प्रगती!!! नक्की कशासाठी?

मराठमोळा's picture
मराठमोळा in काथ्याकूट
14 Oct 2010 - 2:13 pm
गाभा: 

माणसाने प्रगती केली. आपला देश प्रगती करत आहे, जगाची फार प्रगती झाली आहे....
अनेक वाक्ये, अनेक लेख, वाद-विवाद, चर्चा, बातम्या, गप्पा बरंच काही. लहानपणापासुन बघतो, ऐकतो आहे, चालत आहे.
पण मग ही प्रगती म्हणजे काय? आणि का? याची उत्तरं शोधायचा प्रयत्न केला, कदाचित जमला नाही. ;)

बरं प्रगतीची व्यख्या करुयात..
माणसाला सुखी, समाधानी, ऐश्वर्य असेललं आयुष्य देऊ शकेल असे काहीतरी करण्याचा यशस्वी झालेला (?) प्रयत्न म्हणजे प्रगती असे म्हणुयात. मग भारत असो, पाकिस्तान , युरोप वा अमेरिका.

ही प्रगती माणसं बदलु शकली का? माझ्या मते नाही. कितीही सुख, समाधान, ऐश्वर्य लाभलं तरी माणसं माणसंच.
आमच्या आयटीत (हो तेच ते आयटीवाले) नेहमी नविन तंत्रज्ञान शिकुन स्वत:ला जगाच्या स्पर्धेत पुढे ठेवावे लागते, पण त्यात आयुष्य असेच कुठेतरी हरवुन जाते. प्रत्येक तंत्रज्ञान हे काहीतरी चांगलं आणि काहीतरी वाईट घेऊन येतं. उदा. प्लॅस्टीक आलं, दुष्परिणाम बघतोच आहोत. ईंटर्नेट आलं, दुष्परिणाम अतिशय वाईट पण आहेत.

पण निसर्गानेच दिलेल्या एका वरदानामुळे आपण त्यालाच दुर्लक्षित करुन पुन्हा त्याच चुका करीत आहोत?
अ‍ॅडॅप्टेबिलिटी.. आणि टेंडेंसी टु सर्वाईव.

कितीही प्रगती केली तरी पुन्हा नवे रोग, नवे वादळ हा निसर्ग उभा करतो. अहो साधी उदाहरणं घ्या.
आजकाल अ‍ॅरेंज्ड मॅरेज बघा, किती प्रॉब्लेम्स, किती क्लिष्ट.. कुंडली जमत नाही, मुलगी बँकेत आहे, मुलगा आय्टीत, डॉक्टर, दिशा वेगळी, ईच्छा वेगळ्या, कसं जमायचं?

नवे नवे रोग जन्माला येताहेत. नवे शत्रु जन्म घेत आहेत. आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे, अमेरीकेप्रमाणे भारतात पण मुलं आई-वडीलांबरोबर रहात नाहीत. सगळे आजकाल बेसीक्स बदलण्याच्या प्रयत्नत आहेत. इथे काही लोकं म्हणे माणुस ह समाजशील प्राणि नाहि हे सिद्ध करायसाठी वर्षभर बाहेर राहिले, एकटेच. त्याना वेड्याचा ईस्पितळात भरती करावे लागले,
आजतागयात वेडेच आहेत.

जेवण.. किती महत्वाचे असते. पण त्यात पण ह्या प्रगतीने झक मारली. आजकाल म्हणे क्रूत्रीम रित्या खाद्य उगवतो. का? तर भरपुर उत्पन्न मिळते, भरगोस उत्पादन होते. अरे वा. चालु द्या. इथे गायींना मांस खायला घातले जाते, जास्त दुध मिळते म्हणून. ईंजेक्शन्स मारली जातात.

साधं दही सुद्धा साधं राहिलं नाही आता. एखादं सफरचंद खायचं म्हंटल तरी भिती वाटेल असे काही प्रकार आहेत.

तुर्तास एवढेच अजुन लिहायची ईच्छा नाही.. खरं लिहिताना सुद्धा त्रास होतो, पुढच्या पिढीला काय देणार आहोत देव जाणे.
शब्द उरले नाहीत!!

प्रतिक्रिया

स्पा's picture

14 Oct 2010 - 2:18 pm | स्पा

खरय......................... :(

अमेरिकेत जाऊन हे असेच असते आणि तेच बरोबर आहे हे शिकला नाहीस... अरेरे !!

मराठमोळा's picture

14 Oct 2010 - 2:26 pm | मराठमोळा

नाना, यात अमेरिकेचा काय सम्बंध?
भारतात अंधानुकरण नाही काय?

भारतात अंधानुकरण अमेरिकेतल्या विचारांचे होते, हे विचार तिथुनच उगम पावले आहेत असे तुम्हाला वाटत नाही का? तिथे जावुन ह्या विचारांची भलामण करणार्‍या विचारवंतांशी आपली गाठभेट झाली नाही का? त्यांनी हे योग्यच आहे असे आपल्याला समजावुन दिले नाही का? कारण अनेक माझे परिचित तिकडे गेल्यावर या व्यवस्थेचे कट्टर समर्थक झाल्याचे माहित आहे.

मराठमोळा's picture

14 Oct 2010 - 2:46 pm | मराठमोळा

>>भारतात अंधानुकरण अमेरिकेतल्या विचारांचे होते,
सहमत!!

>>हे विचार तिथुनच उगम पावले आहेत असे तुम्हाला वाटत नाही का?
अगदी वाटते.
>> तिथे जावुन ह्या विचारांची भलामण करणार्‍या विचारवंतांशी आपली गाठभेट झाली नाही का?
नाही झाली. व्हावी अशी ईच्छा आहे.
>> त्यांनी हे योग्यच आहे असे आपल्याला समजावुन दिले नाही का?
कुणी असा भेटला असता तर मी माझ्या पद्धतीने समजावले असते.. असो..

>> कारण अनेक माझे परिचित तिकडे गेल्यावर या व्यवस्थेचे कट्टर समर्थक झाल्याचे माहित आहे.
बर मग? मी पण तसाच वागु का? त्यांचा आणि माझा काय संबंध?

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 2:41 pm | नगरीनिरंजन

माणसाने आपली नैसर्गिक शिकारी-संग्राहकाची जीवनपद्धती सोडून शेती करायला सुरुवात केली, उतरंडीचा समाज बनवला आणि नागरीकरणाची सुरुवात झाली तीच पहिली चूक झाली. त्यानंतरच्या सगळ्या चुका अपरिहार्य होत्या. खोटं लपवण्यासाठी जसं वारंवार खोटं बोलावं लागतं तसंच ती पहिली चूक चूक नाही हे गृहीतक सिद्ध करण्यासाठी नव्या नव्या चुका कराव्याच लागतात.
तंत्रज्ञान माणसाचे प्रश्न सोडवू शकतं हे आणखी एक गृहीतक. खरं पाहिलं तर जे प्रश्न सोडवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान मिळवलं जातं ते प्रश्न जुन्या तंत्रज्ञानाने निर्माण केलेले आहेत.
पाश्चात्य भोगवादी संस्कृती हीच योग्य आहे हे मानून त्या अनुषंगाने प्रत्येक माणसाचं पैसे मिळवणारं यंत्र बनणे ही केवळ पुढची तार्किक पायरी आहे. अधिकाधिक पैसा मिळवणे आणि त्यासाठी अधिकाधिक उत्पादन करुन ते खपवण्यासाठी अधिकाधिक गरजा निर्माण करणे यालाच प्रगती म्हटले जाते. स्वतःच्या भोगासाठी सकल सृष्टीचे शोषण करणे म्हणजेच आधुनिकता.
हे सगळं थांबवणे आवश्यक आहे पण त्यासाठी जो उपाय आहे त्याचा स्वीकार या आधुनिकतेच्या भयंकर मार्केटिंगच्या गदारोळात करण्याचा बौद्धिक कणखरपणा किती लोकांकडे आहे? आहे त्या इमारती तोडून तिथे जंगल निर्माण करण्याची आवश्यकता असताना उलट अधिकाधिक गतीने जंगलं साफ करून इमारती बांधल्या जात आहेत.
अशा परिस्थितीत हा आक्रोश मात्र अरण्यरुदन ठरणार.

