीत... !!!

माझी आई अश्या पद्धतीच साध आणि सोप भरीत करते आम्ही हे भरीत ज्वारीच्या भाकरी बरोबर खातो !!! ह्यापेक्षा काही वेगळी कृती असेल तर माहित नाही...
हि भाजी म्हणून पण खूप लोक्स करतात... पण आम्ही भरीत असाच करतो बुवा.... :-)

मनि२७'s picture

21 Oct 2010 - 1:46 pm | मनि२७

साहित्य :- १ पाव गिलकी (घोसावळे )
भाजलेले शेंगदाणे अर्धा वाटी (अर्धवट कुटून घ्यावे)
कडीपत्ता पाने
लहान कांदा,
लसून ४-५ पाकळ्या ठेचून.
जिरे, हळद, तिखट गरम मसाला , मीठ आणि थोडा गुळ( आपल्या आवडत्या प्रमाणात)

मनि२७'s picture

21 Oct 2010 - 1:47 pm | मनि२७

पहिले साहित्य वाचा मग कृती...
घाई गडबडीत हे अस होत... ;-)

हे बरं आहे. उद्या म्हणाला आधी खाउन घ्या मग स्वयंपाक करा !!

मनी मी अशी परवा भाजी केली होती. फक्त शेंगदाण्याच्या ऐवजी खोबर घातल होत.

मनि२७'s picture

21 Oct 2010 - 2:38 pm | मनि२७

@ जागू ताई,
खोबर्याचा कधी प्रयोग केला नाही ... पण तेही छान लागेल...
@ अवलिया काका,
चालायचच हो... निवांत व्हा नाही तर डोळे पाणावतील परत ;-)

कच्ची कैरी's picture

21 Oct 2010 - 2:40 pm | कच्ची कैरी

माहित अस्लेले भरित ह्याप्रमाणे-
साहित्य-गिलके मोठ्या आकाराचे २
कान्दा १
टोमॉटो-१
आलं-लसुण पेस्ट -१चमचा
मिरचिच ठेचा १-२चमचे
कोथिंबिर
तेल
जीरं,मोहरी,हलद ,हिंग
क्रुती-
एका भांड्यात पाणी गरम कर त ठेवावे त्यावर चाळ्णी ठेवावी व त्यावर गिलके वाफवुन घ्यावे.
वा फवलेल्या गिलक्यांन मॅश करुन घ्यावे .कढइत तेल गरम करवे त्यात जीर मोहोरि हिन्ग्ची फोड्णी द्यावी ,
बारिक चिरलेला कान्दा घालवा तसेच टोमॅटो घालावा व चान्गले परतुन घ्यावे नंतर त्यात आलं -लसुण पेस्ट घालावी
तसेच मिरचिचा ठेचा घालावा व परतुन घ्यावे व मॅश केलेले गिलके घालावित वएकजीव करुन घ्यावे चविनुसार मीठ घालावे
व कोथिंबीरिने सजवावे.

दोन्हि पाक्रु छान

दोन्हि पाक्रु छान

दीपा माने's picture

22 Oct 2010 - 12:03 am | दीपा माने

इथे अमेरिकेत झुकिनी म्हणून जी फळभाजी मिळते ती घोसाळ्या सारखीच चवीला लागते. इथे ती नुसतीच कापुन खातात किन्वा सालाडमधे नाहीतर नुसतीच वाफावुन साईड डीश म्हणून खातात. आणखीही क्रुती आहेत.

