राप्चिक र्राप्चिक कूल कूल

चन्द्रशेखर गोखले's picture
चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी...
16 Oct 2010 - 4:21 pm

लग्न झालेली
टंच बाई
जणू दुधात
ग्गच्च मलाई
माझ्या मनात
घालमेल होई

राप्चिक रप्चिक
कूल कूल...

असं कसं माझं
वय झालं
इतक्या लवकर
म्हातारपण आलं
सालं नुसतं
बघणंच नशिबी आलं

राप्चिक राप्चिक
कूल कूल..

डोळे विस्फारून
पहात होतो
भान हरवउन
गेलो होतो
जणू डोळ्याने
आग ओकत होतो

राप्चिक राप्चिक
कूल कूल....

इतक्यात मुलाच
लक्ष गेले
माझ्या डोळ्यातलं
अचूक ओळखले
" बाबा उन कडक आहे
तो गॉगल लावा"
पोर बोलले
माझ तोंड शरमेनं
खाली गेले
काही श्लोक
म्हणायचे
नाटक केले
गीतेचे श्लोक
उलटे म्हटले

मध: शाख
उर्ध्व मूल
राप्चिक राप्चिक
कूल कूल
मध:शाख
उर्ध्व मूल

राप्चिक राप्चिक
कूल कूल,,,,

हास्यकविता

प्रतिक्रिया

यशवंतकुलकर्णी's picture

16 Oct 2010 - 4:51 pm | यशवंतकुलकर्णी

र्राप्चिक र्राप्चिक कूल कूल !!!!!

प्वाराला बघायाची आयडीया माहित व्हती. त्यांनं तुमाला सांगितली नव्ह का! आवं बापापक्षा प्वारगं हुशार हाये तुमच्यावालं.

नगरीनिरंजन's picture

17 Oct 2010 - 8:10 pm | नगरीनिरंजन

मस्त!

मदनबाण's picture

17 Oct 2010 - 8:42 pm | मदनबाण

सो कूल... ;)

गणेशा's picture

18 Oct 2010 - 9:12 pm | गणेशा

कूल

ज्ञानेश...'s picture

19 Oct 2010 - 1:38 pm | ज्ञानेश...

ते 'मी माझा' वाले गोखले हेच का?
(ही चौकशीही आहे आणि प्रतिसादही.)

धनंजय's picture

20 Oct 2010 - 6:47 am | धनंजय

किंवा तेच हे असल्यास कवनातली सुधारणा देदीप्यमान आहे.

मराठमोळा's picture

20 Oct 2010 - 7:08 am | मराठमोळा

कविता वाचुन मला मनात लपलेला दु:शासन ची आठवण झाली. ;)

पोरंग लै हुशार आहे ब्वॉ. :)

ऋषिकेश's picture

20 Oct 2010 - 9:38 am | ऋषिकेश

हा हा.. मस्त कविता

बेसनलाडू's picture

28 Oct 2010 - 12:19 am | बेसनलाडू

कविता मजेशीर वाटली.
(वाचक)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

27 Oct 2010 - 12:07 pm | विसोबा खेचर

गोखलेसाहेब,

मस्त कविता.. :)

तात्या.

स्वछंदी-पाखरु's picture

27 Oct 2010 - 1:05 pm | स्वछंदी-पाखरु

आता ना ती म्हण आठवली....

"उमर पचपन की दील जवान का...."

क्या रापचा है...Boss ;)