याच्याशी पूर्णपणे असहमत (अपवाद झाडे आणि बौद्धिक कणखरपणा).

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 2:59 pm | नगरीनिरंजन

असहमती अपेक्षितच आहे. झाडांच्या बाबतीत सहमती दाखवणे हाही केवळ एक उपचारच झाला. सध्याच्या व्यवस्थेत झाडांची संख्या वाढणे कसे शक्य आहे हे मला कळत नाही. इथे ज्यावर एवढी मोठी लोकसंख्या अवलंबून आहे ती शेतजमीनच कमी पडतेय तिथे नुसत्या झाडांना कोण जागा ठेवणार?

Pain's picture

15 Oct 2010 - 8:28 am | Pain

माणसाने आपली नैसर्गिक शिकारी-संग्राहकाची जीवनपद्धती सोडून शेती करायला सुरुवात केली, उतरंडीचा समाज बनवला आणि नागरीकरणाची सुरुवात झाली तीच पहिली चूक झाली......

झाडांच्या बाबतीत सहमती दाखवणे हाही केवळ एक उपचारच झाला

उपचार नाही, जे खरे/योग्य, त्याला पाठिंबा आणि जे खोटे/ चुकीचे, त्याला विरोध असे माझे धोरण आहे. तुमच्या प्रतिसादात दिलेली सर्व उदाहरणे चूक आहेत. उदाहरणादाखल एकाची चिरफाड करून दाखवत आहे. अशी त्या दोन गोष्टी वगळता प्रत्येक गोष्टीची करता येईल.
तुम्ही कधी शेती केली आहे का ? मी केली आहे. एकदा ट्रेकला जाउन रस्ता चुकला आणि खाणे नसल्याने नैसर्गिक शिकारी-संग्राहक बनण्याचा प्रयत्नही केला होता (संग्राहक, शिकारी नाही) आणि ते जवळजवळ अशक्य आहे. शिवाय प्रचंड अनिश्चित आहे.

फक्त खाणे नाही तर सर्व बाबतीत तुमचे आणि धागाकर्त्याचे आजचे अस्तित्त्वच प्रगतीवर अवलंबून आहे. इथे हा जो टाहो फोडता आहात, तोही प्रगतीच्याच जोरावर. तेव्हा ज्या फांदीवर बसला आहात त्यावर घाव कशाला ?

तुम्ही आणि धागाकर्त्याने प्रगती, आधुनिकता, तंत्रज्ञानाला लक्ष्य केले आहे. तसेच बरेचदा सत्ता, संपत्ती आणि इतर अनेक गोष्टींना सध्याच्या तीव्र समस्यांसाठी जबाबदार धरले जाते (उदा. power corrupts & absolute power corrupts absolutely).
ते सर्व संपूर्णपणे चुकीचे आहे. सत्ता, ज्ञान, यंत्रे किंवा चलन हे आपणहून कधीच कोणाला काही त्रास देत नाहीत. त्याची मालकी असणार्‍याची नीतीमत्ता, चारित्र्य यावर ते अवलंबून असते. ती उच्च असायला हवी. त्याला फारसे महत्त्व दिले जात नाही आणि दुर्दैवाने जे देतात त्यांच्या वाट्याला अडचणीच जास्त येतात. सध्या किंवा ज्ञात इतिहासापासून आजपर्यंत गुन्हे/चुका करू नये आणि केल्यास शिक्षा असे होत नसल्याने/ करता येत नसल्याने आज ही वेळ आली आहे आणि त्याचे खापर वरील गोष्टींवर फोडले जाते.

रन्गराव's picture

14 Oct 2010 - 4:28 pm | रन्गराव

चूक हा शब्दच आजकाल चूकिचा झाला आहे म्हणून सोयीस्कर अस म्हणूयात. जे बरोबर असत त्याचा अंगिकार आणि अनुकरण हे नेहमिच सोप असत असा नाही. म्हणून मग बरेचजण जे सोयीच असेल ते करू लागतो. आणि पूनः पून्हा करत रहातो. आणि म्हणून त्यात काहीही वावग नाही असा एक सोयीस्कर तर्क तयार होतो. आणि मग आपण सांगितल्याप्रमाणे सोयीस्कर घातचक्र चालू होत.

Its the greatest practical JOKE!

ह्या विषयावर घासु गुर्जींनी अनेक उत्तम प्रतिसाद लिहलेले आहेत, ते वाचा हे प्रथम सुचवतो. प्रगती होतच नाही आहे हे टिपीकल निराशावादी माणसाचे बोल आहेत. वेळेत सावरा स्वतःला, हा अनाहुत सल्ला.

(बॅक्ग्राउंडाला, अरे बेमट्या साहेबाने पोष्टं आणलं ते चांगल्यासाठीच ना(?), पुर्वी लग्न व्हायची सुतकात. तिकडं कोकणात कोणीतरी मेलं तरी महिना भर पत्ताच नाही मुंबईत...)

फायदे तोटे गणित करा. फायद्याचं घ्या तोट्याच घेउ नका शिंपल आहे.

इंटरनेट आलं म्हणजे काय तुम्ही त्याचे दुष्परिणामच करुन घ्यायचे का? चांगलं ते घ्या की लेको उगाच रडता कशाला दुष्परिणामापायी.

करा पाहु तुमची नैसर्गिक शेती अन जगवा शेतकर्‍याला अन काढा पाहु उत्पन्न! मग फक्त तो श्रीमंत साहेबच मडमेसोबत भाजी खरेदीला जाउ शकेल इतकीच भाजी उरली मंडईत की मग मरा लेको भुकेने. बाकी हा नेमहीचाच रड्या विषय असल्याने इथेच थांबतो...

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2010 - 4:23 pm | llपुण्याचे पेशवेll

फायदे तोटे गणित करा. फायद्याचं घ्या तोट्याच घेउ नका शिंपल आहे.


वा खूप छान वाक्य आहे पण फारच बाळबोध आहे ते.
फायद्याचं घ्या पण तोट्याचं न घेण्याच स्वातंत्र्य नाहीये. फायद्याची म्हणून गाडी घेतली तरी तोट्याचं ट्रॅफिक जॅम न मागता मिळालं.

ओ पेशवे, ट्राफिक जॅम तुमच्या लेखी काय प्रगतीचं लक्षण आहे का?

बाकी मतितार्थ घ्या. तोटे तुम्ही स्विकारायलाच हवेत असे नाही. म्हणजे इंटरनेटाचा उपयोग करुन ज्ञानार्जन करा, पोर्न साईट्स बघु नका, असे सांगायचे आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Oct 2010 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार

पोर्न साईट्स म्हणजे ?

मोठे व्हा, मग कळेल आपॉप.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Oct 2010 - 6:27 pm | परिकथेतील राजकुमार

सांग ना दादा. प्विइइइइइइइइइइइइइइइइइइज.

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2010 - 6:28 pm | llपुण्याचे पेशवेll

अरे त्यांना पॉर्न म्हणायचे असेल.

चान चान आगदी पारने फेडलेत

पाषाणभेद's picture

14 Oct 2010 - 8:34 pm | पाषाणभेद

अहो, पॉपकॉर्न खाता खाता बघण्याच्या साईट म्हणजे पॉर्न साईट. आपल्या मिपावरही नाही का काही धाग्याच्या वेळी काही मंडळी जागा राखून ठेवतात अन पॉपकॉर्न खात बसतात तशी साईट म्हणजे पॉर्न साईट.

कॉर्न (मका) गरम केल्यावर तो पॉपतो. म्हणजे बाहेर येतो. म्हणजेच कॉर्न-पॉप होतो. काही साईट बघीतल्यावरही आपले डोळे पॉपतात म्हणजे बाहेर येतात. (म्हणजे खरोखर नाही काही. आपला वाक्प्रचार आहे.) अशा साईट म्हणजे पॉपकॉर्न साईट. त्याचे पॉर्न हा अपभ्रंश झाला आहे.

चिगो's picture

15 Oct 2010 - 11:58 am | चिगो

रसग्रहण आणि व्याख्या आवडली..