बेसनलाडू's picture

22 Oct 2010 - 2:12 am | बेसनलाडू

झुकिनी आणि घोसाळे (रिज गोअर्ड/लुफा) या दोन वेगळ्या गोष्टी (भाज्या?) आहेत. मात्र त्यांच्या रंगरूपात साम्य आहे, हे खरेच. चू.भू.द्या.घ्या.
(माहीतगार)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 10:29 am | पिवळा डांबिस

झुकिनी आणि घोसाळे (रिज गोअर्ड/लुफा) या दोन वेगळ्या गोष्टी (भाज्या?) आहेत.
सहमत!
झुकिनी कशी एकदम लॅटिन अमेरिकन डार्क पण सेक्सी वाटते...
पण घोसाळे?
हे एकदम (बेसनलाडूसारखं)डार्क पण देशी वाटतं.....
:)

मीरसिका,

आपण लाल भोपळ्याचे जसे भरीत करतो तसेच गिलक्याचेही करतात.

गिलके वाफवून किंवा उकडून घ्यावे. थोडेसे निवल्यावर कुसकरुन घ्यावे. त्यात दही , शेंगदाण्याचे कुट, मीठ, चवीला थोडी साख्रर घालावी. तुपाची किंवा तेलाची सुकी लाल मिरची, जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी. ही फोडणी कुसकरलेल्या गिलके-दह्याच्या मिश्रणात घालावी.. थोडी चिरलेली कोथिंबीर घालून ढवळून घ्यावे. झाले भरीत तयार.

आवडत असल्यास फोडणीत बारीक चिरलेली किंवा ठेचलेली लसूण घालावी. ह्यात शेंगदाण्याच्या कुटाऐवजी भिजवून जाडसर कुटलेली हरभरा डाळही घालतात.

प्रिया

प्राजु's picture

22 Oct 2010 - 4:45 am | प्राजु

घोसाळ्याचे भरीत होते ही माहिती आजच समजली.
वेगवेगळ्या पाककृतीही मिळाल्या...
धन्यवाद सर्वांना.. :)

मराठमोळा's picture

22 Oct 2010 - 4:57 am | मराठमोळा

>>घोसाळ्याचे भरीत होते ही माहिती आजच समजली

खरं आहे ग प्राजुतै, मला पण आजच समजलं.
पण आवडेल कि नाही शंका आहे.
वांग्याचं भरीत तांदळाच्या भाकरीबरोबर एकदम झकास लागते. आणि फार आवडते. :)

अजुनही न ऐकलेले प्रकार वाचायला मिळाले होते मध्यंतरी एका पुस्तकात.
जसे, चिकन/मटणाचे/वाळवलेल्या मास्यांचे लोणचे, पेरुची/काकडीची/कच्च्या केळाची भाजी, वांग्याची, कारल्याची, उकडलेल्या अंड्याची भजी. दुधात शिजवलेली चिकन बिर्याणी. हिरव्या मिरचीची शेंगदाण्याचा कुट घालुन केलेली भाजी (ही विदर्भात करतात),
अजुन आठवेल तसं..

चटोरी वैशू's picture

22 Oct 2010 - 2:29 pm | चटोरी वैशू

आवडली तर बघा...

गिलके कापुन घ्या... शेगडीवर कढई ठेवा ...१ टे. तेल टाका... कापलेली गिलके त्यात टाका... झाकुन ठेवा... गिलक्यांना थोडे पाणि सुटेल त्यानंतर झाकण काढुन टाका... तेवा पाणि जसे आटेल तस तसे गिलके मस्त वाफेत शिजेल... मग ते वाफवलेले गिलके... ठेचुन घ्या जसे वाग्यांना करतो.... त्यात हिरवी मिर्चिचा ठेचा घालुन मिक्स करा... मग कढईत थोडे तेल टाकुन जिरे तडतडू द्यावे थोडे शेंगदाणे घालावे.... गिलक्यांचे मिक्स घालवे...चवीनुसार मिठ घालावे... थोदि कोथिंबिर घालवे .. दणदणीत वाफ आणावी.... झाले गिलक्याचे भरीत तय्यार....

दिपाली पाटिल's picture

22 Oct 2010 - 9:44 pm | दिपाली पाटिल

ही अगदी अस्सल खानदेशी पाकृ आहे... अश्याने मस्त होते भरित.