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2010 - 6:31 pm | llपुण्याचे पेशवेll

अहो मतितार्थच सांगू इच्छित आहोत. प्रगतीचे तोटे याच सदरात पॉर्न सायटी आणि ट्रॅफिक जाम हे दोन्ही येतात. आणि तो तोटा स्वीकारावा का नाही याला काही पर्याय उपलब्ध नाहीये. आहे हे असं आहे म्हणून स्वीकारायला लागतं. तोटा टाळण्याची सोय म्हणजे फायदाच न घेणे. म्हणजे गाडी घेऊन ट्रॅफिक न वाढवणं वा घरीच इंटर्नेट न घेणे वगैरे.

राजेश घासकडवी's picture

14 Oct 2010 - 2:57 pm | राजेश घासकडवी

काही वेळा जग बिघडत चाललंय असं प्रकर्षाने वाटत राहातं. जग पूर्वीही चांगलं होतं, वाईट होतं. आपल्या पोराला कुठे ठेवू नि कुठे नको ठेवू असं करणारे बाप पूर्वीही होते, आत्ताही आहेत. पूर्वीचे पालक पोराला जी भौतिक सुखं देत त्यापेक्षा आजचे पालक जास्त देऊ शकतात. पण ती खरी प्रगती नाही.

एखाद्या फ्लूच्या साथीमध्ये दशलक्षांनी लोकं मरून अनेक पोरांचे आईबाप नाहीसे होणं ही शोकांतिका. किंवा एखाद्या दुष्काळात आपलं पोर अन्नान्न होऊन मरताना बघायला लागणं ही शोकांतिका. अशा शोकांतिका आजकाल कमी होतात, हीच प्रगती.

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 3:30 pm | नगरीनिरंजन

हे सापेक्ष आहे. कोणत्या कालखंडाशी तुलना करु त्यावर हे अवलंबून आहे.
माणसाचे सरासरी जीवनमान वाढणे आणि एरवी निसर्गात दुर्बळ ठरून जी मेली असती अशी मुले कृत्रिम प्रयत्नांनी वाचवणे ही खरोखर प्रगती आहे का? शेतीमुळे लोकसंख्या वाढली, माणसे, गुरे एकत्र राहू लागली, त्यामुळे साथीचे रोग आणि दुष्काळ वगैरे संकटे वाढली, त्यासाठी औषधे, त्यातून आणखी लोकसंख्या वाढ आणि त्यातून आणखी नवे प्रॉब्लेम्स. कदाचित आता प्रश्न बदललेत आणी नव्या प्रश्नांनी अजून गंभीर रूप घेतलेले नाही. जुने प्रश्न उरले नाही म्हणजे सरसकट प्रगती झाली असं म्हणायचं का?

Nile's picture

14 Oct 2010 - 3:42 pm | Nile

कुठल्याही कालखंडाशी तुलना करा ही प्रगती आहेच.

माणसाचे सरासरी जीवनमान वाढणे आणि एरवी निसर्गात दुर्बळ ठरून जी मेली असती अशी मुले कृत्रिम प्रयत्नांनी वाचवणे ही खरोखर प्रगती आहे का?

तुमचा मुद्दा जर ही वाढलेली लोकसंख्या खरेच फायद्याची आहे का असा असेल तर तो प्रगती फायद्याची का? अश्या प्रकारचा प्रश्न आहे. पण ही प्रगती आहे ह्यात वाद नसावा.

माणसाने (प्रगती करुन) नैसर्गिक आपत्तींपासुन स्वतःचा बचाव करावा का? ही वृती मानवात पुर्वी नव्हती का? ह्या मुद्द्यांवर चर्चा करता येईल. पुर्वीही मानव टोळ्यांमध्ये राहत होता, स्वतःच्या टोळीचा बचाव करण्याची, पालन संगोपन करण्याची वृत्ती तेव्हाही होतीच.

नितिन थत्ते's picture

14 Oct 2010 - 3:45 pm | नितिन थत्ते

उशीर झाला.

अरेरे.

आपण ४०-५० हजार वर्षांपूर्वी जन्मला असतात तर बहुधा ही चर्चा करायची वेळ आली नसती.

नगरीनिरंजन's picture

14 Oct 2010 - 3:52 pm | नगरीनिरंजन

बरोबर. किंवा अजून ७० वर्षे उशीरा जन्मलो असतो तरी अशी चर्चा करायला वेळ नसता मिळाला. स्वतःहून मार्ग बदलणे किंवा मार्ग बदलण्यास भाग पडणे एवढे दोन पर्याय आहेत त्यातला आपण दुसरा निवडतोय एवढंच.

राजेश घासकडवी's picture

15 Oct 2010 - 3:11 am | राजेश घासकडवी

सापेक्षता, जुने प्रश्न उरले नाही म्हणजे प्रगती झाली का वगैरे विचारणं हा मोघमपणा झाला. त्यापेक्षा काही निरपेक्ष, सर्वमान्य सुख व दुःखांची व्याख्या मांडून तुलना करणं अधिक योग्य होईल. असं का नाही करत, तुम्ही एखादा काळ सांगा - जेव्हा सर्वसाधारण माणसाचं आयुष्य आजच्यापेक्षा सुखी होतं. मग सापेक्षता वगैरे बघता येईल.

नुसती जुनी दुःखंच गेली आणि नवी आली इतका फुटकळ व्यवहार नाही. तर सर्वसामान्य व्यक्तीसाठी सनातन व आयुष्यावर ओरखडे उठवणारी, डोळ्यांसमोर दिसणारी दुःखं कमी झाली आहेत, त्यांची जागा काहीशा सौम्य व दूरवर असणाऱ्या शक्यतांनी घेतलेली आहे. पूर्वी साथीत, दुष्काळात कर्ता पुरुष गेल्यावर होणारी कुटुंबाची वाताहत व्हायची, आता लोकसंख्या वाढीच्या किंवा पर्यावरणावर होणाऱ्या दूरगामी परिणामांच्या भीतीने भेडसवायला होतं. पहिलं गळा घोटतं, दुसरं हस्तिदंती मनोऱ्यावर काळी छाया आणतं.

नगरीनिरंजन's picture

15 Oct 2010 - 7:52 am | नगरीनिरंजन

माणूस मरणे हे दु:खदायक आहे हे सध्या आपण गृहीत धरलं तर सध्याच्या दु:खांकडे नजर टाकू या. गूगलबाबावर सहज दोन तीन शोध टाकून पाहिले तर कळेल की एकट्या भारतात दरवर्षी एक लाख तीस हजार लोक रस्त्यांवरच्या अपघातात मरण पावतात. रस्त्यांवर न होणार्‍या अपघातातले वेगळेच. आत्महत्या करणारे वेगळेच. भारतातच जवळजवळ तीन कोटी मघुमेही आणि तितकेच हृद्रोगी आहेत. त्यातले एक टक्का जरी दरवर्षी मरतात असं म्हटलं तर तीन लाख होतात. हे आणि असे आणखी काही मृत्यु जमेस धरले तर तीस लाख हा आकडा फार मोठा नाही असं वाटू लागतं नाही? आणि हे सगळं मानवनिर्मित कारणांमुळे होत नाही आहे असं समजायला काहीही आधार नाही. आणी ज्या दुष्काळात लोक मेले तोही मानवनिर्मितच होता.
मृत्युंची आकडेवारी जाऊ द्या. आप्त मरणे हे दु:खदायक असतेच, पण आजकाल दोन-तीन माणसांच्या कुटुंबातला प्रत्येकजण कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी असणे ही सामान्य बाब आहे. आप्त मरणे या बरोबरच तो मरताना आपण तिथे असू शकलो नाही हे दु:ख जास्तीचं आहे. घटस्फोटांची वाढती संख्या हे कशाचं द्योतक आहे? अमेरिकेसारख्या प्रगत देशातही शाळा-कॉलेजांमध्ये वारंवार होणारा गोळीबार, तरूण पिढीतली व्यसनाधीनता हे कशाचं द्योतक आहे? विद्यार्थ्यांच्या आणि शेतकर्‍यांच्या भरमसाठ आत्महत्या हे कशाचं द्योतक आहे? परदेशात गेलेल्या मुलांच्या वाटेकडे डोळे लावून जगणार्‍या किंवा स्वतःच्याच घरात अपमान सहन करत जगणार्‍या वृद्धांच्या संखेतली वाढ हे कशाचं द्योतक आहे?
दुष्काळ आणि साथीचे रोग नाहीत म्हणजे प्रगती झाली हे म्हणणेही मोघमच आहे. केवळ लोकसंख्या वाढली म्हणून मरणार्‍यांची टक्केवारी कमी वाटते. संख्या कमी झाली आहे याला काही आधार?
आता राहिला तंत्रज्ञानाच्या वापराचा मुद्दा. खाली इंद्रा यांनी म्हटलंय की अतिरेक नाही केला तर तंत्रज्ञान चांगलंच आहे. ते योग्यही आहे, पण किती वापर म्हणजे अतिरेक हे कोण ठरवणार किंवा ठरवतंय? अणुऊर्जा विधायक की घातक? जगातल्या सगळ्यात 'प्रगत' देशाने दुसर्‍या एका देशावर अणुबॉम्ब टाकून लाखो लोक मारले आणि तेवढेच पिढ्यानपिढ्यांसाठी अपंग करून ठेवले ही प्रगती? आज कित्येक देशांकडे अणुबॉम्ब आहेत आणि तीन सेकंदात पृथ्वी नष्ट करण्याच्या बढाया मारल्या जात आहेत, शास्त्रज्ञ चक्क ग्रह सोडून जायचा सल्ला देत आहेत ही प्रगती?
असो. बर्‍याच जणाना हे निराश माणसाचे हताश विचार वाटतील आणि बर्‍याच वेळा नकारात्मक विचार करू नको म्हणून मला गप्पही केलं जातं. पण मी बिल्कुल निराशावादी नाही आणि मला खात्री आहे की स्वतःहून किंवा नाईलाजाने का होईना हे सगळं थांबून पुन्हा माणूस निसर्गाच्या आश्रयाला जाईल. दहा हजार वर्षांच्या संस्कृतीच्या चक्राचा शेवट त्यापुर्वीच्या अवस्थेत जाऊन होणे हे स्वप्नरंजन नसून नैसर्गिक आहे. केवळ ते व्हायच्या खूप आधी त्याबद्दल बोलणारी माणसं आजच्या काळात निराशावादी किंवा मूर्खही समजली जाऊ शकतात.
स्वतः हस्तिदंती मनोर्‍यात असलं म्हणजे आजूबाजूला दु:खच नाही असं म्हणणं चूक आहे. भविष्याकडे बहिर्वक्र आरसा घेऊन आपण पाहतोय पण त्या आरशावरचा संदेश लक्षात घेण्यासारखा आहे: "थिंग्ज आर क्लोजर दॅन दे अ‍ॅपिअर".

उद्या तुमच्या ह्या प्रतिसादाला अजून कोणी एकजन उच्च विवादास्पद उपप्रतिसाद देऊन तुमचे म्हणणे खोडूनही काढेल, पण त्याने साध्य काय होणार.
एकतरी अपघात वाचेल ?
एकतरी आत्महत्या टळेल ?
एक तरी घटस्फोट होण्यापासून थांबेल ?
भविष्य काळात जर युद्ध झालेच तर अणु बॉम्ब वापरण्याचे टाळले जाईल ?

दुर्दैवाने ह्या सगळ्यांची उत्तरे आज 'नाही' अशीच आहेत.

माझा एक मूळ प्रतिसाद पुन्हा देत आहे. प्रत्येक बाब हि सुखदायक आणि घातक असतेच.
जो पर्यंत आपण प्रत्येक बाबीला एक ठराविक गुण देऊन तिचे दरवर्षी मुल्यांकन करत नाही तोपर्यंत आपण नुसते शब्दांचे खेळ पाहू.

मोबाईल चांगला का वाईट ?
इतके शुल्लक ठरविण्यासाठी आपण ढीगभर लेखांचा पाऊस पडू शकतो. पण शेवटी साध्य काय होते ?
केवळ शब्द शब्द आणि शब्द, एकदा तरी अंकांना स्थान द्या ह्या गर्दीत.

My boss always says "Just talk numbers"

अवांतर :
एक अजून सांगावेसे वाटते कि,
मिपावरील सर्व विभागानुसार सर्व सदस्यांना देखील वेगवेगळ्या विभागात एक मूल्य जाहीर मतदानाने देण्यात यावे.
याने काय होईल ?
उदा : आम्हाला संगीतातले 'अ' का 'ब' कळत नाही. ह्या बाबतीती आमचे मूल्य शून्य (०) असे गृहीत धरूया
तर मग
१) तात्यांच्या एका लेखाची आम्ही कितीही प्रशंसा केली तरी ते झाडावर चढणार नाही.
२) कोण्या नवोदित कवीची जरी टीका केली तरी तो इतके मनावर घेणार नाही.
कारण ह्या बाबतीत आमचे मूल्य शून्य आल्याने आमच्या प्रतिक्रिया त्याच मापाने तोलल्या जाणार.
याउलट जे संगीतात माहीर आहेत, त्यांचे मूल्य जास्त (१० पैकी १०) असेल तर मात्र त्यांची दाद / टीका गंभीर घेण्यात मदत होईल.

ह्याला कदाचित मिपाची प्रगती म्हणता येईल.

Pain's picture

15 Oct 2010 - 9:01 am | Pain

प्रगतीचा यात फारसा संबंध नाही. मूळ तत्व/ प्रेरणा/ कृती तीच आहे, अमलात आणण्याची साधने बदलली आहेत.

माझ्या वरच्या प्रतिसादात आहे तेच डिट्टो. एक उदाहरण घेतो-
बेस लोडमधे तर अणुउर्जेला तर काहीच पर्याय नाही. सध्या पुष़्कळ संशोधन चालू आहे पण त्याची जागा घेउ शकेल असे काहीच नाही. भविष्यात काही सापडले तर चित्र कदाचित बदलेल पण ती वेगळी गोष्ट आहे. आरोप करण्याआधी विद्युत उर्जेच्या स्रोतांची आकडेवारीतरी तपासायची होती. असो.

आणि अणुबाँब विषयी म्हणाल तर लाख माणसे मारायला अणुबाँबच लागतो असे काही नाही. मुस्लिम बादशहा, ब्रिटीश, हिटलर, जेंगीझखान या महात्म्यांनी मारली की लाखो माणसे अणुबाँबशिवाय. अणुबाँब, बंदूक किंवा तलवार हा प्रश्न नसून उगाचच्या उगाच दुसर्‍याला इजा पोहोचवू नये हे तत्त्व पाळले जात नाही हा खरा प्रश्न आहे.

आधी रामराज्य होते आणि औद्योगिक क्रांतीने सगळे बिघडवले हा तुमचा सूर पूर्णपणे चुकीचा आहे.

नगरीनिरंजन's picture

15 Oct 2010 - 9:25 am | नगरीनिरंजन

तेच म्हणतोय मी. पहिली चूक कोणती झाली ते मी वर सांगितलंच आहे. आणि आधीच्या लोकांनी लाखो लोक मारले आणी नंतरच्यांनीही मारले. मग प्रगती कोणती झाली?

तुम्ही वर म्हटलंय की तुम्ही वाट चुकलात आणि शिकारी-संग्राहक होऊन राहायचा प्रयत्न केलात आणि ते जमलं नाही. त्याचं कारण तुम्हाला सराव नाही हे असून निसर्गात काही उपलब्ध नाही हे नाही आहे. असो. तुम्ही 'मीट द नेटिव्ह्ज' नावाची एक मालिका पाहिली आहे का? मी त्याचा न्यू यॉर्कचा एपिसोड पाहिला. जमल्यास एकदा मिळवून पाहा आणि अजूनही जंगलात राहणार्‍या त्या लोकांची शरीरयष्टी पाहा, आधुनिक जीवन पद्धतीबद्दल त्यांचे विचार ऐकण्यासारखे आहेत आणि एकंदरीतच त्यांना आपल्यापेक्षा काहीतरी जास्त आणि वेगळं कळतं ही जाणीव नक्कीच होईल. ही त्याबद्द्ल माहिती.

स्वतः हस्तिदंती मनोर्‍यात असलं म्हणजे आजूबाजूला दु:खच नाही असं म्हणणं चूक आहे. भविष्याकडे बहिर्वक्र आरसा घेऊन आपण पाहतोय पण त्या आरशावरचा संदेश लक्षात घेण्यासारखा आहे: "थिंग्ज आर क्लोजर दॅन दे अ‍ॅपिअर".

क्या बात हे....... निरंजन......

खरच खूप सुंदर..............

ममो, तू खूप निराशावादी विचार करतो आहेस असं वाटलं हे वाचून. का बरं?

परिकथेतील राजकुमार's picture

14 Oct 2010 - 3:05 pm | परिकथेतील राजकुमार

प्रगती म्हणजे जोशी काकांची पोरगी :D

अन तीची खडुस आई म्हणजे महागाई का रे?

प्रगती म्हणजे जोशी काकांची पोरगी >>>

मी तर ईतके दिवस तिच नाव काहीतरी वेगळच समजत होतो !!

चिरोटा's picture

14 Oct 2010 - 3:12 pm | चिरोटा

प्रगती म्हणजे अप्पा बळवंत चौकातले प्रगती प्रकाशन.
ममो, केस बाय केस प्रगतीचे प्रॉब्लेम काय आहेत ते चर्चा केलेली बरी असे माझे मत आहे.

गांधीवादी's picture

14 Oct 2010 - 3:13 pm | गांधीवादी

प्रगति काय आहे आणि काय नाही हे पुर्ण पणे माणसाच्या नैतिकतेवर अवलंवुन आहेत. कोणतीहि गोष्ट चांगल्यासाठी कि वाईटासाठी हे केवळ माणुस त्याचा वापर कसा करत आहे पुर्ण पणे ह्यावर अवलंबुन आहे. भौतिक बाबतीत प्रगती झालेली आहे हे नक्की पण मनुष्याने त्याचा जर का योग्य वापर करायला शिकले नाही तर हि प्रगती लवकरच महागात पडेल. उदा अण्वस्त्रे.
आम्हीदेखील असा एक प्रयत्न केलेला होते कि काय चांगले आणि काय वाईट ?
आपण नजरेखालून घालावा हि विनंती.

मराठमोळा's picture

14 Oct 2010 - 3:16 pm | मराठमोळा

मित्रांनो,
एक खुलासा...

हाच काय तर माझे ईतरही बरेच लेख निराशावादी नसतात तर तुमच्या माझ्या सारख्या लोकांच्या अनुभवातुन, विचारांमधुन मी लिहिलेले असतात. अर्थात प्रत्य्के वेळी मी माझेच विचार मांडतो असेही नाही. कधी कधी ग्रुपमधे झालेल्या चर्चा, मित्र/मैत्रिणींच्या अडचणी, दु:ख/आनंद मी इथे मांडतो, ते सर्व माझेच विचार आहेत असा गैरसमज करु नये..

अर्थात जे मला ओळखतात त्याना हे सर्व माहित आहेच. पण तरीही कुणीही डोक्याला त्रास करुन घेऊ नये. आजचा लेख हा ईथे २०-३० वर्षापासुन रहाण्यार्‍या लोकांचे बोल मी मांडलेले आहेत. प्रत्येक लेख हा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने लिहिला आहे असे समजुन वाचावा. मग उगाचच माझ्याशी संबंध जोडावे लागणार नाहीत.. :)

अधिक स्पष्टीकरण हवे असल्यास व्यनी किंवा खरड करावी.

धन्यवाद. :)

अवलिया's picture

14 Oct 2010 - 3:18 pm | अवलिया

खुलाशाबद्दल धन्यवाद. :)

रन्गराव's picture

14 Oct 2010 - 4:40 pm | रन्गराव

नाव मराठमोळा ठेवून हा पश्चात्य डिसक्लेमर का बरं लावलात. आपण जो विचार मांडलात तो तुम्हला पटल म्हणून लिहिला. त्याला अस मध्येच सोडून शायिस्तेखानगिरी करण नावला शोभत नाही तुमच्या ! बाजीप्रभूंसारखी खिंड लढवा आता!

स्पा's picture

14 Oct 2010 - 3:35 pm | स्पा

"प्रगती" नामक आगगाडी सुद्धा धावते बरका ..............
(हि गाडी १९९७ साली सुरु झाली....)

नितिन थत्ते's picture

14 Oct 2010 - 3:49 pm | नितिन थत्ते

बहुधा बरीच आधी असेल.

मी १९९६च्या ऑक्टोबरपूर्वी तिच्यातून प्रवास केला आहे.

गांधीवादी's picture

14 Oct 2010 - 4:01 pm | गांधीवादी

अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला ओळखत असाल मग , मी त्याच गाडीत वडापाव विकायचो.
आठवले का ?

गांधीवादी's picture

14 Oct 2010 - 4:28 pm | गांधीवादी

-

गांधीवादी's picture

14 Oct 2010 - 4:28 pm | गांधीवादी

-

अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला ओळखत असाल मग , मी त्याच गाडीत वडापाव विकायचो. >>>

व्वा !! व्वा !! व्वा !!

अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला ओळखत असाल मग , मी त्याच गाडीत वडापाव विकायचो. >>>

व्वा !! व्वा !! व्वा !!

अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला ओळखत असाल मग , मी त्याच गाडीत वडापाव विकायचो. >>>

व्वा !! व्वा !! व्वा !!

अरे व्व्वा, कदाचित तुम्ही मला ओळखत असाल मग , मी त्याच गाडीत वडापाव विकायचो. >>>

व्वा !! व्वा !! व्वा !!

स्पा's picture

14 Oct 2010 - 4:32 pm | स्पा

हो मला आठवले.......

मी १० वर्षाचा होतो फक्त....... तेव्हा मी तुम्हच्या कडे बघून बाबांजवळ हट्ट धरला होता.....
मला याच आजोबांकडून वडापाव हवाय म्हणून...... ;)

चिरोटा's picture

14 Oct 2010 - 10:01 pm | चिरोटा

अरे मी प्रगतीतून ९३ मध्येपण प्रवास केलाय. पण तिचाही वेग डेक्कन क्वीनएवढाच असल्याने फार काही प्रगती झाली आहे असे म्हणता येणार नाही.

गांधीवादी's picture

14 Oct 2010 - 3:28 pm | गांधीवादी

मला वाटते कि प्रगती झालीस कि नाही हे ठरविण्यासाठी काही ठराविक विभाग करावेत. आणि प्रत्येक विभागाला एक जाहीर चर्चा करून गुणांकन द्यावे.
जसे : मोबायील.
आता मोबायील म्हणाले कि त्यात प्रगती आणि हानी दोन्ही आलेच.
एक वर्षाखेर त्या मोबायील ने किती मदत केली आणि त्यामुळे किती हानी झाली हि माहिती करून त्या विभागाला एक गुण देणे. दरवर्षी त्या गुण पडताळून बघणे आणि निश्चित करणे कि खरच ह्या विभागात प्रगती करत आहोत कि अधोगती.

अवांतर : हे सर्व करण्याची खूप इच्छा आहे पण कुठून सुरुवात होत नाहीये.
(my boss always says "just talk numbers")

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Oct 2010 - 4:27 pm | llपुण्याचे पेशवेll

मोबायील शब्द लै आवडला.

छोटा डॉन's picture

14 Oct 2010 - 3:29 pm | छोटा डॉन

जाऊ द्या हो शेठ, कशाला उगाच त्रास करुन घेता ?
ह्या दुनयेत एकही गोष्ट चांगली नाही आणि वाईटही नाही, जे काही आहे ते आपल्या दृष्टीकोनावर आहे.
पटतेय तोवर रहायचे / पहायचे / ऐकायचे, जास्तच झाले तर आपला मार्ग मोकळा आहेच की.

शोलेचे ते जगप्रसिद्ध नाणे सोडुन प्रत्येक गोष्टीला २ बाजु आहेत, काय म्हणता ?

असा त्रागा ( बहुतेक जराशा हार्श पण चपखल शब्द ) करुन काही फायदा होत नाही.

- छोटा डॉन

गांधीवादी's picture

14 Oct 2010 - 3:37 pm | गांधीवादी

>>जे काही आहे ते आपल्या दृष्टीकोनावर आहे.
पण डॉन भाऊ बर्यान्चदा आपल्याला दुसर्यांच्या दृष्टीकोनाचेच बळी पडतो.

>>पटतेय तोवर रहायचे / पहायचे / ऐकायचे, जास्तच झाले तर आपला मार्ग मोकळा आहेच की.
कोणता मार्ग आणि कुठे आहे ? मार्ग एकंच आहे, जनजागृती करणे. जनहितार्थ जे आहे तेच करावयास भाग पाडणे

>>असा त्रागा ( बहुतेक जराशा हार्श पण चपखल शब्द ) करुन काही फायदा होत नाही.
नाही डॉन भाऊ, प्रत्यके वेळेस असे होत नाही. कुठेतरी कधीतरी प्रत्येकजन विचार करत असतो. हि चर्चा शेकडो लोक वाचत असतात, पुढे हजारो वाचतील. कदाचित काहीतरी चांगले घडू शकेल.

राक्या , तुला नेमक काय झालय ?

परत ब्रेक-अप झाला का

इन्द्र्राज पवार's picture

14 Oct 2010 - 5:48 pm | इन्द्र्राज पवार

श्री.ममो यांनी मूळ धाग्यात आणि नंतर काही प्रतिसाद वाचून झाल्यावर एक खुलासा म्हणून 'हे एका अज्ञाताने लिहिले आहे' अशी त्यांची चेतावणी वाचल्यानंतर एक बाब ते मान्य करतात की आपल्या देशाने प्रगती केली आहे, आणि करत आहे. हा Present Continuous Tense इथे महत्वाचा आहे, कारण जर अमेरिकेसारखा संपन्न देश प्रगतीची पाने उघडण्याचे थांबवत नाही, तर भारताने तरी 'आपली प्रगती झाली पुरेशी, आता थांबू या' असे म्हणण्यात हशील नाही.

प्रगतीची व्याख्या हा खरंतर एक मानसिक खेळ आहे आणि अगदी रामायण-महाभारतापासून चालत आलेली मानवाची 'सुखाची' ती एक कल्पना आहे. कृष्णेकाठी राहून मासेमारी करून, प्रसंगी कंदमुळे खाऊन जगणारा, आणि त्या वडाच्या तुटपुंज्या आवरणात राहूनही संसाराद्वारे प्रजा वाढविणारा आपला मूळपुरूष काय आणि शिक्षणामुळे आता देशाची सीमा ओलांडून थेम्स नदीच्या किनारी संडेला बोटिंग करीत एखाद्या एल्सीला घेऊन 'फिशिंग' करणारा एकनाथ काय, दोघांच्या 'जीन्स' मध्य मूलतः काहीच फरक नाही...फरक आहे तो प्रगतीच्या व्याख्येत. या एकनाथाचे पूर्वज उन्हाळ्यात उन्हामुळे मरत आणि जे जगत ते थंडीने काकडून मरत...जे चिवट असत तेच तगत, आणि प्रजा वाढविण्यासाठी सक्षम राहत. आता एकनाथाकडे सहा आकडी पासबुक असल्याने त्याला वाचविण्यासाठी उन्हाळ्यात लॉईडचा ए.सी. येतो तर थंडीसाठी इव्हान्सचा हीटर आहे. म्हणजेच एकनाथाच्या पिढीने त्या निसर्गाच्या रट्ट्यावर काही प्रमाणात का होईना मात केली आहे हे मान्य करावे लागेल आणि ही मिळकतच तो 'मानवाने विज्ञानाच्या आधारे केलेली प्रगती' मानतो.

सरासरी आयुष्यमान वाढले आहे हे कुणीही नाकबूल करणार नाही. बायपास नावाची कसली तरी शस्त्रक्रिया आहे हे ५० वर्षापूर्वी ऐकीवातदेखील नव्हते पण आज देशाच्या निमशहरी भागातील नाक्यानाक्यावर याचे स्पेशालिस्ट गेट उघडे ठेवून तुमचे आयुष्य वाढविण्याची हमी देत बसले आहेत. ही मानली तर प्रगतीच आहे आणि इथला कुणीही सदस्य वेळ आली तर 'बायपास' करून घेण्यासाठी पाठ फिरविणार नाही.....(देव करो तशी वेळ कुणावर येऊ नये....!!)... आता शरीर विज्ञानात ही जी क्रांती झाली आहे तिचे दुष्परिणाम शोधण्याचा प्रयत्न कुणी करू नये कारण त्यातून डोकेदुखीशिवाय काहीही निष्पन्न होत तर नाहीच, शिवाय मेडिसिन, इंजिनिअरिंगमधील नवनवीन होत असलेली प्रगती थांबतही नाही. 'थांबला तो संपला' हे विधानच मानवी प्रगतीला पोषक असे ठरले गेले आहे.

ही प्रगती माणसं बदलु शकली का? असा म.मो. यांनी प्रश्न विचारला आहे. काय नेमके तुम्हाला इथं अभिप्रेत आहे? सुख, समाधान शेवटी हे मानण्यावर आहे, हे तरी तुम्हाला अमान्य नसेल ना? १ लाख हजार कोटी रुपयांची माया जमविलेले मुकेश अंबानी काय आणि एस.टी.स्टँडवर हमाली करणारी व्यक्ती काय....दिवसातून दोनच वेळा जेवणार ना? "माझ्याकडे तुफान पैसा आहे म्हणून मी आजपासून चार वेळा ताजमध्ये जावून चापणार..." असे कुणीही म्हणत नाही. नीतासाठी मुकेशने आठ हजार कोटीचा राजेशाही बंगला बांधणार अशी घोषणा केली, म्हणजे नीता त्यात राहून डबल सुखी होणार असा बिलकुल अर्थ कुणी घेत नाही. ती ती व्याख्या त्या त्या व्यक्तीच्या मगदुराप्रमाणे ठरत असल्याने ती बदलणे स्वाभाविकच आहे. रिलायन्सचा नोकर सकाळी ८ वाजता उठतो तर रिलायन्सचा मालक पहाटे ५ वाजता उठून कामाला सुरुवात करतो. आता या दोन व्यक्तींच्या सुखाची आणि प्रगतीची व्याख्या कोणती असेल?

प्लॅस्टिक आणि इंटरनेट यांचे उदाहरण श्री.ममो यांनी दुष्परिणाम दर्शविणासाठी दिले आहे ते मला साफ अमान्य आहे. या दोन्ही घटकांना 'अतिरेक' नावाचा फ्लॅग लावला तरच त्याचे परिणाम 'दु' होतात अन्यथा प्लॅस्टिक सुरुवातीच्या काळात 'सु' म्हणूनच ओळखले जात होते आणि आजही ते पूर्णतः व्यवहारातून सरकारने घालविले आहे का? नाही, तर उलट ते ठेवण्यासाठी त्यात 'प्रगती' दायक सुधारणाच सुचविल्या आहेत. दुष्परिणामच बघायचा असेल तर आजकालची वर्तमानपत्रे पाहा, जी २०-३० पानांच्या अनावश्यक आवृत्त्या काढत असतात त्यामुळे पर्यावरणाची काय हालत होत आहे, त्यावर खरा तर तज्ज्ञांनी प्रकाश टाकणे गरजेचे बनले आहे. तीच गोष्ट 'इंटरनेट' ची. मला तर वाटते इंटरनेटच्या उपयुक्ततेविषयी लिखाई-पढाई होण्यापेक्षा ते किती हानीकारक आहे हे सांगण्याचाच ढोल जास्त पिटला जातो, पण असे असले तरी म्हणून इंटरनेट आपल्या आयुष्यातून निघून जाईल असे कुणीही मानू नये.

५० वर्षापूर्वी घरगुती 'गॅस' इथे आला त्यावेळीही 'हे म्हणजे, प्रगतीच्या नावे घर अपवित्र करण्याचाच सरकारचा डाव आहे, गॅसमुळे स्फोट होतात, भाकरीला वास येतो, भात कच्चा राहतो....मुलांना धोकादायक असतो' आदी वावड्या उडाल्या होत्या असे आपले वरिष्ठ सांगतात. आज काय स्थिती आहे? आहे एक तर गृहिणी या राज्यात जी गॅसवर स्वयंपाक नको म्हणेल? याचेही दुष्परिणाम असतीलच, पण म्हणून ही सुविधा कुणी काढून टाकून 'घरोघरी मातीच्या चुली' लावा असे म्हणणार नाही.

निसर्गाने वरदान दिले आहे असे तुम्ही म्हणता. कसले आहे हे वरदान? 'जगा आणि जगू द्या...' ही खरेतर निसर्गाची शिकवण आहे जी कुठल्याही चार भिंतीत असलेल्या शाळेत शिकविली जात नाही. चुका होत असतील निसर्गाचे संतुलन कायम ठेवण्यामध्ये, पण म्हणून त्या सुधारल्या जात नाहीत, किंवा जाणार नाही असे मानव कधीही म्हणणार नाही. हे एक चक्र आहे जे पृथ्वीच्या पहिल्या प्रकाशमय दिवसापासून अखंड चालत आले आहे, आणि ते चालते ठेवले आहे केवळ मानवानेच....पशूत आणि मानवात फरक आहे तो इथेच. ~ टेंड्न्सी टु सर्वाईव्ह.... डायनॉसॉर सदृश्य प्राण्यांनी ही टेन्डंसी ठेवली नाही आणि ते नष्ट झाले. मानवाने मेंदूच्या आधारावर ती टेंडंसी सातत्याने जागृत ठेवली आणि इतके उल्कापात झाले तरी तो 'प्रगती' नामक वाहनात बसून अखंड प्रवास करीत राहिला आहे, राहील.

मानवी प्रगतीवर बोलता बोलता म.मो. यांचा 'अज्ञात' एकदम लग्नाच्या मांडवात कुंडल्यांतील ग्रहांसमवेत उतरला आहे. मी तर म्हणेन हे सर्व सापेक्ष आहे. तुम्हाला असे म्हणायचे आहे का, लग्नातील हे बिनकामाचे आगावू राहुकेतू फक्त हिंदू अंगणातच बागडतात? कुठल्याही खंडात हे बंधू त्या त्या रुपात गोंधळ घालत असतीलच. त्याचा मानवी प्रगतीशी दूरान्वयेही संबंध नाही. लग्ने अडून राहतात, आणि होतही असतातच. ग्रहांचा हा खेळ आज २०१० साली आहे, म्हणजे तो १९१० वा १८१० साली किती असेल...? तितका तरी राहिलेला नाही ना? आणि जर तसा राहिला नसेल तर मग ते तुम्ही आम्ही घेत असलेल्या शिक्षणामुळेच आणि विचारात पडत गेलेल्या फरकामुळेच घडून आले आहे, असे म्हटले पाहिजे.

जेवणातील अन्नघटकांच्या प्रयोगाविषयी जी क्रिया जागतिक पातळीवर चालली आहे ते करणारी बुद्धी शेवटी मानवाचीच आहे ना? तिथे तर कुणी "मंगळ्या" आलेला नाही. विविधरितीने अनेकविध प्रयोग करत राहण्याची जिद्द मानवाने नेहमीच बाळगली आहे, मग अन्नधान्यावरील प्रयोग तरी का वेगळे मानावेत. शेवटी आजच्या बाळ्याने आपल्या आईला 'आई' म्हटले किंवा 'मम्मी' म्हटले, तिला त्याच्याविषवी वाटणारी ओढ तीळभरदेखील कमी होणार नाही.....बाळ्याच्या बाळासाहेब झाल्यावर त्याला आईची ओढ राहिली नाही तर तो परिस्थितीचा दोष असेल, प्रगतीचा नाही.

तुमच्या त्या "अज्ञाता" च्या शंका रास्त असतीलही पण दुर्दैवाने त्या 'निगेटीव्ह' विचारसरणीच्या वाटतात. त्यांना विरोध किंवा उपदेश करायचा म्हणून हे लिखाण नाही तर त्यांना समजून घेऊन ती विचारसरणी पॉझिटिव्ह कशी होईल हे पाहण्यासाठी आहे. आजच्या पिढीकडे प्रचंड प्रमाणावर उत्साह आला आहे, ती ऊर्जा, शक्ती वाया जाऊ नये असे वाटत असेल तर उगाच कुठल्यातरी भावनेच्या आहारी जाऊन प्रगतीची कवाडे बंद करण्याचा यत्न करू नये, इतकेच.

इन्द्रा

गांधीवादी's picture

14 Oct 2010 - 6:14 pm | गांधीवादी

फिदा
(वाचून खोक्यात पहिले जे आले तेच लिहील.)

रन्गराव's picture

14 Oct 2010 - 6:44 pm | रन्गराव

techno utopia ह्याच इतका लांबलचक भाषांतर असेल हे माहिती नव्हत ;)

इन्द्र्राज पवार's picture

14 Oct 2010 - 8:17 pm | इन्द्र्राज पवार

१. श्री.गांधीवादी ~ 'फिदा' ही अदा कधीही खोक्यातून येत नाही, ती येते ती डोक्यातूनच कारण तिथे एक रज्जू असा असतो की, व्यक्ती पाहिली असो वा नसो, तिच्याकडून मेंदूने घेण्यासारखे काहीतरी स्वीकारले (मौखिक्/लिखित्त्/दृश्य स्वरूपात....इ.) तर त्याचे वहन तात्काळ त्या रज्जुकडे जाते आणि अगदी सहजगत्या त्या भावनेला आकार येतो 'व्वा..." ~ ही व्वा दादच फिदाचे प्राथमिक स्वरूप आहे.... म्हणून मी तुमची ही दाद खोक्यातून आलेली नाही असे ठामपणे म्हणू शकतो. एनी वे, थॅन्क्स !

२. श्री.रन्गराव ~ वेल, प्लॅटोचे रिपब्लिक आणि यूटोपियाचा उगम त्यामुळे मला माहित आहे, पण त्याने वा त्याच्या फॉलोअरने 'टेक्नो यूटोपिया' सादर केला असला तर त्यापासून मी अनभिज्ञ आहे. अर्थात तसे असेल तर मी जरून वाचेन.

(ते 'नाद खुळा' मात्र भावले....! थॅन्क्स !)

इन्द्रा

बेसनलाडू's picture

14 Oct 2010 - 10:54 pm | बेसनलाडू

हल्ली मी दोन पवारांना जामच वचकून असतो - एक दिल्लीतले आणि दुसरे हे मिसळपाववरचे! :)
(घाबरट)बेसनलाडू
अर्थात इंद्रराजेंच्या अभ्यासपूर्ण आणि सविस्तर प्रतिसादांचे आपण पंखे आहोत, हेही कबूल करतोच.
(प्रामाणिक)बेसनलाडू

इन्द्र्राज पवार's picture

15 Oct 2010 - 12:02 am | इन्द्र्राज पवार

अहो बेला.....दिल्लीतल्या पवारांना त्यांचा एकुलता एक जावईदेखील वचकून राहत नाही, मग इतरांची बात सोडाच. तीच गोष्ट या मिपावरील पवाराची ! गल्लीतून मी मध्यरात्री ये-जा करीत असलो तरी तेथील कुत्रेही साधे गुरगुरून मला किंमत देत नाही....असला आमचा वचक ! तेव्हा फर्गेट धिस वचक बिझिनेस.

प्रतिसाद आवडल्याचा उल्लेख केला त्याबद्दल मन:पूर्वक आभार.

इन्द्रा

शहराजाद's picture

15 Oct 2010 - 9:03 am | शहराजाद

उत्तम प्रतिसाद इन्द्रा, कीर्तीला 'साजेशी संथ पण दमदार सुरवात' आणि पुढे 'घणाघाती आणि शैलीदार फटकेबाजी' :)
आमचा प्रतिसाद आमच्या शक्तीप्रमाणे छोटासा- 'सहमत'.

शिल्पा ब's picture

14 Oct 2010 - 11:02 pm | शिल्पा ब

काय रे बाबा , का एवढा उदास ? डाक्तरकडं जाऊन ये ...

आणि इंद्रजीत पवारांचा प्रतिसाद आता संपेल मग संपेल करत वाचला तरी अर्धवटच वाचून झाला होता...मग तो नाद सोडला.

इन्द्र्राज पवार's picture

15 Oct 2010 - 12:11 am | इन्द्र्राज पवार

".....मग तो नाद सोडला..."

~ अहो शिल्पाताई, असं करू नका. तिकडे त्या प्रियाली, पुष्करिणी आणि अदिती ओरडायला लागलेत की मी त्यांच्या धाग्यावर तीनच ओळीचा प्रतिसाद दिला यासाठी.....आणि इकडे तुम्ही तो मोठा झाला म्हणून अर्धवट वाचला...आणि नंतर तर नादच सोडला असे म्हणता.

मग मी नेमके काय करावे असे इथल्या भगिनीमंडळाचे म्हणणे आहे?

इन्द्रा

शिल्पा ब's picture

15 Oct 2010 - 1:12 am | शिल्पा ब

तुम्ही दुसऱ्या कोणाचं ऐकू नका...जे तुम्हाला पटेल तेच करा.

(पण माझंच जरा ऐका आणि हे ssssssss एवढे प्रतिसाद नकाच टंकू...एकदम शाळेतला धडा वाचल्यासारखे वाटते. हेच इतर मेगाबायटी प्रतिसाद टंकूंना पण सांगणे आहे.)

Pain's picture

15 Oct 2010 - 9:15 am | Pain

हाहाहा :D मस्त!

आणि ते इंद्रजीत नसून इन्द्र्राज/ इन्द्रराज आहे.

इन्द्र्राज पवार's picture

15 Oct 2010 - 11:04 am | इन्द्र्राज पवार

वरील काही प्रतिसादात सर्वश्री निरंजन, गांधीवादी आणि Pain यांनी मांडलेलेच मुद्दे पुढे थोडे विस्ताराने घेतो.

अपघाती आणि मधुमेही मृत्युंची संख्या चिंतेत टाकणारी आहेच; पण जीवनमृत्युचा खेळ ही काय या विज्ञानयुगाची देणगी नसून पूर्वांपार चालत आलेली एक नैसर्गिक प्रक्रिया असे मानले तर या आकडेवारीची भीती काही प्रमाणात कमी होईल. अर्थात रस्त्यावरील अपघात ही 'निसर्गरावां'ची करणी नसून Man destroys Man या व्याख्येत येईल. पण पूर्वीही भूकंप, महापूर, दुष्काळ या आपत्तीत मरणार्‍यांची संख्या प्रचंड होतीच, तीच गोष्ट आजारपणाची. प्लेग, कॉलरा, कुपोषण या सारख्या महामारीत लाखाने जीव गमावल्याचा आपला इतिहास सांगतोच. परकीय आक्रमणाची तर गोष्ट हीच बाब अधोरेखीत करते की सैनिकांसमवेत नागरी कत्तलीही तीव्रतेने झाल्या होत्या.

श्री.निरंजन म्हणतात ".....ज्या दुष्काळात लोक मेले तोही मानवनिर्मितच होता." ठीक आहे. पण असे किती दुष्काळ या देशात पडले आणी त्यातील मानवनिर्मित किती? माझ्या माहितीप्रमाणे १९४३-४३ चा बंगालचा एकमेव (लक्षणीय) अपवाद वगळता अन्य दुष्काळ हे निसर्गाच्या कोपाचीच उदाहरणे आहेत. सरकार काही करत नाही असेही वारंवार म्हणू नये. त्यावेळीही चर्चिलने नसले तरी लॉर्ड वेव्हेलसारख्या हिंदुस्थानप्रेमी व्हाईसरॉयने शेवटी दुष्काळावर मात केलीच. तीच गोष्ट आजच्या सरकारचीही आहे. असेल प्रचंड प्रमाणावरील भ्रष्टाचार यंत्रणेत, पण म्हणून दुष्काळ, भूकंप, महापूर आदी विक्राळ भयप्रसंगी शासन यंत्रणा किती आणि कशी राबते हे मी स्वतः अनुभवलेय.

हां ~~ एक गोष्ट निर्विवादपणे मान्य करायला हरकत नाही की, नात्याच्या बंधनातील वीण हळुहळू सैलसर होत चालली आहे. वाढते घटस्फोट, एकत्र कुटुंब पद्धतीचा होत असलेला र्‍हास, वृध्दाश्रमांची भासणारी गरज आणि वाढती संख्या, नव्या नवरीला घरी केवळ नवराच असावा अशी वाटणारी आस (अपवाद आहेत...), पन्नास हजार पगार झाला तरी सहा आकडेवाल्याकडे असूयेने बघणारी नजर, सदैव शिडीच्या पायर्‍या चढण्याच्या नादात आयुष्याला दिलेले रखरखीचे रूप, घरी आलेली मित्र, नातेवाईक, शेजारी कधी एकदाचा आता उठेल (कारण 'अनुबंध...' चुकेल) आणि बाहेर पडेल याची वाट पाहणारे जोडपे.... ही मानसिकता बदलण्याचे कारणदेखील भौतिक प्रगतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. वरपांगी आम्ही सुखी आहोत, घर्/फ्लॅट्/बंगला/इंटेरिअर्/बॅन्क बॅलन्स/मुलांचे शिक्षण इ. सगळे आलबेल आहे. मूलभूत बदल झाला आहे तो जीवनविषयक दृष्टीकोन व सामाजिक व्यवहार या घटकात. "मी माझ्यापुरता.." ही या प्रगतीच्या युगाची देणगी आहे असे म्हणू या हवे तर.

असे असले तरी सर्वत्रच कृष्णमेघ दाटून आले आहेत अशी परिस्थिती बिलकुल नाही. 'इंडियन कमिटी फॉर कल्चरल फ्रीडम या नवी दिल्लीच्या संस्थेने करवून घेतलेल्या एका पाहणी असे आढळून आले की, पोस्ट-ग्रॅज्युएशनच्या विविध शाखांत घेणारे विद्यार्थी (मेल-फीमेल....जे साधारणतः Mature समजले जातात) आणि त्यांचे आई-वडील यांचा जीवनविषयक दृष्टीकोन आणि मूल्ये बव्हंशी एकसारखीच होती. याचात अर्थ असा की आजचा विद्यार्थी ज्यावेळी 'मागच्या' पिढीच्या वर्तनावर टीका करतो, त्याचवेळी त्याच्या लक्षात आणले जात होते की काही वर्षानी खुद्द त्याची गणनादेखील 'मागच्या पिढीतील माणूस' अशी होणार आहे; सबब हे एकमेकाच्या कॉलरी धरणे हे चक्र सदोदितच चालणारे आहे हे सिद्ध झाले.

मुलगा प्रस्थापितांविरूध्द, बापाविरूद्ध बंड करतो आहे असे म्हटले जाते; असेलही... मात्र हे बंड औरंगजेबाने शहाजहानविरूद्ध केलेल्या धाटणीचे असणार नाही हे नक्की, कारण जरी आपल्या आजच्या शिक्षणाने 'श्याम' आणि 'श्रावण' मोठ्या प्रमाणावर जन्माला येत नसले तरी चंगेझखान/नादीरशाह तर येत नाहीत, ही बाब सर्वमान्य व्हावी.

इन्द्रा

मराठमोळा's picture

15 Oct 2010 - 12:08 pm | मराठमोळा

पवार साहेब,
शब्दा शब्दाशी सहमत आहे..
असो,
प्रगती झाली काय किंवा न झाली काय.. बेसिक्स जिथल्या तिथेच आहेत.. (वाटत नसले तरी) :)

थेअरी ऑफ रिलेटीविटीच म्हणा हवं तर. ;)

अविनाशकुलकर्णी's picture

15 Oct 2010 - 1:03 pm | अविनाशकुलकर्णी

थोडक्यात आम्हि लवासा गाव वसवायचे नाहि असे म्हणा ना..कशाला उगेच आड वळणाने प्रगति वगैरे..